आदेश (पारीत दिनांक : 21 फेब्रुवारी,2012 ) श्री रामलाल भ.सोमाणी, मा.अध्यक्ष यांचे कथनानुसार तक्रारकर्त्याची संक्षीप्त तक्रार खालील प्रमाणे आहे - 1. त.क.पुलगाव, तालुका देवळी, जिल्हा वर्धा येथील रहिवासी आहेत. यातील विरुध्दपक्ष क्रमांक-1 महाराणा प्रताप नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुलगाव, तालुका देवळी, जिल्हा वर्धा ही सहकारी कायदयाखालील नोंदणीकृत संस्था आहे तर वि.प.क्रं 2 ते 14 हे वि.प.क्रमांक-1 सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ आहेत. (वि.प.क्रं-1 संस्थेचा उल्लेख यापुढे निकालपत्रात वि.प.पतसंस्था असा करण्यात येईल) तक्रारकर्ता हे वि.प.चें ग्राहक आहेत. त्यांनी आपली रक्कम वि.प. महाराणा प्रताप नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुलगाव, तालुका देवळी, जिल्हा वर्धा या सहकारी पतसंस्थेत मुदतठेव रक्कम ठेवली होती.
CC/111/2011 2. तक्रारकर्ते यांनी वि.प.सहकारी पतसंस्थेत गुंतवणूक म्हणून ठेवलेल्या ठेवींचे रकमांचा तपशिल "परिशिष्ट-अ" नुसार खालील प्रमाणे आहे. " परिशिष्ट-अ "
अक्रं | मुदतठेव खाते पान क्रमांक | देय दिनांक | 1 | 3232 | 07.06.2010 | 2 | 2622 | | 3 | 3157 | 19.05.2009 | 4 | 3156 | 19.05.2009 | 5 | 3145 | 30.05.2009 |
3. तक्रारकर्ते यांनी वर नमुद परिशिष्ट-अ नुसार आपली रक्कम वि.प.संस्थेत मुदतठेवीमध्ये जमा केली होती परंतु परिपक्वता तिथी उलटल्या नंतरही वि.प.संस्थे तर्फे रक्कम परत न केल्याने त.क.ला दोषपूर्ण सेवा मिळालेली आहे. वि.प.क्रं 2 ते 14 चे संचालक मंडळापूर्वी, त.क.यांनी प्रशासक श्री तुकाराम ना.चव्हाण यांचेकडे दिनांक 30.08.2010 रोजी मुदतठेवीची रक्कम परिपक्व लाभासह देण्यास विनंती अर्ज केला होता परंतु सदर रक्कम परत मिळाली नाही. 4. त.क.यांनी पुढे असेही नमुद केले की, विरुध्दपक्षाने खाते क्रमांक 3232 दिनांक 11.06.2011, खाते क्रमांक 2622 दिनांक 30.03.2011, खाते क्रमांक 3157 दिनांक 19.06.2011, खाते क्रमांक 3156 दिनांक 19.06.2011 व खाते क्रमांक 3145 दिनांक 04.07.2011 अशा दिनांकास त.क.यांचे बचत खाते क्रमांक 5 मध्ये रकमा जमा केल्यात. त.क.यांचे बचत खाते क्रमांक-5 मध्ये दिनांक 04.07.2011 रोजी खात्यातील एकूण शिल्लक रक्क्म रुपये-3,89,469/- जमा दर्शविली होती. परंतु सदर बचत खाते क्रमांक 5 मधील जमा रक्कम वि.प.यांनी परत न करुन त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 5. त.क.यांनी पुढे असेही नमुद केले की, सन-2007-2008 चे काळात वि.प.संस्थेच्या संचालक मंडळावर असताना, त.क.विरुध्द सहकार कायदा कलम 88 अंतर्गत चौकशी होऊन, चौकशी अंती त.क.यांचेवर नियमबाहय कर्ज वाटपाची जबाबदारी रक्कम रुपये-1,95,626/- निश्चीत करण्यात आली होती व असेही आदेशित करण्यात आले होते की, ज्या कर्ज प्रकरणांमध्ये त.क.वर जबाबदारी निश्चीत केल्या गेलेली आहे, त्या त्या कर्ज प्रकरणात जशा जशा कर्ज रकमा वसूल होतील, त्या प्रमाणे त.क.यांचेवर निश्चीत केलेली आर्थिक नुकसानीची रक्क्म कमी होईल
CC/111/2011 6. वि.प.यांनी, त.क.यांना दिनांक 20.11.2008 रोजीचे नोटीसद्वारे कलम-88 खाली निश्चीत केलेल्या रकमेचा भरणा दिनांक 28.11.2008 पर्यंत करावा अन्यथा सहकारी कायदयाखाली वसुलीचा दाखला प्राप्त करुन वसुली करण्यात येईल असे कळविले होते. परंतु आज पावेतो असा कोणताही वसुलीचा दाखला त.क.विरुध्द तयार केलेला नाही वा वसुली संबधाने कोणतीही कार्यवाही त.क.विरुध्द केलेली नाही कारण त.क.यांचेवर जबाबदारी निश्चीत केलेल्या नियमबाहय कर्जा संबधीचे प्रकरणातील वसुली वि.प.संस्थेनी केलेली आहे. 7. वि.प.यांनी, त.क.यांचे बचतखाते क्रमांक 5 मध्ये जमा केलेली रक्कम, त.क.यांना परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. या सर्व प्रकारामुळे त.क.यांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला तसेच प्रस्तुत तक्रार वि.जिल्हा न्यायमंचात दाखल करावी लागली म्हणून त.क.हे बचतखात्यातील शिल्लक रक्कम तसेच नुकसान भरपाईची रक्कम वि.प.कडून मिळण्यास पात्र आहेत. 8. म्हणून त.क.यांनी प्रार्थना केली की, वि.प.यांनी त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात यावे. त.क.यांचे बचतखाते क्रमांक 5 मधील एकूण शिल्लक रक्कम रुपये-3,89,469/- आणि तीवर रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो वार्षिक 18 टक्के व्याज यासह रक्कम परत करण्याचे वि.प.यांना आदेशित व्हावे. त.क.यांना झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल नुकसान भरपाई रुपये-20,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- वि.प.कडून मिळावेत. 9. वि.प.क्रं 1 ते 14 तर्फे वि.प.क्रं 1 यांनी न्यायमंचा समक्ष प्रतिज्ञालेखावरील लेखी जबाब अभिलेखावरील पान क्रं 25 ते 28 वर दाखल केला. त्यांनी आपले लेखी जबाबाद्वारे त.क.यांनी त्यांचे विरुध्द केलेली संपूर्ण विपरीत विधाने नाकबुल केलीत. वि.प.संस्थेनी, त.क.ची रक्कम त्याचे बचतखाते क्रं 5 मध्ये जमा केल्याची बाब मान्य केली. परंतु त.क.यांनी वारंवार मागणी करुनही वि.प.यांनी रक्कम परत केली नाही हे त.क.यांचे म्हणणे नाकबुल केले. त्यांनी त.क.यांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. 10. वि.प.यांनी पुढे असे नमुद केले की, त.क.यांचे विरुध्द महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 88 अंतर्गत निश्चीत केलेली वसुलीची रक्कम संस्थेनी वसुल केली हे म्हणणे खोटे असल्याचे नमुद केले. अधिकीचे जबाबात नमुद केले की, त.क. हे वि.प.पतसंस्थेचे माजी संचालक आहेत व त्यांचेवर कलम 88 खाली चौकशी होऊन त.क.यांनी नियमबाहय कर्ज
CC/111/2011 वाटप केल्यामुळे रक्कम रुपये-1,95,626/- एवढी जबाबदारी त.क.वर निश्चीत केली होती आणि सदर निश्चीत केलेली रक्कम दिनांक 30.09.2008 पासून 16 टक्के व्याजासह तसेच वसुलीचा खर्च व सरचॉर्जसह त.क.यांचे कडून वसुल करावयाची आहे. परंतु वि.प. संस्थेनी वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही त.क.यांनी सदर रक्कम वि.प. संस्थेत जमा केलेली नाही, परिणामी वि.प.संस्थेस अन्य ठेवीदारांच्या रकमा परत करण्यास अडथळा निर्माण झालेला आहे आणि वि.प.संस्था आर्थिकदृष्टया डबघाईस येण्यास त.क. जबाबदार आहेत. 11. वि.प.यांनी असे नमुद केले की, त.क.यांनी ज्यावेळेस वि.प.संस्थेत मुदतठेवी मध्ये रक्कम गुंतविली होती, त्यावेळेच्या संचालक मंडळास प्रस्तुत प्रकरणात प्रतिपक्ष केले नाही त्यामुळे योग्य त्या प्रतिपक्षा अभावी प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. सध्याचे वि.प.हे संचालक म्हणून वि.प.पतसंस्थेत दिनांक 01.03.2011 पासून आहेत, त्यामुळे त्यांचा कोणताही संबध येत नाही. त.क.यांचेवर निश्चीत केलेल्या रकमे संबधाने वि.प.पतसंस्थेने महाराष्ट्र सहाकरी संस्था अधिनियम 1960 चे कलम 98 अंतर्गत वसुलीचा दाखला मिळविला, त्यावर त्याप्रमाणे त.क.यांना नोटीस पाठविण्यात आली परंतु त.क.कडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे संस्थेच्या वसुली अधिका-यांनी त.क.यांचे विरोधात स्थावर मालमत्ता जप्तीचा आदेश काढला आणि म्हणून त.क.यांनी प्रस्तुत खोटी तक्रार न्यायमंचा समक्ष दाखल केलेली आहे. 12. सद्य परिस्थितीत त.क.यांची कलम 98 अंर्तगत स्थावर मालमत्ता व बचत ठेवीतील रक्कम संस्थेच्या वसुली अधिका-यांनी जप्त केलेली आहे आणि त्यामुळे वि.प .क्रं 2 ते 14 हे त.क.ची रक्कम परत करण्यास असमर्थ आहेत. सन 2005 मधील संचालकांना प्रस्तुत प्रकरणात प्रतिपक्ष करण्याचे आदेशित व्हावे व वि.प.क्रं 2 ते 14 यांना तक्रारीतून वगळण्यात येऊन तक्रार खारीज व्हावी, अशी विनंती केली. 13. त.क.यांनी पान क्रं 07 वरील यादी नुसार एकूण 05 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये, त.क.यांचे वि.प.संस्थेमध्ये असलेले बचतखाते क्रमांक-05 च्या झेरॉक्स प्रती, त.क.यांनी वि.प.संस्थेच्या प्रशासकास दिलेले पत्र, वि.प.यांना पाठविलेली नोटीस, वि.प.यांनी त.क.यांना पाठविलेले पत्र व त.क.यांचेवर महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 88 अंतर्गत निश्चित केलेली जबाबदारी संबधीचे पत्र अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. त.क. यांनी अभिलेखावरील पान क्रं 39 ते 42 वर आपले शपथपत्र दाखल केले. त.क.यांनी पान क्र.78 वरील यादी नुसार एकूण दोन दस्तऐवज दाखल केलेत, ज्यामध्ये मुदतठेवीचे पैसे मिळण्या बाबत त.क.यांनी, वि.प.पतसंस्थेस दिलेले पत्र, चौकशी अधिकारी यांचा चौकशी अहवाल व आदेश इत्यादीचा समावेश आहे. CC/111/2011 14. तर वि.प.यांनी पान क्रं 32 वरील यादी नुसार एकूण 03 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये वि.प.पतसंस्थेनी त.क.यांना पाठविलेली नोटीस, त.क.यांनी वि.प.यांना दिलेले उत्तर, वि.प.संस्थेनी घेतलेल्या ठरावाची प्रत इत्यादी दस्तऐवजाचा समावेश आहे. वि.प.यांनी पान क्रमांक 44 वरील यादी नुसार एकूण 19 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये श्री चंद्रकांत पवार यांचे अध्यक्ष पदाचे राजीनामा प्रत, अध्यक्ष पदाची निवड करण्या बाबत ठराव प्रत, वर्तमान संचालक मंडळाने स्वतः तर्फे रघुनाथ इंगळे यांना केसमध्ये हजर राहण्या बाबत घेतलेल्या ठरावाची प्रत, सहकारी कायदा 1960 चे कलम 98 अंतर्गत तक्रारकर्ता तसेच अन्य संचालकां विरुध्द पारीत वसुली प्रमाणपत्राची प्रत, आदरणीय राष्ट्रीय ग्राहक आयोग, न्यु दिल्ली यांचे निकालपत्राची प्रत, त.क.यांनी दिलेली नोटीस, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी सर्व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचना, सहकार विभागा कडून वि.प.संस्थेशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती, प्रधान सचिव, सहकार व पणन यांचे शासन निर्णय, जिल्हाधिकारी, वर्धा यांचे पत्र, त.क.यांचे बचतखात्यातील रक्कम जप्तीचा विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा आदेश अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. 15. उभय पक्षांचे शपथे वरील लेखी कथन, दाखल कागदोपत्री पुरावे आणि दाखल लेखी युक्तीवाद याचे सुक्ष्म वाचन केल्या नंतर व उभय पक्षां तर्फे त्यांचे अधिवक्ता यांचा मौखीक युक्तीवाद ऐकल्या नंतर मंचाद्वारे निर्णयान्वित करण्या करीता खालील मुद्दे काढण्यात आले. अक्रं मुद्दा उत्तर 1) वि.प.यांनी त.क.चे खात्यातील शिल्लक रक्कम परत न करुन, त.क.यास दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? होय. 2) काय आदेश? अंतिम आदेशा नुसार. :: कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 16. त.क. यांचे लेखी तक्रारअर्जा नुसार विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे तर्फे तिचे कार्यरत संचालकांनी ( यापुढे "वि.प."म्हणजे वि.प.क्रं 1 पतसंस्था आणि तिचे तर्फे वि.प.क्रं 2 ते 14 असे वाचण्यात यावे) त.क.चे खाते क्रमांक- 3232 दिनांक 11.06.2011, खाते क्रमांक 2622 दिनांक 30.03.2011, खाते क्रमांक 3157 दिनांक 19.06.2011, खाते क्रमांक 3156 CC/111/2011 दिनांक 19.06.2011 व खाते क्रमांक 3145 दिनांक 04.07.2011 अशा दिनांकास त.क.यांचे बचत खाते क्रमांक 5 मध्ये रकमा जमा केल्यात. त.क.यांचे बचत खाते क्रमांक-5 मध्ये दिनांक 04.07.2011 रोजी खात्यातील एकूण शिल्लक रक्कम रुपये-3,89,469/- जमा दर्शविली होती. परंतु सदर बचत खाते क्रमांक 5 मधील जमा रक्कम वि.प.यांनी मागणी नंतरही परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 17. या उलट, वि.प.यांनी नमुद केले की, त.क. हे वि.प.पतसंस्थेचे माजी संचालक आहेत व त्यांचेवर कलम 88 खाली चौकशी होऊन त.क.यांनी नियमबाहय कर्ज वाटप केल्यामुळे रक्कम रुपये-1,95,626/- एवढी जबाबदारी त्यांचेवर निश्चीत केली होती आणि सदर निश्चीत केलेली रक्कम दिनांक 30.09.2008 पासून 16 टक्के व्याजासह तसेच वसुलीचा खर्च व सरचॉर्जसह त.क.यांचे कडून वसुल करावयाची आहे. परंतु वि.प. संस्थेनी वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही त.क.यांनी सदर रक्कम वि.प. संस्थेत जमा केलेली नाही, त.क.यांचेवर निश्चीत केलेल्या रकमे संबधाने वि.प.पतसंस्थेने महाराष्ट्र सहाकरी संस्था अधिनियम 1960 चे कलम 98 अंतर्गत वसुलीचा दाखला मिळविलेला आहे. 18. वि.प.यांनी असेही नमुद केले की, त.क.यांनी ज्यावेळेस वि.प.संस्थेत मुदतठेवी मध्ये रक्कम गुंतविली होती, त्यावेळेच्या संचालक मंडळास प्रस्तुत प्रकरणात प्रतिपक्ष केले नाही त्यामुळे योग्य त्या प्रतिपक्षा अभावी प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. सध्याचे वि.प.हे संचालक म्हणून वि.प.पतसंस्थेत दिनांक 01.03.2011 पासून आहेत, त्यामुळे त्यांचा कोणताही संबध येत नाही. 19. प्रस्तुत प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. त.क.तर्फे दाखल पान क्रमांक 80 ते 94 वरील वि.प.पतसंस्थेचे गैरव्यवहारा संबधी सहकारी कायदा कलम 88 खालील प्राधिकृत चौकशी अधिकारी, वर्धा यांचा अहवाल असून, सदर अहवाला मध्ये त.क. वि.प.पतसंस्थेचे संचालक असताना अवैधरित्या कर्ज वाटप केल्या प्रकरणी त.क.यांचेवर वसुलपात्र रक्कम रुपये-1,95,626/- अधिक चौकशी खर्च रुपये-555/- असे एकूण रुपये-1,96,181/- एवढया रकमेची जबाबदारी निश्चीत केलेली आहे. सदर अहवाल हा दिनांक 15.10.2008 रोजीचा आहे. 20. सदर चौकशी अहवालात असेही पुढे नमुद आहे की, मात्र सदर कर्ज प्रकरणात जश्या जश्या कर्ज वसुल रकमा संस्थेस प्राप्त होतील, त्या त्या प्रमाणात त्या त्या संचालका कडील आर्थिक नुकसानीची रक्कम कमी होईल आणि सदर निश्चित केलेल्या जबाबदारीचे रकमेवर दिनांक 01.10.2008 पासून 16 टक्के व्याज आकारुन त्या रकमा वसुल करुन संस्थेत जमा करण्याचा आदेश पारीत केलेला आहे. सदर बाब ही उभय पक्षांना मान्य आहे.
CC/111/2011 21. तसेच वि.प.तर्फे पान क्रमांक 52 ते 54 वर सहायक निबंधक, सहकारी संस्था, देवळी, तालुका देवळी, जिल्हा वर्धा यांनी दिनांक 22.03.2010 रोजी निर्गमित केलेले महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 98 नुसार प्रमाणपत्र असून त्यामध्ये त.क.यांचे कडून वसुलपात्र रक्कम रुपये-1,96,181/- आणि सदर रकमेवर दिनांक 01.10.2008 पासून ते रक्कम वसुल होई पर्यंत द.सा.द.शे.16 टक्के व्याज आकारुन रक्कम वसुल करावयाची आहे असे नमुद केलेले आहे. सदर बाब सुध्दा उभय पक्षांना मान्य आहे. 22. सदर वसुली प्रमाणपत्र दिनांक 22.03.2010 रोजी सहायक निबंधक, सहकारी संस्था, देवळी, जिल्हा वर्धा यांनी त.क. आणि त.क.सारखे ईतर संचालक यांचे विरुध्द निर्गमित केले असताना फार तर दिनांक 22.03.2010 नंतर तीन महिन्याचे आत वि.