जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 43/2009
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 16/01/2009
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 18/02/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 10/08/2009
1. सुरेश माधवराव गडे,
उ.व. 65 वर्षे, धंदाः शेती,
2. सौ.सुरेखा सुरेश गडे,
उ.व.54 वर्षे, धंदाः घरकाम,
3. योगेश सुरेश गडे,
उ.व.35 वर्षे, धंदाः वैद्यकीय,
4. निलेश सुरेश गडे,
उ.व.33 वर्षे, धंदाः शेती,
सर्व रा.मेन रोड, यावल, ता.यावल,
जि.जळगांव. ......... तक्रारदार
विरुध्द
1. श्री.महालक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्था लि.यावल शाखा जळगांव,
150, गोलाणी (व.वा.मार्केट) जळगांव, ता. जि.जळगांव.
(तर्फे व साठी नोटीस मॅनेजर सो यांचेवर बजाविण्यात यावी.)
2. माजी चेअरमन, श्री.महालक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्था लि.यावल,
श्री.भगतसिंग देवनाथ पाटील, रा.प्रताप नगर, यावल, ता.यावल,
जि.जळगांव.
3. माजी व्हा.चेअरमन, श्री.महालक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्था लि.यावल,
श्री.भगवान बाबूराव पाटील, रा.विरार नगर, यावल, ता.यावल,जि.जळगांव.
4. वसंत देवराम बडगुजर,
रा.बडगूजर गल्ली, यावल, ता.यावल, जि.जळगांव.
5. दिपक रामचंद्रजी बेहडे,
रा.मेन रोड, यावल, ता.यावल,जि.जळगांव.
6. डॉ.निंबाजी गिरधर बोंडे,
रा.मेन रोड, यावल, ता.यावल,जि.जळगांव.
7. अशोक काळू बारी,
रा.बारी वाडा, यावल, ता.यावल,जि.जळगांव.
8. गुलाम रसूल हाजी गुलाम दस्तगीर,
रा.खिर्नी पुरा, यावल, ता.यावल,जि.जळगांव.
9. प्रविण शंकरराव घोडके,
रा.मेन रोड, यावल, ता.यावल,जि.जळगांव.
10. बाळासाहेब कृष्णराव येवले,
रा.शिवाजी नगर, यावल, ता.यावल,जि.जळगांव.
11. भगवान सोमा कोळी,
रा.संभाजी पेठ, यावल, ता.यावल,जि.जळगांव.
12. चेअरमन, श्री.महालक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्था लि.यावल,
शाखाःचोपडा, श्री.वासुदेव रा.वाणी,
वाणी गल्ली, यावल, ता.यावल,जि.जळगांव. .......... सामनेवाला
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 10/08/2009)
(निकाल कथन न्याय मंच सदस्य श्री. चंद्रकांत मोहन येशीराव यांचेकडून )
तक्रारदारतर्फे श्री.अमीत जी.चोरडीया वकील हजर
सामनेवाला क्रं.1 ते 11 तर्फे श्री.अशोक जे.महाजन वकील हजर.
सामनेवाला क्र. 12 तर्फे श्री.मनीषकुमार एम.वर्मा वकील हजर.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. सदरील सामनेवाला यांचे जळगाव जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी शाखा आहेत. वेगवेगळया प्रकारच्या ठेवी स्विकारणे, त्यावर व्याजदेणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. सामनेवाला ही एक नामांकीत पतसंस्था असल्याने इतर ठेवीदारांप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | पावती / खाते क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख |
1 | 202/9 | 6/10/2003 | 20,000/- | 6/01/2007 |
2 | 200/9 | 6/10/2003 | 20,000/- | 6/01/2007 |
3 | 201/9 | 6/10/2003 | 20,000/- | 6/01/2007 |
4 | 204/9 | 6/10/2003 | 20,000/- | 6/01/2007 |
5 | 203 | 6/10/2003 | 20,000/- | 6/01/2007 |
तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्या मुदत ठेव पावत्यांची मुदत संपलेली असल्याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्याने, तक्रारदार हे त्यांची मुदत ठेवीची रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. तक्रारदार यांना सामनेवाला क्रं. 1 संस्थेचे व सामनेवाला क्रमांक 2,3,4,5,7,8 व 11 यांचे खालीलप्रमाणे मिळकतीचे उतारे प्राप्त झालेले आहेत.
