ग्राहक तक्रार क्र. 129/2013
अर्ज दाखल तारीख : 07/09/2013
अर्ज निकाल तारीख: 26/05/2015
कालावधी: 01 वर्षे 08 महिने 20 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
1. उस्मानाबाद क्लब तर्फे व्यवस्थापक,
श्री. श्रीराम भगवानराव पाठक,
वय - 51, धंदा – नौकरी,
रा.उस्मानाबाद, ता. जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. महाराट्र राज्य विद्युत वीज पुरवठा,
कंपनी लि. करिता ए.बी. पापडकर,
अधिक्षक अभियंता, उस्मानाबाद.
2. एम.ए.लवटे, कार्यकारी अभियंता,
विभागीय कार्यालय, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.ए.एन.देशमूख.
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) तक्रारकर्ता (तक) हा न्यास असून विरुध्द पक्षकार (विप) वीज कंपनीने अवास्तव
वीज बिलाची मागणी करुन सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाईसाठी तक ने ही तक्रार दिलेली
आहे.
1. तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
तक न्यासातर्फे व्यावस्थापकाने ही तक्रार दिलेली आहे. न्यासाचा उद्देश उस्मानाबाद व परीसरातील लोकांमध्ये खेळ, लोककला, सांस्कृतीक कला, वृध्दींगत करणे, गरीब खेळाडू कलाकारांना मदत करणे, प्रोत्साहीत करणे असा आहे. विप तर्फे उस्मानाबाद सिव्हील क्लब येथे तक यांना वीज जोडणी देण्यात आलेली असून त्याचा क्र.590010157651 असा आहे. तक यांनी नियमीतपणे वीज बिल भरलेले आहे. तक कडे कोणतीही थकबाकी नाही. मात्र जानेवारी व फेब्रूवारी 2013 मध्ये विप ने रु.1,60,620/- चे देयक दिले संस्थेमध्ये बल्ब टयूब व फॅन वापरले जातात. इतर वापर नाही. दरमहा सरासरी वापर 160 ते 190 युनिट पर्यंत होतो. मात्र विप ने चुकीचे वीज बिल दिले आहे. तक्रार करुनही दुरुस्ती केली नाही व विद्युत पुरवठा बंद करुन तक चे सभासद खेळाडू व कलावंत यांची गैरसोय केली आहे. त्यामुळे ही तक्रार दि.07/09/2013 रोजी दाखल करण्यात आली. तक्रारीसोबत अंतरिम आदेशासाठी अर्ज देण्यात आला. अंतरिम आदेशावरुन तक यांनी देयकाच्या 50 टक्के रक्कम भरल्यास दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरु करावा असा अंतरिम आदेश त्याच दिवशी देण्यात आला.
2. तक यांनी तक्रारीसोबत जानेवारी 2013 चे वीज बिल उस्मानाबाद क्लबच्या दि;12/03/2013 चे बैठकीचे कार्यकारणीचे इतीवृत्त, न्यास नोंदणीची कागदपत्रे, सि.पी.एल.चा उतारा, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
ब) विप यांनी हजर होऊन दि.07/02/2014 रोजी आपले म्हणणे दिलेले आहे. त्याप्रमाणे तक यांनी डिसेंबर 2012 पुर्वी वापरलेल्या युनिटप्रमाणे बिल न भरता कमी युनिटची बिले भरली. जानेवारी 2013 मध्ये प्रत्यक्ष वापराचे युनिट पाहिले असता 1998 युनिट वापर दिसुन आला त्यामुळे सदरचे बिल तक ला देण्यात आले. डिसेंबर 2011 ते सप्टेंबर 2012 या कालावधीतील बिलातुन जास्त लागलेले रु.6,580/- कमी करुन तक ला बिल देण्यात आलेले आहे. चुकीचे बिल दिलेले नसल्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
क) तक ची तक्रार त्याने दाखल केलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तर
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनूतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
1. तक हा उस्मानाबाद क्लब या न्यासाचा व्यवस्थापक आहे. खेळ, लोककला व संस्कृतीक कलांना पुढावा देणे हे न्यासाचे उद्दीष्ट आहे. तक कडे खेळाचे मैदान, बंदिस्त कोर्ट, नाटय गृह, हॉल, वगैरे असल्याबद्दल कोणताही खुलासा नाही. कारण त्यावरच वीज किती वापरली जाईल हे ठरते. तक चे म्हणण्याप्रमाणे फक्त बल्ब्, टयूब व फॅन त्यांचेकडे वापरले जातात. वीज वापर सरासरी 160 ते 190 युनिट असतो मात्र एकदम रु.1,60,620/- चे बील देऊन विप ने वीज पुरवठा खंडित केला. या उलट विप चे म्हणणे आहे की जानेवारी 2013 मध्ये प्रत्यक्ष वीज वापर पाहिला तेव्हा 1998 युनिट वीज वापर दिसून आला. त्यानंतर प्रत्यक्ष वापराप्रमाणे बिल देण्यात आले.
2. जानेवारी 2013 चे बिल पाहिले असता मागील 11 महिन्याचा वीज वापर युनिटमध्ये 166, 170, 99, 10747, 420, 1935, 189, 189, 189, 138, 450 असा होता जानेवारी 2010 पासूनचे सि.पी.एल. हजर केलेले आहे. नोव्हेंबर 2011 पर्यंत मिटर रीडिंग 11638 मध्ये कोणताही बदल झाला नव्हता कारण मिटर चेंन्ज असे शेरे मारले आहेत. जानेवारी 2012 मध्ये 1643 युनिट वापर दाखवला पुन्हा 2230 वर मिटर रिडींग जून 2012 पर्यंत थांबले आहे. जूलै 2012 मध्ये 1,935 युनिट वापर नोंदवला त्यांनतर सप्टेंबर 2012 मध्ये 10747 युनिट वापर नोंदवला व थकबाकी रु.17,982/- सह मागणी रु.1,36,142/- झाली.
3. खरा वाद सप्टेंबर 2012 मध्ये निर्माण झाला आहे. मागील रिडींग 4,165 तर चालू रीडिंग 14,115/- दाखवले आहे. एका महिन्यात 10,000/- युनिट कसे वापरले हे विप सांगू शकले नाही. विप चे महणण्याप्रमाणे डिसेंबर 2011 ते सप्टेंबर 2012 म्हणजेच 10 महिन्यातील कालावधीतील हा वाद आहे. म्हणजेच महिना 1,000/- युनिट वापर या कालावधीत विप ने कमी नोंदवला या बद्दल विप तक ला दोष देत आहे. वस्तूत: योग्य वापर नोंदवणे ही विप च्या कर्मचा-यांची जबाबदारी होती. ती त्यांनी पार पाडलेली नाही. डिसेंबर 2011 पासून जो वीज वापर नोंदवला तो युनिटमध्ये 200, 1643, 450, 136, 189, 189, 189, व 1935 असा प्रत्यक्ष नोंदवल्याचे म्हंटले आहे. शेवटी प्रत्यक्ष वापर न मिळाल्याने 420 युनिट वीज वापर दाखवला गेला.
4. कुठल्याही परिस्थितीत सप्टेंबर 2012 चे 10,447/- युनिटचे बिल अवास्तव दिसून येते. पुर्वी विप च्या कर्मचा-यांनी खोटे रीडिंग नोंदवलेले असतील तर त्याची जबाबदारी विप वरच येते. एकदम दरमहा 1,000/- युनिट सरासरी कमी दाखवले हे पटण्यासारखे नाही त्यामुळे सप्टेंबर 2012 चे बिल चुकीचे देऊन विप ने सेवेत त्रुटी केली असे आमचे मत आहे. त्यामुळे तक अनूतोषास पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
1) विप यांनी सप्टेंबर 2012 या महिन्याचे देयकाची मागणी 50 टक्याने कमी करावी व त्यांनतरची बिले प्रत्यक्ष वापराप्रमाणे द्यावीत.
2) विप यांनी तक यांना या तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावे.
3) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज दयावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.