Maharashtra

Jalna

CC/45/2011

Kantilal Chabildas Shaha - Complainant(s)

Versus

Maharashtra State Electricity Distribution co. Partur - Opp.Party(s)

V.G.Patil (Akanikar)

28 Dec 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/45/2011
 
1. Kantilal Chabildas Shaha
Partur Tq. Patur
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Maharashtra State Electricity Distribution co. Partur
Partur Tq.Patur
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Mr. D. S. Deshmukh PRESIDENT
 HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 HONABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:V.G.Patil (Akanikar), Advocate for the Complainant 1
 J.C.Badve, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

 (घोषित दि. 28.12.2011 व्‍दारा श्रीमती रेखा कापडिया सदस्‍या)
 
      अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी आवस्‍तव वीज बिल आकारणी केली त्‍याबाबत अर्जदाराने तक्रार केली असता त्‍याची दखल घेण्‍यात न आल्‍यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
      अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी मे 2009 पर्यंत दिलेली वीज बिले नियमितपणे भरलेली आहेत. गैरअर्जदार यांनी जून 2009 ते नोव्‍हेंबर 2009 या काळात वीज बिले दिले नाही. डिसेंबर 2009 मध्‍ये त्‍यांना 842 युनिट वीज वापराचे 4,597.70 रुपयाचे व मागील थकबाकी 51441=52 रुपये असे एकूण 57,770/- रुपयाचे बिल देण्‍यात आले. त्‍यानंतर त्‍यांना सतत वाढीव वीज बिल देण्‍यात आले. अर्जदाराने याबाबत केलेल्‍या तक्रारीची दखल गैरअर्जदार यांनी घेतली नाही. दिनांक 29.03.2011 रोजी कोणतीही पूर्व सूचना न देता गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा वीज पुरवठा खंडीत केला. अर्जदाराने 7,000/- रुपयाचा भरणा केल्‍यानंतर गैरअर्जदार यांनी वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन दिला. अर्जदाराने योग्‍य वीज बिल आकारणी करण्‍याची व वाढीव वीज बिल रद्द करुन मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
      अर्जदाराने तक्रारी सोबत वीज बिलाच्‍या प्रती जोडल्‍या आहेत.
      गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या जवाबात अर्जदाराने घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असल्‍याचे मान्‍य केले आहे. जानेवारी 2009 पर्यंत अर्जदारास देण्‍यात आलेले वीज बिल योग्‍य असल्‍याचे सांगून फेब्रूवारी 2009 पुढील काही महिने अर्जदाराचे घर बंद असल्‍यामुळे त्‍यांना सरासरीवर अधारीत 290/- रुपयाचे बिल आकारण्‍यात आले. ऑगस्‍ट 2009 मध्‍ये रिडींग उपलब्‍ध झाल्‍यानंतर अर्जदारास 7 महिन्‍याचे एकूण 36,104/- रुपयाचे बिल आकारण्‍यात आले, जे योग्‍य असल्‍याचे गैरअर्जदार यांचे म्‍हणणे आहे. मे 2010 मध्‍ये गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे मीटर बदलले व त्‍यानंतर फेब्रूवारी 2011 व मार्च 2011 या महिन्‍यात वीज बिल कमी करुन देण्‍यात आले आहे. अर्जदारास देण्‍यात आलेले बिल योग्‍य असल्‍याचे सांगून गैरअर्जदार यांनी तक्रार खारीज करण्‍याची विनंती मंचास केली आहे.
      अर्जदार व गैरअर्जदार यांच्‍यातर्फे मंचात दाखल करण्‍यात आलेल्‍या कागदपत्रांचे निरीक्षण केल्‍यावर असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून त्‍याचा ग्राहक क्रमांक 524010020301 असा आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडे बसविलेल्‍या जुन्‍या मीटरचा क्रमांक 8000086697 असा आहे. गैरअर्जदार यांच्‍या तर्फे अर्जदाराचे मीटर डिसेंबर 2008 मध्‍ये बदलण्‍यात आले व त्‍या ठिकाणी आर.सी. 000166 या क्रमांकाचे मीटर बसविण्‍यात आले. सदरील मीटर हे डिसेंबर 2008 ते एप्रिल 2010 या काळात कार्यरत असल्‍याचे सी.पी.एल. वरुन दिसून येते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास या कालावधीत अनेकदा चुकीच्‍या वीज बिलाची आकारणी केल्‍याचे दिसून येते. गैरअर्जदार यांच्‍या तर्फे मंचात दाखल करण्‍यात आलेल्‍या मीटर बदली अहवालाचे निरीक्षण केल्‍यावर आर.सी. 000166 या क्रमांकाचे मीटर दिनांक 17.05.2010 रोजी बदलण्‍यात आले व त्‍याजागी 22815353 या कमांकाचे नवीन मीटर लावण्‍यात आले. सी.पी.एल. च्‍या नोंदीवरुन अर्जदाराकडे सद्या हे मीटर चालू असल्‍याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास या काळात देखील अनेक वेळेस चुकीची वीज बिल आकारणी केल्‍याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी आपल्‍या जवाबात डिसेंबर 2008 ते एप्रिल 2010 या काळात बसविलेले आर.सी. 000166 या क्रमांकाच्‍या मीटर बाबत कोणतेही स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही. तसेच सदरील मीटर केंव्‍हा बसविले, त्‍याची सुरुवातीची रिडींग काय होती याबाबतीत कोणताही खुलासा केलेला नाही. सी.पी.एल. चे निरीक्षण केल्‍यावर गैरअर्जदार यांनी अर्जदारास अनेकवेळेस वाढीव वीज बिल आकारणी केली आहे तर काही वेळेस रिडींग न घेता वीज बिल आकरणी केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदार यांची ही कृती सेवेतील त्रुटी मानण्‍यात येते.
      वरील सर्व निरीक्षणावरुन व गैरअर्जदार यांनी अर्जदारास तीनही मीटर वरील रिडींग योग्‍य प्रकारे न घेता वीज बिल आकरणी केली असल्‍यामुळे वरील तीनही मीटरचा कालावधी व त्‍यावरील नोंदविण्‍यात आलेल्‍या वीज वापर लक्षात घेता अर्जदारास सुधारीत बिल देणे योग्‍य ठरेल असे मंचाचे मत आहे.
      गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्‍या येथे डिसेंबर 2008 ते ऑगस्‍ट 2011 या दरम्‍यान तीन मीटर बसविले असून त्‍याचा कालावधी व वीज वापर सी.पी.एल. वरुन खालील प्रमाणे दिसून येतो.
 

मीटर क्रमांक
कालावधी
रिडींग
वीज वापर
 
8000086697
जानेवारी 2008 ते नोव्‍हेंबर 2008
(11 महिने)
 
8038 7430
 
508 युनिट
 
आर.सी. 000166
डिसेंबर 2008 ते एप्रिल 2010
(16 महिने)
 
8478 3420
 
5058 युनिट
12015353
मे 2010 ते ऑगस्‍ट 2011 (15 महिने)
2327 1
2326 युनिट

     
      गैरअर्जदार यांनी जवाबा सोबत योग्‍य ती कागदपत्रे न दिल्‍यामुळे डिसेंबर 2008 ते ऑगस्‍ट 2011 या कालावधीसाठी अर्जदारास वरील युनिट वापराप्रमाणे वीज आकारणी करणे योग्‍य ठरेल.
 
आदेश
 
  1. गैरअर्जदार यांनी अर्जदारास जानेवारी 2008 ते नोव्‍हेंबर 2008 या कालावधीसाठी 508 युनिट वीज वापराचे, डिसेंबर 2008 ते एप्रिल 2010 या काळात 5058 युनिट वीज वापराचे व मे 2010 ते ऑगस्‍ट 2011 या काळात 2326 युनिट वीज वापराचे बिल आकारावे.  
  2. गैरअर्जदार यांनी अर्जदाराने भरलेल्‍या रकमेची त्‍यातून वजावट करावी.
  3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास वरील प्रमाणे सुधारीत बिल 30 दिवसाच्‍या आत द्यावे व त्‍यास कोणतेही व्‍याज व दंड आकारु नये.
  4. गैरअर्जदार यांनी अर्जदारास खर्च व मानसिक त्रासाबद्दल रुपये 1,500/- 30 दिवसाच्‍या आत द्यावे.             
 
 
[HONORABLE Mr. D. S. Deshmukh]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER
 
[HONABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.