::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 20/01/2015 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून त्याच्या शेतीवर छोटेसे घर बनविले असून त्या घरासाठी दि. 28/4/09 रोजी विज कनेक्शन घेतले होता. गैरअर्जदाराने अर्जदारास मिटर वाचन न करता व देयक न पाठविल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे तोंडी तक्रार केल्यावर दि. 24/12/11 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास दस्तक्रं. अ- 2 वरील रु. 6560/- चे देयक बनवून दिले त्या देयकाचा अर्जदाराने भरणा केला. त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास दस्त क्रं. अ- 3 वरील नादुरुस्त मिटर असा शेरा असलेला 20,500/- रु. चे देयक पाठविले ते देयक अर्जदारास गैरअर्जदाराने 10,000/- रु. करीता सुधारीत करुन दिले. त्याचाही भरणा अर्जदाराने गैरअर्जदाराकडे केलेला आहे. गैरअर्जदाराचे अधिकारी मिटर वाचन घेण्याची आपली जबाबदारी टाळतात व अर्जदाराचे मिटर रिडींग उपलब्ध नाही असा शेरा मारुन अर्जदाराप्रति न्युनतम सेवा व अनुचित व्यापार पध्दतीची अवलंअना करतात. गैरअर्जदाराने अर्जदारास दि. 29/8/12 चे देयकामध्ये रिडींगमध्ये खोटा शेरा मारुन पाठविला सबब अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदारास नियमित मिटर वाचन घेवून नियमाप्रमाणे विज देयक अर्जदाराला दयावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं.14 वर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप चुकीचे असून नाकबुल केले आहे. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, अर्जदाराचे फॉर्महाऊसचे बाहेरील गेट हे नियमितपणे सुरु राहत नसल्सामुळे जेव्हा गैरअर्जदारातर्फे कर्मचारी रिडींग घ्यायला जातात तेव्हा ब-याच वेळा अर्जदाराकडील मिटर वाचन घेण्यास जातांना बाहेरील गेट बंद असल्यामुळे शक्य होत नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे केलेल्या विनंतीनुसार तउजोड करुन सरासरी बिल देण्यात आले होते. गैरअर्जदाराची कर्मचारी यांनी अर्जदाराच्या मिटरचे वाचनाची कधीच टाळमटाळ केली नसून सदर तक्रार दंडासह खारीज करण्याची मागणीकेली आहे.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय.
(4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून त्याच्या शेतीवर छोटेसे घर बनविले असून त्या घरासाठी दि. 28/4/09 रोजी विज कनेक्शन घेतले होते. बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होते असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. अर्जदाराने नि. क्रं. 5 वर दस्त क्रं. अ- 2, अ- 3, व अ- 5 वर दाखल देयकाची पडताळणी करतांना असे दिसते कि, गैरअर्जदाराने अर्जदारास दस्त क्रं. अ- 2 व अ- 3 वर दाखल प्रोव्हिजनल देयक म्हणून दिले होते त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास अ- 5 वर दाखल देयक पाठविले त्यावर चालु रिडींग R. N. A. व मागील रिडींग 1619 असे दर्शविले आहे. सदर देयकावर कोणतेही रिडींगच्या संदर्भात छायाचिञ नाही. ही बाब गैरअर्जदाराना सुध्दा मान्य आहे. जर अर्जदाराचे फॉर्महाऊस बंद असल्याने गैरअर्जदाराचे कर्मचारी मिटर रिडींग घेवू शकले नाही तर गैरअर्जदाराने दस्त क्रं. अ- 5 चे देयकामध्ये आवार तालेबंद असे दर्शवून सरासरी बिल पाठवायला पाहिजे होते परंतु तसा कोणताही शेरा दस्त क्रं. अ- 5 देयक वर दिसून येत नाही. म्हणून गैरअर्जदाराने बचाव करतांना म्हणणे की, अर्जदाराचे फॉर्म हाऊस मिटर रिडींग घेतेवेळी बरेच वेळा बंद होते व त्यामुळे मिटर रिडींग घेणे शक्य झाले नाही ही बाब ग्राहय धरण्यासारखी नाही.गैरअर्जदाराने अर्जदाराचे मिटर रिडींग न घेवून अर्जदारास सरासरी देयक पाठवून दिले ही बाब सिध्द होते सबब गैरअर्जदाराने सेवेत ञुटी दिलेली आहे व त्याच्या प्रति अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंब केला आहे. असे सिध्द होत आहे सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास दि. 29/08/12 चे दिलेले देयक रद्द करुन
अर्जदाराचे मिटरची नियमित मिटर वाचन करुन अर्जदाराला मिटर रिडींग
अनुसार नियमित देयक आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत
देण्यात दयावे.
(3) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(4) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 20/01/2015