प.पतसंस्थे तर्फे त.क.यांचे कडून सहायक निबंधक, सहकारी संस्था, देवळी यांचे दिनांक 22.03.2010 चे वसुली प्रमाणपत्रा नुसार वसुलपात्र रक्कम रुपये-1,96,181/- आणि सदर रकमेवर दिनांक 01.10.2008 पासून ते रक्कम वसुल होई पर्यंत द.सा.द.शे.16 टक्के व्याज अशी वसुली करुन, वि.प.कडे जमा रकमेतून कपात करुन उर्वरीत रक्कम त.क.यांना परत करणे गरजेचे होते. 23. त.क. यांचे लेखी तक्रारी नुसार विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे तर्फे त.क.चे खाते क्रमांक 3232 दिनांक 11.06.2011, खाते क्रमांक 2622 दिनांक 30.03.2011, खाते क्रमांक 3157 दिनांक 19.06.2011, खाते क्रमांक 3156 दिनांक 19.06.2011 व खाते क्रमांक 3145 दिनांक 04.07.2011 अशा दिनांकास त.क.यांचे बचत खाते क्रमांक 5 मध्ये रकमा जमा केल्यात. त.क.यांचे बचत खाते क्रमांक-5 मध्ये दिनांक 04.07.2011 रोजी खात्यातील एकूण शिल्लक रक्क्म रुपये-3,89,469/- जमा दर्शविली होती सदर बाब उभय पक्षांना मान्य आहे. मुद्या क्रं-2 24. मंचा समक्ष ही बाब सिध्द होते की, त.क.चे बचतखात्यात रुपये-3,89,469/- जमा आहेत आणि वसुली प्रमाणपत्रा नुसार त.क.कडून, त.क.ने दिलेल्या कर्जा करीता कर्जदार धीरजसिंग राजेशसिंग ठाकूर व इतर-1 कर्जदार यांचे करीता वि.प.संस्थेस घेणे असलेली रक्कम, कलम-88 अंतर्गत सहकारी संस्था अधिनियमा अंतर्गत त.क.विरुध्द निश्चीत केलेली आहे. सदर चौकशी अधिका-यांचे आदेशात असे सुध्दा नमुद आहे की, सदर कर्जदारांकडून जशी जशी रक्कम वि.प.संस्थेस वसुल होईल तशी संबधित कसूरदार (प्रस्तुत प्रकरणातील त.क.) यांचे कडून घेणे असलेल्या रकमेतून कमी करण्यात येईल.
CC/111/2011 25. त.क.ने युक्तीवाद केला की, धीरजसिंग ठाकूर यांनी कर्ज परतफेडीपोटीची काही रक्कम वि.प.संस्थेत जमा केलेली आहे, या विषयी मंचाद्वारे वि.प.संस्थेला प्रतिज्ञालेख दाखल करण्यास मंचाद्वारे आदेशित केले असता, वि.प.पतसंस्थे तर्फे तिचे व्यवस्थापकानी दाखल केलेल्या प्रतिज्ञालेखा वरुन, मंचा समक्ष ही बाब स्पष्ट होते की, दिनांक 14.12.2011 रोजी धीरजसिंग ठाकूर यांनी रुपये-45,000/- वि.प.संस्थेत कर्ज परतफेडीपोटी जमा केलेले आहेत. चौकशी अधिका-यांनी दिलेल्या आदेशा नुसार व वसुली दाखल्या नुसार ही रक्कम त.क.कडून घेणे असलेल्या रकमेतून वि.प.संस्थेनी समायोजनाने कमी करणे आवश्यक होते व आहे. 26. दिनांक 30.08.2010 चे मागणी पत्रका नुसार वि.प.ला त.क.कडून घेणे रक्कम, वि.प.पतसंस्थेकडे त.क.ची रक्कम जमा असताना देखील, त्यांनी ती वळती केलेली नाही. तसेच त.क.ने त्याच्या मुलीच्या लग्नाचे वेळी वि.प.पतसंस्थेकडे पान क्रं 16 वरील दाखल असलेल्या अर्जा वरुन स्पष्ट होते की, त.क.ने प्रशासकाला दिनांक 30.08.2010 ला त्याचे कडून घेणे असलेल्या रकमे बद्यल व मुलीचे लग्ना करीता आवश्यक असलेल्या रकमे बद्यल त्वरीत उत्तर दिलेले आहे व त्याची पोच सुध्दा दाखल आहे.
27. तसेच त.क.ने दाखल केलेल्या दस्तऐवजा वरुन असे सुध्दा स्पष्ट होते की, वि.प.संस्थेनी त.क.ला त्याचे मुदतठेवीवर करारा नुसार व्याज दिलेले आहे. म्हणजेच ज्या दराने व्याज संस्थेला त.क.कडून घेणे होते, जवळ जवळ त्याच दराने त.क.ला मुदतीठेवीवर व्याज वि.प.संस्थेनी दिलेले आहे आणि अशा स्थितीत त.क.चे कोणतेही नुकसान व्याजापोटी झालेले नाही. 28. तरी देखील त..क. कडून घेणे असलेली रक्कम वेळीच वि.प.ने त.क.चे खात्यातून वळती करुन, इतर सभासदांना चुकती केली असती तर त.क.ला वेळेवर उर्वरीत रक्कम मिळाली असती. परंतु वि.प.ने योग्य वेळी त्वरीत योग्य ती कारवाई न करुन त.क.ला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे आणि त.क.ला मानसिक, शारिरीक त्रास व आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागलेले आहे आणि म्हणून तक्रारकर्ता नुकसान भरपाई पोटी रुपये-5000/- वि.प.कडून मिळण्यास पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. CC/111/2011 त्यामुळे उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे त.क.कडून वसुली प्रमाणपत्रा नुसार निश्चीत केलेली रक्कम, व्याजासह वसूल करुन, उर्वरीत रक्कम वि.प.पतसंस्थेनी त.क.यांना परत केली असती, तर त.क.यांना वि.न्यायमंचात तक्रार दाखल करावयाचे कारणच नसते. त्यामुळे दिनांक 22.03.2010 चे वसुली प्रमाणपत्रा पासून तीन महिन्याचा कालावधी सोडून म्हणजे दिनांक 22.05.2010 एवढा येतो कारण तीन महिन्याचे आत सदर कार्यवाही वि.प.पतसंस्थेस करता आली असती, परंतु असे वि.प.यांनी न करुन दोषपूर्ण सेवा त.क.यांना दिलेली आहे. 26. त.क.यांचे कडून वसुल करावयाची निश्चीत केलेली रक्कम रुपये-1,96,181/- आणि त्यामधून रुपये-45,000/- वि.प.पतसंस्थेस वसुल झालेली रक्कम वजा करीता येणारी रक्कम रुपये-1,51,181/- एवढी रक्कम आणि तीवर दिनांक 01.10.2008 पासून ते दिनांक 22.05.2010 पोवतो वार्षिक 16 टक्के व्याज यासह येणारी रक्कम त.क.यांचे खात्याचे जमा रकमेतून वजावट करुन, उर्वरीत रक्कम त.क.परत मिळण्यास प्राप्त आहेत, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत झालेले आहे. 27. या सर्व प्रकरात त.क.ला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला आणि प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागली म्हणून त.क.हे शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-2000/- व प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/- वि.प.पतसंस्थे कडून मिळण्यास पात्र आहेत, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 28. वरील सर्व विवेचना वरुन, प्रस्तुत प्रकरणात न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श 1) त.क.ची तक्रार , वि.प. ("वि.प." म्हणजे वि.प.क्रं-1 पतसंस्था व तिचे तर्फे वि.प.क्रं 2 ते 14) विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. 2) वि.प.यांनी त.क.ला त्याचे मुदतठेवीची नियमा नुसार व हिशोबा नुसार येणारी योग्य रक्कम देयलाभांसह व व्याजासह परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
CC/111/2011 3) वि.प.नीं वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या त.क.यांचे बचत खाते क्रमांक-5 मध्ये दिनांक 04.07.2011 रोजी खात्यातील एकूण शिल्लक रक्कम रुपये-3,89,469/- मधून, ( त.क.यांचेवर चौकशी अधिका-यांनी निश्चीत केलेली रक्कम रुपये-1,96,181/- (-) वि.प.पतसंस्थेस वसूल झालेली रक्कम रुपये-45,000/-) रुपये-1,51,181/-(अक्षरी रुपये एक लक्ष एक्कावन्न हजार एकशे ऐक्यांशी फक्त ) आणि तीवर दि. 01.10.2008 पासून ते दि. 22.05.2010 पोवतो वार्षिक16 टक्के व्याज यासह येणारी रक्कम वजावट करुन, उर्वरीत रक्कम तक्रार दाखल दि-01.11.2011 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याजासह त.क.यांना परत करावी. 4) त.क.ला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-3000/-(अक्षरी- रुपये तीन हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त ) वि.प.नीं त.क.ला देय करावे. 5) सदर आदेशाचे अनुपालन वि.प.नीं सदर आदेशाची प्रत प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत करावे. 6) उभय पक्षांना सदर आदेशाची प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन द्यावी. 7) मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती त.क.ने घेवून जाव्यात. (रामलाल भ. सोमाणी) | (सौ.सुषमा प्र.जोशी ) | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष. | सदस्या. | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |