जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर
मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, दक्षिण बाजू, बावडा रोड, कोल्हापूर-416 003.
................................................................................................................................
अंमलबजावणी अर्ज क्र.338/2011 मध्ये
तक्रार क्र.127/2011
दाखल दि.21/11/2011
आदेश दि.18/05/2013
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनांन्स कंपनी,
तर्फे विजय बाळासो पाटील, शाखाधिकारी,
रा.देवेंद्र भवन, दुसरा मजला,
उषा टॉकीजजवळ, कोल्हापूर. ........तक्रारदार
विरुध्द
महंमद गुलाब मुल्ला,
रा.बागडी गल्ली, कबनूर, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर. ........सामनेवाला
तक्रारदार तर्फे वकील:- श्री.ए.एम.निबांळकर, हजर
गणपूर्ती:- 1. मा. श्री.संजय पी. बोरवाल, अध्यक्ष
2. मा. श्री.दिनेश एस. गवळी, सदस्य
व्दाराः- मा.श्री.संजय पी.बोरवाल, अध्यक्ष
आदेश
तक्रारदारांची सदरची तक्रार दि.15.11.2011 रोजी मंचात नोंदणी झालेली आहे. तथापि सदरचा अंमलबजावणी अर्ज कलम-25 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदाराने आजरोजी दिलेल्या पुरशीस अर्जाची दखल घेऊन आदेश पारीत करण्यात आले. तक्रारदारांच्या पुरशीसमधील मसुदा खालीलप्रमाणे-
“याकामी कलम-25 खाली दाखल केली असता, या कामी खुप अडचणी येत असल्याने कलम-27 खाली स्वतंत्र प्रोसीडींग दाखल करणेचे आहे, सदर कारणास्तव सदरचे प्रकरण काढून घेत आहे.”
उक्त उल्लेखलेल्या पुरसीसमधील मुद्दयांस अनुसरुन, सदरची तक्रारनिकाली काढणेत येते.
सदर आदेशाच्या सही शिक्क्याच्या प्रतिलिपी उभय पक्षकारांना नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. दिनेश एस. गवळी) (श्री. संजय पी. बोरवाल)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर.
vrb