Maharashtra

Additional DCF, Mumbai(Suburban)

CC/06/284

Shri Madanlal Harishchand Thapar - Complainant(s)

Versus

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. - Opp.Party(s)

U B Wavikar

20 Oct 2010

ORDER


ADDITIONAL DISTRICT CONSUMER REDRESSAL DISPUTES FORUM,BANDRA3rd floor,New ADM BLDG. Near Chetna College,Bandra(E)-51.
Complaint Case No. CC/06/284
1. Shri Madanlal Harishchand Thapar11-A, Miniland, Tank Road, Bhandup, Mumbai 400078 ...........Appellant(s)

Versus.
1. Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.Prakashgad, Plot No.G-9, Bandra (E), Mumbai 400051 2. Chief Engineer, M S E D Co. Ltd.Bhandup Urban Zone, Vidyut Bhavan, L B S Marg, Bhandup, Mumbai 400078 ...........Respondent(s)



BEFORE:
HONORABLE S P Mahajan ,PRESIDENTHONORABLE G L Chavan ,Member
PRESENT :

Dated : 20 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

तक्रारदारासाठी वकील श्रीमती शायनी बदलानी.
सामनेवाले क्र. 1 ते 3 साठी वकील श्री.पाटणकर.
सामनेवाले क्र. 4 व 5 साठी वकील श्री.अजित अनेकर.
 
 
मा.अध्‍यक्षानुसार दिलेले निकालपत्र.
 
 
1.    तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी की, सामनेवाले क्र.1 हे होंडा या गाडीचे विक्रेते व सामनेवाले क्र.4 हे त्‍या गाडीचे उत्‍पादक आहेत. सामनेवाले क्र. 2 हे सामनेवाले क्र.1 चे चेअरमन व सामनेवाले क्र.3 हे सामनेवाले क्र.1 याच्‍यातर्फे सही करण्‍यासाठी अधिकृत व्‍यक्‍ती आहेत. सामनेवाले क्र.5 हे सामनेवाले क्र.4 चे अध्‍यक्ष व सी.ई.ओ. आहेत.
 
2.    तक्रारदाराने सामनेवाले क्र.4 ची "होंडा-सी.आर.व्‍ही.2006, कलर नाईट-हॉक ब्‍लॅकहया मॉडेलची गाडी सामनेवाले क्र.3 व्‍दारा दिनांक 03/04/2006 रोजी रुपये 18,54,019/- ला विकत घेतली. या गाडीची किंमत व अतिरिक्‍त अक्‍सेसरीजची किंमत होती. तिच्‍या बिलाची कॉपी तक्रारीच्‍या निशाणी " अ " दाखल केली आहे. सामनेवाले क्र.3 यांनी गाडीची डिलीव्‍हरी दिनांक 06/04/2004 रोजी देऊ असे आश्‍वासन दिल्‍याने तक्रारदाराने दिनांक 04/04/2006 रोजीच्‍या दोन पेऑर्डरने गाडीची संपूर्ण रक्‍कम अदा केली. त्‍या पेऑर्डरच्‍या कॉपी तक्रारीच्‍या निशाणी " ब " ला दाखल आहेत. त्‍या पेऑर्डरच्‍या कव्‍हरींग-लेटरवर पेऑर्डर मिळाल्‍याचे सामनेवाले क्र.3 यांनी लिहून दिले आहे. त्‍या तारीख 04/04/2006 च्‍या पत्राची कॉपी निशाणी " क " ला दाखल केली आहे.
 
3.    तक्रारदाराचा आरोप की, सामनेवाले यांना विनंत्‍या करुनही आश्‍वासन दिल्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी तारीख 06/04/2006 रोजी गाडीची डिलीव्‍हरी दिली नाही. तारीख 22/04/2006 रोजी त्‍याला सामनेवालेकडून एक पत्र आले. त्‍यात त्‍यांनी कळविले की, गाडीचा डोअर व्हिसॉर हा भाग त्‍यांच्‍याकडे शिल्‍लक नसल्‍याने त्‍यांना त्‍यांची ऑर्डर दिली नाही. ती मिळाल्‍यानंतर मे, च्‍या पहिल्‍या आठवडयात डोअर व्हिसॉर बसवून देऊ. तक्रारदाराचे म्‍हणणे की, दिनांक 06/04/2006 नंतर दिनांक 22/04/2006 पर्यत सामनेवाले यांनी त्‍याला या बाबत कळविले नाही. दरम्‍यान त्‍याच्‍याकडे एक समारंभ होता व बरेच पाहुणे मंडळी आलेली होती. त्‍यासाठी त्‍याला कार भाडयाने घ्‍यावी लागली व खर्च करावा लागला.
 
4.    तक्रारदाराचे म्‍हणणे की, त्‍याने सामनेवाले क्र.4 ला पत्र पाठविल्‍यानंतर लगेचच दिनांक 30/04/2006 रोजी त्‍याला सामनेवाले यांच्‍याकडून पत्र आले व गाडी डिलीव्‍हरीसाठी तयार आहे असे कळविले. सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या 22/04/2006 च्‍या पत्राने कळविले होते की, मे, 2006 च्‍या पहिल्‍या आठवडयात डिलीव्‍हरी देऊ, त्‍यांच्‍या वरीष्‍ठ वरील अधिका-याला कळविल्‍याबरोबर म्‍हणजे लगेच 29/04/2006 रोजी गाडी डिलीव्‍हरीसाठी तयार कशी झाली याचे तक्रारदारास आश्‍चर्य वाटले.  दिनांक 02/05/2006 च्‍या पत्राने त्‍यांनी सामनेवाले यांना गाडीची डिलीव्‍हरी देण्‍यासाठी सांगीतले. मात्र डिलीव्‍हरी देण्‍यास उशिर झाल्‍यामुळे त्‍याबद्दलची नुकसान भरपाई मागण्‍याचा त्‍यांचा हक्‍क कायम आहे असे कळविले. परंतु सामनेवाले यांनी दिनांक 05/05/2006 चे पत्र पाठवून गाडीचा ताबा उशिरा देण्‍यात तक्रारदाराचा दोष आहे असे सांगून तक्रारदाराला गाडी घेउन जाण्‍यास सांगीतले. तेव्‍हा पुन्‍हा तक्रारदाराने दिनांक 05/05/2006 चे पत्र पाठवून गाडीचा उशिरा ताबा देण्‍याबाबत सामनेवले क्र. 1 ते 5 जबाबदार आहेत असे कळविले व तक्रारदारांचे झालेले नुकसान त्‍यांना भरुन द्यावे असे कळविले. परंतु सामनेवाले यांनी त्‍याला प्रतिसाद दिला नाही. नंतर तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यामध्‍ये बराच पत्रव्‍यवहार/नोटीसेस इत्‍यादी दिल्‍या. सामनेवाले तक्रारदाराला नुकसान भरपाई देण्‍यास तयार नव्‍हते. गाडीच्‍या किंमतीची पूर्ण रक्‍कम देऊनही गाडीचा ताबा न देणे ही सामनेवाले यांच्‍या सेवेत न्‍यूनता आहे असे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे. गाडीचा ताबा न मिळाल्‍यामुळे त्‍याला इतर व्‍यवस्‍था करावी लागली व त्‍याला त्‍याचा मानसीक त्रास झाला व नुकसान झाले म्‍हणून त्‍यांनी सदर तक्रार दाखल केली.
 
5.    तक्रारदाराने सामनेवाले यांना दिलेली रक्‍कम रु.18,54,019/- ही रक्‍कम व हया रक्‍कमेवर दिनांक 06/04/2006 पासुन तक्रार दाखल करीपर्यत व त्‍यानंतर मुद्दल आणि व्‍याज या संपूर्ण रकमेवर तक्रार दाखल केल्‍यापासून गाडीचा ताबा मिळेपर्यत द.सा.द.शे.17 दराने व्‍याजाची मागणी केली आहे. तसेच गाडीच्‍या अभावी त्‍याला इतर व्‍यवस्‍था करावी लागली आहे, त्‍यासाठी झालेल्‍या खर्चापोटी रु.5,00,000/- मागणी केली आहे. गाडीचा ताबा न दिल्‍यामुळे त्‍याला झालेल्‍या मानसीक त्रासापोटी रुपये 1 करोडची मागणी केलेली आहे. त्‍याला जो खर्च झाला आहे त्‍यासाठी रुपये 50,000/- ची मागणी केली आहे व या तक्रारीचा खर्च मागीतला आहे.
 
6.    सामनेवाले क्र.1 यांनी त्‍यांचे म्‍हणणे देऊन तक्रारदाराचे आरोप नाकारले आहेत. त्‍यांचे म्‍हणणे की, सामनेवाले क्र.3 यांनी सामनेवले क्र. 1 च्‍या वतीने गाडीच्‍या किंमतीबाबत व तक्रारदाराला पाहिजे असलेल्‍या अक्‍सेसरीजचे पेपर तक्रारदाराला दिले होते. त्‍याचे म्‍हणणे की, दिनांक 03/04/2006 च्‍या बिलावर गाडी नोंदविण्‍याच्‍या दिवशी उपलब्‍ध असलेल्‍या रजिस्‍ट्रेशन नंबरपैकी त्‍यास पाहिजे असलेला नंबर घेण्‍याची मुभा देऊ असे लिहून दिले होते व ते बिल फॅक्‍स करुन तक्रारदाराला पाठविले होते. दिनांक 04/04/2006 रोजी सामनेवाले क्र.3 हे तक्रारदाराकडे गेले होते व बुकींग बाबतची कार्यप्रणाली व फॉर्म्‍यालिटिज या बद्दल त्‍याला सांगीतले होते. तक्रारदाराने त्‍या दिवशी गाडीच्‍या किंमतीचे पेमेंट तयार ठेवले होते. सामनेवाले क्र.3 यांनी ते स्विकारले व दिनांक 04/04/2006 च्‍या पत्रावर ते पत्र मिळाल्‍याबाबतची सही केली. तक्रारदाराच्‍या प्रतिनिधीने सामनेवाले क्र.3 यांना विंनती केली होती की, दिनांक 06/04/2006 रोजी जर गाडीचा ताबा दिला तर चांगले होईल. परंतु सामनेवाले क्र.3 यांनी त्‍या दिवशी गाडी देण्‍यास कशा अडचणी आहेत ते त्‍यांना सांगीतले होते. कारण ताबा देण्‍याचे अगोदर ब-याच फॉर्म्‍यालिटीज पूर्ण करावयाच्‍या असतात, जसे की गाडी तक्रारदाराच्‍या नावावर करणे, विमा काढणे, व तक्रारदाराला पाहिजे असलेल्‍या अक्‍सेसरीज बसवून देणे इ. या सर्व अडचणी तक्रारदाराच्‍या प्रतिनिधींला सांगीतल्‍या होत्‍या व दिनांक 06/04/2006 रोजी गाडीचा ताबा देणे शक्‍य होणार नाही असेही सांगीतले होते. तसेच त्‍यांनी असेही सांगीतले होते की, ज्‍यावेळी गाडी तंयार असेल त्‍यावेळी तक्रारदाराने सामनेवाले क्र.1कडे जावून गाडीची डिलीव्‍हरी घ्‍यावी. हे सर्व तक्रारदाराच्‍या प्रतिनिधीने मान्‍य केले होते. सामनेवाले क्र.3 यांनी दिनांक 03/04/2006 च्‍या बिलावर गाडीच्‍या डिलीव्‍हरी तारखेबाबत लिहून दिलेले नाही. सर्व फॉर्म्‍यालिटिज पूर्ण झाल्‍यानंतर व तक्रारदाराने सांगीतलेल्‍या सर्व अक्‍सेसरीज बसवून दिल्‍यानंतर दिनांक 29/04/2006 रोजी गाडी डिलिव्‍हरीसाठी तयार होती हे तक्रारदाराला माहित होते. परंतु त्‍यांनी गाडीचा ताबा घेतला नाही. तक्रारदार व सामनेवाले यांच्‍या वकीलांची बैठक झाल्‍यानंतर दिनांक 07/09/2007 रोजी तक्रारदाराने गाडीचा ताबा घेतला. सामनेवाले यांचे म्‍हणणे की, ही तक्रार दाखल करण्‍यासाठी कोणतेही कारण घडलेले नाही.
 
7.    दिनांक 02/05/2006 चे पत्र पाठवून तक्रारदाराने तो गाडीचा ताबा घेण्‍यास तयार आहे असे कळविले होते व त्‍यांनी दिनांक 05/05/2006 रोजीचे तक्रारदारास पत्र पाठवून सामनेवाले क्र.1 यांचेकडून गाडीचा ताबा घ्‍यावा असे कळविले होते. परंतु गाडीचा ताबा तक्रारदाराने अद्याप घेतला नाही. गाडीचा ताबा देण्‍याच्‍या तारखेबद्दल तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यात काही करार झालेला होता असे सामनेवाले क्र.1 यांनी नाकारले आहे.
8.    सामनेवाले क्र.1 यांचे म्‍हणणे की, तक्रारदाराला डोअर व्हिसॉर ही अक्‍सेसरी बसवून द्यावयाची होती परंतू ती त्‍यांच्‍याजवळ उपलब्‍ध नव्‍हती. म्‍हणून त्‍यांनी तक्रारदाराला गाडीचा ताबा घ्‍यावा व ती अक्‍सेसरी आल्‍यानंतर ते ती बसवून देतील असे सांगीतले होते. त्‍यांनी तक्रारदाराला वेळोवेळी गाडीच्‍या डिलिव्‍हरीबद्दल कळविले होते म्‍हणून सामनेवाले क्र.1 यांच्‍या सेवेत न्‍यूनता नाही. त्‍यांनी गाडीचा ताबा देण्‍यास उशिर केलेला नाही. तक्रारदाराच्‍या पत्रास व नोटीसला त्‍यांनी योग्‍य ते उत्‍तर दिले होते. त्‍यांचे म्‍हणणे की, तक्रारदाराचे काहीही नुकसान झालेले नाही. गाडीचा ताबा देण्‍यास ते केव्‍हाही तयार होते. म्‍हणून सदर तक्रार रद्द करण्‍यात यावी अशी त्‍यांची मागणी आहे.
 
9.    सामनेवाले क्र.2 यांनी लेखी म्‍हणणे देऊन तक्रारदाराचा आरोप नाकारला आहे. त्‍यांनी सामनेवाले क्र.1 यांनी दिलेली कैफीयत ही त्‍यांची कैफीयत समजावी असे सांगीतले व तेच मुद्दे त्‍यांच्‍या कैफीयतमध्‍ये नमूद केले.
 
10.   सामनेवाले क्र.3 यांनीसुध्‍दा लेखी म्‍हणणे दिले व सामनेवाले क्र.1 यांनी दिलेली कैफीयत स्विकारुन त्‍याप्रमाणे कैफीयत दिली. त्‍याशिवाय त्‍यांचे म्‍हणणे की, ते सामनेवाले क्र.1 यांचे नोकर आहेत. तक्रारदार व त्‍यांचेमध्‍ये कोणताही करार झालेला नव्‍हता. त्‍यांनी बिलावर वर गाडीच्‍या डिलिव्‍हरी तारखेबद्दल काही लिहून दिलेले नाही. ते तक्रारदारास कोणतीही नुकसान भरपाई देण्‍यास जबाबदार नाहीत. म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍दचा सदर तक्रार अर्ज रद्द करण्‍यात यावा.
 
11.   सामनेवाले क्र. 4 व 5 यांनी त्‍यांची कैफीयत दिली. त्‍यांचे म्‍हणणे की, तक्रारदार हे त्‍यांचे ग्राहक नाहीत. त्‍याचे व तक्रारदार यांचेमध्‍ये कोणताही करार झालेला नाही. सामनेवाले क.1 यांनी गाडीचा ताबा घेण्‍याबाबत वेळोवेळी तक्रारदाराला कळविले होते परंतु तक्रारदाराने गाडीचा ताबा घेतला नाही. तक्रारदाराने दिनांक 28/04/2006 च्‍या त्‍यांना पाठविलेल्‍या पत्रात त्‍याने म्‍हटले होते की, सामनेवाले क्र. 4 व 5 यांचा काही दोष नाही. सामनेवाले क्र. 4 व 5 यांचे म्‍हणणे तक्रारदाराने गाडीच्‍या किमतीचे पैसे सामनेवाले क्र.1 यांना दिले आहेत, त्‍यांना नाही. तक्रारदाराने त्‍यांच्‍या विरुध्‍द सेवेतील न्‍यूनतेबाबत काही आरोप केलेला नाही म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार रद्द करण्‍यात यावी.
 
12.   आम्‍ही सामनेवाले क्र.1,2,3 तर्फे वकील श्री.पुष्‍कर पाटणकर व सामनेवाले क्र.4 व 5 साठी वकील श्री.अजीत अनेकर यांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला. तक्रारदारासाठी वकील श्रीमती शायनी बदलानी तर्फे वकील श्री.सुनील शिंदे हजर होते त्‍यांनी सांगीतले की, तक्रारदाराने जो लेखी युक्‍तीवाद दिलेला आहे तोच त्‍यांचा तोंडी युक्‍तीवाद समजण्‍यात यावा. आम्‍ही तक्रारीतील कागदपत्रं वाचली. यात मुद्दा उपस्थित होतो की,
            "सामनेवाले यांनी तक्रारदाराला गाडीचा ताबा
            देण्‍यास उशिर केला आहे असे तक्रारदाराने सिध्‍द
            केलेले आहे का ? "
      मंचाच्‍या मते तक्रारदाराने हे सिध्‍द केलेले नाही. त्‍याला कारण असे की, गाडीचा ताबा दिनांक 04/06/2006 रोजी देऊ असे सामनेवाले यांनी आश्‍वासन दिल्‍याबाबतची विश्‍वनीय कागदपत्रं तक्रारदाराने दाखल केलेली नाहीत. तक्रारदाराने दिनांक 03/04/2006 चा इनव्‍हाईस मंचाच्‍या निदर्शनास आणला व सांगीतले की, या इनव्‍हाईसवर समासामध्‍ये सामनेवाले क्र.3 यांनी खालील रिमार्क लिहून दिलेले आहेत.
             "डिलेव्‍हरी ईन एप्रिल– 06 "
परंतु सदरचे लिखाण सामनेवाले क्र.3 यांनी नाकारले आहे. या लिखाणाखाली सामनेवाले क्र.3 ची सही दिसून येत नाही. ते लिखाण सामनेवाले क्र.3 च्‍या हस्‍ताक्षरात आहे असे तक्रारदार यांने सिध्‍द केलेले नाही. जर सामनेवाले क्र.3 यांनी हे लिखाण त्‍याचे नाही असे म्‍हटले आहे तर  तक्रारदाराने सदरहू लिखाण सामनेवाले क्र.3 च्‍या किंवा सामनेवाले क्र.1 यांच्‍या एखाद्या नोकराच्‍या हस्‍ताक्षरात आहे हे सिध्‍द करावयास हवे होते. ते त्‍यांने केलेले नाही. त्‍यामुळे हे लिखाण सामनेवाले यांच्‍यातर्फे लिहीलेले आहे हे तक्रारदार यांचे म्‍हणणे मान्‍य करता येत नाही.
 
13.   तक्रारदाराने दिनांक 04/04/2006 चे त्‍यांने सामनेवाले क्र.1 यांना पाठविलेले पत्र मंचाच्‍या निदर्शनास आणले. त्‍यात म्‍हटले आहे की,
 
           गाडीच्‍या अक्‍सेसरीजसहीत ताबा दिनांक 06/04/2006
           रोजी, जो दिवस हिंदू दिनदर्शिके प्रमाणे चांगला आहे, दिला
           तर चांगले होईल/त्‍यास बर वाटेल.
 
सदर पत्र सामनेवाले क्र.3 यांना मिळाल्‍याबाबत सामनेवाले क्र.3 यांनी सही केली आहे. पण त्‍या पत्रावर सदरहू पत्राचा मजकूर त्‍यांना मान्‍य असल्‍याबद्दल लिहिलेले नाही केवळ पत्र त्‍यांना मिळाले म्‍हणून त्‍यांनी दिनांक 06/04/2006 रोजी गाडीचा ताबा देण्‍याचे कबुल केले असे म्‍हणता येणार नाही. हे जरी खरे असले की, दिनांक 03/04/2006 रोजी गाडीच्‍या किंमतीची सर्व रक्‍कम तक्रारदाराने सामनेवाले क्र.1 यांना दिली तरी गाडीचा ताबा दिनांक 06/04/2006 ला द्यावयाचा होता. हे तक्रारदार यांनी सिध्‍द केलेले नाही.
 
14.   सामनेवाले क्र.1 यांनी दिनांक 22/04/2006 रोजी तक्रारदाराला पत्र पाठवून कळविले होते की, डोअर व्हिसॉर ही अक्‍सेसरी त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध नसल्‍यामुळे त्‍यांनी त्‍यासाठी ऑर्डर दिलेली आहे. दिनांक 30/04/2006 पर्यत ते भाग येण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यांनी या पत्राने तक्रारदाराला कळविले होते की, त्‍याने गाडीचा ताबा घ्‍यावा व डोअर व्हिसॉर आल्‍यानंतर तो पार्ट बसवून देतील असे सांगीतले. त्‍यावर दिनांक 24/04/2006 रोजी तक्रारदाराने उत्‍तर पाठवून सामनेवाले क्र.1 यांना कळविले की, दिनांक 25/04/2006 रोजी सर्व अक्‍सेसरी बसवून गाडी द्यावी अन्‍यथा ते विलंबापोटी द.सा.द.शे. त्‍यांनी दिलेल्‍या रक्‍कमेवर 17 दराने व्‍याज आकारतील. त्‍यानंतर दिनांक 29/04/2006 रोजी सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराला कळविले की, ते गाडी ताब्‍यात देण्‍यासाठी तयार आहे, व तक्रारदार गाडी केव्‍हा न्‍यावयास तंयार आहे तसे त्‍यांनी कळवावे. त्‍यांनतर दिनांक 02/05/2006 रोजी तक्रारदाराने सामनेवाले क्र.3 ला पत्र पाठवून कळविले की, ते गाडीचा ताबा घेण्‍यास तंयार आहेत, परंतू त्‍यांच्‍या व्‍याजाचा तो क्‍लेम कायम आहे व ते क्‍लेम तो सोडावयास तंयार नाही. त्‍यानंतर दिनांक 05/05/2006 रोजी पुन्‍हा सामनेवाले क्र.1 यांनी गाडी घेऊन जाण्‍याबद्दल कळविले. पत्राच्‍या कॉपीज तक्रारदार यांनी त्‍यांची मागणी पूर्ण झाल्‍याशिवाय काही सेटलमेंट होणार नाही असे कळविले. वरील पत्राची कॉपी तक्रारीसोबत जोडलेल्‍या आहेत. वरील कागदपत्रावरुन असे दिसून येते की, दिनांक 22/04/2006 पासुन सामनेवाले क्र.1 हे गाडीचा ताबा देण्‍यास तंयार होते. दिनांक 22/04/2006 रोजी फक्‍त सामनेवाले यांचेकडे एक अक्‍सेसरी उपलब्‍ध नव्‍हती व ती आल्‍यानंतर ते बसवून देण्‍यास तंयार होते. दिनांक 29/05/2006 रोजी गाडी पूर्ण अक्‍सेसरीसहीत तंयार होती. परंतू तक्रारदाराने त्‍याचा व्‍याजाच्‍या मागणी बद्दल हट्ट कायम असल्‍यामुळे गाडी ताब्‍यात घेतली नाही. शेवटी तक्रारदार व सामनेवाले क्र.1 यांच्‍या वकीलांची बैठक होऊन दिनांक 07/09/2007 रोजी तक्रारदाराने गाडीचा ताबा घेतला.
 
15.   दिनांक 29/04/2006 पासुन ते दिनांक 07/09/2006 पर्यत गाडीचा ताबा देण्‍यास जो उशिर झाला त्‍याला तक्रारदार हेच जबाबदार आहेत.दिनांक 06/04/2006 रोजी गाडीचा ताबा देण्‍याचे सामनेवाले क्र.1 यांनी कबुल केले होते असे तक्रारदाराने सिध्‍द न केल्‍यामुळे सामनेवाले क्र.1 यांनी गाडीचा ताबा दिनांक 06/04/2006 ऐवजी 29/04/2006 रोजी देऊ केला असे म्‍हणता येत नाही व ही त्‍यांच्‍या सेवेत न्‍यूनता म्‍हणता येत नाही. मंचाच्‍या मते सामनेवाले क्र.1,2 व 3 यांच्‍या सेवेत काही न्‍यूनता दिसत नाही.
 
16.   सामनेवाले क्र. 4 व 5 गाडीचे उत्‍पादक आहेत. त्‍याच्‍यामुळे गाडीचा ताबा देण्‍यास उशिर झाला असा तक्रारदारांचा आरोप नाही. उलट दिनांक 28/04/2006 ला सामनेवाले क्र.4 यांच्‍या प्रतिनिधीला तक्रारदाराने पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, त्‍यांचा काही दोष नाही. तक्रारदाराने सामनेवाले क्र. 4 व 5 यांचे विरुध्‍द गाडीच्‍या ताब्‍याबद्दल काही आरोप न केल्‍यामुळे सामनेवाले क्र 4 व 5 यांचेविरुध्‍दची तक्रार रद्द होण्‍यास पात्र आहे.
 
17.   वरील विवेचनावरुन मंचाचे असे मत आहे की, सदरहू तक्रारीत काही तथ्‍य नाही. ती रद्द होण्‍यास पात्र आहे. म्‍हणून मंच खालील आदेश करीत आहे.  
 
 
 
आदेश
 
1.    तक्रार क्रमांक 315/2006 रद्द बातल करण्‍यात येते
2.    उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा.
3.    आदेशाच्‍या प्रमाणित प्रती दोन्‍ही पक्षकारांना विनामूल्‍य पाठविण्‍यात याव्‍या.
 
 

[HONORABLE G L Chavan] Member[HONORABLE S P Mahajan] PRESIDENT