1) सामनेवाला क्र. 1 यांचा संस्थेच्या मालकीची मिळकत मौजे यावल, ता.यावल सिटी सर्व्हे क्रमांक 154 मधील सामनेवाला क्र. 1 श्री.महालक्ष्मी सहकारी पतसंस्था लि, यावल यांच्या मालकीची मिळकत.
2) सामनेवाला क्र. 2 श्री.भगतसिंग देवनाथ पाटील यांच्या मालकीचा प्लॉट मौजे यावल, ता.यावल येथील भू-मापन क्र.68 मधील प्लॉट नं.13.
3) सामनेवाला क्र. 2 श्री.भगतसिंग देवनाथ पाटील यांच्या मालकीचा प्लॉट मौजे यावल, ता.यावल येथील भू-मापन क्र.68 मधील प्लॉट नं.12.
4) सामनेवाला क्र. 2 श्री.भगतसिंग देवनाथ पाटील यांच्या मालकीची शेतजमीन मौजे यावल, ता.यावल येथील शेतजमीन भू-मापन क्र.1816 मधील शेतजमीन क्षेत्र 2 हे.47 आर पैकी श्री.भगतसिंग देवनाथ पाटील यांच्या मालकीची शेतजमीन.
5) सामनेवाला क्र. 2 श्री.भगतसिंग देवनाथ पाटील यांच्या मालकीची शेतजमीन मौजे यावल, ता.यावल येथील शेतजमीन भू-मापन क्र.1818/2 मधील शेतजमीन क्षेत्र 0.32 आर पैकी श्री.भगतसिंग देवनाथ पाटील यांच्या मालकीची शेतजमीन.
6) सामनेवाला क्र. 3 श्री.भगवान बाबुराव पाटील यांच्या मालकीचा प्लॉट मौजे यावल, ता.यावल येथील भू-मापन क्र.45 मधील प्लॉट नं.4 पैकी श्री.भगवान बाबुराव पाटील यांच्या मालकीची प्लॉट मिळकत.
7) सामनेवाला क्र. 4 श्री.वसंत देवराम बडगुजर यांच्या मालकीची शेतजमीन मौजे यावल, ता.यावल येथील शेतजमीन भू-मापन क्र.1896 मधील शेतजमीन क्षेत्र 0.52 आर.
8) सामेनवाला क्र. 4 श्री.वसंत देवराम बडगुजर यांच्या मालकीची शेतजमीन मौजे यावल, ता.यावल येथील शेतजमीन भू-मापन क्र.1850 मधील शेतजमीन क्षेत्र 1 हे.19 आर.
9) सामनेवाला क्र. 5 श्री.दिपक रामचंद्र बेहेडे यांच्या मालकीची शेतजमीन मौजे यावल, ता.यावल येथील शेतजमीन भू-मापन क्र.1687 मधील शेतजमीन क्षेत्र 1 हेक्टर 21 आर पैकी दिपक रामचंद्र बेहेडे यांच्या हिश्याची शेतजमीन.
10) सामनेवाला क्र. 7 श्री.अशोक काळू बारी यांच्या मालकीचा प्लॉट मौजे यावल, ता.यावल येथील भू-मापन क्रमांक 68 मधील प्लॉट क्र.2.
11) सामनेवाला क्र. 8 श्री.गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर यांच्या मालकीची शेतजमीन मौजे यावल, ता.यावल येथील शेतजमीन भू-मापन क्र.638 मधील शेतजमीन क्षेत्र 0.51 आर पैकी गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर यांच्या हिश्याची शेतजमीन.
12) सामनेवाला क्र. 8 श्री.गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर यांच्या मालकीची शेतजमीन मौजे यावल, ता.यावल येथील शेतजमीन भू-मापन क्र.639 मधील शेतजमीन क्षेत्र 1 हे.68 आर पैकी गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर यांच्या हिश्याची शेतजमीन.
13) सामनेवाला क्र. 11 श्री.भगवान सोमा कोळी यांच्या मालकीची शेतजमीन मौजे यावल, ता.यावल येथील शेतजमीन भू-मापन क्र.249 मधील शेतजमीन क्षेत्र 1 हे.52 आर पैकी भगवान सोमा कोळी यांच्या हिश्याची शेतजमीन.
14) सामनेवाला क्र. 11 श्री.भगवान सोमा कोळी यांच्या मालकीची शेतजमीन मौजे यावल, ता.यावल येथील शेतजमीन भू-मापन क्र.326 मधील शेतजमीन क्षेत्र 1 हे.38 आर पैकी भगवान सोमा कोळी यांच्या हिश्याची शेतजमीन.
15) सामनेवाला क्र. 11 श्री.भगवान सोमा कोळी यांच्या मालकीची शेतजमीन मौजे यावल, ता.यावल येथील शेतजमीन भू-मापन क्र.1412 मधील शेतजमीन क्षेत्र 3 हे.37 आर पैकी भगवान सोमा कोळी यांच्या हिश्याची शेतजमीन.
16) सामनेवाला क्र. 11 श्री.भगवान सोमा कोळी यांच्या मालकीची शेतजमीन मौजे यावल, ता.यावल येथील शेतजमीन भू-मापन क्र.1339 मधील शेतजमीन क्षेत्र 5 हे.48 आर पैकी भगवान सोमा कोळी यांच्या हिश्याची शेतजमीन.
येणेप्रमाणे तक्रारदार यांना सदर मिळकतीचे उतारे प्राप्त झालेले आहेत. तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून वरील मुदत ठेवीची रक्कम घेणे असल्याने सामनेवाला हे आपल्या मिळकती त्वरीत विल्हेवाट लावण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती तक्रारदार यांना मिळालेली आहे. सामनेवाला हे तक्रारदार यांना रक्कम मिळू नये व त्यात अडचणी याव्यात म्हणून सामनेवाला सदरील कृत्य करीत आहेत. सामनेवाला यांनी वरील मिळकतीची विक्री केल्यास तक्रारदार यांना मे. न्यायमंचाचे हुकूमाप्रमाणे मुदत ठेवीची रक्कम वसूल करणे असंभव होईल म्हणून तक्रारदार यांनी सदरील तक्रारी अर्जासोबत तुर्तातुर्त मनाई हुकूमाचाही अर्ज दाखल केलेला आहे. म्हणून तक्रारदार यांनी मे. न्यायमंचास विनंती केली आहे की, तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून वरील वर्णन केलेल्या मुदत ठेवीच्या रक्कमा व्याजासह परत मिळाव्यात तसेच सामनेवाला 1 संस्थेचे व सामनेवाला क्रमांक 2,3,4,5,7,8 व 11 यांनी अथवा त्यांचे तर्फे अन्य कोणीही वरील मिळकती विकू नये अथवा त्या अन्य त-हेने तबदील करु नये असा त्यांचेविरुध्द निरंतर मनाई हुकूम देण्यात यावा व ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकामी तसेच त्यांना झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करण्यात आल्यानंतर, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. त्याप्रमाणे सामनेवाला क्रं. 1 ते 11 व 12 हे तक्रारीकामी हजर झाले.
3. सामनेवाला क्र. 1 ते 11 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना रक्कम देण्यास कधीही टाळाटाळ केलेली नाही तसेच तक्रारदारांना ठेवीवरील दि.6/4/2007 पर्यंतचे व्याज मिळालेले आहे. सामनेवाला क्र. 1 ते 11 यांनी तक्रारदारांना सेवा देण्यास कोणतीही कसुर केलेली नाही. सामनेवाला क्र. 12 हे चेअरमन असुन दि.15/7/2008 पासुन नवीन कार्यकारी संचालक मंडळ सामनेवाला क्र. 1 संस्थेचे कामकाज पाहत आहेत. संस्थेचे सर्व व्यवहार, कर्ज वसुलीचे अधिकार हे नवीन कार्यकारी संचालकांकडे असल्यामुळे तक्रारदारांची ठेवीची रक्कम देण्यास सामनेवाला क्र. 12 चेअरमन श्री.वासुदेव राजाराम वाणी व नवीन कार्यकारी संचालक मंडळ जबाबदार आहे त्यामुळे सदरची रक्कम देण्यास सामनेवाला क्र. 1 ते 11 हे वैयक्तीकरित्या व संयुक्तीकपणे जबाबदार नाहीत. सबब तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह रद्य करण्यात यावा अशी विनंती सामनेवाला क्र. 1 ते 11 यांनी केली आहे.
4. सामनेवाला क्र. 12 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. प्रस्तुत सामनेवाला व नवनियुक्त संचालक मंडळ हे महालक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या.यावल यांचे सभासद व ठेवीदार असुन ठेवीदार बचाव समितीचे सभासद आहेत. संस्थेत चाललेल्या गैरकारभार व ठेवी वाचविण्याकरिता वर्षे 2008 मध्ये संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संचालक म्हणुन निवडुन आलेले आहेत व त्यांची कारकिर्द सन 2008-09 पासून 2012-13 पर्यंत आहे. सदरकामी सामनेवाला व नवनियुक्त संचालक मंडळाला कोणतीही माहिती नसल्याने प्रस्तुत अर्जाबाबत जास्त खुलासा करता येत नाही. सबब सदरकामी वर्ष 2006-07 पासुन ते 2007-08 ऑडीट झाल्यानंतर व संस्थेचा संपुर्ण व्यवहाराचा चार्ज मिळाल्यानंतर जास्त खुलासा दाखल करण्याची परवानगी असावी अशी विनंती सामनेवाला क्र. 12 यांनी केली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचे अवलोकन केले असता व उभयतांचे वकील यांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1)
प्रमाणे ग्राहक आहे काय ? .......होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
6. मुद्या क्रमांक 1 तक्रारदार यांनी तक्रारीत निशाणी 3 अंतर्गत दाखल केलेल्या पावतीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी काही रक्कम सामनेवाला यांचे पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवलेली आहेत. सबब सदरील कागदपत्रावरुन दिसून येते की, तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1) ड नुसार ग्राहक आहे.
7. मुद्या क्रमांक 2 दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपण्याआधी ठेवीदाराने सदरील रक्कमेची मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या ठेवीच्या रक्कमा त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे हा ग्राहकाचा वाद आहे. सदरील मुदत ठेवीची रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे तसेच सदरील तक्रार दाखल केल्यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्यांचे शपथपत्रा दाखल केल्यानंतरही सदरील रक्कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्या सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्यांची ठेव रक्कम व्याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्कम मागणेस हक्कदार आहे.
तक्रारदार यांची ठेवीची रक्कम परतफेड करण्याची हमी दिल्यानंतर व त्याची मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम देण्याची वसुली अभावी सामनेवाला यांनी टाळाटाळ केलेली आहे, जेणेकरुन तक्रारदार संस्थेने नाईलाजाने सदरहू तक्रार दाखल करुन सामनेवाला यांचेकडून ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकरीता विनंती केलेली आहे. कारण त्यांची रक्कम मिळणेस धोका निर्माण झाला आहे. म्हणून सदरहू तक्रारीत तक्रारदार यांना निशाणी 6 प्रमाणे दरम्यानचे हुकूमासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर विद्यमान मंचाने दिनांक 16.01.2009 ला अंतरिम आदेश होणेसाठी सामनेवाला 1 संस्थेचे व सामनेवाला क्रमांक 2,3,4,5,7,8 व 11 यांना नोटीस काढण्यात आली होती जेणेकरुन सामनेवाला 1 संस्थेचे व सामनेवाला क्रमांक 2,3,4,5,7,8 व 11 ची मालमत्ता (अर्जाप्रमाणे ) '' जशीची तशी '' का ठेवण्यात येऊ नये असा आदेश होण्याकरिता नोटीस काढलेली आहे. त्याकरीता सदरील सामनेवाला यांनी खुलासा दाखल करावयाचा होता. त्याची जाणीव सामनेवाला यांना आहे कारण सामनेवाला यांना नोटीस लागून ते तक्रारीत हजर होऊन त्यांनी नि.क्र. 6 वर आपला खुलासा दाखल केला नाही व कोणतीही हरकत घेतलेली नाही. तसेच तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून बरीच रक्कम परत घ्यावयाची आहे ही बाब सामनेवाला यांना ज्ञात आहे. आणि अशी रक्कम जर सामनेवाला क्रं. 1 संस्था त्यांचे संचालक मंडळ/ चेअरमन यांचे कृतीमुळे परत करण्यास असमर्थ आहे तर संस्थेचे सर्व संचालक मंडळ/ चेअरमन स्वतंत्ररित्या व एकत्रितरित्या सदरील रक्कम परतफेड करण्यास जबाबदार आहेत आणि त्यामुळे त्यांची मालमत्ता ही जप्त होऊन कायद्याने विक्रीचा आदेश होऊन प्राप्त झालेल्या रक्कमेच्या धनादेशातून सबंधीत तक्रारदार यांची रक्कम परतफेड होऊ शकते . म्हणून मंचाने सदरहू तक्रारीत सामनेवाला यांची जी मालमत्तेबद्यल अंतरीम आदेश करीता नोटीस दिली होती तो आता या आदेशाप्रमाणे सामनेवाला 1 संस्थेचे व सामनेवाला क्रमांक 2,3,4,5,7,8 व 11 ची सदरहू तक्रारीत दर्शविल्याप्रमाणे त्याचे किंवा त्याचे हिश्याची मालमत्ता '' जशीची तशी '' ठेवण्यात येत आहे. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं. 1 ते 12 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावती क्रमांक अनुक्रमे 202/9, 200/9, 201/9, 204/9, व 203 मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमा त्या त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे. 5 टक्के व्याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( क ) सामनेवाला क्रं. 1 ते 12 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 2000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं. 1 ते 12 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं. 1 ते 12 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( ई ) सामनेवाला क्रं. 1 संस्थेचे व सामनेवाला क्रमांक 2,3,4,5,7,8 व 11 च्या तक्रारीत व निशाणी 6 मध्ये आणि तक्रारीत म्हटल्याप्रमाणे मालमत्ता मंचाचे आदेशाप्रमाणे जप्त करण्यात येते म्हणून सामनेवाला यांनी वरील मालमत्ता किंवा त्याचे कोणत्याही हिश्याचा व्यवहार करु नये आणि वरील मालमत्तेचा कोणालाही कोणत्याही प्रकारे विक्री,गहाण,दान, बक्षीस,ताबा व अन्य मार्गाने तबदील करु नये. सदर आदेश सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या इतर तक्रारीतील आदेशाप्रमाणे पूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपर्यंत सामनेवाला यांचेवर बंधनकारक राहील.
( फ ) सदरील तक्रारीच्या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्यास सामनेवाला क्रं. 1 ते 12 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्र ठरतील.
( ग ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 10/08/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव