एकतर्फी आदेश
1. तक्रारकर्तीच्या कथनानुसार तीने दि.14/12/2009 रोजी इ.टच मोबाईल मॉडेल क्र. सी.जी 1 रु.4,000/- रकमेस विरुध्द पक्ष 2 कडुन विकत घेतला. विकत घेण्याचे एक आठवडयाचे आत वादग्रस्त भ्रमणध्वनी संच सदोष असल्याचे निदर्शनास आले. संच चार्जींग होत नसे, स्विच ऑन-ऑफ होत नसे, तसेच डिस्प्लेवर माहिती बरोबर दिसत नव्हती. हा संच तीने विरुध्द पक्षाच्या सुचनेनुसार त्यांचेकडे जमा केला व विरुध्द पक्ष 1 कडुन त्याऐवजी नवीन दुसरा संच दि.27/12/2009 रोजी बदलुन घेतला. मात्र हा दुसरा संच देखील 6 महिन्याचे आत बिघडल्याने विरुध्द पक्षाच्या सर्विस सेंटरमध्ये जमा करण्यात आला. स्पेअर पार्टस उपलब्ध नाही या कारणाखातर त्याची दुरूस्ती विरुध्द पक्षाने करुन देण्याचे टाळले. विरुध्द पक्ष क्र. 1, 2 व 3 यांचेकडुन सतत टोलवाटोलवी सुरू असल्याने तीने अनेकवेळा लेखी पत्रव्यवहार केला. मात्र त्याची देखल न घेतल्याने भ्रमणध्वनी संचाची संपुर्ण रक्कम व्याजासह परत मिळावी तसेच नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मंचाने मंजुर करावा असे तीचे म्हणणे आहे.
तक्रारीचे समर्थनार्थ निशाणी 2 अन्वये स्वतंत्र प्रतिज्ञापत्र तसेच निशाणी 3.1 ते 3.10 अन्वये कागदपत्रे दाखल करण्यात आले. यात विरुध्द पक्षाला वेळोवेळी पाठवलेले ई.मेल, महालक्ष्मी मोबाईलचे दि.14/12/2009, 27/12/2009 चे बिल तसेच लक्ष्मी टेलीकॉतम चे दि.20/11/2010 चे बिल यांचा समावेश आहे.
2. मंचाने निशाणी 4 अन्वये विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना नोटिस जारी केली व लेखी जबाब दाखल करण्याचा निर्देश दिला. विरुध्द पक्ष क्र. 1 तर्फे दि.02/09/2011 रोजी वकील गणेश नलावडे हजर झाले व त्यांनी निशाणी 5 अन्वये अर्ज दाखल केला. विरुध्द पक्ष क्र. 3 ला नोटिस प्राप्त झाल्याबाबत पोचपावती अभिलेखात उपलब्ध आहे. विरुध्द पक्ष 2 ला पाठवण्यात आलेली नोटिस ‘लेफ्ट अँड्रेस’ या शे-यासह बजावणी न होता मंचाकडे परत आली.
3. मंचाने विरुध्द पक्षाला लेखी जबाब दाखल करण्यासाठी दि.02/09/2011, 10/10/2011, 28/11/20011 व आज दि.05/12/2011 याप्रमाणे वेळोवेळी संधी दिली मात्र लेखी जबाब दाखल न केल्याने ग्राहक कायद्याचे कलम 13(ii)ब(2) अन्वये एकतर्फी सुनावणी घेण्यात आली. मंचासमक्ष स्वतः हजर असणा-या तक्रारकर्तीचे म्हणणे मंचाने ऐकले, तसेच तीने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले त्याआधारे खालील मुदयांचा विचार करण्यात आला-
मुद्दा क्र. 1 वादग्रस्त भ्रमणध्वनी संच दोषपुर्ण आहे काय?
उत्तर – होय.
मुद्दा क्र. 2. तक्रारकर्ती विरुध्द पक्षाकडुन भ्रमणध्वनी संचाची रक्कम, नुकसान भरपाई व न्यायीक खर्च मिळण्यास पात्र आहे काय?
उत्तर – होय.
स्पष्टिकरण मुद्दा क्र. 1
मुद्दा क्र. 1 चे संदर्भात असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीने रु.4,000/- रकमेस दि.14/12/2009 रोजी भ्रमणध्वनी संच विरुध्द पक्ष क्र. 1 कडुन विकत घेतला. विकत घेतल्यापासुन त्यात बॅटरी चार्ज न होणे, मचकुर न दिसणे व संचाची बटने व्यवस्थित काम न करणे यासारखे दोष आढळले. वारंवार तक्रार करल्यानंतर विरुध्द पक्षाने दि.27/12/2009 रोजी हा संच बदलुन दुसरा संच दिला. बिलावर एक वर्षाची हमी राहिल असे आढळते मात्र हा संच देखल 6 महिन्याचे आत नादरुस्त झाला. विरुध्द पक्षाच्या सर्विस सेंटरवर स्पेअर पार्टस उपलब्ध नसल्याने एक महिन्यापेक्षा जास्त काळ आपल्याकडे भ्रमणध्वनी ठेवुनही विरुध्द पक्षाने तो दुरूस्त केला नाही. मंचाच्या मते उपरोक्त सर्व बाबी लक्षात घेऊन वादग्रस्त संच हा दोषपुर्ण असल्याचे निदर्शक आहेत. सबब ग्राहक कायद्याचे कलम 2(1)फ अन्वये दोषपुर्ण संच तक्रारकर्तीला विकल्याबाबत विरुध्द पक्ष जबाबादार आहेत.
स्पष्टिकरण मुद्दा क्र 2 -
मुद्दा क्र. 2 चे संदर्भात मंचाचे मत असे की, विकत घेतल्याचे काही दिवसातच भ्रमणध्वनीत सतत दोष आढळले, नव्याने बदलुन दिलेला दुसरा संच हमी कालावधीत 6 महिन्याचे आत नादुरूस्त होणे. विरुध्द पक्षाकडे वारंवार संपर्क साधुनही विरुध्द पक्षाने दखल न घेणे या सर्व बाबी विरुध्द पक्षाच्या सदोष सेवेच्या निर्दशक आहेत. न्यायाचे दृष्टिने रु. 4,000/- भ्रमणध्वनी संचाची रक्क्म परत करणे आवश्यक ठरते.
ज्या उद्देशाने तक्रारकर्तीने भ्रमणध्वनी संच विकत घेतला तो उद्देश पुर्ण न होता तिला केवळ मनस्ताप सहन करावा लागला. तिने आपली तक्रार ई-मेलद्वारे विरुध्द पक्षाकडे नोंदविली, त्यांच्या प्रती तक्रारीसोबत जोडलेल्या आहेत. त्याची देखील दखल विरुध्द पक्षाने न घेतल्याने तिला सदर तक्रार दाखल करणे भाग पडले. नोटिस प्राप्त होऊनही विरुध्द पक्षाने ने आपला लेखी जबाब दाखल करण्याचे सौजन्य न दाखविल्यामुळे त्यांचा न्यायालयाच्या संदर्भातील अनुदार दृष्टिकोण लक्षात येतो. सबब न्यायाचे दृष्टिने मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई रु.2,000 व न्यायिक खर्च रु.1,000/- मिळणेस तक्रारकर्ती पात्र आहे.
4. सबब अंतिम आदेश परित करण्यात येतो -
आदेश
1.तक्रार क्र.296/2011 मंजुर करण्यात येते.
2.आदेश तारखेच्या 45 दिवसाचे आत विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या तक्रारकर्तीला खालील प्रमाणे रक्कम द्यावी.
अ) वादग्रस्त भ्रमणध्वनी संचाची किंमत रु.4000/- (रु. चार हजार फक्त).
ब) मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई रु.2000/- (रु. दोन हजार फक्त).
क) न्यायिक खर्च रु.1,000/- (रु. एक हजार फक्त)
3.विहित मुदतीत उपरोक्त आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षाने न केल्यास तक्रारकर्ती आदेशान्वीत संपुर्ण रक्कम विरुध्द पक्ष क्र. 1 व 2
यांचे कडुन वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या आदेश तारखे पासुन ते प्रत्येक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे 18% दराने व्याजासह
वसुल करण्यास पात्र राहील.
ठिकाण – ठाणे
दिनांक – 05/12/2011
(श्रीमती.ज्योती अय्यर) (श्री.एम.जी.रहाटगांवकर)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे.