Maharashtra

Nagpur

CC/10/99

Shri Mohanlal Hiralal Chouhan - Complainant(s)

Versus

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. - Opp.Party(s)

Adv. Tapdiya

02 Aug 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR.District Consumer Forum, 5th Floor, New Administrative Building, Civil Lines, Nagpur-440 001
Complaint Case No. CC/10/99
1. Shri Mohanlal Hiralal Chouhan1270, Vaishalinagar, NagpurMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.NagpurMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :Adv. Tapdiya, Advocate for Complainant

Dated : 02 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                     -// आ दे श //-
               (पारित दिनांक : 02/08/2010)
 
1.           प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्‍द मंचात दिनांक 05.02.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          तक्रारकर्ता हा सन 2003 पासुन कापड विक्रीचा व्‍यवसाय करतो, तर तो सन 1994 पासुन गैरअर्जदारांचा ग्राहक असुन नियमीतपणे देयकांचा भरणा करीत असल्‍याचे त्‍याने तक्रारीत नमुद केले आहे. तक्रारकर्त्‍याने पुढे नमुद केले आहे की, त्‍याने सन 1994 मध्‍ये तक्रारीत दिलेल्‍या पत्‍त्‍यावर घर व दुकान बांधले त्‍यानंतर त्‍याने दि.24.10.1994 ला दुकान व घरासाठी विद्युत पुरवठयाचा अर्ज गैरअर्जदारांकडे केला. गैरअर्जदारांनी 3 मीटरसाठी रु.15,575/- चे देयक दिल्‍याचे तक्रारकर्त्‍याने नमुद केले असुन सदर रक्‍कम त्‍याने दि.02.12.1994 रोजी पावती क्र.1076415 व्‍दारे भरल्‍याचे नमुद केले आहे. सदर देयकाचा भरणा केल्‍यानंतर गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला दि.10.12.1994 रोजी सदर मिटर लावुन दिले त्‍याचा ग्राहक क्रमांक 410013317805 हा आहे. तक्रारकर्त्‍याने नमुद केले आहे की, गैरअर्जदारांनी 3 मिटरचे देयक वसुल करुन फक्‍त एकच मीटर दिले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने वारंवार विचारणा केली असता नविन दोन मीटरबाबत देयके द्यावे लागेल असे गैरअर्जदारांनी सांगितले. तसेच रु.14,301/- व रु.3,001/- एवढया रकमेची मागणी केली. तक्रारकर्त्‍याने सदर रक्‍कम दि.07.01.2000 रोजी पावती क्र.4150812 व 4150820 व्‍दारे भरल्‍याचे नमुद केले असुन त्‍यांचा ग्राहक क्रमांक 410014267577 व 410014267585 हा दिला. तक्रारकर्त्‍याने नमुद केले आहे की, गैरअर्जदारांनी व्‍यावसायीक व घरगुती मीटरसाठी रक्‍कम वसुल केलेली होती, परंतु तक्ररकर्त्‍याकडून परत रक्‍कम घेऊन गैरअर्जदारांनी त्‍याची फसवणुक केलेली आहे.
 
3.          तक्रारकर्त्‍याने पुढे नमुद केले आहे की, त्‍याने दि.02.12.1994 रोजी 3 मीटर बद्दल भरलेल्‍या देयकांनुसार 2 व्‍यवसायीक व 1 घरगुती पुरवठयाकरता होते व त्‍यानुसार तक्रारकर्ता विजेचा वापर करीत होता. दि.30.12.2009 रोजी गैरअर्जदारांचे अधिका-यांनी तक्रारकर्त्‍याचे परिसरात भेट दिली व मीटरची तपासनी केली व त पासनी अहवालावर तक्रारकर्त्‍याची सही घेतली. तक्रारकर्ता हा अशिक्षीत असल्‍यामुळे त्‍याने गैरअर्जदारांचे म्‍हणण्‍यावर विश्‍वास ठेवून सह्या केल्‍या. या घटनेनंतर जवळपास अडीच महिन्‍यांनंतर दि.18.01.2010 रोजी गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास ग्राहक क्रमांक 410013217805 व 410014267577 करता अनुक्रमे रु.28,241/- व रु.26,803/- अशी विद्युत कायद्याचे कलम 126 अन्‍वये देयके दिली. तक्रारकर्त्‍याने याबाबत चौकशी केली असता त्‍याला असे कळून आले की, गैरअर्जदारांनी दिलेला विद्युत पुरवठा हा घरगुती वापरासाठी आहे व त्‍यावर व्‍यवसायीक विद्युत वापर केल्‍यामुळे कारवाई करण्‍यांत आली व त्‍याला देयके देण्‍यांत आली.
 
4.          तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले आहे की, दोन्‍ही ग्राहक क्रमांकाच्‍या देयकांमध्‍ये सदर रक्‍कम जाडून दि.18.01.2010 रोजी गैरअर्जदारांनी देयके निर्गमीत केली. तक्रारकर्त्‍याने नमुद केले आहे की, कलम 126 नुसार केलेल्‍या कारवाईच्‍या दिवशीच देयके निर्गमीत करावयास पाहिजे होती. परंतु गैरअर्जदारांनी अडीच महिन्‍यांनंतर देयके निर्गमीत केले. गैरअर्जदारांची कारवाई ही चुकीची असुन त्‍यांचे सेवेतील त्रुटी असल्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने मंचात दाखल केलेली आहे.
 
5.          प्रस्‍तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावंर नोटीस बजावण्‍यांत आली असता, त्‍यांना नोटीस मिळाल्‍यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्‍यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे.
6.          गैरअर्जदाराने आपल्‍या उत्‍तरात सदर तक्रार मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्‍याचे नमुद केले आहे तसेच विज कायद्याचे कलम 145 अंतर्गत या मंचास अधिकार नसल्‍याचे नमुद केले आहे. त्‍यांनी आपल्‍या उत्‍तरात पुढे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्‍याची सदर ही देयक क्रमांक 109, 110 मधील आकारलेल्‍या संबंधी आहे. या देयका अगोदर तकारकर्त्‍याला दि.11.01.2010 ला कलम 126 अन्‍वये केलेल्‍या आकारणीचे देयक देण्‍यांत आले होते व त्‍यानंतर दि.18.01.2010 ला पण देयक दिलेले आहे. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांकडे दि.01.02.2010 रोजी अर्ज केला व त्‍यावर तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे ऐकूण घेण्‍यांत आले व त्‍यानंतर दि.05.02.2010 ला आदेश देण्‍यांत आला. सदर आदेश तक्रारकर्त्‍यास मान्‍य नसल्‍यास त्‍याने त्‍या आदेशा विरुध्‍द कलम 127 अंतर्गत अपील करावयास पाहिजे. तशी अपील तक्रारकर्त्‍याने न केल्‍यामुळे सदर तक्रार खारिज करण्‍याची विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे.
 
7.          गैरअर्जदाराने आपल्‍या उत्‍तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्‍याची तक्रार ही पूर्णपणे खोटी व बेकायदेशिर आहे. त्‍याने आपल्‍या उत्‍तरात नमुद केले आहे की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याचे परिसरात दि.30.10.2009 रोजी भेट देऊन तपासनी केलेली आहे व याची पूर्व कल्‍पना तक्रारकर्त्‍यास होती. त्‍यानंतर दि.11.01.2010 रोजी कलम 126 प्रमाणे आकारणी केलेली देयके तक्रारकर्त्‍यास दिली होती. त्‍यांनी आपल्‍या परिच्‍छेद निहाय उत्‍तरात तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब मान्‍य केली असुन तक्रारकर्त्‍याचा कपडे शिवण्‍याचा कारखाना असल्‍याचे सुध्‍दा मान्‍य केले आहे. त्‍यांनी पुढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्‍याने 1994 साली अर्ज केला, त्‍यानुसार एका सर्व्‍हीस कनेक्‍शनसाठी अंदाजपत्रक देण्‍यात आले व त्‍यानुसार त्‍याला घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा देण्‍यांत आला. त्‍यानंतर 2003 साली तक्रारकर्त्‍याचे मागणीप्रमाणे विद्युत पुरवठा करण्‍यांत आला. दि.30.10.2010 रोजी तपासनी केल्‍यानंतर असे दिसुन आले आहे की, तक्रारकर्त्‍याने विद्युत पुरवठा घरगुती वापरासाठी नसुन व्‍यावसायीक कारणासाठी वापरत आहे. तसेच तक्रारकर्त्‍याचे इतर सर्व म्‍हणणे नाकारले असुन सदर तक्रार खारिज करण्‍याची मंचास विनंती केली आहे.
            प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.08.07.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता गैरहजर, गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर. उभय पक्षांचा लेखी/ मौखिक युक्तिवाद व दाखल दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
   -// नि ष्‍क र्ष //-
 
1.          प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये दोन्‍ही पक्षांचे कथन व मंचापुढे दाखल दस्‍तावेज यावरुन तक्रारकर्ता गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे.
 
2.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीमधे नमुद केले आहे की, त्‍याने तक्रारीत नमुद पत्‍त्‍यावर घर व दुकानाचे बांधकाम केले होते व त्‍याकरता विद्युत पुरवठा मिळण्‍याकरता दि.24.10.1994 ला गैरअर्जदारांकडे अर्ज सादर केला होता. गैरअर्जदारांनी तिन मीटर साठी रु.15,575/- चे देयक दिले होते.
            तक्रारकर्त्‍याने सदर बाब सिध्‍द करण्‍याकरता मंचासमक्ष दस्‍तावेज क्र.1 पान क्र.10 वर दाखल केले आहे. सदर दस्‍तावेज हे  New Service Connection करीताचे देयक आहे. त्‍याचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्‍याने दि.24.10.1994 ला अर्ज दिल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तसेच सदर देयक हे दि.06.12.1994 चे आहे. सदर देयकामध्‍ये रु.5,000/- स्‍टोअर करीता, रु.8,000/- दुकानाकरीता व रु.2,000/- सदनिके करीता सर्व्‍हीस कनेक्‍शन शुल्‍क म्‍हणून आकारलेले आहेत. यावरुन तक्रारकर्त्‍याकडून तिन विद्युत पुरवठयाच्‍या कनेक्‍शन करीता गैरअर्जदाराने रक्‍कम स्विकारल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे गैरअर्जदारांनी आपल्‍या उत्‍तरामध्‍ये 1994 साली एका स‍र्व्‍हीस कनेक्‍शनसाठी अंदाजपत्रक देण्‍यांत आले होते असे केलेले कथन सिध्‍द होत नाही. म्‍हणून मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याकडून 1994 साली तिन विद्युत कनेक्‍शन करीता सर्व्‍हीस शुल्‍क स्विकारले आहे.
 
3.          गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याच्‍या परिसरात दि.30.12.2009 रोजी भेट दिली व मीटरची तपासनी केली. सदर तपासनी अहवालावर तक्रारकर्त्‍याची स्‍वाक्षरी सुध्‍दा गैरअर्जदाराने घेतली आहे.
            तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारीमध्‍ये आक्षेप घेतला आहे की, त्‍याने 1994 साली दोन व्‍यवसायीक व एक घरगुती विद्युत पुरवठयाकरीता मागणी केली होती व त्‍यावरुनच तो विद्युत वापर करीत होता.
            गैरअर्जदाराने आपल्‍या उत्‍तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्‍याने घरगुती विद्युत पुरवठयावरुन व्‍यवसायीक कारणा करीता विद्युतचा वापर केला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यावर विद्युत कायद्याच्‍या कलम 126 अन्‍वये कारवाई करण्‍यांत आली.
            गैरअर्जदाराने आपल्‍या कथनातील तथ्‍य स्‍पष्‍ट करण्‍याकरीता मंचासमक्ष दस्‍तावेज क्र.5 पान क्र.51 वर दाखल केलेल्‍या सदर दस्‍तावेज हा तपासनी अहवाल असुन त्‍यावर गैरअर्जदारांचे अधिका-यांची स्‍वाक्ष-या आहेत. सदर अहवाल हा दि.30.10.2009 चा आहे. सदर तपासनी अहवालाला अनुसरुनच गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास कलम 126 अंतर्गत अनुक्रमे रु.28,241/- व रु.26,803/- चे देयक दि.11.01.2010 रोजी दिल्‍याचे दस्‍तावेज क्र.3 पान क्र.10 व दस्‍तावेज क्र.5 पान क्र.16 वरुन स्‍पष्‍ट होते.
            मंचाचे मते गैरअर्जदाराने कलम 126 अंतर्गत कारवाई दि.30.10.2009 रोजी केली असतांना त्‍या संबंधीचे देयक त्‍याच दिवशी तक्रारकर्त्‍यास द्यावयास पाहिजे होते. परंतु तसे न करता सदर देयके तक्रारकर्त्‍यास दि.11.01.2010 रोजी दिल्‍याचे दस्‍तावेजांवरुन स्‍पष्‍ट होते, ही गैरअर्जदारांची सेवेतील त्रुटी आहे.
 
4.          गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याकडून दि.06.12.1994 (दस्‍तावेजे क्र.1 पान क्र.10) चे देयकानुसार तिन मीटर करता कनेक्‍शन चार्जेस घेतलेले आहे. त्‍यापैकी एक मीटर हे घरगुती वापराकरीताचे होते व दोन मीटर हे व्‍यावसायीक कारणाकरीता होते, असे असतांना गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याकडून परत दि.07.01.2000 ला पावती क्र.4051812 अन्‍वये रु.14,301/- (दस्‍तावेज क्र.6 पान क्र.17) व पावती क्र.4150820 (दस्‍तावेज क्र.8 पान क्र.19) अन्‍वये रु.3,001/- घेतले आहे, हे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याकडून दि.06.12.1994 चे देयकानुसार तिन मीटर करीता आकारणी केली असतांना परत दोन मीटरची आकारणी कोणत्‍या कारणास्‍तव केली या बाबतचे कोणतेही स्‍पष्‍टीकरण गैरअर्जदारांनी केले नाही. त्‍यामुळे अशिक्षीत ग्राहकाकडून चुकीच्‍या पध्‍दतीने रक्‍कम स्विकारणे ही गैरअर्जदारांची अनुचित व्‍यापार पध्‍दती असल्‍याचे मंचाचे मत आहे.
 
5.          गैरअर्जदारांनी दि.30.10.2009 रोजी तक्रारकर्त्‍याचे ग्राहक क्रमांक 410013317805 व 410014267577 या मीटरची तपासनी केली. सदर दोन्‍ही ग्राहक क्रमांक असलेल्‍या विद्युत पुवठयाच्‍या मीटरचे देयक तक्रारकर्त्‍याने दस्‍तावेज क्र.9 व 10 वर दाखल केले आहे. सदर देयकाचे अवलोकन केले असता ती दोन्‍ही देयके घरगुती वापरा करीताचे आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदर देयक आल्‍यानंतर गैरअर्जदारांकडे आक्षेप घ्‍यावयास पाहिजे होता. परंतु तक्रारकर्त्‍याने तसे काहीही केली नाही. याउलट तक्रारकर्त्‍याने असे नमुद केले आहे की, त्‍याने दोन व्‍यावसायीक व एक घरगुती वापराचे विद्युत मीटर करीता पैशांचा भरणा केला होता. त्‍यामुळे त्‍यावर विश्‍वास ठेवुन व तो अशिक्षीत असल्‍यामुळे सदर बाबी त्‍याचे लक्षात आल्‍या नाहीत. मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्‍याकडून व्‍यावसायीक कारणा करीता देयक स्विकारल्‍यानंतर विद्युत पुरवठा देत असतांना तो व्‍यावसायीक कारणा करीता न देता घरगुती वापराकरीता देणे ही गैरअर्जदारांची सेवेतील त्रुटी आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार स्‍व‍तःचे चुकी करीता ग्राहकास जबाबदार करुन त्‍यावर कारवाई करणे अनुचित असुन गैरकायदेशिर असल्‍याचे मंचाचे मत आहे.
            त्‍यामुळे दि 18.01.2010 रोजीचे देयक क्र. 110 व 109 अनुक्रमे रु.28,930/- व रु.27,390/- चुकीचे असल्‍यामुळे ती दुरुस्‍तीस पात्र आहेत. सदर देयकांमधील देयक क्र.109 मधील थकबाकीची रक्‍कम रु.26,804.14/- कमी करावी, तसेच देयक क्र.110 मधील रक्‍कम रु.28,241.14/- कमी करुन देयक द्यावे.
6.          गैरअर्जदारांनी आपल्‍या उत्‍तरामध्‍ये नमुद केले आहे की, तक्रारकर्त्‍यास देण्‍यांत आलेले कलम 126 अन्‍वयेचे देयकावरुन तक्रारकर्त्‍याने अर्ज करुन दि.01.02.2010 रोजी आक्षेप घेतलेला आहे. त्‍यावर दि.05.02.2010 रोजी तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे ऐकूण आदेश देण्‍यांत आला. सदर आदेश मान्‍य नसल्‍यास तक्रारकर्त्‍याने अपील करावयास पाहिजे. त्‍यामुळे सदर बाब ही मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्‍यामुळे गैरअर्जदारांनी आपल्‍या उत्‍तरातील आक्षेपात कथन केले आहे. मंचाचे असे मत आहे की, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 3 नुसार सदर प्रकरणातील बाबींचा विचार करुन त्‍यावर निर्णय देण्‍याचा अधिकार मंचास असल्‍यामुळे गैरअर्जदारांचा सदर आक्षेप खारिज करण्‍यांत येते.
 
7.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीमध्‍ये मानसिक व शारीरिक त्रासाकरीता रु.30,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्‍तव असल्‍यामुळे न्‍यायोचितदृष्‍टया तक्रारकर्ता हा रु.5,000/- मिळण्‍यांस पात्र ठरतो तसेच तक्रारीचा खर्च रु.3,000/- मिळण्‍यांस सुध्‍दा तक्रारकर्ता पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे.
            वरील सर्व निष्‍कर्षांचे आधारे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
           
      -// अं ति म आ दे श //-
 
1.     तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी दिली असुन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे  घोषीत करण्‍यांत येते.
3.    गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याला दि.18.01.2010 रोजीचे देयक क्र.109 मधील       थकबाकीची रक्‍कम रु.26,804.14/- कमी करावी, तसेच देयक क्र.110 मधील रक्‍कम रु.28,241.14/- कमी करुन सुधारीत देयक द्यावे.
4.    गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.5,000/- व    तक्रारीच्‍या खर्चाचे रु.3,000/- अदा करावे.
5.    वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30     दिवसांचे आंत गैरअर्जदारांनी करावी.
6.    तक्रारकर्त्‍याने तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत घेऊन जावी.
 
 
 
            (मिलींद केदार)                         (रामलाल सोमाणी)
               सदस्‍य                                अध्‍यक्ष