जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार क्र. 490/2009. आदेश पारीत तारीखः- 08/10/2013.
राजेंद्रसिंग प्रतापसिंग पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.साकेगांव,ता.भुसावळ,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. श्री.महालक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्था लि,यावल,
ता.यावल,जि.जळगांव तर्फे संस्थापक चेअरमन व
इतर 4 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
नि.क्र.1 खालील आदेश व्दाराः श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः उपरोक्त तक्रार अर्जाचे कामी तक्रारदार व त्यांचे वकील माहे जुलै,2011 पासुन सतत गैरहजर. तक्रारदाराने जुलै,2011 पासुन तक्रार अर्जाचे कामी कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. याकामी आज रोजी नेमलेल्या तारखेस विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 तर्फे वकील हजर, त्यांनी विनंती अर्ज दाखल करुन तक्रारदाराने जवळपास 3 वर्षापासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नसल्याने सदर प्रकरणी योग्य ते आदेश व्हावेत अशी विनंती केली. तक्रारदाराची व त्यांचे वकीलांची प्रस्तुत कामी सततची गैरहजेरी पाहता तक्रारदारास त्याची तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य राहीले नसल्याचे स्पष्ट होते. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
ज ळ गा व
दिनांकः- 08/10/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.