(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 05.11.2011) 1. अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 14 व 12 अन्वये गैरअर्जदाराविरुध्द दाखल केली व सोबत नि.5 नुसार अंतरिम आदेश मिळण्याकरीता अर्ज दाखल केला आहे. 2. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 व 2 हजर झाले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.17 नुसार लेखी बयान दाखल केले व नि.18 नुसार लेखी बयानालाच अंतरिम अर्जाचे उत्तर समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 यांनी लेखी उत्तर व अंतरिम अर्जाचे उत्तर सादर केले नाही. त्यापूर्वी अर्जदाराचा विद्युत पुरवठा जोडून दिलेला आहे. त्यामुळे, तक्रारीतील वाद मिटलेला आहे. 3. अर्जदार व त्याचे अधिवक्ता यांनी हजर होऊन नि.20 नुसार पुरसीस दाखल. गैरअर्जदार क्र.1 यांनी विद्युत पुरवठा दि.3.11.2011 रोजी सुरु करुन दिलेले आहे, यामुळे अर्जदार हा वाद पुढे चालवू इच्छित नाही, अशी पुरसीस दाखल केली. 4. अर्जदारास नि.20 मधील मजकुराबाबत विचारणा केली असता, बरोबर असल्याचे मान्य केले. अर्जदार नि.क्र.20 नुसार तक्रार पुढे चालवू इच्छित नसल्याने, अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची तक्रार परत घेतल्यामुळे निकाली काढण्यात येत आहे. (Complainant Disposed off by way of withdrawal) (2) अर्जदार व गैरअर्जदार यांनी आप-आपला खर्च सहन करावा. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक :05/11/2011. |