Maharashtra

Kolhapur

CC/10/149

Shri.Bhubali Vidyapeeth . - Complainant(s)

Versus

Maharashtra Stat Electricity Dist.Co. - Opp.Party(s)

Sudhir Patil.

05 Aug 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/149
1. Shri.Bhubali Vidyapeeth .Bhubali Tal-Hatkanganle.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Maharashtra Stat Electricity Dist.Co.Shirol road.Jaysingpur.Kolhapur2. Asst Engineer, Maharashtra State Electricty Distribution Co., Hatkangale Sub-Division, Tal.Hatkangale, Dist.Kolhapur3. Junior Engineer, Maharashtra State Electricity Distribution Co., Kumbhoj Branch.Tal.Hatkangale, Dist.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Sudhir Patil., Advocate for Complainant
A.G.Digavadekar , Advocate for Opp.Party Adv A G Digawadekar, Advocate for Opp.Party Adv A G Digawadekar, Advocate for Opp.Party

Dated : 05 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.05.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           तक्रारदार ही मुंबई पब्लिक ट्रस्‍ट अक्‍टनुसार नोंदणीकृत संस्‍था आहे. सदर संस्‍थेमधून वेगवेगळे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक उपक्रम रा‍बविले जातात. प्रस्‍तुतचे प्रकरण दाखल करणेबाबत संस्‍थेचे जॉंईन्‍ट सेक्रेटरी, भरमू बेडगे यांना ठरावान्‍वये अधिकार दिलेले आहेत. तक्रारदार संस्‍थेने सामनेवाला विद्युत कंपनीकडून संस्‍थेच्‍या कामासाठी विद्युत पुरवठा घेतलेला आहे. त्‍याचा ग्राहक क्रमांक 250410000039 असा आहे. 
 
(3)        तक्रारदार त्‍यांच्‍या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या मिटरचा क्र.8/33-8302-0030-00902225 असा होता. सामनेवाला यांनी सदरचा जुना मिटर बदलून नविन मिटर तक्रारदार संस्‍थेच्‍या गिरणीमध्‍ये बसविला. त्‍यावेळेस तक्रारदार संस्‍थेस कोणतीही कल्‍पना दिली नाही. तसेच, मिटर बसविल्‍यानंतर त्‍याचा अहवालही बनविलेला नाही. दि.01.05.2008 रोजी मिटर बद‍लला. तेंव्‍हापासून 1 महिन्‍यात 1367 युनिटचे बिल आकारले गेले. त्‍यानंतर दि.26.05.2008 ते दि.22.06.2008 रोजीअखेर रिडींग घेतले नाही, बिल मात्र रुपये 590/- चे दिले. तसेच, दि.22.06.2008 ते दि.21.07.2008 या कालावधीमध्‍ये रिडींग न घेता रक्‍कम रुपये 120/- चे बिल दिले. सदर देयकांचा भरणा केलेला आहे. त्‍यानंतर दि.21.07.2008 ते दि.21.08.2008 अचानकपणे 13209 चे मिटर रिडींग दाखवून रक्‍कम रुपये 46,986.83 पैसे इतक्‍या रक्‍कमेचे अवास्‍तव आकारणी करुन रक्‍कमेची मागणी केली. त्‍यानंतर दि.21.08.2008 ते दि.21.09.2008 या कालावधीतील बिल व त्‍यानंतर आलेली बिले बरोबर आहेत. त्‍यानंतर आलेल्‍या बिलापोटी तक्रारदार संस्‍थेने रुपये 10,000/- चा भरणा केलेला आहे.
 
(4)        तक्रारदार संस्‍था पुढे सांगतात, दि.21.07.2008 ते दि.21.08.2008 या कालावधीतील बिल चुकीचे असल्‍याने त्‍याचा भरणा केलेला नाही. सदर बिल दुरुस्‍त करणेबाबत तसेच मिटर बदलून देणेबाबत दि.20.10.2008, दि.09.01.2009 यातारखांना अर्ज करुन विनंती केली. परंतु, सामनेवाला यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्‍याने‍ दि.13.01.2009 रोजी स्‍पॉट व्‍हेरिफिकेशनचा दाखला मिळणेसाठी व मिटर बदलून मिळणेसाठी लेखी विनंती केली. त्‍यांनतर सामनेवाला यांनी दि.14.01.2009 रोजी खुलासा करुन बिल बरोबर असलेचे कळविले. त्‍यानंतर सामनेवाला यांना प्रत्‍यक्ष भेटून बिल चुकीचे आहे, त्‍याबाबत खात्री करुन देणेबाबत चर्चा केली. परंतु, सामनेवाला यांनी बिल दुरुस्‍त करुन देणेस जाणीवपूर्वक हयगय केली व त्‍याबाबत चर्चा करणेचे टाळून विद्युत पुरवठा खंडित करणेबाबत नोटीस पाठविली व थकबाकी रुपये 58,408/- ची मागणी केली. सबब, सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. सबब, दि.08.08.2008 चे बिलामध्‍ये युनिटचे रिडींग वीज वापरापेक्षा जादा काढणेत आले आहे असल्‍याने सदरचे बिल दुरुस्‍त करुन द्यावे, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(5)        तक्रारदार संस्‍थेने त्‍यांच्‍या तक्रारीसोबत संचालक मंडळाचा ठराव, सामनेवाला यांनी पाठविलेली दि.16.06.2008, दि.15.07.2008, दि.16.08.2008, दि.16.09.2008, दि.16.10.2008, दि.16.10.2008 ची बिले, सामनेवाला क्र.2 यांना दि.20.10.2008, दि.03.12.2008, दि.09.01.2009, दि.13.01.2009, दि.14.01.2009 रोजीची पत्रे, सामनेवाला यांनी वजी पुरवठा खंडित करणेबाबत पाठविलेली दि.22.09.2009 व दि.10.02.2010 रोजीची पत्रे, दि.30.12.2009 रोजी भरलेले बिल, तसेच धर्मशिक्षण शिबीराची जाहिरातीच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केलेले आहे.
(6)        सामनेवाला विद्युत कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सर्व औद्योगिक ग्राहकांना नविन टी.ओ.डी. मिटर बसविणेचे आदेश दिले असल्‍याने एप्रिल 2007 नंतर जसे मिटर उपलब्‍ध होतील, त्‍याप्रमाणे जुने मिटर काढून नविन मिटर टेस्टिंग लॅबमध्‍ये टेस्टिंग करुन ग्राहकांना बसविणेचे काम चालू केले. त्‍यानुसार तक्रार ग्राहकांना दि.16.06.2007 रोजी नविन मिटर बसविला. परंतु, सामनेवाला यांचे उपविभाग, हातकणंगले कार्यालयाकडून वेळेत मिटर चेंज रिपोर्ट मिळाला नसल्‍याने जून 2007 ते एप्रिल 2008 पर्यन्‍त शुन्‍य युनिटची देयके दिली गेली आहे. नंतरच्‍या बिलामधून सरासराने दिलेल्‍या बिलांची वजावट केलेली आहे व मे 2008 मध्‍ये दि.01.05.2008 ते 26.05.2008 चे देयक 1367 युनिटचे दिलेले आहे. हे देयक दि.16.06.2007 रोजी मिटर बसविलेल्‍या तारखेपासून 11 महिन्‍यातील मासिक 125 युनिटप्रमाणे प्रत्‍यक्ष वीज वापराचे बिल आहे. त्‍यामध्‍ये व्‍याज, विलंब आकार लावलेला नाही. जून 2008 मध्‍ये मिटर रिडींग घेताना कुलूप असल्‍याने जून 2008 चे देयक शुन्‍य युनिटने देणेत आले आहे.  तसेच, रक्‍कम रुपये 500/- टेस्टिंग फी भरुन मिटर घ्‍यावा याबाबत तक्रारदारांना कळविले आहे व देयक बरोबर असलेचे तक्रारदारांना कळविले आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी व नुकसान भरपाई रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(7)            सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ मे ते जुलै 2008 च्‍या वीज वापराची माहिती (टी.ओ.डी.), माहे मे, जून, जुलै, ऑगस्‍ट, सप्‍टेंबर 2008 ची बिले, मिटर बदल अहवाल, दि.10.10.2008, दि.03.12.2008, दि.09.01.2005 रोजीची तक्रारदारांनी दिलेली पत्रे, सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.14.01.2009 रोजी दिलेले पत्र, जानेवारी 2008 मध्‍ये वीज पुरवठा खंडित करणेबाबत दिलेली नोटीस, तक्रारदारांनी वीज वापरलेबाबत खातेउतारा इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. 
 
(8)        या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचे युक्तिवाद सविस्‍तर व‍ विस्‍तृतपणे ऐकले आहेत. उपलब्‍ध कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. तक्रारदारांची तक्रार ही सामनेवाला विद्युत कंपनीने अवास्‍तव देयक दिले आहे याबाबतची आहे. त्‍या अनुषंगाने या मंचाने मिटर‍ रिडींग फॉर्म एम्.आर.9 यातील नोंदी तसेच तक्रारदार संस्‍थेचे सामनेवाला विद्युत कंपनीने दिलेले कन्‍झ्युमर पर्सनल लेजरचे अवलोकन केले आहे. सामनेवाला विद्युत कंपनीने एप्रिल 2007 ते एप्रिल 2008 अखेरपर्यन्‍त रिडींग घेतले नसलेचे दिसून येते. सामनेवाला विद्युत कंपनीने मे 2008 च्‍या कन्‍झ्युमर पर्सनल लेजरमध्‍ये चालू रिडींग 1368 व पूर्वीचे रिडींग 1 असे दर्शवून वीज वापर 1367 असा दर्शविलेला आहे. त्‍यानंतर जून 2008 मध्‍ये चालू रिडींग 1368 व पूर्वीचे रिडींग 1368 व वापर शुन्‍य, त्‍याचप्रमाणे जुलै 2008 मध्‍ये अशाचप्रकारे विद्युत वापर दर्शविलेला आहे. उपरोक्‍त वस्‍तुस्थितीचे अवलोकन केले असता सामनेवाला विद्युत कंपनीने महाराष्‍ट्र विद्युत नियामक आयोग (विद्युत पुरवठा संहिता आणि पुरवठयाचा इतर अटी) विनिमय 2005 यामध्‍ये दिलेल्‍या विनिमयाचे स्‍पष्‍टपणे भंग केल्‍याचे दिसून येते. यातील तरतुद विचारात घेतली असता मिटरच्‍या नोंदी घेणेबाबत एखाद्या ग्राहकाकरिता किंवा ग्राहकाच्‍या वर्गाकरिता आयोगाने विशिष्‍ट मंजूरी दिली नसेल तर नोंदी घेण्‍याचे काम अधिकृत प्रतिनिधीकडून कृषि ग्राहकांच्‍या बाबतीत किमान तीन महिन्‍यांतून किमान एकदा आणि इतर ग्राहकांच्‍या बाबतीत किमान दोन महिन्‍यातून एकदा करणेत येईल. तसेच,पुढीलप्रमाणे मिटरच्‍या नोंदी नसताना देयके तयार करणे :-
 
कोणत्‍याही कारणामुळे मिटर पर्यन्‍त पोहोचणे शक्‍य नसेल तर आणि त्‍यामुळे नोंदी घेतल्‍या नसतील तर वितरण परवानाधारक ग्राहकास अंदाजे देयक पाठवेल. 
 
(9)        तसेच, सदर विनिमयामध्‍ये दिलेल्‍या परिशिष्‍टामध्‍ये प्रत्‍येक दोन महिन्‍यातून एकदा ग्राहकाच्‍या मिटरच्‍या नोंदी घेणे बंधनकारण ठरविलेले आहे. उपरोक्‍त उल्‍लेख केलेल्‍या विनिमयातील तरतुदींचा विचार करता सामनेवाला विद्युत कंपनीने याबाबत कोणतीही कार्यवाही केलेची दिसून येत नाही. 
 
(10)       सामनेवाला विद्युत कंपनीने जुने मिटर बदलून नविन मिटर बसविलेले आहे. याबाबतची कृती सेवात्रुटीमध्‍ये येत नाही. परंतु, नविन मिटर दिल्‍यानंतर त्‍याबाबतचे कोणतेही रिडींग घेवून देयके दिलेली नाही. सामनेवाला यांनी दि.21.07.2008 ते दि.21.08.2008 या कालावधीतील मिटर रिडींग घेवून तक्रारदारांकडे देयकाची मागणी केली आहे. परंतु, सदर कालावधीत मिटर रिडींग घेताना त्‍या अनुषंगाने विद्युत कंपनीने स्‍वतंत्रपणे अहवाल करणे आवश्‍यक असते अशा परिस्थितीमध्‍ये सदरचे रिडींग ग्राहकाचे समोर घेणे आवश्‍यक होते. तसेच, अहवाल तयार करीत असताना विद्युत ग्राहकांचे त्‍यावरती सहया घेणे आवश्‍यक होते. मिटर रिडींगबाबतचा कोणताही अहवाल तयार केलेला नाही. त्‍याबाबतचे सुस्‍पष्‍ट स्‍पष्‍टीकरण प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेले नाही. इत्‍यादी उपरोक्‍त विवेचन विचारात घेता तसेच, महाराष्‍ट्र विद्युत नियामक आयोग (विद्युत पुरवठा संहिता आणि पुरवठयाचा इतर अटी) विनिमय 2005 यातील तरतुदीचा विचार करता सामनेवाला विद्युत कंपनीने त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली असल्‍याचा निष्‍कर्ष हे मंच काढीत आहे. सामनेवाला विद्युत कंपनीने सदर कालावधीतील देयक दुरुस्‍त करावे व सदर कालावधीतील नविन देयक देत असताना दि.21.07.2008 पूर्वीच्‍या सहा महिन्‍यातील सरासरी विद्युत वापर विचारात घेवून कोणताही दंड, व्‍याज, सरचार्ज न लावता सदर कालावधीतील नविन दुरुस्‍त देयक द्यावेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच, सामनेवाला यांच्‍या सदर कृतीमुळे तक्रारदार संस्‍थेच्‍या पदाधिका-यांना झालेल्‍या मा‍नसिक त्रासाबद्दल तक्रारदार संस्‍था नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   सबब, उपरोक्‍त विवेचन विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
2.    सामनेवाला विद्युत कंपनीने दि.21.07.2008 ते दि.21.08.2008 या कालावधीतील 13209 हे मिटर रिडींग दाखवून रक्‍कम रुपये 46,970/- ची मागणी केलेले देयक रद्द करणेत येते. सामनेवाला विद्युत कंपनीने दि.21.07.2008 पूर्वीचे सहा महिन्‍यातील सरासरी विद्युत वापर विचारात घेवून सदर कालावधीतील दंड, व्‍याज इत्‍यादी न लावता   नविन दुरुस्‍ती देयक द्यावेत.
 
3.    सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदार संस्‍थेस मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्‍त) द्यावेत.
 
4.    सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्‍त) द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER