Maharashtra

Satara

cc/12/05

Ghanshyam Salunkhe - Complainant(s)

Versus

Maharashtra Sate Electricity Board - Opp.Party(s)

10 Sep 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. cc/12/05
 
1. Ghanshyam Salunkhe
A post Ambawade, Tal Koregaon
...........Complainant(s)
Versus
1. Maharashtra Sate Electricity Board
Wathar, Koregaon
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
 HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

          मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य

           मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.            

             

                तक्रार अर्ज क्र. 05/2012

                      तक्रार दाखल दि.13-01-2013.

                            तक्रार निकाली दि.10-09-2015. 

 

श्री. घनःश्‍याम लक्ष्‍मण साळुंखे,

रा. अंबवडे संमत,

ता. कोरेगांव, जि.सातारा.

मयत तर्फे कायदेशीर वारस

सौ.सुवर्णा सचिन साळुंखे,

रा. अंबवडे, ता.कोरेगांव,जि.सातारा                   ....  तक्रारदार.

  

         विरुध्‍द

 

1. महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण

   कंपनी लिमीटेड, तर्फे सहाय्यक अभियंता,

   वाठार स्‍टेशन, उप विभाग,

   वाठार स्‍टेशन, ता. कोरेगांव, जि.सातारा.                ....  जाबदार.

 

                           तक्रारदारातर्फे अँड.डि.एस. कुलकर्णी.

                           जाबदारतर्फे अँड.व्‍ही.ई.भोसले.                               

 

न्‍यायनिर्णय

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

                                                                                      

1.  तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात मजकूर पुढीलप्रमाणे-

     तक्रारदार हे अंबवडे-संमत, ता. कोरेगांव, जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवाशी आहेत. तर जाबदार ही विद्युत वितरण कंपनी आहे.  तक्रारदार हे जाबदार विद्युत कंपनीचे ग्राहक आहेत.  तसेच ते ऊस उत्‍पादक शेतकरी आहेत.  तक्रारदार यांची गट नं.375 ते 377 ही ऊसशेती तक्रारदाराचे वहिवाटीखाली असणारे क्षेत्र खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.     गट क्रमांक     क्षेत्र  हे.आर.

1.          375          0.21

2.                    376                    0.74

3.                    377                    0.74

                           1.28

                              =======

वर नमूद क्षेत्रातील सर्व जमीन ऊस बागायत आहे.  या जमीनीत दोन जीवंत पाण्‍याच्‍या मोठया विहीरी आहेत व त्‍यावर 15 हॉर्सपॉवरच्‍या दोन इलेक्‍ट्रीक मोटर्स तक्रारदाराचे पतीचे नावाने वीज कनेक्‍शन असणा-या आहेत.  त्‍यांचा ग्राहक क्र. (1) जुना नं.एल.ए.0023, नवीन नं.210310109678 (2) जुना नं ए-00148 नवीन नं.210310109228 असा आहे.  गट नं. 376 मध्‍ये पोट खराब 1 गुटा क्षेत्र असून ते केशव नेटके व नारायण नेटके यांना घरबांधणीसाठी दिले आहे.  त्‍याचप्रमाणे गट नं.375 यात तक्रारदार यांची अलग तुटक वहिवाट असणारे क्षेत्र 21 गुंठे आहे.  ते सर्व क्षेत्र ऊसाखाली आहे.  ऊर्वरीत जमिनीपैकी काही क्षेत्र हे ज्ञानेश्‍वर प्रभाकर क्षीरसागर व आत्‍माराम रामू तेली यांच्‍या हिश्‍याची आहे.  त्‍या दोघांचा ऊस नाही.  तक्रारदाराचे प्रस्‍तुत जमीनीतून, वीज वितरण कंपनीची विद्युत वाहीनी तारा नेणारे पोल व त्‍यावरुन विद्युत वाहक तारा जातात.  या पोलवरुन जाणारी विद्युत वाहक तार, त्‍यातून विद्युत प्रवाह चालू असताना दि.16/11/2011 रोजी दुपारी 1 वाजणेच्‍या सुमारास अकस्‍मात तुटून खाली पडली व त्‍यातून विद्युत प्रवाह तक्रारदाराचे शेतात आला आहे.  याच वीजवाहक तारा व त्‍याची डी.पी. यावरुनच तक्रारदाराचे दोन्‍ही इलेक्‍ट्रीक मोटारींना कनेक्‍शन घेतलेले आहे.  या विद्युत तारामधून वाहणा-या विद्युत प्रवाहामुळे तक्रारदाराचे ऊसाचे फडास अचानक आग लागली.  वर नमूद केलेले गट नं. 375,376 व 377 ही जमिन एकमेकांस लागून एकाच तळावर आहे व तक्रारदार यांचा ऊस एकमेकास लागून सलग आहे.  संपूर्ण ऊसाचा फळ ही विद्युत वाहिनी (तार) तुटून पडलेने जळून खाक झाला आहे.  प्रस्‍तुतचे तक्रारदाराचे नुकसानीस जाबदार हेच सर्वस्‍वी जबाबदार आहेत. कारण जाबदाराने विद्युत वाहिनीच्‍या तारा अनेक वर्षात न बदलल्‍याने त्‍या खराब झाल्‍या व जळाल्‍या.  या ऊसाला ठिबक सिंचन स्‍कीमने पाणीपुरवठा केला जात होता.  त्‍या ठिबक सिंचनाचे पाईप्‍स इ. सर्व काही शेतात सर्वत्र परसलेले होते. तेही जळून गेले. या आगीची नोंद कोरेगांव पोलीस ठाण्‍याअंतर्गत सातारा रोड येथील पोलीस आऊट पोस्‍टमध्‍ये दि. 16/11/2011 रोजी दु.14.45 वाजता झाली आहे.  पो.हे.कॉ.कोरेगांव पो.स्‍टे. श्री.व्‍ही.एस.चव्‍हाण यांनी  व यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.  अकस्‍मात जळीत रजि. नं. 7/2011 ने त्‍यांनी गुन्‍हा नोंदला असून पोलीस तपास सुरु आले.  प्रस्‍तुतची आग किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्‍यावरुन अग्‍नीशामक बंब मागवून त्‍यांचेकडून विझविण्‍यात आली. या जळीताचे ठिकाणी महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांनीही समक्ष येवून त्‍याचदिवशी पाहणी केली आहे  व संबंधीत लाईट (विद्युत वाहीनी) दुरुस्‍तही केली आहे. प्रस्‍तुत आगीमुळे झाले नुकसानीचा पंचनामा मे. तहशिलदारसो, कोरेगांव यांचेसमक्ष तलाठी मौजे अंबवडे तर्फे कोरेगांव, मंडल अधिकारी किन्‍हई, कृषी सहाय्यक, अंबवडे यांनी पंचांसमक्ष केला आहे.  या पंचनाम्‍यात 11 एकर उभ्‍या ऊसाचे नुकसान अंदाजे रक्‍कम रु.17,00,000/- (रुपये सतरा लाख मात्र) व ठिबक सिंचनाचे सेटचे नुकसान रक्‍कम रु.4,00,000/- (रुपये चार लाख मात्र) असे एकूण रक्‍कम रु.21,00,000/-(रुपये एकवीस लाख मात्र) नमूद केले आहे.  वस्‍तुतः तक्रारदाराचे प्रत्‍यक्षात यापेक्षा जास्‍त नुकसान झाले आहे.  कारण तक्रारदाराचा ऊस उत्‍तम प्रतीचा व खतपाणी घालून जोपासलेला होता.  एकरी उत्‍पादनहि अधिक असते व उताराही चांगला असतो. पंचनाम्‍यात फक्‍त जळीत ऊसाचाच विचार घेत आहे.  मात्र ठिबक सिंचन जळालेने खोडवा ऊसास पाणी देता येत नाही.  त्‍यामुळे ऊसाचे नुकसान झाले आहे.  तसेच तक्रारदाराचे गट नं.378,372,159 ते 170 (17) अशा ऊसाच्‍या जमीनी आहेत.  त्‍याला तक्रारदाराचे जमिनीतील विहीरीचे पाणी तक्रारदार देतात.  तक्रारदाराचे जमिनीची प्रतवारी चांगली आहे ते सरासरी एकरी 90 टन ऊस काढतात.  जळीताचे वर्षी कारखान्‍याने प्रतिटन रक्‍कम रु.2450/- दर जाहीर केला होता.  यावरुन एकरी 80 टन ऊस उत्‍पादन सरासरी धरले तर ऊसाचे उत्‍पादन रक्‍कम रु.5,88,000/- एवढे आले असते हे स्‍पष्‍ट होते.  तसेच नवीन ठीबक सिंचनसाठी अंदाजे रक्‍कम रु.5,00,000/- खर्च होणार आहे.  या सर्व कारणांमुळे तक्रारदाराचे अतोनात नुकसान झाले आहे.  त्‍यामुळे तक्रारदाराने जाबदार यांचेकडे मदतीची मागणी केली परंतू जाबदाराने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने जाबदार विद्युत वितरण कंपनीकडून एकूण रक्‍कम रु.10,40,000/- (रुपये दहा लाख चाळीस हजार मात्र) नुकसानभरपाई जाबदार यांचेकडून मिळावी म्‍हणून सदर तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.

2.  तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी जाबदार यांचेकडून तक्रार अर्ज कलम 12 मध्‍ये तपशीलात नमूद केली एकूण रक्‍कम रु.10,40,000/- (रुपये दहा लाख चाळीस हजार मात्र) तक्रारदार यांना मिळावी, प्रस्‍तुत रकमेवर, रक्‍कम तक्रारदाराचे पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 15 टक्‍के व्‍याज जाबदाराकडून तक्रारदाराला मिळावे.  अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.

3.   प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते 5/9 कडे अनुक्रमे मौजे अंबवडे, ता. कोरेगांव, येथील गट नं. 376 व 377, 375 चा 7/12 उतारा, तक्रारदाराचे ऊस लागण कराराची किसनवीर सहकारी साखर कारखान्‍याची पावती, तक्रारदाराचे शेतातील ऊस पिकाचे नुकसान व ठिबक सिंचनाचे झाले नुकसानीची पोहोचपावती, गुन्‍हा घडलेचा प्राथमिक अहवाल, दि.16/11/2011 रोजी पोलीस स्‍टेशन, सातारा रोड यांनी केले पंचनाम्‍याची प्रत, अकस्‍मात जळीत रजि. नं. 7/11 मधील खबरी जबाबाची प्रत, जबाबाच्‍या प्रती, नि. 16 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 18 चे कागदयादीसोबत नि.18/1 ते नि.18/5 कडे किसनवीर सहकारी साखर कारखाना यांचा गट नं. 375, 376 व 377 मधील मधील ऊस गळितासाठी आला नसलेबाबत दाखला, तक्रारदाराने ठिबक सिंचन खरेदी केलेची जैन इरिगेशनची पावती, तक्रारदाराने बँकेकडून घेतले कर्जाचा खातेउतारा, गट नं. 372 चा 7/12 उतारा, किसनवीर कारखान्‍याचे ऊस खरेदीचे अँडव्‍हान्‍स बील, नि. 30 कडे जाबदाराने दिले जादा म्‍हणण्‍यावर तक्रारदाराचा खुलासा, नि. 31 कडे तक्रारदाराचे शपथपत्र, नि. 32 चे कागदयादीसोबत नि. 32/1 ते नि. 32/7 कडे अनुक्रमे तक्रारदार व इतरांच्‍या जमीनीचा एकत्रित नकाशा सहीशिक्‍का प्रत, गट नं.  378,169,372 चे 7/12 उतारे, तक्रारदाराने किसनवीर सहकारी साखर कारखान्‍याकडे माहितीच्‍या अधिकाराखाली केलेला अर्ज, तक्रारदाराने फी भरलेची पावती, किसनवीर कारखान्‍याचे पत्र, सोबत ऊसाचे बील सन 2011,2012 ऊसाच्‍या वजनाच्‍या पावत्‍या, नि. 39 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 40 कडे लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.

4.  प्रस्‍तुत कामी जाबदार यांनी नि. 13 कडे म्‍हणणे, नि. 14 कडे म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट, नि. 15 चे कागदयादीसोबत नि. 15/1 ते 15/8 कडे अनुक्रमे अभियंता वाठार स्‍टेशन यांनी तक्रारदार यांना दिलेले पत्र, सदर पत्र साध्‍या पोष्‍टाने पाठवले त्‍याबाबत जावक रजिस्‍टर मधील अ.क्र. नं.3522 ते 3532 या पानाची प्रमाणीत प्रत, सहाय्यक अभियंता यांनी घनःश्‍याम साळुंखे यांना दिलेले पत्राची  प्रमाणीत प्रत, पोस्‍टाची पोहोचपावती, सहाय्यक अभियंता यांनी किसनवीर साखर कारखाना यांना दिले पत्राची प्रमाणीत प्रत, पोस्‍टाची पोहोचपावती, सहाय्यक अभियंता यांनी घनःश्‍याम साळुंखे यांना दिलेले पत्राची प्रमाणीत प्रत व पोस्‍टाची पोहोचपावती, नि. 19 कडे जाबदारांचे पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 23 कडे जाबदारांचे जादा म्‍हणणे, नि.24 कडे जादा म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट, नि. 26 कडे कागदयादीसोबत नि.26/1 ते नि.26/9 कडे अनुक्रमे जाबदाराने किसनवीर सहकारी साखर कारखान्‍याकडे माहिती अधिकाराखाली केलेला अर्ज, प्रस्‍तुत अर्ज कारखान्‍याचे रजिस्‍टर पोष्‍टामार्फत स्विकारला याची पोहोचपावती, किसनवीर सहकारी साखर कारखाना मर्या., भुईंज यांनी जाबदार यांना दि. 25/10/2012 रोजीचे अर्जास दिले उत्‍तराची व्‍हेरीफाईड प्रत, किसनवीर सहकारी साखर कारखाना मर्या., भुईंज यांचेकडे जाबदाराने रक्‍कम भरलेची व्‍हेरीफाईड प्रत, किसनवीर सहकारी साखर कारखाना मर्या.,भुईज यांचेकडील ऊसगळीत हंगाम सन 2011-2012 मधील दि.18/11/2011 ते दि.23/11/2011 पर्यंतच्‍या संगणकीय साक्षांकीत गळीत ऊसाबाबत दाखल्‍याची व्‍हेरिफाईड प्रत, नि. 32 चे कागदयादीसोबत किसनवीर सहकारी साखर कारखान्‍याचे जाबदार यांना दिलेले पत्र, नि. 33 कडे जाबदार यांचा लेखी युक्‍तीवाद, नि. 34 कडे जादा म्‍हणण्‍यावरील पुराव्‍याचे शपथपत्र अशी कागदपत्रे जाबदारांनी या कामी दाखल केले आहेत.

    जाबदाराने त्‍यांचे म्‍हणणे/कैफियतमध्‍ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्‍यांनी तक्रारदाराचे अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.

    i  तक्रारदार व जाबदार यांचे दरम्‍यान ग्राहक व सेवापुरवठादार असे नातेसंबंध नाहीत.  त्‍यामुळे तक्रारदाराने मे मंचासमोर आणलेला वादविषय हा या मे. कोर्टात चालू शकत नाही.  प्रस्‍तुत तक्रारदाराने मागणी केलेली नुकसानीची बाब ही दिवाणी न्‍यायालयाकडे मागणे कायद्याने आवश्‍यक आहे.  परंतू तक्रारदाराने मागणी केलेला वादविषय हा सेवेतील त्रुटीमध्‍ये मोडत नाही. तसेच तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होऊच शकत नसलेने तक्रारदाराने मागणी केलेला हा विषय या मे. मंचात चालू शकत नाही.  सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा.

ii  सदरची दाद तक्रारदाराने दिवाणी न्‍यायालयात मागणे गरजेचे आहे.  तसेच प्रत्‍यक्षात घटना कशी घडली ? घटनेनंतर त्‍यास कोण जबाबदार? ऊस लागणीकरीता व त्‍याच्‍या वाढीकरीता किती खर्च आला?  प्रत्‍यक्षात किती क्षेत्रातील ऊस जळाला ?  जळालेला ऊस कारखान्‍याने नेला कि नाही?  आता त्‍याचे वजन किती?  ठिबक सिंचन पाईप जळाल्‍या यासाठी किती खर्च आला?  अशा सर्व बाबी पूर्ण सखोल चौकशी झाल्‍याशिवाय नुकसानीचे अनुमान काढता येत नाही.  विद्युत वाहिनीची तार तुटून ऊस जळाला ही बाब नुकसान मिळविणेसाठी तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केली आहे व रेव्‍हेन्‍यू खातेला हाताशी धरुन खोटे पंचनामे तक्रारदाराने करुन घेतले आहेत.

    iii  प्रस्‍तुत कामी वस्‍तुस्थिती अशी आहे की, दि.16/11/2011 रोजी  जाबदार कंपनीचे कनिष्‍ट अभियंता, श्री. डावरे हे कार्यालयात होते व कनिष्‍ठ तंत्रज्ञ कुचेकर हे नांदगिरी येथे होते. दि. 16/11/2011 रोजी रात्री 1.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत भारनियमन कालवधी होता.  भारनियमनाचा कालावधी संपलेनंतर 1.00 वाजता चालू होणार होता.  परंतू उपकेंद्र सातारा रोड ते भाडलेपर्यंत जाणारी 22 के.व्‍ही. वाठार फीडर ही वाहिनी चालू झाली नाही. ती ड्रीप झाली म्‍हणून उपकेंद्र सातारा रोड मधून श्री. कदम यांचा श्री. डावरे यांना फोन आला व  पुढील ट्रायलसाठी सांगीतले त्‍यावेळी श्री. डावरे यांनी सातारा रोडचे कुचेकर यांना नांदगिरीवरुन ए.बी.स्‍वीच ओपन करण्‍यास सांगीतले त्‍याप्रमाणे ए.बी.स्‍वीच ओपन करुन कुचेकर यांनी डावरे यांना ट्रायल घेण्‍यास सांगितले.  त्‍यानंतर नांदगिरीपासून पुढील लाईट चालू झाली नाही. त्‍यानंतर थोडया वेळाने कुचेकर यांनी फोन करुन लांबून धूर येत असलेचे सांगीतले. नंतर थोडयाच वेळात तक्रारदाराचा मुलगा सचिन साळुंखे यांचा फोन आला, त्‍यानंतर जाबदाराचे अधिकारी श्री. डावरे हे ऊसजळीताठिकाणी पोहचले.  त्‍याठिकाणी तार तुटल्‍याचे दिसले.  परंतू प्रस्‍तुतची आग ही निश्चितपणे तार तुटल्‍यामुळेच लागली हे तक्रारदाराचे कथन खोटे आहे.  तक्रारदाराचे कुटूंबीय राजकीय प्रभावाखाली आहे, त्‍यामुळे गावात त्‍यांचे राजकीय विरोधक आहेत.  कदाचीत त्‍यामधून हे कृत्‍य झाले असु शकते.  त्‍यामुळे केवळ तार तुटून पडलेली दिसली म्‍हणून शॉर्ट सर्कीटने आग लागली ऊस जळाला असे अनुमान काढणे योग्‍य होणार नाही, याचा योग्‍य व ठोस पुरावा तक्रारदाराने देणे गरजेचे आहे.  पाचट जळत असताना अनेक लोक जमले होते.  भुईंज साखर कारखाना अग्‍नीशामक बंबही आला होता.  लोकांनी बरेच क्षेत्र जळीतापासून वाचविले आहे.  जळीतक्षेत्र अडीच एकरपेक्षा जास्‍त नव्‍हते असे असतानाही केवळ खोटया पंचनाम्‍याच्‍या आधारे नुकसानभरपाईची मागणी तक्रारदाराने केली आहे.

iv    तक्रारदाराकडे जाबदाराने पुढील कागदपत्रांची मागणी केली होती.  परंतू तक्रारदाराने प्रस्‍तुत कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.

     अ.  ऊस ज्‍या कारखान्‍यास गेला त्‍याच्‍या वजनाच्‍या पावत्‍या.

     ब.  कारखान्‍याचे ऊस जळीताबाबत सर्टिफिकेट (जळीत ऊसाचे वजनाची घट व जळीत ऊसाचा दर)

     क. कारखान्‍याचे शेती अधिकारी यांचे सरासरी प्रति एकर ऊस उत्‍पादनाचे सर्टीफिकेट

     ड.  चालूवर्षीचा ऊस दराचा दाखला

     इ.  ज्‍या क्षेत्रातील ऊस जळीत झाला त्‍याचे नवीन 7/12 उतारे

     वरील कागदपत्रांची पूर्तता तक्रारदाराने केली नाही म्‍हणून तक्रारदाराने वरील कागदपत्रांची पूर्तता करावी म्‍हणून जाबदार कंपनीचे सहाय्यक अभियंता यांनी तक्रारदाराचे पतीचे नावे दि.18/12/2011 रोजीचे पत्र दि.3/1/2012 रोजी रजिस्‍टर पोस्‍टाने पाठवले.  तसेच दि.2/1/2012 रोजी सहाय्यक अभियंता वाठार स्‍टेशन यांनी किसनवीर साखर कारखाना, भुईंज यांना पत्र लिहून वरील कागदपत्रांची मागणी केली. वरील पत्र कारखान्‍यास मिळूनही,कारखान्‍याने कोणतेही कागदपत्रांची पूर्तता केली नाही. तसेच तक्रारदारानेही कागपत्रांची पूर्तता केली नाही.  म्‍हणून जाबदाराने पुन्‍हा तक्रारदाराला स्‍मरणपत्र पाठवले व कागदपत्रांची मागणी केली.  परंतू अद्यापपर्यंत कागदपत्रे दिली नाहीत.  त्‍यामुळे तक्रारदाराचे प्रस्‍तुत तक्रार अर्जाचा विचार करता येणार नाही.

     v.  तक्रारदाराने तक्रार अर्जात केलेल्‍या मागण्‍या कायदेशीर नाहीत, खोटया व चूकीच्‍या माहितीवरुन सदर तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला असून तो चालणेस पात्र नाही, त्‍यामुळे तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे आक्षेप जाबदाराने घेतले आहेत.       

5.   प्रस्‍तुत कामी वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रे, पुराव्‍याची शपथपत्रे, लेखी व तोंडी युक्‍तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्‍तुत तक्रार अर्जाच्‍या निराकरणार्थ मे. मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला.

अ.क्र.               मुद्दा                           उत्‍तर

 1.  तक्रारदार हे जाबदार यांचे दरम्‍यान ग्राहक व

     सेवापुरवठादार असे नाते आहे काय?                        होय.                                        

2.  तक्रारदाराचा तक्रार अर्ज या मे मंचात चालणेस पात्र आहे काय?   नाही.

3.   अंतिम आदेश काय?                                 खाली नमूद

                                                      आदेशाप्रमाणे.

विवेचन-

6.   वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- प्रस्‍तुत तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून दोन्‍ही विहीरीवरील इलेक्‍ट्रीक मोटारीना वीज कनेक्‍शन घेतले आहे.  त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक असून जाबदार हे तक्रारदाराचे सेवापुरवठादार आहेत हे स्‍पष्‍ट होते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.

7.    वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी ऊस गळीताची नुकसानभरपाई मागणी केली आहे.  या प्रकारचा वाद हा या मे. मंचासमोर चालणार नाही तर तक्रारदाराने याबाबतीत मे. दिवाणी न्‍यायालयात दाद मागणे आवश्‍यक आहे.  जाबदार ही विद्युत वितरण कंपनी असून त्‍यांच्‍या ग्राहकांना वीजपुरवठा करण्‍याचे कार्य करते.  प्रस्‍तुत वीजपुरवठयामध्‍ये किंवा प्रस्‍तुत सेवेमध्‍ये जर काही त्रुटी असल्‍या तर तशा प्रकारचे वादविषय या मे मंचासमोर चालणेस पात्र असतात.  तक्रारदाराचे तक्रार अर्जातील वादविषय ही सेवात्रुटी होऊ शकत नाही. तसेच तक्रारदाराने त्‍याच्‍या विहीरीवर मोटारसाठी दिले विद्युत लाईनमधून स्‍पार्कींग होवून अथवा तार तुटून सदरचे ऊस जळीताचे नुकसान झाले आहे अशी तक्रारदाराची तक्रार नाही व तसे कागदपत्रांवरुनही शाबीत होत नाही तर प्रस्‍तुत तक्रारदाराचे ऊसाचे फडात तुटून पडलेली विद्युत वाहिनी ही वीजवितरण कंपनीची विद्युत वाहिनी तारा नेणारे पोल व ज्‍यावरुन विद्युत वाहन तारा जातात या पोलवरुन जाणारी विद्युत वाहक तार, त्‍यातून विद्युत प्रवाह चालू असताना अकस्‍मात तुटून खाली पडली व ऊसाचे शेतात विद्युत प्रवाह येवुन ऊस जळीत झाला असलेचे म्‍हणणे आहे.  प्रस्‍तुत कामी नि. 5/4 कडे या घटनेचा झालेल्‍या पंचनाम्‍याची खरी प्रत जोडली आहे.  त्‍यामध्‍ये म्‍हटले आहे की, तक्रारदाराचे शेतातून विद्युत पोलवरुन जाणारी विजवाहक तार तुटून पडली त्‍यामुळे आग लागली.  म्‍हणजेच तक्रारदाराने विहीरीवर घेतले मोटारीचे कनेक्‍शनमधून किंवा त्‍यासाठी विद्युतपुरवठा करणारी तार तुटून सदर जळीत झालेले नाही हे स्‍पष्‍ट होत आहे.  त्‍यामुळे तक्रारदाराचे प्रस्‍तुत झालेले नुकसानभरपाई अर्ज या मंचात चालणेस पात्र नाही. कारण प्रस्‍तुत नुकसानीही Tortuous liability ने मे. दिवाणी कोर्टात दावा दाखल करणे आवश्‍यक आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. याकामी मे. राज्य आयोग यांचे फर्स्‍ट अपील नं.227/2007 व फर्स्‍ट अपील क्र. 228/2007

      i   First Appeal  No. 227/2007  MSEDS V/s. Babulal Gandhi                

     ii    First Appeal No.228/2007 Babulal Gandhi V/s. MSEDC

या न्‍यायनिवाडयांचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.

    मे. राज्‍य आयोगाने पुढीलप्रमाणे स्‍पष्‍टकरण दिले आहे.

      In short, we find that the relationship of a person as consumer under the Consumer Protection Act, in electric supply case, Board commences with board or supplier from the point of the meter and lines, the point of consumption the main distributing main and he transmission lines are an infrastructure lines of the opponents, so as to bring supply of the energy to the premises of the consumer.  However the said energy enters energy to the premises of the consumer  through the service line brought up to the  meter and cutouts.  The service line is always from the pole close to the premises of the consumer and the premises of consumer.  The service line may be overhead and may be underground.  If it is overhead line it is always insulted and kept with material so as to avoid shock or damages to the life of any human being.  It is not the case of present complainant that anything has happened after the meter and at the time of consumption of energy through the line which can be considered as any consumer line for which the  consumer pays on such line no accident has taken place.  The accident admittedly has taken place as a result of the loose wires either of a main and or of a distributing main and therefore there would be consistent remedies for those persons who suffered   an accident at this place.  Thus we find that the present dispute is not a consumer dispute.  Therefore even though we have recorded a finding that complainant is entitled for the damages and that the damages have taken place due to short circuit and that compensation is calculated.  Yet according to us it is not a case  which consumer forum shall deal.  We find that there is no relationship of a ‘Consumer’ and the ‘Service Provider’ between complainant and opponent. Dispute is not a consumer dispute.

      We have dealt with all the points raised by the parties, But, we find that since there is no relationship of any consumer and service provider between complainant and opponent and  complaint was /is not tenable.

   प्रस्‍तुत तक्रारदार व जाबदार यांचे दरम्‍यानसुध्‍दा ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते आहे ही बाब स्‍पष्‍ट होते. तसेच सदर तक्रार अर्जातील वादविषय हा या मे मंचासमोर चालणेस पात्र नसून मे. दिवाणी कोर्टासमोर चालणेस पात्र आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब सदर तक्रार अर्ज नामंजूर करणे न्‍यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे मत आहे.  परंतू प्रस्‍तुत कामी तक्रारदार यांचा मे. दिवाणी न्‍यायालयाकडून अथवा इतर योग्‍य त्‍या न्‍यायालयाकडून नुकसानभरपाई मागणेचा हक्‍क अबाधित ठेवणे न्‍यायोचीत होणार आहे असे आम्‍हास वाटते.

7.  सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.

आदेश

1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत येतो.

2. तक्रारदाराने मे.दिवाणी न्‍यायालय अथवा योग्‍य त्‍या कोर्टात दाद मागावी.

3. सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

4. सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

 

ठिकाण- सातारा.

दि. 10-09-2015.

 

 सौ.सुरेखा हजारे  श्री.श्रीकांत कुंभार   सौ.सविता भोसले

सदस्‍या          सदस्‍य           अध्‍यक्षा

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.