तक्रार क्र. CC/ 15/ 27 दाखल दि. 15.06.2015
आदेश दि. 10.02.2016
तक्रारकर्ता :- 1. श्रीमती उर्मिला पांडुरंग कंगाले
वय – 40 वर्षे, धंदा – घरकाम/शेती
2. श्री पांडुरंग बकाराम कंगाले
वय – 49 वर्षे, व्यवसाय – नोकरी
दोघे रा.जांभोरा, ता.मोहाडी जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. महालक्ष्मी इंजिनियरींग वर्क्स
तर्फे प्रोप्रायटर/पार्टनर/मॅनेजर
रा.गोंदिया रोड, खापा चौक,खापा
ता.तुमसर जि.भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा.सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया
मा.सदस्या श्रीमती चंद्रिका के.बैस
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.उदय क्षिरसागर
विपतर्फे अॅड.एन.जी.पांडे
(आदेश पारित द्वारा मा.सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 10 फेब्रुवारी 2016)
1. तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष महालक्ष्मी इंजिनियरींग वर्क्स यांचे कडून ट्रॅक्टर ट्रॉली कर्ज घेऊन विकत घेतली. परंतु वारंवार विनंती करुन सुध्दा विरुध्द पक्षाने सदर ट्रॉलीचा ताबा तक्रारकर्त्यांना न दिल्यामुळे सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
2. तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
तक्रारकर्ते हे रा.जांभोरा ता.मोहाडी जि.भंडारा येथील रहीवासी असून व्यवसायाने शेतकरी असून त्यांचे मालकीची शेतजमीन आहे.
3. तक्रारकर्त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली विकत घेण्याकरीता विरुध्द पक्ष यांना दिनांक 20/3/2013 ला रुपये 50,000/-(पन्नास हजार) व दिनांक 2/4/2013 ला डी.डी.नं.016957 द्वारे रुपये 80,000/-(अंशी हजार फक्त) असे एकुण रुपये 1,30,000/- संपुर्ण रक्कम विरुध्द पक्ष यांना दिले. तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्ष यांना ट्रॅक्टर ट्रॉली करीता संपुर्ण रक्कम दिल्यानंतर सदर ट्रॉलीचे बांधकाम पुर्ण करुन लवकर ताबा देण्यासाठी वारंवार विनंती केली. परंतु विरुध्द पक्ष यांनी सदर ट्रॉलीचा तक्रारकर्ते यांना ताबा न दिल्याने त्यांनी पोलीस स्टेशन, मोहाडी येथे ही तक्रार नोंदवली. सदरहू ट्रॅक्टर ट्रॉली न मिळाल्यामुळे सदरहू प्रकरण न्यायमंचाचे समोर दाखल केले आहे.
4. तक्रारकर्त्यांची तक्रार मंचात दाखल होवून विरुध्द पक्षास दिनांक 14/07/2015 ला नोटीस पाठविण्यात आल्या.
7. विरुध्द पक्ष यांना दिनांक 12/08/2015 ला नोटीस मिळूनही ते सदरहू प्रकरणात हजर न झाल्यामुळे विरुध्द पक्षाविरुध्द प्रकरण विना जबाब चालविण्याचा आदेश दिनांक 06/01/2016 ला पारित करण्यात आला.
8. तक्रारकर्त्यांनी तक्रारीच्या पृष्ठर्थ्य दस्तऐवज दाखल करावयाच्या यादीप्रमाणे एकूण 05 दस्तऐवज दाखल केले आहेत.
9. तक्रारकर्त्याच्या वकीलांनी लेखी युक्तीवाद केला की विरुध्द पक्ष यांना ट्रॅक्टर ट्रॉली करीता संपुर्ण रक्कम रुपये 1,30,000/-(एक लाख तीस हजार) तक्रारकर्त्यांकडून घेतली. परंतु सदर ट्रॅक्टर ट्रॉलीचा ताबा तक्रारकर्त्यांना न दिल्यामुळे विरुध्द पक्ष यांचे सेवेतील त्रृटी असल्यामुळे सदरहू तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे.
10. तक्रारकर्त्यांची तक्रार, दस्तऐवज, तक्रारकर्त्यांचे वकील यांचा लेखी युक्तीवाद यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.
A) तक्रारकर्त्यांची तक्रार मंजुर होण्यास पात्र आहे का? – होय.
- अंतीम आदेश काय – कारणमिमांसेनुसार
कारणमिमांसा
11. तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून ट्रॅक्टर ट्रॉली विकत घेण्याकरीता विरुध्द पक्षाला दिनांक 20/03/2013 ला रुपये 50,000/-(पन्नास हजार फक्त) व दिनांक 02/04/2013 ला रुपये 80,000/-(अंशी हजार फक्त) स्टेट बँक ऑफ इंडिया मुंधरी ब्रांच ता.मोहाडी जि.भंडारा यांचे डी.डी.क्रमांक 061957 द्वारे ट्रॅक्टर ट्रॉली करीता दिले. त्याबाबतचे दस्त पान क्र.13 ते 15 वर दाखल केले आहेत.
तक्रारकर्त्यांनी सदर ट्रॅक्टर ट्रॉली विकत घेण्याकरीता संपुर्ण रक्कम रुपये 1,30,000/-(एक लाख तीस हजार) विरुध्द पक्ष यांचे कोटेशन प्रमाणे दिले, हे स्पष्ट होते.
विरुध्द पक्ष यांनी सदर ट्रॅक्टर ट्रॉलीचा ताबा विनंती करुनही तक्रारकर्त्यास न दिल्यामुळे तक्रारकर्त्यांनी तक्रार पोलीस स्टेशन मोहाडी येथेही नोंदवली आहे, जी पान क्र.16 वर दाखल केली आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांकडून संपुर्ण पैसे घेऊन सुध्दा ट्रॅक्टर ट्रॉलीचा ताबा तक्रारकर्त्यांना वेळेत न दिल्याने तक्रारकर्त्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्ते Special Damages मिळण्यास पात्र आहेत. विरुध्द पक्षाने योग्य वेळेत ट्रॅक्टर ट्रॉलीचा ताबा न देणे म्हणजे सेवेतील त्रृटी आहे.
करीता खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
- तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजुर.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांना ट्रॅक्टर व ट्रॉली पोटी भरणा केलेली रक्कम रुपये 1,30,000/-(एक लाख तीस हजार फक्त) दिनांक 15/06/2015 पासून द.शा.द.शे. 9% टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम तक्रारकर्त्यांस मिळेपर्यंत व्याजासह दयावे.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यांस मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासासाठी नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/-(दहा हजार फक्त) दयावे.
-
- विरुध्द पक्षाने तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/-(दहा हजार फक्त) दयावे.
- विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची
प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
6. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी सदर आदेशाची
प्रत नियमानुसार तक्रारकर्त्यास विनामुल्य उपलब्ध करुन दयावी