विद्यमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग,चंद्रपूर यांचे समोर
तक्रार प्रकरण क्रमांक : CC/6/2021
तक्रार दाखल दिनांक : 19/1/ 2021
तक्रार निकाली दिनांक : 22/1/ 2021
तक्रार प्रलंबित कालावधी : - . व, - म, 3 दि.
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्री. राजेश नंदलाल बियाणी,
प्रोप्रायटर श्री साई कन्स्ट्रक्शन कंपनी,
वय अंदाजे 45 वर्षे, राहणार- बियाणी चेंबर, ताडोबा रोड,
तुकुम, चंद्रपूर, तहसील व जिल्हा चंद्रपूर
:: विरूध्द ::
गैरअर्जदार/विरूध्दपक्ष :-1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित,
मार्फत- अधिक्षक अभियंता, चंद्रपुर सर्कल बाबुपेठ,
चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर
2. उपकार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित,
उपविभाग बल्लारपूर तहसील बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर
अर्जदार /तक्रारकर्त्यातर्फे :- अॅड.श्री.कुल्लरवार व अॅड.पोटदुखे
गणपुर्ती :- कीर्ती वैदय (गाडगीळ), मा.सदस्या
कल्पना जांगडे (कुटे), मा.सदस्या
निशाणी क्रमांक 1 खालील आदेश
(पारीत दिनांक :- 22/1/2021)
आयोगाचे निर्णयान्वये, श्रीमती कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या
तक्रारकर्त्यातर्फे अधिवक्ता श्री.कुल्लरवार व श्री.पोटदुखे यांचा तक्रार दाखल करून घेण्याबाबत युक्तिवाद ऐकला. तक्रारकर्त्याची तक्रार व दस्ताऐवजांची पडताळणी केल्यानंतर असे
..2..
निदर्शनास येते की तक्रारकर्त्याचे तक्रारीमध्येच तक्रारकर्त्याचे " श्री साई कन्स्ट्रक्शन कंपनी" या
नावाचे डांबर मिक्सिंग युनिट असून त्यांचा रस्ता बांधकामात आवश्यक असलेले गिट्टी व डांबर चे मिश्रण तयार करून देण्याचा व्यवसाय आहे. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत निशाणी क्रमांक 4 वर दाखल केलेल्या विज देयकांवर सुद्धा नाव " श्री साई कन्स्ट्रक्शन कंपनी" व वर्गवारी (Category) वाणिज्य (commercial) असे नमूद आहे. यावरून तक्रारकर्त्याने, विरुद्ध पक्ष यांचेकडून " श्री साई कन्स्ट्रक्शन कंपनी" या नावाने व्यवसाय करण्याकरिता विज जोडणी घेतलेली असून तक्रारकर्ता हा सदर विजेचा वापर उपरोक्त व्यवसायाकरिता करतो. तक्रारकर्त्याचा विजेचा वापर करण्याचा उद्देश हा पूर्णतः व्यावसायिक असल्याकारणाने तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 2(7)(i) अन्वये ग्राहक या संज्ञेत मोडत नाही.
सबब तक्रारकर्त्याची प्रस्तूत तक्रार ही दाखल खारीज करण्यात आली आहे.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. कीर्ती वैदय (गाडगीळ)
सदस्या सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर.