Maharashtra

Nanded

CC/10/198

Vithalrao madhavrao sawant - Complainant(s)

Versus

Maharashtra hybrid seeds - Opp.Party(s)

R N kulkarni

11 Feb 2011

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/198
1. Vithalrao madhavrao sawant Gortha Tq.Umari Nanded Maharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Maharashtra hybrid seedsJalna-aurangabad Road post,dawalwadi tq.BadanapurJalnaMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBER
PRESENT :

Dated : 11 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/198
                          प्रकरण दाखल तारीख - 18/08/2010
                          प्रकरण निकाल तारीख 11/02/2011
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
       मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
    
विठठलराव ऊर्फ विजय माधवराव सावंत
वय 35 वर्षे, धंदा शेती                                                           अर्जदार.
रा. गोरठा ता.उमरी जि. नांदेड.
     विरुध्‍द.
महाराष्‍ट्र हायब्रिड सिडस कंपनी लि.
मार्फत व्‍यवस्‍थापक, जालना औरंगाबाद रोड,
पोस्‍ट दावलवाडी, ता.बदनापूर जि.जालना                               गैरअर्जदार
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.आर.एन.कूलकर्णी
गैरअर्जदारा तर्फे वकील           -  अड.पी.एस.भक्‍कड.
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्‍यक्ष )
 
1.              गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्‍हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
2.                थोडक्‍यात अर्जदाराची तक्रार अशी की, अर्जदार हा शेतकरी असून त्‍यांचा गट क्र.175 मध्‍ये मौजे गोरठा ता. उमरी येथे शेती आहे. अर्जदारांनी गैरअर्जदार कंपनीकडून दि.16.1.2010 रोजी ज्‍वारीचे सिडस बियाणे दोन बॅग कंपनीचे एंजट सुनिल कपाळे यांच्‍याकडून रु.460/- ला खरेदी केले.  ज्‍यांचा लॉट नंबर डब्‍ल्‍यू आर -1380332 असा आहे. गैरअर्जदार यांचे एंजट यांच्‍या मार्गदर्शनानुसार दोन एकर क्षेञात लागवड केली. डि.ए.पी.खताचे तिन बँग व युरिया खताचे दोन बॅग तसेच कोळपणी व निंदणी करुन पाण्‍याच्‍या सात पाळया केल्‍या. किटकनाशकांची फवारणी केली. शेतात ज्‍वारीच्‍या पिकाची वाढ झाली पण ज्‍वारीच्‍या पिकाच्‍या कणसात दाणे भरले नाही. एंजटाकडे तक्रार
केली पण त्‍यांनी दाद दिली नाही. अर्जदाराने तालूका कृषी अधिकारी यांच्‍याकडे तक्रार केली, म्‍हणून गट विकास अधिकारी पंचायत समिती उमरी व तालूका कृषी अधिकारी उमरी यांनी अर्जदाराच्‍या शेतात येऊन दि.20.05.2010 रोजी पिकाची पाहणी व स्‍थळ पंचनामा केला.  अर्जदाराच्‍या शेतातील ज्‍वारीचे दाणे न भरल्‍यामूळे अर्जदाराचे 100 टक्‍के नूकसान झाले आहे असा अभिप्राय दिला. सदरील ज्‍वारी पासून अर्जदारास एकरी 20 क्विंटल याप्रमाणे 40 क्विंटल ज्‍वारीचे उत्‍पादन अपेक्षित होते. प्रति क्विंटल ज्‍वारीस रु.1500/- होता त्‍यानुसार 1500  x  40 = रु.60,000/- चे नूकसान झाले तसेच अर्जदारास खत, निंदणी, पेरणी, कोळपणी व पाण्‍याच्‍या पाळया असे मिळून एकूण रु.30,000/- एवढा खर्च झाला. त्‍याबाबत दि.24.6.2010 रोजी गैरअर्जदार यांना रु.90,000/- नूकसान भरपाई मिळावी म्‍हणून नोटीस पाठविली, नोटीस मिळाल्‍यावर
 
 
गैरअर्जदार यांनी नोटीसीस उत्‍तर देऊन नूकसान भरपाई देण्‍यास नकार दिला ?   म्‍हणून अर्जदाराने प्रस्‍तूतची तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, ज्‍वारीचे पिकाचे रु.60,000/- व खर्च रु.30,000/- असे एकूण रु.90,000/- तसेच तक्रार खर्च रु.3,000/-व मानसिक ञासाबददल रु.5,000/-  गैरअर्जदाराकडून मिळावेत.
3.                गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे नि.12 वर दाखल केलेले आहे. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होऊच शकत नाही. गैरअर्जदार यांनी कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही व अनूचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला नाही म्‍हणून सदरची तक्रार ही फेळाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे. जोपर्यत बियाणे हे प्रयोगशाळेमध्‍ये पाठवून त्‍यांची तपासणी होत नाही तोपर्यत बियाण्‍यात दोष आहे ही बाब सिध्‍द होत नाही. अर्जदाराने किंवा कृषी अधिका-याने किंवा समितीने सदरचे बियाणे हे प्रयोगशाळेमध्‍ये तपासणीकरिता पाठविलेले नाही. कृषी अधिकारी यांनी कोणतेही शास्‍ञोक्‍त कारण न देता आपला अभिप्राय दिलेला आहे तो कायदयास अमान्‍य आहे. महाराष्‍ट्र शासनाने प्रत्‍येक जिल्‍हयामध्‍ये तज्ञ व्‍यक्‍तीची सिड समिती स्‍थापन करुन त्‍यांनी संपूर्ण कारणे देऊन आपला अभिप्राय देणे आवश्‍यक आहे. सदरचे बियाणे हे बरोबर नाही असा अहवाल दिलेला नाही. पंचनामा करण्‍यापूर्वी गैरअर्जदार यांना नोटीस दिलेली नाही किंवा सूचना दिलेली नाही. गैरअर्जदार यांच्‍या माघारी पंचनामा व अहवाल झाला म्‍हणून तो ग्राहय धरता येत नाही. दि.16.01.2010 रोजी अर्जदार व गैरअर्जदार यांच्‍यामध्‍ये करार झाला आहे त्‍यानुसार सदर तक्रार ही जालना न्‍यायालयाच्‍या कार्यक्षेञामध्‍ये येते.  म्‍हणून सदर मंचाला तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही. दोन बँग घेतले हे मान्‍य आहे पण
त्‍याबददल रु.460/- घेतले हे मान्‍य नाही.अर्जदाराने तक्रारीमध्‍ये त्‍यांला किती ज्‍वारी झाली यांचा तपशील दिलेला नाही. सदरचा लॉट नंबर डब्‍ल्‍यू आर 1380332 हे बियाणे गेरअर्जदाराने स्‍वतच्‍या क्‍वॉलिटी कंट्रोल लेबोरेटरी मध्‍ये तपासून घेतलेले आहे व सदर बियाणे उत्‍पादनास योग्‍य आहे त्‍याबददलची रिपोर्टची प्रत दाखल केली आहे.ज्‍वारीचे कणसाला दाणे न लागण्‍याचे कारण बरेच आहेत ज्‍यामध्‍हये वेळेवर किटकनाशकाचे उपयोग न करणे किंवा कमी किंवा जास्‍त प्रमाणात उपयोग करणे, वेळेवर निदन न करणे, डाट पध्‍दतीने लागवड करणे, आजूबाजूच्‍या शेतात 200 मि. पर्यत ज्‍वारीचे पिक असणे इत्‍यादी कारणे असू शकतात म्‍हणून ज्‍वारीचे उत्‍पादनात दोष आहे असे म्‍हणता येत नाही. म्‍हणून वरील सर्व कारणामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज रु.5,000/- खर्चासह फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.
4.                अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञावरुन व दोन्‍ही बाजूचा यूक्‍तीवाद ऐकून जे मूददे उपस्थित होतात, ते मूददे व त्‍यावरील सकारण उत्‍तरे पूढील प्रमाणे.
            मूददे                                                                                                        उत्‍तर
1.     अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ?                                        नाही.
2.    अर्जदाराची केस या मंचाच्‍या कार्यक्षेञात येते काय ?                                     नाही.
3.    अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्‍यास
      गैरअर्जदार बांधील आहेत काय                                                                    नाही.                            
4.    काय आदेश ?                                                                                    अंतिम आदेशाप्रमाणे
मूददा क्र.1 व 2 ः-
5.                हे दोन्‍हीही मूददे एकमेकांशी पूरक असल्‍यामूळे ते एकञितपणे
 
 
चर्चिण्‍यास घेतले आहेत. अर्जदाराच्‍याच म्‍हणण्‍याप्रमाणे गैरअर्जदार हे जालना औरंगाबाद रोडवरील पोस्‍ट दावलवाडी ता.बदनापूर जि.जालना येथे राहतात. त्‍यामूळे अर्जदाराने ही तक्रार गैरअर्जदार जीथे राहतात त्‍या ठिकाणी म्‍हणजेच जालना येथे दाखल करावयास पाहिजे होती.  ( पहा कलम 11 (2) (a) ग्राहक संरक्षण कायदा 1986 ) अर्जदाराने सदरील बियाण्‍याच्‍या दोन बँग दि.16.1.2010 रोजी गैरअर्जदार यांचे एजन्‍ट श्री.सुनिल कपाळे यांचेकडून रु.460/- मध्‍ये खरेदी केल्‍याचे  म्‍हटले आहे. सदरील पावती त्‍यांनी रेकार्डवर दाखल केलेली आहे. ती झेरॉक्‍स प्रत आहे. मूळे पावती का दाखल केलेली नाही ?  त्‍याबददल कसलाही खूलासा अर्जदार यांनी केलेला नाही. सदरील पावतीवरील सही पाहता ती सही कपाळे यांची आहे असे वाटत नाही. अर्जदारांनी सदरील एजन्‍ट श्री.कपाळे यांना या तक्रारीमध्‍ये पार्टी केलेले नाही व ते का केले नाही या बददलचा खूलासाही दिलेला नाही.
6.                गैरअर्जदाराचे म्‍हणणेच असे होते की, सदरील करार दि.16.1.2010 रोजी जालना येथेच झाला होता व त्‍या कराराप्रमाणे अर्जदाराने असे कबूल केले होते की,  जर भविष्‍यात कोणता वाद झाला तर तो वाद जालना येथील न्‍यायालयाच्‍या अधिकार क्षेञातच दाखल करावा लागेल, गैरअर्जदाराने सदरील कराराची नक्‍कल यादी बरोबर दाखल केली आहे. यावरुन असे दिसते की, हा व्‍यवहार सरळ सरळ बियाणे विक्रीचा नसून बियाणे उत्‍पादन करण्‍याचा होता. त्‍यामध्‍ये असेही लिहीलेले आहे की, बियाणे उत्‍पादन केल्‍यानंतर ते बियाणे अर्जदार हे गैरअर्जदाराला विकेल व गेरअर्जदार ते खरेदी करील.  त्‍या करारातील  अट नंबर 36 प्रमाणे स्‍पष्‍ट लिहीलेले आहे की, जर वाद नीर्माण झाला तर तो महाराष्‍ट्रातील जालना येथेच दाखल करावा लागेल. एवढे स्‍पष्‍ट लिहीलेले असताना अर्जदाराने ही केस या मंचापूढे कशी दाखल केली यांचेच आश्‍यर्च वाटते ?
7.                गैरअर्जदाराचे असेही म्‍हणणे आहे की, सदरील रक्‍कम रु.460/- ही अर्जदाराने गैरअर्जदारास जालना येथे बियाण्‍याच्‍या सिड प्‍लॉटच्‍या रजिस्‍ट्रेशन फिस म्‍हणून जमा केले होते व ती फिस न परत करण्‍याची (non refundale )  अशी होती. त्‍या अटीप्रमाणे असेही कबूल करण्‍यात आले आहे की, बियाणे उगवल्‍यानंतर तो त्‍यांनी गैरअर्जदार यांना बाजारभावाप्रमाणे विकावे. गैरअर्जदाराचे असेही म्‍हणणे आहे की, त्‍यांचे प्रतीनीधी श्री. सूनिल कपाळे हे वारंवार अर्जदाराच्‍या सिड प्‍लॉटला भेट देत होते व वांरवार योग्‍य त्‍या सूचनाही देत होते. त्‍यांनी असेही म्‍हटलेले आहे की, अशा प्रकारे सदरील श्री.कपाळे हे गैरअर्जदाराच्‍या सिड प्‍लॉटवर दि.15.1.2010, 12.3.2010, 6.4,2010, 11.5.2010 रोजी गेले होते व त्‍यांना योग्‍य त्‍या सूचनाही दिल्‍या होत्‍या. सदरील सूचनांची लेखी अहवाल यादीसोबत दाखल केला आहे. त्‍यावरुन असे दिसते की, सदरील श्री.कपाळे यांनी वारंवार त्‍या सिड प्‍लॉटवर जाऊन त्‍यांना सूचना दिल्‍या होत्‍या की सिड प्‍लॉटमध्‍ये पेरणी फार दाट झाली ती लवकरात लवकर विरळ करण्‍यात यावी. त्‍यानंतर असेही सूचना करण्‍यात आली होती की, योग्‍य ते पाणी देऊन 18 : 46 : 00 हे खत देणे व निंदणी करणे अशा प्रकारे वेळोवेळी श्री. कपाळे सिड प्‍लॉटला भेट देऊन सूचना देत होते. यांचाच अर्थ ती रु.460/- ही बियाण्‍याची किंमत नसून ती रजिस्‍ट्रेशन फिस होती असे गृहीत धरण्‍यास वाव आहे. गैरअर्जदाराचे असेही म्‍हणणे आहे की, अज्रदार हा स्‍वच्‍छ हाताने मंचाकडे आलेला नाही.
8.                गैरअर्जदाराचे सन्‍माननीय वकिल श्री. दागडीया यांनी यूक्‍तीवादाचे वेळी आपल्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आयोगा समोर चाललेले अपील नंबर 1392 ते 1398/1997 च्‍या सदरचे निकालाची प्रत जो निकाल दि.2.7.2003रोजी देण्‍यात आला होता ती प्रत
 
