::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ) मा.सदस्या
१.. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
२. अर्जदार ही वरील पत्त्यावर रहात असून अर्जदाराचे घरी एक विज मीटर अर्जदाराच्या नांवाने तर एक मीटर अर्जदाराच्या आईच्या नांवाने असे दोन वीज मीटर आहेत. घरी दोन वीज मीटर असल्यामुळे विजेचा वापर फार कमी होतो. अर्जदाराने गैरअर्जदार विज वितरण कंपनीकडून दिनांक ०८.१०.२०१०रोजी विज मीटर घेतले असून त्याचा ग्राहक क्र४५८०१०००२३७ हा आहे. अर्जदाराने सुरूवातीपासून वीजदेयकांचा भरणा नियमीतपणे केला.अर्जदार ही आममुख्त्यारची मुलगी आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराला जुलै,२०१६ चे देयक पाठविले. या देयकात चालु रिडींग १३९८४९ व मागील रिडींग १३५३२ असे दाखवून ३४८ युनिटचे देयक अर्जदाराला दिले. या देयकामधील थकबाकीची रक्कम रू.४०१९/- ही चुकीची होती. म्हणून गैरअर्जदाराने देयक दुरूस्त करून दिले व अर्जदाराने देयकाचा भरणा केला. यानंतर अर्जदाराला गैरअर्जदाराकडे जाऊन देयकाची मागणी करावी लागत आहे. अर्जदाराने सप्टेंबर,२०१६ मध्ये गैरअर्जदाराचे कार्यालयात जाऊन बिलाची मागणी केल्यावर गैरअर्जदाराने दिनांक ०६.०९.२०१६ चे कम्प्युटरचे बिल दिले व अर्जदाराने ते भरले. त्यानंतर दिनांक 15/9/2016 चे देयक गैरअर्जदाराने पाठविले. सदर देयकामध्ये अर्जदाराची क्रेडीट रक्कम जमा असल्याची नोंद आहे. गैरअर्जदाराचे लोकांनी अर्जदाराकडे बिल आणून न दिल्यामुळे अर्जदाराने दिनांक ०४.११.२०१६ रोजी पोस्टामार्फत तक्रार पाठविली. गैरअर्जदाराने अर्जदाराला सप्टेंबर, २०१६ पासून जानेवारी, २०१७ पावेतो मीटर इनअॅक्सेसीबल दर्शवून विज देयक पाठविले. त्याबद्दल तक्रार करता गैरअर्जदाराने फेब़्रवारी, २०१७ चे १६१ युनिटचे सरासरी देयक पाठविले. अर्जदाराने मीटर वाचनाप्रमाणे विजदेयक पाठविण्याची विनंती केली. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या हातचे विजदेयक काढून चालु रिडींग १५५४० असे लिहून १६१ सरासरी युनिटला कमी करून १५५४० युनिटचे देयक रू.६७१०/- करिता दिले. अर्जदाराने ते देयक नाकारले असता अर्जदाराचा विजपूरवठा खंडीत केला. अर्जदाराचा विजपूरवठा खंडीत झाल्याने विवादीत रक्कम अधिकार राखून ठेवून दिनांक २३.२.२०१७ रोजी जमा केल्यावर वि.प.ने विजपुरवठा सुरू करून दिला. वास्तवीक फेबृवारी, २०१७ चे देयकामधील मागील रिडींग १३६६८ नव्हती व चालू रिडींग १५५४० ही नव्हती परंतु गैरअर्जदाराने हाताने लिहून अर्जदाराला दोषपूर्ण सेवा दिली आहे.यानंतरही गैरअर्जदाराने मार्च व एप्रिल, २०१७ चे देयक पाठविले नाही तेव्हा अर्जदाराने गैरअर्जदाराच्या कार्यालयात जाऊन मागणी केल्यावर संगणकातून देयक काढून दिले. सदर देयकामध्ये अर्जदाराची रक्कम क्रेडीट म्हणून जमा आहे. याचा अर्थ गैरअर्जदाराने गुंडप्रवृत्तीचा वापर करून अर्जदाराचा विजपुरवठा खंडीत करून फेबृवारी, २०१७ चे देयकामध्ये चालू रिडींग हाताने लिहून मनमानी रक्कम वसूल केली व १७ एप्रील,२०१७ चे क्रेडीट जमा आहे असे नमूद असलेले देयक दिले. गैरअर्जदाराने प्रत्येक महिन्याचे नियमीत देयक न पाठवून अर्जदाराचा विजपूरवठा खंडीत करून अर्जदाराला शारिरीक, मानसीक व आर्थीक त्रास दिलेला आहे.
३. सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष गैरअर्जदाराविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांस न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे असे घोषित करावे, व गैरअर्जदाराने अर्जदाराचे घरी जुना मीटर काढून त्या ठिकाणी नवीन मीटर लाऊन अर्जदाराचा वीज वापर काढून सेप्ट. २०१६ ते नवीन मीटर चे वापर काढेपावतो सुधारित देयक द्यावेत व सेप्ट. २०१६ पासून आज पावेतो अर्जदाराने जमा केलेली रक्कम त्यातून वळती करावी व दुरुस्त देयके वर कोणत्याही प्रकारे व्याज दंड आकारू नये तसेच अर्ज्दारचे घरी वीज देयक पोहचविणाऱ्याअधिकारी वर प्रशाकीय कारवाई करावी. अर्जदारला झालेल्या मानसिक शारीरिक त्रासापोटी रु. ५०,०००/-गैरअर्जदारांनी द्यावे. व केसचा खर्च रु. २०,०००/- गैरअर्जदाराने द्यावा.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारा विरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने हजर होवून आपले लेखी उत्तर दाखल केले व प्राथमीक आक्षेप घेतला की अर्जदाराचे घरी एक अर्जदाराच्या नांवाने वीज मीटर व एक अर्जदाराच्या आईचे नांवाने असे दोन मीटर आहेत असे तक्रारीत नमूद केले असल्यामूळे एकाच परिसरात एकाच हेतूकरीता दोन विज कनेक्शन ठेवता येत नाही. सबब सदर तक्रार खारीज करण्यांत यावी. गैरअर्जदाराला देयक बरोबर दिले गेले असून तो ते भरण्यांस जबाबदार आहे. माहे जून, २०१७ मध्ये अर्जदारांस ९ महिन्याचे देयक देण्यांत आले होते. सदर देयकात सरासरी देयकापोटी भरणा केलेली रक्कम रू. ८०८२.८७ वजा करून रू ८१८.००/- चे देयक दिले. परंतु ते अर्जदाराने भरले नाही. सदर देयक गैरअर्जदाराने दस्तावेजांसह प्रकरणात दाखल केले आहे. तसेच ही बाब गैरअर्जदाराने अर्जदाराला समजावूनदेखील सांगितली. त्यावेळी अर्जदाराने बाब समजल्याचे कबूल केले. सबब गैरअर्जदाराने अर्जदाराला आवश्यक ती सेवा दिली असून कोणत्याही अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही. सबब सदर तक्रार खोटी असल्याने ती खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
४. . तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, तक्रारदारांचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखी उत्तर ,रिजॉईंडर, लेखी युक्तिवाद., उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिद्ध करतात काय ?
होय
२. गैरअर्जदार तक्रारदारास नुकसानभरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? होय
३ . आदेश ? अंशतः मान्य
मुद्दा क्र. १ व २ बाबत
- अर्जदाराचे तक्रार व तक्रारीत दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता असे निर्देशनास आले की अर्जदाराने मार्च एप्रिल २०१७ पर्यंतचे वीज देयक गैरअर्जदाराकडे नियमित भरलेले आहेत. वास्तविक पाहता अर्जदाराने सदर प्रकरण गैरअर्जदार विरुद्ध अर्जदाराने जास्तीचे रकमेचे देयक लाऊन अर्जदाराकडून वसुली करून क्रेडिट असल्यामुळे समोरील देयके नियमित न पाठवल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे केलेली आहे. तक्रारीत कथन केल्या प्रमाणे जुलै २०१६ पासून गैरअर्जदाराने अर्जदाराला चुकीचे तर कधी हाताने बिलाचे रीडिंग वाढवून देयकाची रक्कम अर्जदाराला भरावयास सांगितलेली आहे व अर्जदाराने वेळोवेळी भरलेली आहेत. अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदारा देयकाबद्दल त्याबद्दल पत्राद्वारे कळविले किवा स्वतः जाऊन सदर देयक आणून पूर्ण मार्च एप्रिल २०१७ पर्यंतचे देयक गैरअर्जदाराकडे देयक भरलेली आहेत यात वाद नाही..अर्जदाराला गैर अर्जदाराने अर्जदाराला पाठवलेले फरवरी २०१७ चे युनिट सरासरी देयक पाठवले, त्याबाबत विचारणा केल्यास गैर अर्जदाराने बिलावर हाताने लिहून रुपये ६७१०/-चे वाढून वीज देयक अर्जदाराला दिले हि गैरअर्जदाराची सेवेत न्यूनता दिसून येत आहे .त्यानंतर गैर अर्जदाराने अर्जदाराला मार्च एप्रिल २०१७ चे बिल पाठवले नाही कारण अर्जदाराने आधी भरलेल्या बिलामधील रक्कम गैरअर्जदाराकडे कडे जमा होती. गैर अर्जदाराने तक्रारी त्यांचे उत्तर दाखल करून कबूल केले की मीटर रीडिंग ची नोंद संगणकीय प्रणालीत होत नसल्या कारणाने सरासरी स्वरूपाची देण्यात येत होती व त्यानंतर मीटर वाचनाची नोंद प्राप्त झाल्यावर अर्जदाराने सरासरी दिवसाची झालेली रक्कम वळती करून वीज देण्यात आलेले आहेत. तसेच तक्रारीत अर्जदाराने अनेकदा गैरअर्जदाराकडे तक्रार केल्याचे पत्र दाखल केलेले आहेत. परंतु एकाही पत्रात तक्रारदाराने नवीन मीटर लावून देण्याची विनंती अर्ज अर्जदाराकडे केलेली नाही. तसेच गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या सिपील नुसार अर्जदाराच्या मीटर चे स्टेटस नॉर्मल दिसून येत आहे. सबब अर्जदाराची तक्रारीतील मागणी नवीन मीटर लावून द्यावे ही ग्राह्य धरण्यास सारखी नसल्यामुळे ती निष्फळ झालेली आहे. परंतु अर्जदाराने दाखल केलेले देयकाचे अवलोकन केले असता ही बाब लक्षात येत आहे की गैर अर्जदाराने फरवरी २०१७ चे देयक दुरुस्त करून हाताने वाढवून दिलेले आहे परंतु त्यावरील खुलासा उत्तरात अमान्य करण्याशिवाय काहीही केला नाही. अर्जदाराला नियमित देयके न पाठवणे ही अर्जदारांप्रति गैरअर्जदाराची न्यूनतापूर्ण सेवा आहे या निष्कर्षाप्रत मंच आलेला आहे. सबब मुद्दा क्रमांक १ व २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे
मुद्दा क्रं. ३ बाबत ः-
- . मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार क्र.८०/२०१७ अंशत: मान्य करण्यात येते.
२. गैरअर्जदाराला आदेश देण्यात येत आहे की गैरअर्जदार ह्यांनी अर्जदाराला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु ५०००/- ह्या आदेश प्राप्ती दिनका पासून ३० दिवसांच्या आत द्यावे.
३. गैरअर्जदाराला आदेशित करण्यात येत आहे कि गैरअर्जदाराने यापुढील देयक अर्जदाराला वेळेवर पाठवावी व अर्जदाराने ती देयक नियमित भरणा करावित
४. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
.
.कल्पना जांगडे(कुटे) किर्ती वैद्य (गाडगीळ) (श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष