(पारीत व्दारा मा. सदस्या श्रीमती वृषाली गौ. जागीरदार)
(पारीत दिनांक – 28 मार्च, 2019)
01. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाची ग्राहक असून, तिचा ग्राहक क्र. 436280215280 आहे. तक्रारकर्तीकडे एक आटा चक्की व एक मिरची पिसाई मशिन आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दिनांक 09/09/2017 रोजीचे 967 युनिट विज वापराचे रुपये 5,592.29 चे विज देयक पाठविले जे तक्रारकर्तीस दिनांक 14/09/2017 रोजी मिळाले.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्तीकडे असलेली आटा चक्की व मिरची पिसाई मशिन जास्त प्रमाणांत चालत नसल्यामुळे विज वापर जास्त होत नाही. तक्रारकर्तीला सदर बिलाबाबत संशय आल्यामुळे तिने सदरील विज मिटरचे निरिक्षण केले असता दिनांक 09/09/2017 च्या विज देयकामध्ये दिनांक 03/09/2017 ला नोंद असलेले मिटरचे वाचन 3764 चुकीचे आढळल्यामुळे तिने दिनांक 15/09/2017 रोजी विज ग्राहक तक्रार नोंदवहीत पान क्रं. 9 वर ‘चुकीची रिडींग घेतल्यामुळे चुकीचे बिल पाठविण्यात आले आहे. करीता पुन्हा रिडींग लिहून नविन बिल पाठवावे’ अशी तक्रार नोंदविली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्षाच्या अधिका-यांनी दिनांक 16/09/2017 रोजी प्रत्येक्ष विज मिटरचा चालु वाचनाची नोंद 2815 kwh असल्याची खात्री करुन घेतली व दिनांक 09/09/2017 च्या विज देयक बिलावर सदरील मिटरच्या नोंदी त्यांनी स्वहस्ते लिहून स्वाक्षरी केली, परंतु दिनांक 08/10/2017 च्या विज देयक बिलामध्ये विज मिटरचे मागील वाचन 3764 kwh व दिनांक 03/10/2017 चे विज मिटरचे चालु वाचन 3764 kwh ची नोंद आहे, त्यामुळे विरुध्द पक्षाकडून दर्शवीत असलेल्या विज मिटरच्या नोंदीत सुमारे 967 kwh ची तफावत असुन ताळमेळ नसल्याचे तक्रारकर्तीने नमुद केले आहे. तक्रारकर्तीने दिनांक 05/10/2017 रोजीच्या पत्राद्वारे विरुध्द पक्ष यांना विज देयकात सुधारणाकरुन विज देयक देण्यात यावे अशी विनंती केली, परंतु विरुध्द पक्षाने कोणतीही सुधारणा न करता दिनांक 08/10/2017 चे विज देयक दिनांक 13/10/2017 रोजी पाठविले व त्याच दिवशी तक्रारकर्तीला कोणतीही पूर्व सुचना न देता विज पुरवठा खंडीत केला.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दिलेले विज देयक हे दिनांक 03/09/2017 पासून मागील वाचन 3764 युनिट व दिनांक 05/01/2018 चे विज देयकात चालु वाचन 3764 युनिटची नोंद करुन विज देयक पाठविलेले आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला पाठविलेले विज देयक अनु. क्रं. 1 मधील 2611 युनिट व अनु. क्रं. 8 मधील 2797 युनिट वजा केल्यास 186 युनिटचा विज वापर झालेला आहे. विरुध्द पक्षाने दिनांक 24/01/2018 रोजी नोटीस पाठविली आहे त्यात दिनांक 05/01/2018 चे विज देयक रुपये 6,811.63 15 दिवसात न भरल्यास विज पुरवठा दुसरी कोणतीही नोटीस न देता खंडीत करण्यांत येईल असे नमुद केले आहे. विरुध्द पक्षाने दिनांक 13/10/2017 रोजी तक्रारकर्तीचा विज पुरवठा खंडीत केल्याचे नमुद न करता नोटीस दिलेली आहे. तक्रारकर्तीने आपले वकीलामार्फत कायदेशीर नोटीस दिनांक 12/02/2018 रोजी विरुध्द पक्षाला पाठविली, सदर नोटीस विरुध्द पक्ष यांना मिळूनही त्यांनी नोटीस उत्तर दिलेले नाही, म्हणून तक्रारकर्तीने या मंचात तक्रार दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केली आहे. विरुध्द पक्ष यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे तसेच तक्रारकर्तीला दिलेले विज देयक विज वापरानुसार सुधारीत करण्याचा आदेश व्हावा. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा खंडीत केलेला विज पुरवठा विनाशुल्क सुरु करुन देण्यात यावा. तक्रारकर्तीला मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 20,000/- आणि तक्रार खर्च रुपये 5,000/- विरुध्द पक्षाकडून मिळावा अशी विनंती केली आहे. kwh असल्याची बाब मान्य केली आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्तीची आटा चक्की जास्त प्रमाणांत चालत नसल्याने विजेचा वापर कमी होत असल्याची बाब अमान्य केलेली आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीने दाखल केलेल्या तक्रारीतील इतर परिच्छेद निहाय कथन अमान्य करुन तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
3. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, लेखी युक्तिवाद व विरुध्द पक्षाचे लेखी उत्तर,शपथपत्र, लेखी युक्तिवादानावरुन मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
निष्कर्ष –
4. सदर प्रकरणांत तक्रारकर्तीला विरुध्द पक्षाने दिनांक 09/09/2017 रोजी 967 युनिट विज वापराचे रुपये 5,592.29 चे विज देयक माहे सप्टेंबर 2017 पाठविले आहे. सदर बिल तक्रारकर्तीला मान्य नसल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल केली आहे. विरुध्द पक्षाचे लेखी उत्तर व शपथपत्रानुसार कथन केले आहे की, विरुध्द पक्षाने दिनांक 09/09/2017 रोजी तक्रारकर्तीस पाठविलेले रुपये 5,592.29 चे विज देयक अगदी बरोबर व योग्य आहे आणि विरुध्द पक्ष यांनी दिनांक 27/09/2017 रोजी तक्रारकर्तीला सदर बिलाचा भरणा 15 दिवसात न केल्यास विज पुरवठा खंडीत करण्यात येईल अशी नोटीस तक्रारकर्तीला दिलेली होती, परंतु तक्रारकर्तीने सदर नोटीस घेण्यास नकार दिला असल्याने विरुध्द पक्षाने दिनांक 13/10/2017 रोजी तक्रारकर्तीचा विज पुरवठा तात्पुरता खंडीत केला. तक्रारकर्तीला जास्त युनिट दर्शविणारे विज देयक आल्याने चुकीचे असल्याने योग्य ती शहानिशा करण्यासंबंधीत विरुध्द पक्ष यांचेकडे तक्रारकर्तीने वारंवार पत्र व्यवहार केल्याचे अभिलेखावर दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला असल्यास जर तक्रारकर्तीच्या पत्रांची योग्य दखल घेऊन समस्येचे त्वरीत निराकरण केले असते तर तक्रारकर्तीचा विज पुरवठा परत जोडता येऊ शकला असता, परंतु विराध्द पक्ष यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही.
5. सदर प्रकरणात विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला आटा चक्की व मिरची पिसाईकरीता विज मिटर लावून दिले. तक्रारकर्तीने अभिलेखावर दाखल केलेल्या बिलाचे तसेच विरुध्द पक्षाने अभिलेखावर दाखल केलेल्या सीपीएलचे मंचाने अवलोकन केले असता तक्रारकर्तीने वापर केलेले विज युनिट सन 2016-2017 मध्ये वापर अत्यंत कमी प्रमाणांत असल्याचे दिसून येते. तक्रारकर्तीकडे असलेली एक आटा चक्की व एक मिरची पिसाई मशिनचे विज युनिट हे सर्वात जास्त म्हणजे माहे जुन 2016 मध्ये एकूण 45 युनिट चा वापर झालेला दिसून येते. याचाच अर्थ तक्रारकर्तीची आटा चक्की व मिरची पिसाई मशिन सर्व साधारण सरासरी धर्तीवर जास्त प्रमाणांत चालत नव्हती हे सिध्द होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दिनांक 09/09/2017 रोजी पाठविलेले 967 युनिट वापराचे विज देयक हे चुकीचे आहे असे मंचाचे मत आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला देण्यात येणा-या सेवेत दोषपूर्ण सेवा दिली ही बाब स्पष्ट होते. विरुध्द पक्षाने माहे सप्टेंबर 2017 मध्ये दिलेल्या बिलाची रक्कम रुपये 5,592.29 ची मागणी करणे आणि तक्रारकर्तीने त्यास हरकत घेऊनही सदर बिल दुरुस्त न करता बिल न भरल्यास तक्रारकर्तीचा विज पुरवठा खंडीत करणे ही विरुध्द पक्षाची कृती ही निश्चितच सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे असे मंचाचे मत आहे.
kwh चा सरासरी वापर 17.7 kwh च्या वर गेलेला दिसून येत नाही. विरुध्द पक्षाने दिलेले माहे सप्टेंबर 2017 चे 967 युनिट वापराचे विज देयक तक्रारकर्तीस अमान्य आहे. तसेच आकस्मिक वाढ झालेल्या युनिट kwh मध्ये का वाढ झाली याबाबतचा तपशिल अहवाल सादर करण्यास विरुध्द पक्षाने कसुर केलेला आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडे सदरहु देयक दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली, परंतु विरुध्द पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही. या उलट विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विद्युत पुरवठा खंडीत करुन सेवेत त्रुटी केली आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा खंडीत केलेला विज पुरवठा कोणतेही शुल्क न घेता पुर्वरत सुरु करुन देण्यास जबाबदार आहेत. तक्रारकर्तीला विरुध्द पक्षाने वादातीत बिलाच्या मागील सात महिन्याच्या बिलाचा सरासरी वापर 18 युनिट kwh प्रमाणे येत असल्याचे गृहीत धरुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दिलेले माहे सप्टेंबर 2017 चे 967 युनिटचे विज देयक रद्द करुन 18 युनिट kwh विज वापराचे सुधारीत विज देयक मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्तीला या मंचात तक्रार दाखल करावी लागली. वकीलांची सेवा घ्यावी लागली, म्हणून तक्रारीचा खर्च रु.3,000/- आणि मानसिक व शारिरीक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.2,000/- तक्रारकर्ती विरुध्द पक्षाकडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
07. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आ दे श -
- तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 अंतर्गत तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीला माहे सप्टेंबर 2017 मध्ये दिलेले रुपये 5,592.29 चे विज बिल रद्द करुन सदर कालावधीचे 18 युनिट विज वापराचे सुधारीत नविन बिल द्यावे व तक्रारकर्तीने सदर बिलाचा भरणा 30 दिवसाचे आत करावा आणि तदनंतर विरुध्द पक्ष यांनी कोणतेही शुल्क न आकारता मिटरच्या रिडींगप्रमाणे आकारणी करुन तक्रारकर्तीस विज देयके देण्यात यावे.
- विरुध्द पक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीचा विज पुरवठा खंडीत केला असल्यास विना मुल्य पुर्वरत सुरु करावा.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस शारिरीक मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई दाखल रु.2,000/- आणि सदर तक्रारीच्या खर्चादाखल रु.3,000/- द्यावे.
- विरुध्द पक्षाने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
- तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.