Maharashtra

Nashik

CC/24/2011

Rakhamabai Sanpatrao Bankar - Complainant(s)

Versus

Mahalaxmi Mahila Gramin Bigar sheti - Opp.Party(s)

30 Jun 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/24/2011
 
1. Rakhamabai Sanpatrao Bankar
Pnpalgao basvant,Niphad,nahsik
...........Complainant(s)
Versus
1. Mahalaxmi Mahila Gramin Bigar sheti
Basvant Market,Pinpalgao,nashik
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr R S Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

(मा.सदस्‍या अँड सौ.विणा दाणी यांनी निकालपत्र पारीत केले) 

 

      अर्जदार क्र.1 ते 5 यांना सामनेवाले क्र. 1 ते 5 यांचेकडून वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या मुदतठेवीची रक्‍कम रु.5,00,000/- मिळावी, या रकमेवर 12% दराने व्‍याज मिळावे व अर्जाचा निकाल होईपर्यंत 15 टक्‍के दराने व्‍याज मिळावे, इतर नुकसान भरपाई म्‍हणून रु. 18,000/- मिळावेत व अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.

      सामनेवाले क्र.1 ते 4 यांनी याकामी पान क्र. 23 लगत लेखी म्‍हणणे व पान क्र. 24 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे

      सामनेवाले क्र.5 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत. त्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द दि. 20/4/2011 रोजी एकतर्फा आदेश करण्‍यात आलेले आहेत.

      अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः

मुद्देः

1.  अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय

2.  सामनेवाले क्र.1 ते 5 यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केली आहे  काय?-

होय. फक्‍त सामनेवाले क्र. 1 यांनी सेवा देण्‍यात कमतरता केलेली आहे.

3.  अर्जदार हे सामनेवाले क्र. 1 यांचेकडून ठेवपावतीवरील रक्‍कम व्‍याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय?-- होय

4.  अर्जदार हे सामनेवाले क्र. 1 यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम 

वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय ---होय

5.  अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 1 यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर

करणेत येत आहे व अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 2 ते 5 यांचेविरुध्‍द नामंजूर करण्‍यात येत आहे.

विवेचनः

      याकामी अर्जदार यांचेवतीने अँड.श्रीमती आर.आर.महाजन यांनी युक्‍तीवाद केलेला आहे.  सामनेवाला यांचेवतीने अँड.ए.एन.डोमसे यांनी युक्‍तीवाद केलेला आहे.

अर्जदार यांनी याकामी पान क्र. 29 ते 33 लगत एकूण 5 मुळ अस्‍सल ठेवपावत्‍या दाखल केलेल्‍या आहेत. पान क्र. 29 ते 33 लगतच्‍या ठेवपावत्‍या सामनेवाले यांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेल्‍या नाहीत. पान क्र.29 ते 33 चे ठेवपावत्‍यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला  यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांनी याकामी सामनेवाले क्र. 2 ते 5 यांना अनुक्रमे संस्‍थेचे चेअरमन, व्‍हाईस चेअरमन व सहायक निबंधक म्‍हणून सामिल केलेले आहे. परंतु प्रस्‍तुत तक्रार अर्जाचेकामी सामनेवाले क्र. 2 ते 4 यांना महाराष्‍ट्र सहकारी कायदा कलम 88 नुसार जबाबदार धरलेले आहे व तसा अहवाल तयार झालेला आहे याबाबत कोणतेही कागदपत्र मंचासमोर दाखल नाहीत. याचा विचार होता मा. उच्‍च न्‍यायालय,  औरंगाबाद खंडपीठ यांचेसमोरील रिट पिटीशन क्र. 5223/2009 निकाल तारीख 22/12/2010 सौ. वर्षा रविंद्र इसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी या निकालपत्रामधील अंतीम आदेश व विवेचनाचा विचार करता प्रस्‍तुत तक्रार अर्जाचेकामी सामनेवाले क्र. 2 ते 4 यांना संस्‍थेचे कारभाराबाबत व अर्जदार यांचे देय रकमेबाबत वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार धरता येत नाही असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाले क्र. 5 हे सहाय्यक निबंधक आहेत. त्‍यांचेवर सामनेवाला नं.1 पतसंस्‍थेची जबाबदारी व ठेवीवरील रक्‍कम परत करण्‍याची जबाबदारी सहकार विभागाने नेमलेली आहे. हे दर्शवण्‍याकरीता अर्जदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही यामुळे सामनेवाला नं.5 यांना या कामी जबाबदार धरता येत नाही.

      सामनेवाला क्र.1 ते 4 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व प्रतिज्ञापत्रामध्‍ये अर्जदार यांनी कलम 4 मधील मजकूर हा संतापाचे भरात चुकिचा व बदनामीकारक लिहीलेला आहे. सामनेवाला ही आर्थीक व सामाजीक हित जोपासणारी पतसंस्‍था आहे.  सामनेवाला यांचे पदाधिकारी योग्‍य प्रकारेच कामकाज करीत होते. मयताबाबत वारसदारांचे मे.कोर्टाचे वारस प्रमाणपत्र व रक्‍कम काढणेबाबत कायदेशीर हुकूम घ्‍यावा लागतो.  कायदेशीर कागदपत्रांच्‍या अपुर्णतेमुळे रक्‍कम देता आली नाही. अर्जदार यांनी दि.5/1/2011 रोजी नोटीस पाठवली त्‍यादरम्‍यानचे काळात व त्‍यानंतर सामनेवाला संस्‍थेतील कर्मचारी यांनी मृत्‍युचे प्रमाणपत्र व वारस सर्टिफिकेट आणण्‍यास सांगितले परंतु अर्जदार यांनी कोणतीही पुर्तता केलेली नाही.  अर्जदार यांना योग्‍य त्‍या कागदपत्रांची पुर्तता करणेबाबत आदेश व्‍हावेत, संस्‍थेच्‍या अटी व नियमाप्रमाणे व्‍याजदर आकारुन सामनेवाला हे ठेवी देण्‍यास तयार होते व आहेत. असे म्‍हटलेले आहे.

      परंतु या कामी अर्जदार यांनी पान क्र.27 लगत प्रतिज्ञापत्र दाखल करुन अर्जदार क्र.3 व अर्जदार क्र.6 यांचे मयत रखमाबाई यांचेबरोबर कोणते नाते आहे हे स्‍पष्‍ट केलेले आहे.  वास्‍तविक अर्जदार क्र.2 ते 5 यांच्‍या ठेवपावतीवरील रक्‍कम मुदत संपल्‍यानंतर परत करणे ही सामनेवाला क्र.1 यांची जबाबदारी होती व मयत रखमाबाई यांचे नावावरील ठेवपावतीवरील रक्‍कम अर्जदार क्र.2 ते 6 यांचेकडून योग्‍य तो इन्‍डेमन्‍टी बॉंड लिहून घेवून परत करणे गरजेचे होते.

सामनेवाला नं.1 यांनी अर्जदार यांची ठेव पावत्‍यावरील रक्‍कम व्‍याजास‍ह परत केलेली नाही. ठेवपावतीवरील संपुर्ण रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍याची संपूर्ण जबाबदारी सामनेवाले क्र. 1 यांचेवर आहे. परंतु या तक्रार अर्जाचेकामी सामनेवाले क्र. 1 यांनी अर्जदार यांना पान क्र. 29 ते 33 चे ठेवपावतीवरील संपूर्ण रक्‍कम व्‍याजासह परत केलेली नाही. याचा विचार होता सामनेवाले क्र. 1 पतसंस्‍था यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केलेली आहे.

सामनेवाला यांनी पान क्र.35 लगत अर्ज देवून अर्जदार यांची ठेव रक्‍कम दरमहा 30,000/- रुपये हप्‍त्‍याने परत करण्‍यास परवानगी मिळावी व तसा आदेश व्‍हावा अशी विनंती केलेंली आहे. परंतु अशाप्रकारे हप्‍त्‍याने रक्‍कम परत फेड करण्‍याबाबत ग्राहक संरक्षण कायद्यामध्‍ये तरतुद नाही यामुळे सामनेवाला यांचे पान क्र.35 चे अर्जाचा विचार करता येत नाही.                                                                                                

      पान क्र. 29 ते 33 चे ठेवपावतीचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र. 1 पतसंस्‍थेकडून पान क्र. 29 ते 33 चे ठेवपावतीवरील संपुर्ण रक्‍कम व्‍याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाले यांचेकडून रक्‍कम वसूल होऊन मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाले यांचेविरुध्‍द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार क्र.2 ते 6  हे एकत्रीतरित्‍या सामनेवाले क्र. 1 पतसंस्‍था यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु. 1000/- अशी रक्‍कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, प्रतिज्ञापत्र त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे दोन्‍ही बाजुंच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

                       आ दे श

1)      अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 2 ते 5 यांचेविरुध्‍द नामंजूर करण्‍यात येत आहे.

2)      अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 1 पतसंस्‍थेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

3)      आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार क्र.2 ते 6 यांना सामनेवाले पतसंस्‍था क्र. 1 यांनी पुढीलप्रमाणे रकमा द्याव्‍यातः

 (अ) अर्जदार क्र.3 श्री.आनंदराव संपतराव बनकर यांना ठेवपावती क्र. 452 वरील रक्‍कम रु. 1,00,000/- (रक्‍कम रु. एक लाख रुपये) दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.3/8/2009 ते दि.3/8/2010 पर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज दयावे व दि.4/8/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

 (ब) अर्जदार क्र.4 श्री.राजेंद्र आनंदराव बनकर यांना ठेवपावती क्र. 454 वरील रक्‍कम रु. 1,00,000/- (रक्‍कम रु. एक लाख रुपये) दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.3/8/2009 ते दि.3/8/2010 पर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज दयावे व दि.4/8/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

.(क) अर्जदार क्र.2 ते 6 यांना एकत्रीत रित्‍या कै.रखमाबाई संपतराव बनकर यांचे वारस म्‍हणून ठेवपावती क्र. 455  वरील रक्‍कम रु. 1,00,000/- (रक्‍कम रु. एक लाख रुपये) दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.3/8/2009 ते दि.3/8/2010 पर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज दयावे व दि.4/8/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे. जरुरतर या ठेवपावतीबाबत अर्जदार क्र.2 ते 6 यांचेकडून योग्‍य तो इन्‍डेमन्‍टी बॉंड सामनेवाला क्र.1 यांनी लिहून घ्‍यावा.

(ड) अर्जदार क्र.2 श्री.संपतराव धोंडीराम बनकर यांना ठेवपावती क्र. 456 वरील रक्‍कम रु. 1,00,000/- (रक्‍कम रु. एक लाख रुपये) दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.3/8/2009 ते दि.3/8/2010 पर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज दयावे व दि.4/8/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

(इ) अर्जदार क्र.5 श्री.संदीप आनंदराव बनकर यांना ठेवपावती क्र. 453 वरील रक्‍कम रु. 1,00,000/- (रक्‍कम रु. एक लाख रुपये) दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.3/8/2009 ते दि.3/8/2010 पर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज दयावे व दि.4/8/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

   (4) अर्जदार क्र.2 ते 6 यांना एकत्रीतरित्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/-

   (अक्षरी रुपये दहा हजार ) दयावेत.

   (5) अर्जदार क्र.2 ते 6 यांना एकत्रीतरित्‍या अर्जाचे खर्चापोटी  रु. 1000/-

   (अक्षरी रुपये एक हजार) दयावेत.

 

 

 
 
[HON'ABLE MR. Mr R S Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.