दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचासमोरील कामकाज,
पुरवठा भवन, 1ला मजला, जनरल नागेश मार्ग, एम्.डी.कॉलेजसमोर,
परळ, मुंबई - 400 012.
तक्रार अर्ज क्रमांक : सीसी/17/82
दाखल दिनांक : 17/4/2017
आदेश दिनांक : 03/10/2017
Vav Life Sciences Pvt.Ltd.,
कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय –
51/बी, मित्तल कोर्ट, नरीमन पॉईंट,
मुंबई – 400 021. .... तक्रारदार.
विरुध्द
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड,
कार्यालय पत्ता -एम.एस.ई.बी.,
गुरुद्वारा बिल्डींग,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड,
ओल्ड बी.डी.डी. चाळ,
दादर (पूर्व)
मुंबई – 400 014.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड,
वसई – 410 210.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड,
वसई रोड (पूर्व), सब डिव्हीजन,
वसई – 401 210.
अॅडीशनल एक्झीक्यूटीव्ह इंजिनियर,
वसई रोड (पूर्व), सब डिव्हीजन,
1, एमएसईडी कंपनी लि., दिपश्री बिल्डींग,
पहिला मजला, एमएसईबी स्टाफ कॉलनी,
नवघर (पूर्व), वसई रोड ईस्ट - 401 210. .... सामनेवाला.
तक्रारदार - वकील श्री. आर.एम. केडिया,
// निकालपत्र //
द्वारा – श्री. गो.क. राठोड, अध्यक्ष
तक्रारदार आणि त्यांचे वकील गैरहजर. तक्रारदार यांचे वकील मागील तीन ते चार तारखांपासून गैरहजर. त्यांनी मंचास परस्पर लेखी युक्तिवाद पाठविला. तसेच ते दुस-या कोर्टात व्यस्त असल्यामुळे मुळ तकार अॅडमिट करावी अशी विनंती केली. तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर असल्यामुळे तक्रारीतील मजकूर पाहता, त्यांची तकार इलेक्ट्रिसिटी बिलाबाबत आहे व त्यांनी इलेक्ट्रीक बिल न भरल्यामुळे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटने त्यांचे इलेक्ट्रीक मीटर काढून टाकले आहे व त्यांची मागणी इलेक्ट्रीकल बिलाची रक्कम जास्त असल्यामुळे ते रद्द करण्यात यावे व इलेक्ट्रीक मीटर बसविण्यात यावे याकरिता आहे. या तक्रारीत मागणी केलेल्या केसमधील बाबी विचारात घेऊन त्यात मागितलेली विनंती कलमे पाहता, आम्ही या निष्कर्षाप्रत आलो की ही तक्रार अॅडमिट करता येणार नाही. तसेच तक्रारदार व त्यांचे वकील ब-याच तारखांपासून अनुपस्थित असल्यामुळे हे प्रकरण निकाली काढण्यात येते. तक्रार खारीज करण्यात येते. प्रकरण नस्तीबध्द.
(श्री. एस.आर.सानप) (श्री. गो.क. राठोड)
सदस्य अध्यक्ष
व्हीएनएस