Maharashtra

Sangli

CC/09/1743

Pandurang Mahadev Kambale - Complainant(s)

Versus

Maharashtra State Electricity Dist.Co. - Opp.Party(s)

30 Sep 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/09/1743
 
1. Pandurang Mahadev Kambale
House No.1312, Khatalnagar, Shahunagar, Wanleswadi, Nr.Maharashtra Hsg.Soc., Kupwad, Tal.Miraj, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. Maharashtra State Electricity Dist.Co.
Madhavnagar, Tal.Miraj, Dist.Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                            नि. २१
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
                                                    
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
                         
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १७४३/२००९               
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख    १५/०४/२००९
तक्रार दाखल तारीख   २९/०४/२००९
निकाल तारीख       ३०/०९/२०११
------------------------------------------------------------
 
श्री पांडुरंग महादेव कांबळे
व.व.४९, धंदा नोकरी
रा.घर क्र.१३१२, खताळनगर,
शाहुनगर, वालनेसवाडी, महाराष्‍ट्र हौसिंग
सोसायटी जवळ, कुपवाश्र, तालुका मिरज
जि. सांगली                                                      ..... तक्रारदारú
          
 विरुध्‍दù
 
उपकार्यकारी अभियंता,
महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कं.
(कुपवाड विभागांतर्गत)
उपविभाग, माधवनगर, तालुका मिरज
जि. सांगली                                       .....जाबदारúö
                               
                                      तक्रारदारतर्फेò      : +ìb÷.श्री.बी.एम.पाटील
   जाबदार तर्फे              : +ìb÷. श्री. यु.जे.चिप्रे
                         
नि का ल प त्र
 
द्वारा- अध्‍यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
 
.     तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपले विद्युत बिलाबाबत दाखल केला आहे.
 
२.    सदर तक्रार अर्जाचा थोडक्‍यात तपशील पुढीलप्रमाणे
 
तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक असून नोकरीनिमित्‍त परगावी असतात. तक्रारदार यांना जाबदार यांनी वेळोवेळी विद्युत देयके दिली आहेत. त्‍यामध्‍ये कधी लॉक्‍ड, कधी फॉल्‍टी, असा शेरा मारुन विद्युत देयके दिली आहेत. त्‍यामुळे तक्रारदार यांनी दि.२७/७/२००७ रोजी जाबदार यांचेकडे मीटर बदलून घेतला. जाबदार यांनी दि.२८/७/२००७ रोजी मीटर बदलला. मीटर बदलल्‍यानंतर तक्रारदार यांना दि.१२/११/२००७ रोजीचे दि.८/१०/२००७ ते ६/११/२००७ या कालावधीचे ३५५ युनिटचे विद्युत देयक देण्‍यात आले. त्‍यामध्‍ये मागील काहीही बाकी शिल्‍लक नसताना मागील बाकी रु.२३,२४३.९७ दर्शवून रु.२४,८७०/- चे विद्युत देय‍क दिले. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे वारंवार सदर विद्युत देयक दुरुस्‍त करुन देणेची मागणी केली. परंतु त्‍यास जाबदार यांनी प्रतिसाद दिला नाही. व त्‍यानंतरच्‍या कालावधीसाठी दि.७/११/२००७ ते ७/१२/२००७ या कालावधीचे वापरलेले युनिट ७२० दाखवून रिडींग कॉलममध्‍ये लॉक्‍ड असे नमूद करुन तक्रारदार यांस रु.२९,०४०/- रकमेचे देयक दिले त्‍यानंतरचे दि.८/१२/२००७ ते ८/१/२००८ या कालावधीसाठी सुध्‍दा वापरलेले युनिट २७९ दर्शवून रु.२६,०७१०/- इतक्‍या रकमेचे विद्युत देयक दिले. जाबदार यांनी दिलेली चुकीची देयके दुरुस्‍त करुन देणेबाबत तक्रारदार यांनी वारंवार विनंती केली असता जाबदार यांनी दाद दिली नाही म्‍हणून तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे लेखी अर्ज दिला. परंतु जाबदार यांनी तक्रारदार यांचे तक्रारीची दखल घेतली नाही व दि.७/२/२००८ रोजी हाताने लिहिलेले एकूण रु.१७,११०/- चे बिल दिले व सदर बिलावर नमूद केल्‍याप्रमाणे भरावयाची रक्‍कम रु.६,०००/- तक्रारदार यांनी नाईलाजास्‍तव त्‍या‍चदिवशी भरणा केली आहे. त्‍यानंतर जाबदार यांनी तक्रारदार यांना दि.१६/२/२००८ रोजी वापरलेले युनिट १३८ दर्शवून त्‍यावर रक्‍कम रु.११,८३०/- तसेच दि.७/५/२००८ रोजी रु.८,१००/- ची विद्युत देयके दिली. तक्रारदार यांनी दि.२८/३/२००८ रोजी रक्‍कम रु.५,०००/- भरले व त्‍यानंतर आलेली बिले ही तक्रारदार यांनी वेळोवेळी दुरुस्‍त करुन जानेवारी २००९ अखेरची अदा केली आहेत. त्‍यामुळे जाबदार यांनी दिलेल्‍या या सदोष सेवेबाबत तक्रारदार यांनी नोव्‍हेंबर २००६ ते जून २००७ या कालावधीची सरासरी बिले काढण्‍यात येवून मासिक वापर १५० इतका धरुन त्‍याप्रमाणे बिलाची आकारणी करण्‍यात यावी व अर्जदाराने भरलेल्‍या रकमा विचारात घेवून उर्वरीत रक्‍कम जाबदाराकडून अर्जदारास परत मिळणेबाबत आदेश व्‍हावा या मागणीसाठी तसेच इतर तदनुषंगिक मागण्‍यांसाठी प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने १६ कागद दाखल केले आहेत. 
 
३.    जाबदार यांनी याकामी नि.१३ ला आपले म्‍हणणे शपथपत्राच्‍या स्‍वरुपात दाखल केले आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी दि.५/२/२००८ रोजी जाबदार यांचेकडे अर्ज देवून बिलाची रक्‍कम एकरकमी भरु शकत नसलेचे नमूद करुन बिलाची रक्‍कम तीन हप्‍त्‍यात भरणेस विनंती केली व त्‍याप्रमाणे पहिला हप्‍ता रु.६,०००/- दि.६/८/२००८ रोजी भरीत असलेची लेखी हमी दिली व त्‍यांचे अर्जाचा विचार करुन दि.६/२/२००८ रोजी रु.६,०००/- भरण्‍याची परवानगी दिली. या पत्रावरुन तक्रारदार यांना दिलेले बिल योग्‍य असल्‍याची खात्री करुन मान्‍यता दिली आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारअर्जास Estopple by conduct या तत्‍वाची बाधा येते असे जाबदार यांनी म्‍हणणेत नमूद केले आहे. तक्रारदार यांचा मीटर दि.२८/७/२००७ रोजी बदलला आहे. त्‍यावेळी जुन्‍या मीटरचे रिडींग उपलब्‍ध झाले. जुने मीटर सुरुच होते. परंतु तक्रारदार हे परगावी असल्‍यामुळे व घर बंद असलेमुळे रिडींग घेता आले नव्‍हते. मीटर बदलतेवेळी रिडींग उपलब्‍ध झालेने एकूण ३७४३ युनिट नोव्‍हेंबर २००६ पासून ऑगस्‍ट २००७ अखेर वापरलेचे दिसून आले. त्‍यामुळे ३७४३ युनिटचे बिल रु.२३,४२६.१९ ची आकारणी केली. तक्रारदार यांचे जुने मीटर बदलले त्‍यावेळेस फायनल रिडींग ७२१२ असे देण्‍यात आले होते. तक्रारदार यांनी ३६७५ रिडींग पर्यंत फॉल्‍टी म्‍हणून बिले भरली होती. त्‍यामुळे ७२१२ ३६७५ = ३५३७ व नवीन मीटरचे २०६ युनिट असे एकूण युनिट ३७४३ चे बिल सप्‍टेंबर २००७ मध्‍ये आकारले गेले. तक्रारदार यांच्‍या दि.५/२/२००८ रोजीच्‍या लेखी अर्जानुसार तक्रारदारास तीन हप्‍त्‍यांमध्‍ये रक्‍कम भरण्‍याची मुभा दिली व त्‍याप्रमाणे तक्रारदार यांनी दि.६/२/२००८ रोजी रु.६,०००/-, दि.२८/३/२००८ रोजी रु.५,०००/- व दि.२८/४/२००८ रोजी रु.८,१००/- जमा केले आहे. तक्रारदार यांनी रक्‍कम रु.८१ चे बिल दि.२८/४/२००८ रोजी भरले आहे. तेव्‍हापासून तक्रारदार नियमितपणे विद्युत देयके भरीत आहे त्‍यामुळे सध्‍या  थकबाकी काही नाही. तक्रारदार याने केलेली विनंती बेकायदेशीर आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तरी तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.१५ चे यादीने ३ कागद दाखल केले आहेत.
 