 
दाखल केली. सदरील निकालामध्‍ये सन्‍माननीय आयोगाने असे म्‍हटले आहे की, Under Contract the parties have agreed to a particular Forum and if that was so, it is a well settled position of the law that the parties would be bound by such contract. It appears that the District Forum has lost sight of the position of the law in this regard.
ती केस देखील जालना या जिल्‍हयाच्‍या संबंधातीलच होती व त्‍यामध्‍ये देखील करारामध्‍ये जालना न्‍यायालया अंतर्गत वाद सादर होईल असे लिहीलेले होते. सदरील केस मधील Observation  हे या केसला तंतोतंत लागू पडते.
9.                त्‍याचप्रमाणे सदरील सन्‍माननीय आयोगाच्‍या निकालामध्‍ये असेही उदधृत करण्‍यात आले आहे की,   “ That, being so, transaction is more in a nature of what is known as, buy-back transaction. Complainants herein assume dual capacity being a purchaser as also seller of the goods at the same time. Under section 2 (1) (d)  of Consumer Protection Act, 1986, benefits under said Act are available only to the Purchasers of the goods and not to the Seller Usefully we may make reference to our judgement delivered on 24/4/2002 in group of appeal nos.1499/01 to 1503/2001 in C/182/2000 to 186/2000. District Forum, Ahmadnagar,  in which position as obtained therein is identical as obtained in the matters herein, in which, we have held that since the transaction involved purchase as also sale. The same would not fail under the purview of cosumer dispute as envisaged under Consumer Protection Act, 1986. ”
हे सूध्‍दा observation  या केस ला तंतोतंत लागू पडते म्‍हणून अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होऊ शकत नाही.
10.               सन्‍माननीय आयोगाने पूढे असेही म्‍हटले आहे की, “ Therefore, on two major points namely about the jurisdiction of District Forum Chadrapur and of the Status of the complainants, being Cosumer, we hold against the complainants. That is to say, as per agreement, between the parties herein, jurisdiction would lie with District Forum, Jalna and not Chadrapur, and further, dispute of the nature would not fall under category of Consumer Disputes ”
वरील सर्व observation  वरुन व करारातील अटी बघून सूर्यप्रकाशा एवढे स्‍वच्‍छ आहे की, अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक संरक्षण कायदा 1986 प्रमाणे ग्राहकच होऊ शकत नाही व त्‍या कायदयातील तरतूदीप्रमाणे अर्जदार प्रॉपर फोरम पूढे महणजे जालना येथे केस घेऊन गेलेला नाही. वरील सर्व चर्चेवरुन मूददा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारात्‍मक देण्‍यात येते.
 
मूददा क्र.3 ः-
11.                दोन्‍ही पार्टीचे कथन ऐकून व दाखल केलेल्‍या कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदार हा स्‍वच्‍छ हाताने मंचापूढे आलेलाच नाही. त्‍यांनी जी 7/12 दाखल केली त्‍या 7/12 मध्‍ये त्‍यावेळी त्‍यांचे जमिनीमध्‍ये सदरील सिड घेतले होते यांचाच उल्‍लेख नाही ? येथे प्रर्कषाने नमूद करण्‍यासारखी गोष्‍ट अशी आहे की, गैरअर्जदाराने त्‍यांचे कागदपञासोबत लॅबोरटरीचा बियाणे तपासणीचे प्रमाणपञ, त्‍यांचे म्‍हणणे नि.12 सोबत दाखल केलेले आहे. Quality Assurance Loboratory, Dawalwadi  चे Assistant Manager,  यांनी दिलेला हा अहवाल आहे. त्‍या अहवालावरुन असे दिसते की, सदरील बियाण्‍याची जर्मिनेशनची ताकद 93 टक्‍के होती. म्‍हणजे ते बियाणे  हलक्‍या प्रतीचे होते असे म्‍हणता येणार नाही. गैरअर्जदारातर्फे असा यूक्‍तीवाद करण्‍यात आला की, अर्जदाराने जो पंचनामा दाखल केला आहे तो गैरअर्जदाराच्‍या गैरहजेरीत केलेला आहे. गैरअर्जदाराला नोटीस पाठविली होती असे अर्जदाराचे कोणतेही म्‍हणणे नाही. त्‍यामूळे तो एकतर्फा पंचनामा आहे व त्‍या पंचनाम्‍यातील पंच एकही तज्ञ व्‍यक्‍ती नाही. गैरअर्जदाराचे वकिलाचे यूक्‍तीवादावरुन  असे  दिसते  की,   अर्जदाराने  जेव्‍हा  त्‍यांना  नोटीस  पाठविली होती
 
त्‍या नोटीसचे उत्‍तर गैरअर्जदारातर्फे वकिलामार्फत दि.22.7.2010 रोजीलाच देण्‍यात आले होते. त्‍या उत्‍तरामध्‍ये देखील असे स्‍पष्‍ट नमूद करण्‍यात आले आहे की,  तो बियाणे खरेदी विक्रीचा करारच नव्‍हता तर ती रक्‍कम सिड प्‍लॉटच्‍या रजिस्‍ट्रेशनसाठी घेण्‍यात आले होते व त्‍या पावती रजिस्‍ट्रेशनचा नंबरही 013454 दि.16.1.2010 असा आहे. त्‍या उत्‍तरामध्‍ये असेही स्‍पष्‍ट केलेले आहे की, त्‍यांचे प्र‍तीनीधी वारंवार सिड प्‍लॉटवर जात होते व सूचना देत होते परंतु अर्जदाराने त्‍यांची सूचना पाळलेल्‍या नाहीत. त्‍यामूळे त्‍यांला पाहिजे तसे उत्‍पन्‍न मिळाले नसावे. नोटीसच्‍या उत्‍तरामध्‍ये असेही म्‍हटले आहे की, पंच म्‍हणून जागेवर जाण्‍यापूर्वी त्‍यांना कोणतीही सूचना देण्‍यात आली नव्‍हती. त्‍यांनी असेही म्‍हटले आहे की, अर्जदारानेच करारातील अटीचा भंग केलेला आहे व असे असूनही जर अर्जदार कूठे केस दाखल करील तर तो गैरअर्जदाराच्‍या खर्चास देखील जिम्‍मेदार राहील.
12.               अर्जदाराने जो पंचनामा दिलेला आहे त्‍या पंचनाम्‍यावर गैरअर्जदार किंवा त्‍यांचे प्रतीनीधीची सही नाही. सदरील पंचनामा करण्‍यापूर्वी गैरअर्जदार यांना नोटीस दिल्‍याचे कोणताही उल्‍लेख नाही. पंचनाम्‍यातील नांवे व सहया बघून असे दिसते की, त्‍या पंचा पैकी कोणताही तज्ञ व्‍यक्‍ती तेथे हजर नव्‍हता.
13.               वरील सर्व चर्चेवरुन असे निष्‍पन्‍न होते की, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे कोणतीही ञूटी सिध्‍द करु शकले नाहीत म्‍हणून ते कोणतीही नूकसान भरपाई वसूल करण्‍यास पाञ नाहीत असे या मंचाचे मत आहे. दोन्‍ही पार्टीनी इतरही काही निकालाच्‍या झेरॉक्‍स प्रती दिलेल्‍या आहेत परंतु वरील सर्व चर्चेवरुन व दोन्‍ही पार्टीला ती दिलेल्‍या कागदपञावरुन असे निष्‍पन्‍न होते की, तज्ञाचा अहवाल रेकॉर्डवर नाही, अर्जदाराने या मंचापूढे केस दाखल करुन त्‍या कराराच्‍या अटीचा भंग केलेला आहे व तो ग्राहक नसताना देखील ग्राहक आहे असे खोटे सांगून या मंचापूढे हजर झालेले आहे. त्‍यामूळे तो कोणतीही नूकसान भरपाई मागण्‍यास पाञ नाही असे या मंचाचे मत आहे. त्‍यामूळे मूददा क्र.3 चे उत्‍तर सुध्‍दा नकारात्‍मक देण्‍यात येते.
14.               वरील सर्व चर्चेवरुन असे दिसते की, अर्जदार हे ग्राहक असल्‍याचे सिध्‍द करु शकले नाहीत व गैरअर्जदाराची कोणतीही ञूटी सिध्‍द करु शकलेले नाहीत. त्‍यांनी प्रॉपर फोरम पूढे जाण्‍या ऐवजी या मंचापूढे ही केस विनाकारण दाखल केली. गैरअर्जदाराचे म्‍हणणे असे आहे की, अर्जदाराची केस खर्चासहीत खारीज करावी. एकंदर कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदाराच्‍या अज्ञानामूळे त्‍यांनी ही केस या मंचामध्‍ये दाखल केलेली आहे व एकंदर कागदपञ पाहता अर्जदारावर खर्च लावणे हे उचित होणार नाही. म्‍हणून अर्जदाराची तक्रार विनाखर्च खारीज करण्‍यात येते.
 
                                                                        आदेश
1.                                          अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्‍यात येतो.1.
2.                                          खर्च ज्‍यांचा त्‍यांनी आपआपला सोसावा.
 
3.                                          पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                    श्रीमती सुवर्णा देशमूख          
                  अध्‍यक्ष                                                          सदस्‍या   
 
 

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT