जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
तक्रार अर्ज क्रमांक – ३१/२०११
तक्रार दाखल दिनांक – ११/०२/२०११
तक्रार निकाली दिनांक – २७/०१/२०१४
सौ.शोभा राजाराम साळुंके,
उ.व. ५० धंदा – शेती
रा.साक्री, ता.साक्री, जि.धुळे. ----------- तक्रारदार
विरुध्द
१. म.अध्यक्ष सो.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
प्रकाशगड बिल्डींग, बांद्रा, मुंबई.
२. म.कार्यकारी अभियंता सो.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
पाण्याच्या टाकीजवळ, देवपूर, धुळे.
३. म.सहाय्यक अभियंता सो.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
नेहरू नगर, साक्री, जि.धुळे.
४. म.कनिष्ठ अभियंता सो.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
साक्री, ता. साक्री, जि.धुळे.े
---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.जी.आर. भोसले)
(सामनेवाला तर्फे – गैरहजर)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
------------------------------------------------------------------------------------
सामनेवाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. वाहिनीच्या तारांमधे शॉर्ट सर्कीटमुळे ठिणग्या पडुन तक्रारदारचे गव्हाच्या रचलेल्या गंजीस आग लागल्यामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
तक्रारदार हे दाखल दिनांकानंतर तारीख १५/०३/२०११ पासून सतत गैरहजर आहे. तसेच तक्रार अर्ज सुरू ठेवणेकामी कोणताही पाठपुरावा (Steps) केलेला नाही. यावरून त्यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नसल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर तक्रार अंतिमरित्या निकाली (D.I.D.) काढण्यात येत आहे.
आ दे श
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दि.२७/०१/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.