Sou. Malati Kashinath Bhusari filed a consumer case on 31 Aug 2010 against Mahalaxmi Mahila Sahakari Pat Sanstha Maryadit, Peth Vadgaon in the Kolhapur Consumer Court. The case no is CC/10/151 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Maharashtra
Kolhapur
CC/10/151
Sou. Malati Kashinath Bhusari - Complainant(s)
Versus
Mahalaxmi Mahila Sahakari Pat Sanstha Maryadit, Peth Vadgaon - Opp.Party(s)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी व सामनेवाला संस्थेच्या मॅनेजर यांनी युक्तिवाद केला. उर्वरित सर्व सामनेवाला गैरहजर आहेत.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी,
यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे दामदुप्पट (पुनर्गुंतवणुक) ठेवीच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :-
अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्कम
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्कम
1.
050
26750/-
16.09.2006
50000/-
2.
053
26750/-
16.09.2006
50000/-
3.
056
26750/-
16.09.2006
50000/-
4.
055
26750/-
16.09.2006
50000/-
(3) सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदाराना सदर रक्कमांची शैक्षणिक व कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी आवश्यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.25.07.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्याजासह ठेवींच्या रक्कमांची मागणी केली. सामनेवाला यांनी उत्तरी नोटीस पाठवून तक्रारदारांच्या रक्कमा मान्य केल्या, परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
(4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस व सामनेवाला यांची उत्तरी नोटीस इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(5) सामनेवाला संस्थेतर्फे मॅनेजर यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी वेळोवेळी मागितलेल्या त्यांचे ठेवींच्या रक्कमा त्या-त्यावेळी व्याजासह अदा केलेल्या आहेत. उर्वरित ठेव रक्कमेसंदर्भात देखील त्यांना वेळोवेळी तोंडी व दि.25.07.2009 व दि.08.04.2010 रोजी लेखी कळविले आहे. तक्रारदारांना त्यांची देय असलेले एकूण रक्कमेपैकी मुद्दल रककम रुपये 1,70,000/- देणेस तयार होते व आहेत. त्यावर होणा-या व्याजाचे रक्कम रुपये 93,000/- बाबत कालावधीची मागणी केली होती, त्यास तक्रारदारांनी अनुमती दिली नाही.
(6) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ दि.08.04.2010 रोजीचे पत्र व दि.20.08.2009 रोजीच्या नोटीसीची प्रत दाखल केली आहे.
(7) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्कमांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत व सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टीप्रित्यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्यांच्या म्हणण्यातील कथनांचा तक्रारदारांच्या तक्रारींशी कोणताही दुरान्वयेदेखील संबंध नसल्याचे स्पष्ट होते. सबब, तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे.
(8) सामनेवाला क्र.2 ते 15 यांना या मंचाने संधी देवूनही त्यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या व्याजासह रक्कमा परत करण्याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्य असल्याचे दाखवून दिले आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 1 ते 14 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.15 हे संस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(9) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या दामदुप्पट ठेवींच्या असून त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे पुनर्गुंतवणुक (दामदुप्पट) ठेव पावत्यांवरील मुदतपूर्ण रक्कमा मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(10) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
(3) सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.15 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील दामदुप्पट रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर दि.17.09.2006 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे.
अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्कम
देय मुदतपूर्ण रक्कम
1.
050
26750/-
50000/-
2.
053
26750/-
50000/-
3.
056
26750/-
50000/-
4.
055
26750/-
50000/-
(3) सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.15 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.