जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, भंडारा.
ग्राहक तक्रार क्रं- CC/18/90
तक्रार नोंदणी दि.- 24/12/2018
आदेश पारित दि.-20/11/2020
तक्रारकर्ती- सौ.पुनाबाई नत्थुजी राठोड,
वय-65 वर्ष, धंदा-गृहीणी
राहणार-वडगाव (गाढवे),
तालुका-दारव्हा, जिल्हा यवतमाळ
-विरुध्द-
विरुध्दपक्ष- 1) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
विभाग मार्फत- आगार व्यवस्थापक,
साकोली आगार, तालुका साकोली,
जिल्हा भंडारा
2) भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत-
मा.केंद्रीय लोकसुचना अधिकारी/प्रबंधक,
(ग्रा.सं.प्र.) नागपूर मंडळ कार्यालय,
नॅशनल इन्शुरन्स बिल्डींग,
दुसरा माळा, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग,
नागपूर-440001
गणपूर्ती- 1) श्री नितीन माणिकराव घरडे- मा.पिठासीन अध्यक्ष
2) श्रीमती वृषाली गौरव जागीरदार- मा.सदस्या.
त.क. तर्फे - त.क. स्वतः व त्यांचे वकील श्री टी.एस.शिंगाडे
वि.प. 2 तर्फे- वकील सौ.सुषमा सिंग.
-निशाणी क्रं 1 वरील आदेश-
(पारित दिनांक-20 नोव्हेंबर, 2020)
आज तक्रारकर्ती स्वतः व तिचे वकील श्री टी.एस.शिंगाडे हजर. विरुध्दपक्ष क्रं 2 तर्फे वकील सौ.सुषमा सिंग यांचे कारकून हजर. सदर तक्रारीमध्ये उभय पक्षात समझोता झाला असल्याने विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी तक्रारकर्तीला दिनांक-17.11.2020 रोजीचा धनादेश क्रं-101097 रुपये-1,66,592/- एवढया रकमेचा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, भंडारा यांचे समक्ष दिला तसेच उभय पक्षांचे स्वाक्षरीची संयुक्त पुरसिस दाखल करुन तक्रार काढून घेण्या बाबत नमुद केले. उभय पक्षांचे संयुक्त पुरसिस वरुन तक्रार काढून टाकण्यात येते. तक्रार नस्तीबध्द करण्यात येते. सदर आदेशाची नोंद उभय पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांनी घ्यावी.
स्वाक्षरीत/- स्वाक्षरीत/-
( श्री नितीन माणिकराव घरडे) (श्रीमती वृषाली गौरव जागीरदार)
मा.पिठासीन अध्यक्ष मा.सदस्या.