४.    तक्रारदार यांनी नि.१७ ला प्रतिउत्‍तर दाखल केले आहे.  त्‍यामध्‍ये जाबदार यांचे म्‍हणण्‍यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी नि.१९ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.१८ वर लेखी युक्तिवादाबाबत पुरसि‍स दाखल केली आहे. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्‍हणणे, दाखल करण्‍यात आलेली कागदपत्रे,  दाखल करण्‍यात आलेला लेखी युक्तिवाद व ऐकण्‍यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाचे निष्‍कर्षासाठी उपस्थित होतात. 
 
      मुद्दे                                                    उत्‍तर 
 
१. तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा            
    दिली आहे का ?                                            नाही.
 
२. तक्रारदार मागणीप्रमाणे अनुतोष      
    मिळणेस पात्र आहे का ?                                     नाही.
 
३. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला
    आहे का ?                                                नाही.
                      
४. काय आदेश ?                                        अंतिम आदेशाप्रमाणे.
 
विवेचन
 
५.    मुद्दा क्र.१ व २ एकत्रित -
 
      तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, दाखल कागदपत्रे व विद्युत देयकांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत दाखल केलेली विद्युत देयके यांचे अवलोकन केले असता दि. २८/७/२००७ रोजी मीटर बदलणेपूर्वी तक्रारदार यांचे विद्युत देयकाचे चालू रिडींग ३६७५ असे सातत्‍याने येत असलेचे दिसून येते व सदर मीटर Faulty असे विद्युत देयकावर नमूद आहे. तक्रारदार यांचा मीटर दि.२८/७/०७ रोजी बदलला आहे. सदर मीटर बदलतेवेळी रिडींग उपलब्‍ध झाले व ते ७२१२ होते असे जाबदार यांनी म्‍हणण्‍यामध्‍ये नमूद केले आहे व सदर ७२१२ मधून ३६७५ वजा करुन आलेले युनिट ३५३७ युनिटचे बिल दि.२६/११/०७ रोजीचे दि.८/१०/०७ ते ६/११/०७ या कालावधीचे देयकामध्‍ये नमूद करुन देणेत आले आहे. तक्रारदार यांचा मीटर बदलला तेव्‍हा रिडींग उपलब्‍ध झाले असलेबाबत व ते ७२१२ असलेबाबत जाबदार यांनी नि.१५/३ ला पत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांचा दि.२८/७/०७ रोजी मीटर बदलला त्‍यावेळी रिडींग उपलब्‍ध झाले हे तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.१३/१२/०७ रोजी दिलेल्‍या पत्रावरुन स्‍पष्‍ट होते. सदरचे पत्राची प्रत ही तक्रारदार यांनी याकामी नि.५/५ वर दाखल केली आहे. सदर पत्रामध्‍ये जुन्‍या मीटरचे रिडींग ९६१० आहे असे तक्रारदार यांनी नमूद केले आहे. याउलट जाबदार हे जुन्‍या मीटरचे रिडींग त्‍यापेक्षा कमी म्‍हणजे ७२१२ आहे असे दर्शवितात. तक्रारदार यांचे मीटर बदलणेपूर्वीचे सर्व बिलांमध्‍ये मागील रिडींग ३६७५ नमूद आहे. सदरचे रिडींग हे डिसेंबर २००६ पासून ३६७५ आहे. तत्‍पूर्वी आलेले युनिट हे ४९५, २९२, २८०, ३२०, ४४० असे असलेचे लेजर पेपरवरुन दिसून येते म्‍हणजे तक्रारदार यांचा मीटर बदलणेपूर्वी सरासरी वापर १५० युनिट होता ही बाब दिसून येत नाही. तक्रारदार यांनी जाबदार यांना दिलेले पत्र नि.१५/२ वर दाखल आहे. सदर पत्रामध्‍ये तक्रारदार यांनी रक्‍कम तीन हप्‍त्‍यांत भरणेची सवलत मागितली आहे व त्‍याप्रमाणे पहिला हप्‍ता दि.५/२/२००८ रोजी रु.६,०००/- भरला आहे व त्‍यानंतर उर्वरीत रक्‍कम पुढील दोन हप्‍त्‍यांत भरली आहे. तक्रारदार यांना पाठविणेत आलेल्‍या बिलांमध्‍ये चूक होती व आहे हे समोर आलेल्‍या बिलांवरुन दिसून येत नाही. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्‍ये नोव्‍हेंबर २००६ ते जून २००७ या कालावधीचे बिलाबाबत सरासरी वापर १५० इतका धरुन बिले आकारणेत यावीत अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांची सदरची मागणी मीटर बदलणेचे पूर्वीची आहे व मीटर बदलला त्‍यावेळेस उपलब्‍ध झालेल्‍या रिडींगवरुन पुढील बिल आकारणेत आले आहे. त्‍यामुळे सदरची मागणी मंजूर करणे योग्‍य होणार नाही असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी सर्व थकबाकीची रक्‍कम जमा केली आहे व थकबाकीपोटी तक्रारदार यांचेकडून कोणतेही येणे बाकी नाही. तक्रारदार हे दि.२८/४/२००८ पासून पुढील देयके नियमितपणे भरत आहेत व थकबाकी काही नाही असे जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये नमूद केले आहे.  तक्रारदार यांना थकबाकीची रक्‍कम भरणेसाठी जाबदार यांनी हप्‍त्‍याची सवलत दिली आहे व त्‍याप्रमाणे तक्रारदार यांनी रक्‍कम भरली आहे असेही जाबदार यांनी नमूद केले आहे. तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा दिली असलेचे दिसून येत नसलेने तक्रारदार कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत या निष्‍कर्षास सदरचा मंच येत आहे.
 
६.    मुद्दा क्र.३
 
जाबदार यांनी तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे असे आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये आक्षेप घेतला आहे. तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारअर्जामध्‍ये नोव्‍हेंबर २००६ ते जून २००७ या कालावधीतील बिलांच्‍या बाबत दाद मागितली आहे. प्रस्‍तुत तक्रारअर्जास जून २००७ मध्‍ये कारण घडले असे जरी मानले तरी तेव्‍हापासून दोन वर्षाचे आत दि.१५/४/२००९ रोजी तक्रारअर्ज दाखल केला आहे त्‍यामुळे तो मुदतीत आहे असे या मंचाचे मत आहे.
 
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
१.  तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहेत.
 
२.  खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
 
सांगली
दि. ३०/०९/२०११                        
 
 
                  (गीता सु.घाटगे)                    (अनिल य.गोडसे÷)
                       सदस्‍या                                  अध्‍यक्ष           
                          जिल्‍हा मंच, सांगली.                  जिल्‍हा मंच, सांगली.  
 
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्‍टाने दि.//२०११          
       जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्‍टाने दि.//२०११
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.