Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/13/19

Shri Ravishankar Hiralal Shukla - Complainant(s)

Versus

Mahak Realtors Pvt.Ltd. - Opp.Party(s)

Nitin Ambilwade

15 Feb 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/13/19
 
1. श्री.रविशंकर हिरालाल शुक्‍ला
रा.क्‍वा.न.7/30/8 ऑर्डीनन्‍स फॅक्‍टरी इस्‍टेट अंबाझरी,नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. महक रिअल्‍टर्स प्रा. लि. तर्फे संचालक शेख तनवीर शेख महबूब
रा.महावीर पॅलेस मागे सतरंजीपुरा,नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा- श्री नितीन माणिकराव घरडे , मा.सदस्‍य )

(पारीत दिनांक-15 फेब्रुवारी, 2014 )

 

01.    ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खालील उपरोक्‍त नमुद तक्रारीं मधील तक्रारदार हे जरी वेगवेगळे असले तरी यामधील विरुध्‍दपक्ष हे एकच आहेत आणि तपशिलाचा थोडा फार भाग वगळता, ज्‍या कायदे विषयक तरतुदींचे आधारावर या तक्रारी निकाली निघणार आहेत, त्‍या कायदेशीर तरतुदी हया सुध्‍दा सारख्‍याच असल्‍यामुळे, आम्‍ही, उपरोक्‍त नमुद तक्रारीं मध्‍ये एकत्रितरित्‍या निकाल पारीत करीत आहोत.

 

02.   उपरोक्‍त नमुद तक्रारींमधील सर्व तक्रारदारांनी त्‍यांनी वि.प.कडे नोंदणी केलेल्‍या रो-हाऊसचे अपूर्ण राहिलेले बांधकाम पूर्ण करुन ताबा मिळावा व इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रारी दाखल केलेल्‍या आहेत.

 

 

 

03.   सर्व तक्रारदारांचे थोडक्‍यात कथन खालील प्रमाणे-

      (सर्व तक्रारदारांचे कथन तक्रारीमधील तपशिलाचा थोडाफार भाग वगळता एकसारखे असल्‍यामुळे आम्‍ही तक्रारदारांच्‍या तक्रारीतील मजकूर एकत्रितरित्‍या नमुद करीत आहोत) विरुध्‍दपक्ष महक रिअल्‍टर्स प्रायव्‍हेट लिमिटेड ही घराचे बांधकाम करणारी कंपनी असून शेख तनवीर शेख महबूब हे सदर कंपनीचे संचालक आहे. विरुध्‍दपक्षाने मौजा वडधामना, ग्राम पंचायत वडधामना, तहसिल हिंगणा, जिल्‍हा नागपूर येथील नविन खसरा क्रं-150, जुना खसरा क्रं 126 व 127 आणि मधील भूखंड क्रं-68 ते 76 आणि क्रं 78 ते 85 वर रो-हाऊसेस व बंगल्‍याची योजना तयार केली. उपरोक्‍त नमुद तक्रारदारानीं विरुध्‍दपक्षाकडे खालील नमुद परिशिष्‍ट-अ प्रमाणे त्‍यांचे-त्‍यांचे रो-हाऊसची नोंदणीकृत विक्रीपत्राव्‍दारे खरेदी केली.

परिशिष्‍ट-अ

 

तक्रार क्रं व            तक्रादाराचे नाव

नोंदणीकृत विक्रीपत्र दस्‍त क्रं

विक्रीपत्र दिनांक

मालमत्‍तेचा तपशिल

विक्रीपत्रा नुसार विरुध्‍दपक्षास अदा केलेली संपूर्ण रक्‍कम रुपया मध्‍ये

सी.सी-13/9-

दिनेशकुमार माखनलाल त्रिपाठी

4080/2010

20.08.2010

भारत नगर फेज-II डयुप्‍लेक्‍स रो हाऊस            क्रं 23

5,50,000/-

सी.सी-13/11-

चंद्रशेखर कृष्‍णराव शेंडे

782/2009

16.02.2009

भारत नगर फेज-II डयुप्‍लेक्‍स रो हाऊस             क्रं 08

7,00,000/-

सी.सी-13/12-

संजय हिरामण सोनटक्‍के

2602/2010

28.05.2010

भारत नगर फेज-II डयुप्‍लेक्‍स रो हाऊस            क्रं 02

8,70,000/-

सी.सी-13/13-

अनुप कुमार श्‍यामकिशोर श्रीवास्‍तव

2749/2010

07.06.2010

भारत नगर फेज-II डयुप्‍लेक्‍स रो हाऊस           क्रं 09

6,80,000/-

सी.सी-13/15-

पुंडलीक नत्‍थुजी येनुरकर

213/2008

28.03.2008

भारत नगर फेज-II डयुप्‍लेक्‍स रो हाऊस            क्रं 19

5,50,000/-

सी.सी-13/16-

रमेशकुमार तपेश्‍वरीप्रसाद शुक्‍ला

4079/2010

20.08.2010

भारत नगर फेज-II डयुप्‍लेक्‍स रो हाऊस            क्रं 16

5,50,000/-

सी.सी-13/18-

योगेश सत्रजित तिवारी

7277/2007

27.12.2007

भारत नगर फेज-II डयुप्‍लेक्‍स रो हाऊस           क्रं 15

6,51,000/-

सी.सी-13/19- रविशंकर हिरालाल शुक्‍ला

4125/2010

24.08.2010

भारत नगर फेज-II डयुप्‍लेक्‍स रो हाऊस             क्रं 17

5,50,000/-

 

     उपरोक्‍त नमुद सर्व तक्रारदारानां, विरुध्‍दपक्षाने परिशिष्‍ट-अ मध्‍ये नमुद केल्‍या नुसार रो-हाऊसचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले. परंतु विक्रीपत्राचे दिवशी उपरोक्‍त नमुद रो-हाऊसचे बांधकाम अपूर्ण असल्‍यामुळे ते वास्‍तव्‍यास योग्‍य नव्‍हते. रो-हाऊसचे संपूर्ण बांधकाम झाल्‍या नंतर रो-हाऊसचा ताबा तक्रादारानां देण्‍याचे ठरले. बांधकाम अपूर्ण असतानाही तक्रारदारांनी रो-हाऊसची संपूर्ण किंमत वेळोवेळी विरुध्‍दपक्षास अदा केलेली आहे व त्‍याचा उल्‍लेख विक्रीपत्रात सुध्‍दा आलेला आहे.

      उपरोक्‍त नमुद तक्रारदारांची मुख्‍य तक्रार अशी आहे की, त्‍यांनी विरुध्‍दपक्षास विक्रीपत्रा  नुसार  रो-हाऊसची संपूर्ण किंमत वेळोवेळी अदा केली.  त्‍यानुसार विरुध्‍दपक्षाने रो-हाऊसचे  विक्रीपत्र  जरी  तक्रारदारांचे  नावे  करुन

दिलेले असले तरी विक्रीचे वेळी रो-हाऊसचे बांधकाम अपूर्ण असल्‍यामुळे ते वास्‍तव्‍यास योग्‍य नव्‍हते. परंतु त्‍यानंतरही आज पावेतो विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांच्‍या रो-हाऊसचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करुन दिलेले नाही, त्‍यामध्‍ये आवश्‍यक सोयी-सुविधा पुरविलेल्‍या नाहीत. रो-हाऊसचे बांधकाम अपूर्ण असल्‍यामुळे अद्दाप पर्यंत तक्रारदारांना त्‍याचा ताबा मिळालेला नाही. त्‍यामुळे तक्रारदारांना दुसरीकडे किरायाने क्‍वॉर्टरमध्‍ये राहावे लागत आहे. विरुध्‍दपक्षाने रो-हाऊसचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करुन ताबा मिळण्‍यासाठीची सभा दि.14.07.2012 रोजी श्री अशोक ताकतोडे यांचे निवासस्‍थान क्‍वॉर्टर               क्रं-7/57/1 मध्‍ये सभा झाली, सभेमध्‍ये विरुध्‍दपक्षाने करारा नुसार तक्रारदारांना सूपर्ण सोयी सुविधायुक्‍त बांधकामा व ताबा दि.30.09.2012 पूर्वी देण्‍याचे लेखी आश्‍वासन दिले होते. परंतु विरुध्‍दपक्षाने आश्‍वासित केल्‍या नुसार कोणतीही कार्यवाही न केल्‍यामुळे तक्रारदारांनी अधिवक्‍ता यांचे मार्फतीने नोंदणीकृत डाकेने विरुध्‍दपक्षास नोटीस पाठविली परंतु नोटीस प्राप्‍त झाल्‍या नंतरही त्‍यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.

     तक्रारदारानीं पुढे असे नमुद केले की, रो-हाऊसचे अपूर्ण बांधकामाची त्‍यांनी खाजगी बांधकाम अभियंत्‍या मार्फत तपासणी केली, त्‍यानुसार सदर बांधकाम अभियंत्‍यानीं बांधकाम पूर्णत्‍वासाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक दिले. विरुध्‍दपक्षाने करारा नुसार रो-हाऊसचे बांधकाम पूर्ण न करुन दिल्‍यामुळे व ताबा न मिळाल्‍यामुळे सर्व तक्रादारांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा

 

 

 

लागत आहे. म्‍हणून उपरोक्‍त नमुद तक्रारदारानीं विरुध्‍दपक्षा विरुध्‍द न्‍यायमंचा समक्ष स्‍वतंत्र तक्रारी दाखल करुन त्‍याव्‍दारे खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

(1)       विरुध्‍दपक्षाने संपूर्ण किंमत स्विकारुनही आजतागायत रो-हाऊसचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करुन दिले नाही व ताबा दिला नाही म्‍हणून झालेल्‍या नुकसानी पोटी तक्रादारानां प्रत्‍येकी  रुपये-1,00,000/- नुकसान भरपाई देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(2)       तक्रारदारानां झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून प्रत्‍येकी रुपये-50,000/- विरुध्‍दपक्षाने देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(3)       रो-हाऊसचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्‍यासाठी खाजगी बांधकाम अभियंत्‍याचे अंदाजपत्रका नुसार (परिशिष्‍ठ-ड) नमुद रक्‍कम प्रत्‍येक तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्षाने देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(4)       विरुध्‍दपक्षाने रो-हाऊसचे अपूर्ण बांधकाम त्‍वरीत पूर्ण करुन तक्रारदारानां ताबा देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(5)       प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च म्‍हणून प्रत्‍येकी रुपये-5000/- विरुध्‍दपक्षाने देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(5)

04.   प्रस्‍तुत तक्रारी मंचा समक्ष चालू असताना तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द मॅन्‍डेटरी इंजक्‍शन मिळण्‍या बाबतचा अर्ज मंचा समक्ष सादर केला. सदर अर्जामध्‍ये विरुध्‍दपक्षाने विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करुन दिलेले नाही.त्‍यामुळे तक्रादारानां किरायाचे घरात/क्‍वॉर्टरमध्‍ये राहावे लागत आहे. रो-हाऊसला दरवाजे, खिडक्‍या टाईल्‍स, इलेक्ट्रिक फीटींग, पाण्‍याचे कनेक्‍शन त्‍याच प्रमाणे बाहेरच्‍या भागाचे प्‍लॅस्‍टरींग, रंगरंगोटी केलेली नाही असे नमुद करुन विरुध्‍दपक्षाने रो-हाऊसचे राहिलेले बांधकाम पूर्ण करण्‍याचे आदेशित व्‍हावे अशी विनंती केली.

      या उलट विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांच्‍या मॅन्‍डेटरी इंजक्‍शन अर्जास लेखी उत्‍तर सादर केले. त्‍यांनी अधिकच्‍या बांधकामाचे तक्रारदारांनी भुगतान न केल्‍यामुळे व कामात व्‍यत्‍यय आणल्‍यामुळे ते बांधकाम पूर्ण करु शकले नाही व त्‍याकरीता तक्रारदार स्‍वतः जबाबदार आहेत. विक्रीपत्रामध्‍ये बांधकाम पूर्ण करुन ताबा दिल्‍याचा उल्‍लेख आहे. तक्रारदारांनी सांगितलेले अधिकचे काम जे जवळ जवळ पूर्ण झालेले आहे त्‍या बद्दल पैशाचा व इतर बाबींचा वाद उभय पक्षांमध्‍ये निर्माण झाल्‍यामुळे तक्रारदारानां विरुध्‍दपक्षाचे पैसे द्दावयाचे नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत अर्ज सादर केलेला आहे. मूळ तक्रारीचे अंतिम निकालपत्राचे वेळी तक्रारदारांच्‍या तक्रारींवर निर्णय घेणे योग्‍य राहिल त्‍यामुळे सध्‍या सदरचे अंतरिम अर्जावर आदेश पारीत करणे योग्‍य होणार नाही असे नमुद केले. तक्रारदारांनी सदरचा अर्ज मंचा समक्ष नॉट प्रेस केल्‍यामुळे मंचाचे दि.08.10.2013 रोजीचे आदेशान्‍वये सदरचा अर्ज नस्‍तीबध्‍द करण्‍यात आला.

05.  विरुध्‍दपक्षाने आपले प्रतिज्ञालेखावरील तक्रारीनिहाय स्‍वतंत्र उत्‍तर (विरुध्‍दपक्षाचे सर्व तक्रारींमधील लेखी उत्‍तर त्‍यातील तपशिलाचा थोडाफार भाग वगळता एकसारखे असल्‍यामुळे आम्‍ही विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्‍तरातील मजकूर एकत्रितरित्‍या नमुद करीत आहोत) मंचा समक्ष सादर केले. त्‍यांचे लेखी उत्‍तरा नुसार तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केल्‍या नुसार रो-हाऊस बांधकामाची योजना, तक्रारदारांना रो हाऊसची करुन दिलेली नोंदणीकृत विक्री या सर्व बाबी

मान्‍य केल्‍यात. त्‍यांनी लेखी उत्‍तरात पुढे असे नमुद केले की, तक्रारदारानां विक्रीपूर्वी योजनेतील बांधकाम सोई सुविधे संबधाने संपूर्ण कल्‍पना दिली होती आणि या शिवाय जास्‍तीच्‍या सोई सुविधा हव्‍या असल्‍यास त्‍याची आगाऊ सुचना देऊन  जास्‍तीचे शुल्‍क भरावे लागतील असे सुचित केले होते. परंतु त्‍यावेळी तक्रारदारांनी कुठलेही अधिकचे बांधकाम व परिवर्तन करण्‍यास सुचविले नव्‍हते. विरुध्‍दपक्षाने ठरल्‍या प्रमाणे संपूर्ण रो-हाऊसचे बांधकाम           जुन-जुलै-2010 मध्‍ये पूर्ण केले होते. तक्रारदारानीं स्‍वतः येऊन रो-हाऊसे निरिक्षण केले होते, त्‍यावेळी बांधकाम व इतर कुठल्‍याही बाबींवर तक्रारदारानीं त्‍या वेळी उजर केला नाही कारण ते घराचे बांधकामा बद्दल संतुष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदारांनी रो-हाऊसचे विक्रीपत्र करुन घेण्‍याची तयारी दर्शविली व त्‍या अनुषंगाने तक्रारदारानां नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले. ज्‍या दिवशी           रो-हाऊसचे विक्रीपत्र करुन दिले त्‍या दिवशी रो-हाऊसचे बांधकाम अपूर्ण होते, त्‍यामुळे ते वास्‍तव्‍यास योग्‍य नव्‍हते  हे तक्रारदारांचे म्‍हणणे चुकीचे असल्‍यामुळे मान्‍य नाही. तसेच सदर रो-हाऊसचा ताबा हा बांधकाम पूर्ण झाल्‍या नंतर देण्‍याचे ठरले होते ही बाब सुध्‍दा सपशेल चुकीची आहे. सदर           रो-हाऊसचे बांधकाम पूर्ण झाल्‍यामुळेच तक्रादारानीं विक्रीपत्र नोंदवून घेतले होते. सदर रो-हाऊसचा ताबा तक्रादारानां विक्रीपत्राचे दिवशीच देण्‍यात आला होता व तसा उल्‍लेख सुध्‍दा विक्रीपत्रात आलेला आहे. रो-हाऊसचे संपूर्ण बांधकाम हे विक्रीपत्र करुन देण्‍या आधीच झाले होते. त्‍यांनी तक्रारदारांना त्‍यांचे त्‍यांचे           रो-हाऊस मध्‍ये संपूर्ण सोई सुविधा पुरविलेल्‍या आहेत, त्‍यामुळे तक्रारदारांचे म्‍हणणे की, अपूर्ण बांधकामामुळे ते रो-हाऊसमध्‍ये वास्‍तव्‍यास जाऊ शकले नाहीत हे म्‍हणणे चुकीचे आहे. विरुध्‍दपक्षाने सदर रो-हाऊसची योजना गरीब व मध्‍यम वर्गीयांसाठी पाच ते सात लाख रुपये एवढया अत्‍यल्‍प किंमतीमध्‍ये तयार केली होती. ताबा मिळाल्‍या नंतर तक्रारदारानीं त्‍यांच्‍या ऐपतीला शोभेल अशा सोई सुविधा करण्‍याचे ठरविले, त्‍यांनी सद्दस्थितीत असलेल्‍या टाईल्‍स ऐवजी  उच्‍च प्रतीच्‍या  टाईल्‍स लावण्‍याचे ठरविले. तक्रारदारानां त्‍यांच्‍या घरात


 

सोई-सुविधा वाढवून घ्‍यावयाच्‍या होत्‍या व काही बदल करुन घ्‍यावयाचे होते व त्‍याप्रमाणे त्‍या मोबदल्‍यात येणारा खर्च करण्‍याची तयारी दर्शविली होती. त्‍यावेळी विरुध्‍दपक्षाने  रो-हाऊसमध्‍ये बदल व जास्‍तीच्‍या सोयी-सुविधे संबधाने संभाव्‍य खर्च तक्रारदारानां सांगितला होता परंतु दरम्‍यानचे काळात अचानक बांधकाम साहित्‍याचे किंमतीं मध्‍ये वाढ झाली, त्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्षाने जास्‍तीचे  खर्चाची  मागणी  केली  आणि  तेथून  तक्रादार आणि विरुध्‍दपक्ष यांचेमध्‍ये मतभेद सुरु झालेत.  विरुध्‍दपक्षाने विशेषत्‍वाने नमुद केले की, अन्‍य रो-हाऊस मालकानां कुठलाही बदल करावयाचा नसल्‍याने ते  रो-हाऊसमध्‍ये वास्‍तव्‍यास गेले व आजही तिथे वास्‍तव्‍य करीत आहेत. तक्रारदारानीं वेळेवर झालेल्‍या कामाचे पैसे न दिल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष संपूर्ण काम वेळेत पूर्ण करु शकले नाही. तक्रारदारां सोबत बांधकाम संबधाने विरुध्‍दपक्षाची कोणतीही सभा झाली नाही. त्‍यामुळे तक्रारदारांनी बनविलेले सभेचे ईतिवृत्‍त विरुध्‍दपक्षास मान्‍य नाही. तक्रारदारांची वकिला मार्फत दि.08.10.2012 रोजीची नोटीस विरुध्‍दपक्षास प्राप्‍त झाली होती. नोटीस प्राप्‍त झाल्‍या नंतर विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांकडे विचारणा केली असता त्‍यावेळी तक्रारदारानीं रो हाऊसमध्‍ये अधिकचे कामाचा व बदलाचा खर्च सध्‍याच्‍या दराने देण्‍यास तयार असल्‍याची तयारी दर्शविली होती व त्‍याप्रमाणे अंदाजित खर्च काढून देण्‍या बाबत विनंती केली होती. त्‍यानुसार विरुध्‍दपक्षाने रो-हाऊस मध्‍ये बदललेल्‍या कामाचा खर्च काढून तक्रारदारानां दिला होता. त्‍यावेळी बांधकाम साहित्‍याच्‍या किंमती बद्दल उभय पक्षात काही मतभेद असल्‍यामुळे काम पूर्ण झाल्‍यानंतर ते पाहून अंतिम रक्‍कम देण्‍यात येईल असे ठरले होते. तक्रारदारानीं झालेल्‍या कामा संबधाने देय असलेल्‍या रकमेचा भरणा केला नाही त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष पैशाच्‍या अभावी काम पूर्ण करु शकले नाही. तक्रारदारांनी बांधकामातील केलेल्‍या बदलाची (उन्‍नयनाची रक्‍कम) रक्‍कम विरुध्‍दपक्षास न दिल्‍यामुळे सदरचे प्रकरण न्‍यायालयात आलेले आहे. तक्रारदारांनी मंचा समक्ष रक्‍कम जमा करावी जेणे करुन विरुध्‍दपक्ष आपले काम योग्‍यपणे करु शकेल. विरुध्‍दपक्ष आपले परीने काम करीत आहे व जवळजवळ सर्व काम पूर्ण झालेले आहे. तक्रारदारानीं विरुध्‍दपक्षाचे कामाचे पैसे रोखल्‍याने विरुध्‍दपक्ष लवकरात लवकर काम पूर्ण करण्‍यास असमर्थ आहे. तक्रारदारांनी स्‍वतः सादर केलेल्‍या अंदाजपत्रका वरुन कुठल्‍याही प्रकारचे बांधकाम हे आजच्‍या तारखेस शिल्‍लक राहिलेले             नाही ही बाब निर्विवाद सिध्‍द होते. विरुध्‍दपक्षाचा कुठलाही दोष नाही. प्रत्‍यक्ष्‍य तक्रारदारांच्‍या चुकीमुळेच व तक्रारदारांनी आज पर्यंत झालेल्‍या कामाचे पैसे न दिल्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारी उदभवलेल्‍या आहेत त्‍यामुळे तक्रारी खर्चासह खारीज होण्‍यास पात्र आहेत अशी विनंती विरुध्‍दपक्षाने केली.

 

 

 

06.    उपरोक्‍त नमुद तक्रारदारानीं  आप-आपले प्रतीउत्‍तर प्रतिज्ञालेखावर मंचा समक्ष सादर केले. तक्रारदारांनी आपल्‍या प्रतीउत्‍तरामध्‍ये त्‍यांनी तक्रार मंचा समक्ष दाखल करण्‍यापूर्वी वकीला मार्फत विरुध्‍दपक्षास नोटीस दिली होती. परंतु विरुध्‍दपक्षाने अशी नोटीस प्राप्‍त झाल्‍यावरही कोणतीही कार्यवाही केली नाही वा लेखी उत्‍तरही सादर केले नाही. तक्रारदारांनी त्‍यांच्‍यामध्‍ये आणि विरुध्‍दपक्षामध्‍ये झालेल्‍या समजोत्‍याची प्रत सुध्‍दा दाखल केली आहे. समजोत्‍या नुसार विरुध्‍दपक्षाने तक्रारदारानां  दि.30.09.2012 चे आत संपूर्ण बांधकाम पूर्ण करुन ताबा देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. परंतु विरुध्‍दपक्षाने आश्‍वासनाची पुर्तता न करता रो-हाऊचे बांधकाम पूर्ण करुन दिले नाही व ताबा दिला नाही. तक्रारदार आणि विरुध्‍दपक्ष यांचेमध्‍ये झालेल्‍या समजोत्‍या वरील विरुध्‍दपक्षाची स्‍वाक्षरी विरुध्‍दपक्षाने अमान्‍य केलेली नाही. तक्रारदारांनी            रो-हाऊसची संपूर्ण रककम विरुध्‍दपक्षास दिलेली असून विक्रीपत्र सुध्‍दा 3-4 वर्षापूर्वी झालेले आहे परंतु विरुध्‍दपक्षाने बांधकाम पूर्ण केलेले नाही व जास्‍त रक्‍कम उकळण्‍याचे उद्देश्‍याने विरुध्‍दपक्ष त्रास देत आहे. तक्रारदारांना उर्वरीत बांधकाम विरुध्‍दपक्षाने पूर्ण करुन द्दावे व ताबा मिळावा अशी मागणी केली आहे.

 

07.   तक्रारदारानीं आप-आपल्‍या तक्रारीं सोबत विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांच्‍या नावे नोंदवून दिलेले नोंदणीकृत विक्रीपत्र व त्‍या सोबतचे दस्‍तऐवज दाखल केले. तसेच  विरुध्‍दपक्षाचे बांधकाम योजने संबधाने उर्वरीत राहिलेल्‍या बांधकामाचे बाबतीत तक्रारदार आणि विरुध्‍दपक्ष यांचेमध्‍ये दि.14.07.2012 रोजी झालेल्‍या सभेचे इतिवृत्‍त, तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षास अधिवक्‍ता श्री आंबिलवादे यांचे मार्फतीने दि.08.10.2012 रोजी दिलेली रजि.नोटीस प्रत, पोस्‍टाची पावती, पोच पावती, तक्रारदारां तर्फे खाजगी बांधकाम अभियंता मे.के.एम.के.असोसिएटर तर्फे श्री हितेंद्र कैलासनाथ मुन यांनी बांधकाम पूर्ण करुन देण्‍यासाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक  आणि विरुध्‍दपक्षाचे स्‍पेसीफीकेशनसची प्रत दाखल केली.

08.     विरुध्‍दपक्षाने तक्रारनिहाय तक्रारदारांच्‍या अं‍तरिम अर्जास उत्‍तर तसेच तक्रारीस प्रतिज्ञालेखावरील उत्‍तर सादर केले. अन्‍य दस्‍तऐवज सादर केले नाहीत.

 

 

 

 

 

09.  उपरोक्‍त नमुद तक्रारींमध्‍ये तक्रारकर्त्‍या तर्फे वकील                         श्री आंबिलवादे/वकील श्री पंचोली यांचा  तर विरुध्‍दपक्षा तर्फे वकील                 श्री ए.ए.सांभरे/ वकील श्री बरी यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

10.   तक्रारदारांच्‍या प्रतिज्ञालेखावरील तक्रारी, वि.प.चा प्रतिज्ञालेखावरील जबाब, प्रकरणातील उपलब्‍ध कागदपत्रांचे  काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले असता, न्‍यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहेत-

              मुद्दे                              उत्‍तर

(1)      त.क. चें म्‍हणण्‍या नुसार, योजने नुसार

     वि.प.ने, त.क.नां विहित  मुदतीत फ्लॅटचे

     संपूर्ण बांधकाम करुन न देता व ताबा न देता

        आपले सेवेत त्रृटी ठेवली आहे काय?.................  होय.

(2)      काय आदेश?.............................................  अंतिम आदेशा नुसार

 

::कारण मिमांसा::

मु्द्दा क्रं 1 बाबत-

11.   तक्रारदारानीं विरुध्‍दपक्षा विरुध्‍दची प्रस्‍तुत तक्रार (यातील विरुध्‍दपक्ष म्‍हणजे-महक रिअल्‍टर्स प्रायव्‍हेट लिमिटेड तर्फे संचालक शेख तनवीर शेख महबूब असे समजण्‍यात यावे ) स्‍वतंत्ररित्‍या प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली आहे. विरुध्‍दपक्ष यांचे स्‍वाक्षरीने प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर  तक्रारनिहाय मंचा समक्ष सादर करण्‍यात आले.

 

12.  तक्रारदारांची मुख्‍य तक्रार अशी आहे की, त्‍यांना विरुध्‍दपक्षाने               रो-हाऊसचे विक्रीचे वेळी लवकरात लवकर रो-हाऊसचे संपूर्ण बांधकाम पूर्ण करुन देऊन ताबा देण्‍याचे आश्‍वस्‍त केल्‍यामुळे तक्रारदारांनी रो-हाऊसची संपूर्ण किंमत विरुध्‍दपक्षास अदा करुन रजिस्‍टर विक्रीपत्र आपले नावाने  नोंदवून घेतले.  मात्र त्‍यानंतर विरुध्‍दपक्षाने आश्‍वासित केल्‍या प्रमाणे योजने नुसार        रो-हाऊसचे  संपूर्ण  बांधकाम  मंचा  समक्ष तक्रारी दाखल करे पर्यंत करुन न


दिल्‍यामुळे रो-हाऊसचा ताबा मिळाला नाही त्‍यामुळे  तक्रारदार सदर               रो-हाऊसमध्‍ये वास्‍तव्‍यास जाऊ शकले नाहीत. तक्रारदार आजही क्‍वॉर्टरमध्‍ये भाडयाने राहत आहेत .स्‍वतःचे घर असून सुध्‍दा त्‍यांना भाडयापोटी खर्च करावा लागत आहे.  

 

13.    या संदर्भात तक्रारदारांनी दि.14.07.2012 रोजी भारत नगर फेज-2 या विरुध्‍दपक्षाच्‍या योजनेतील त.क.नीं खरेदी केलेल्‍या रो-हाऊस मधील त्रृटी संदर्भात श्री अशोक ताकतोडे, यांचे क्‍वॉर्टर क्रं-7/57/1 मध्‍ये झालेल्‍या सभेचे इतिवृत्‍ताची प्रत प्रकरणात दाखल केलेली आहे. सदर इतिवृत्‍तावर तक्रारदार आणि विरुध्‍दपक्षकार यांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.  सदर सभेचे ईतिवृत्‍त परिशिष्‍ट-ब अनुसार खालील प्रमाणे नमुद करण्‍यात येते-

परिशिष्‍ट-ब- सभेचे ईतिवृत्‍त

         सदर सभेमध्‍ये ब-याच अवधी पर्यंत भारत नगर फेज-2 या योजनेचे बांधकाम सुरु असल्‍यामुळे आता पावेतो कोणासही ताबा मिळालेला नाही असा मजकूर नमुद आहे. सदर ईतिवृत्‍तात पुढे असे नमुद आहे की, सेप्‍टीक टँकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्‍यात येईल तसेच 31 ऑगस्‍ट 2012 पूर्वी इलेक्ट्रिक फीटींग्‍स, पाण्‍याची टाकी इत्‍यादीसह ताबा देण्‍यात येईल कारण संदर्भीत मालकानीं रक्‍कम अदा केलेली आहे. विरुध्‍दपक्षाने कोणत्‍याही परिस्थितीत दि.30 सप्‍टेंबर, 2012 पर्यंत तक्रारदारांनी खरेदी केलेल्‍या रो-हाऊसचा ताबा देण्‍याचे आश्‍वस्‍त केले. विरुध्‍दपक्षाने पुढे बाऊन्‍ड्री वॉल बनवून देण्‍याचे मान्‍य केले परंतु गेट लावणे संभव नसल्‍याचे सभेत सांगितले. ईमारतीचे मागे बाऊन्‍ड्री वॉल बनवून देण्‍यास तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षास सांगितले, त्‍यावर विरुध्‍दपक्षाने ईमारतीचे मागे पाईप लाईन/गटर लाईन असल्‍याने किमान चार-चार ब्‍लॉक मिळून बाऊन्‍ड्री वॉल करुन दिल्‍या जाईल असे ईतिवृत्‍तामध्‍ये नमुद आहे.

      विरुध्‍दपक्षाने आपले लेखी उत्‍तरामध्‍ये तक्रारदारां सोबत बांधकाम संबधाने विरुध्‍दपक्षाची कोणतीही सभा झाली नाही. त्‍यामुळे तक्रारदारांनी बनविलेले सभेचे ईतिवृत्‍त विरुध्‍दपक्षास मान्‍य नसल्‍याचे नमुद केले. विरुध्‍दपक्षाने सभेचे ईतिवृत्‍तावर असलेली त्‍यांची सही नाकारलेली नाही. विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्‍तरावरील स्‍वाक्षरी आणि सदर सभेचे ईतिवृत्‍तावरील स्‍वाक्षरी ही एकमेकांशी मिळतीजुळती एकसारखी दिसून येते. त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाचे या बचावात कोणतेही तथ्‍य नाही की, त्‍यांची तक्रारदारां सोबत कोणतीही सभा झालेली नाही. सदर सभेचे ईतिवृत्‍तावरुन विरुध्‍दपक्षाने बांधकाम योजने प्रमाणे संपूर्ण बांधकाम तक्रारदारांना पूर्ण करुन न दिल्‍याची बाब सिध्‍द होते.

 

14.   विरुध्‍दपक्षाने दि.14.07.2012 रोजीचे सभेचे ईतिवृत्‍तामध्‍ये बांधकाम योजने प्रमाणे उर्वरीत बांधकाम तक्रारदारांना पूर्ण करुन देऊन             दि.30 सप्‍टेंबर, 2012 पर्यंत रो-हाऊसचा ताबा देण्‍याचे आश्‍वासन दिले होते परंतु त्‍यानंतरही विरुध्‍दपक्षाने कोणतीही कार्यवाही न केल्‍यामुळे तक्रारदारानीं त्‍यांचे अधिवक्‍ता श्री नितीन अंबिलवादे यांचे मार्फतीने नोंदणीकृत डाकेने कायदेशीर नोटीस दि.08.10.2012 रोजीची विरुध्‍दपक्षास पाठविली. सदर नोटीस विरुध्‍दपक्षास मिळाल्‍या बाबतची मूळ पोच प्रकरणात दाखल केली व सदर नोटीस मिळाल्‍याची बाब विरुध्‍दपक्षाने सुध्‍दा आपले लेखी उत्‍तरात मान्‍य केली आहे. परंतु अशी स्थिती असतानाही विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांच्‍या नोटीसला कोणताही प्रतिसाद दिला नाही वा नोटीसला कोणतेही लेखी उत्‍तर दिले नाही वा नोटीस मधील मजकूर खोडून काढलेला नाही. तक्रारदारांना योजने नुसार त्‍यांनी खरेदी केलेल्‍या रो-हाऊसचे संपूर्ण बांधकाम विरुध्‍दपक्षाने करुन न दिल्‍यामुळे त्‍यांना सभा घ्‍यावी लागली, विरुध्‍दपक्षास अधिवक्‍ता यांचे मार्फतीने रजिस्‍टर्ड नोटीस द्दावी लागली. विरुध्‍दपक्षाने योजने प्रमाणे संपूर्ण बांधकाम, सोई सुवि धा तक्रारदारांना पूर्ण करुन दिल्‍या असत्‍या तर त्‍यांना सभा घेण्‍याचे, नोटीस देण्‍याचे आणि मंचात तक्रारी दाखल करण्‍याचे कोणतेही औचीत्‍य राहिले नसते असे मंचाचे मत आहे.  

 

15.    तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारी सोबत विरुध्‍दपक्ष यांचे बांधकाम योजने संबधीचे स्‍पेसिफीकेशनची प्रत अभिलेखावर दाखल केली, त्‍यास परिशिष्‍ट-क देण्‍यात येते, त्‍यानुसार त्‍यातील मजकूर खालील प्रमाणे-

परिशिष्‍ट-क-स्‍पेसिफीकेशन्‍स

(SPECIFICATIONS)

 

01        STRUCTURE                         R.C.C.Frame Structure

02        SUPER STRUCTURE            6”External & 4-1/2” Internal walls.

03        PLASTER                               Sand faced plaster on outer walls funty

                                                           Plaster on in inner walls.

04        PAINT                                      Oil bound distemper paints in all room

                                                            External painting with water proof

                                                           snowcem paint.

05        FLOORING                             Ceramic tiles flooring in hall and

                                                            Grey Mosaic tiles in other rooms.

 

 

 

 

 

06        WINDOWS                             Aluminum fully glazed sliding windows

                                                            In all rooms.

07        DOORS                                  Teak wood front door & all other doors

                                                            with concrete frames with flush door

                                                            shuters.

08        DADO                                     Glazed tiles in Bath & W.C.

09        KITCHEN OTTA                      Kadappa stone top with steel sink.

10        WATER SUPPLY                   Ample water supply (One under ground

                                                            Sump & one over head water tank)

11        PLUMBING                              Concealed Electric fitting with standard

                                                             Accessories.

12        ELECTRIFICATION                In all room & necessary power point at

                                                             Kitchen, Bathroom & Hall.

                                                             M.S.E.B. Transformer & Meter charges

                                                            extra.

 

                                                           For MAHAK REALTORS PRIVATE LTD.

                                                                                     Sd/-

                                                                                DIRECTOR

 

     विरुध्‍दपक्षाचे उपरोक्‍त बांधकाम योजनेचे स्‍पेसीफीकेशन्‍स वरुन विरुध्‍दपक्षाने ईमारतीचे आतील आणि बाहेरील भिंतीनां प्‍लॅस्‍टर करुन देणे, सर्व खोल्‍यानां ऑईल बाऊंड डिस्‍टेम्‍पर पेन्‍टस लावून देणे , फ्लोअरींग हॉलला सिरॅमिक टाईल्‍स आणि अन्‍य खोल्‍यांमध्‍ये ग्रे मोझॅक टाईल्‍स बसवून देणे, प्रत्‍येक खोलीस अल्‍युमिनीयम ग्‍लेझड स्‍लायडींग विन्‍डो बसवून देणे, सागवानी फ्रन्‍ट दरवाजा आणि अन्‍य दरवाजे कॉंक्रीट फ्रेम्‍स फलश डोअर शटरसह लावून देणे, ग्‍लेझड टाईल्‍स बाथरुम, कडप्‍प्‍याचा किचन ओटा स्‍टील सिंकसह, ग्राऊंड फ्लोअरला पाण्‍याची टाकी आणि एक ईमारतीचे वर पाण्‍याची टाकी, चांगल्‍या दर्जेदार साहित्‍याची ईलेक्ट्रिक फीटींग आणि घरामध्‍ये मुख्‍य व आवश्‍यक ठिकाणी ईलेक्ट्रिकचे पॉईन्‍टस बसवून देण्‍याचे मान्‍य केलेले आहे.

 

 

 

 

 

 

16.   तक्रारदारांनी आपल्‍या म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ मे.के.एम.के.असोसिएटस आर्कीटेक्‍ट इंजिनिअर-इन्‍टेरीअरस या खाजगी बांधकाम अभियंत्‍यानीं दिलेल्‍या प्रमाणपत्राची  तसेच विरुध्‍दपक्षाचे योजने नुसार अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्‍यास येणा-या संभाव्‍य खर्चाचे अंदाजपत्रकाची प्रत सादर केली. सदर अंदाजपत्रका मध्‍ये खालील कामे दर्शविण्‍यात आलेली आहेत-

1)    सिरॅमिक टाईल्‍स फ्लोअर, किचन बेडरुम बाल्‍कनी इत्‍यादी ठिकाणी

      बसविणे.

2)    मुख्‍य दरवाजा हा सागवानी दरवाजा बसविणे.

3)    आतील दरवाजे हे फलश डोअरचे बसविणे.

4)    टाईलेटचे दरवाज्‍यास पी.व्‍ही.सी.डोअर पॅनेल बसविणे.

5)    अल्‍युमिनीयमच्‍या खिडक्‍या बसविणे.

6)    ईमारतीचे आतील ड्राईंग हॉल, किचन, बेडरुम, टाईलेट इत्‍यादीला

      पेन्‍टींग करणे.

7)    किचन ओटा, स्‍टील सिंक आणि वरती कडप्‍पा बसविणे.

8)    इलेक्ट्रिक फीटींग संबधाने वायर आणि स्विचेस बसविणे

9)    प्‍लम्‍बींग वर्क

 

17.    मे.के.एम.के.असोसिएटस आर्कीटेक्‍ट इंजिनिअर-इन्‍टेरीअरस या खाजगी बांधकाम अभियंत्‍यांनी आपले अंदाजपत्रकात दर्शविलेली कामे आणि येणारा संभाव्‍य खर्च आणि विरुध्‍दपक्षाने आपल्‍या बांधकाम योजने संबधीचे जे स्‍पेसिफीकेशन्‍स छापलेले आहे, त्‍यामध्‍ये पुरविण्‍यात येणा-या सोई-सुविधा या एक सारख्‍याच आहेत. त्‍यामुळे मे.के.एम.असोसिएटस आर्कीटेक्‍ट यांनी अंदाजपत्रकात दर्शविलेली कामे ही जास्‍तीची वा बांधकाम योजनेच्‍या बाहेरील आहे असे म्‍हणता येऊ शकत नाही. त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्‍तरातील म्‍हणण्‍या नुसार तक्रादारानां बांधकाम योजनेच्‍या बाहेरील अतिरिक्‍त जास्‍त सोई सुविधा पाहिजे होत्‍या आणि त्‍यासाठी तक्रारदार त्‍यांना जास्‍त रक्‍कम देण्‍यास तयार होते परंतु दरम्‍यानचे काळात बांधकाम साहित्‍याचे दर वाढल्‍यामुळे वाढीव दरा संबधाने तक्रारदार आणि विरुध्‍दपक्ष यांच्‍यामध्‍ये मतभेद निर्माण झाल्‍याने तक्रारदारानीं जिल्‍हा मंचात तक्रारी दाखल केल्‍यात असे विरुध्‍दपक्षाचे म्‍हणणे म्‍हणजे त्‍यांचे बौध्‍दीक कल्‍पनेचे तारे आहेत असे मंचाचे मत आहे.  त्‍यामुळे एक तर विरुध्‍दपक्षाने नोंदणीकृत विक्रीपत्रा नुसार तसेच परिशिष्‍ट-ब मध्‍ये नमुद केल्‍या नुसार उभय पक्षांमध्‍ये झालेल्‍या सभेचे ईतिवृत्‍ता प्रमाणे  आणि


 

बांधकाम योजनेतील परिशिष्‍ट-क-मध्‍ये नमुद केल्‍या नुसार विरुध्‍दपक्षाचे स्‍पेसिफीकेशन्‍स नुसार संपूर्ण कामे तक्रारदारानां पूर्ण करुन द्दावीत अथवा खाजगी बांधकाम अभियंता मे. के.एम.के.असोसिएटस, तुकडोजी स्‍क्‍वेअर,  मानेवाडा  रोड,  नागपूर  यांचे  परिशिष्‍ठ-ड  अनुसार अंदाजपत्रका प्रमाणे उर्वरीत कामे पूर्ण करण्‍यासाठी येणारा संभाव्‍य खर्च तक्रारदारांना अदा करणे योग्‍य होईल असे मंचाचे मत आहे. खाजगी बांधकाम अभियंता मे. के.एम.के.असोसिएटस, तुकडोजी स्‍क्‍वेअर, मानेवाडा रोड, नागपूर यांचे अंदाजपत्रका नुसार तक्रारनिहाय अंदाजित खर्च परिशिष्‍ठ-ड अनुसार खालील प्रमाणे-

परिशिष्‍ठ-ड

तक्रार क्रं व   तक्रादाराचे नाव

त.क.तर्फे खाजगी बांधकाम अभियंता यांनी अपूर्ण बांधकाम पूर्ण होण्‍यासाठी अंदाजपत्रका नुसार दिलेला खर्च

सी.सी-13/9- दिनेशकुमार माखनलाल त्रिपाठी

1,03,329/-

सी.सी-13/11-चंद्रशेखर कृष्‍णराव शेंडे

97,075/-

सी.सी.13/12-संजय हिरामण सोनटक्‍के

55,512/-

सी.सी-13/13-अनुप कुमार श्‍यामकिशोर श्रीवास्‍तव

91,477/-

सी.सी.-13/15-पुंडलीक नत्‍थुजी येनुरकर

1,16,937/-

सी.सी-13/16-रमेशकुमार तपेश्‍वरीप्रसाद शुक्‍ला

79,120/-

सी.सी-13/18-योगेश सत्रजित तिवारी

65,512/-

सी.सी-13/19-रविशंकर हिरालाल शुक्‍ला

79,120/-

 

 

18.   विरुध्‍दपक्षाने आपले लेखी उत्‍तरामध्‍ये केवळ मोघम स्‍वरुपाची विधाने केलेली आहेत. तसेच त्‍यांनी योजने नुसार संपूर्ण बांधकाम पूर्ण करुन दिल्‍या बाबतचा कोणताही तज्ञांचा पुरावा वा बांधकामाची छायाचित्रे पुराव्‍या दाखल मंचा समक्ष सादर केलेली नाहीत. त्‍यांनी आपले लेखी उत्‍तरामध्‍ये केवळ तक्रारदारांची विधाने साफ नाकारलेली आहेत. विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्‍तरा मध्‍ये असे नमुद केले आहे की, तक्रारदारांनी मंचा समक्ष रक्‍कम जमा करावी जेणे करुन विरुध्‍दपक्ष आपले काम योग्‍यपणे करु शकेल. विरुध्‍दपक्ष आपले परीने काम करीत आहे व जवळजवळ सर्व काम पूर्ण झालेले आहे. विरुध्‍दपक्षाचे या विधाना वरुनच त्‍यांनी संपूर्ण काम केले नसल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारदारांनी विक्रीचे वेळीच रो-हाऊसचे मोबदल्‍याची संपूर्ण रक्‍कम विरुध्‍दपक्षास अदा केल्‍याची बाब विक्रीपत्रातील मजकूरा वरुन सिध्‍द होतो. विरुध्‍दपक्षाने तक्रारदारां कडून रो-हाऊसचे किंमतीपोटी संपूर्ण मोबदला स्विकारुन विक्रीपत्रा प्रमाणे तसेच

 

योजनेतील स्‍पेसिफीकेशन नुसार आणि सभेतील ईतिवृत्‍ता नुसार रो-हाऊसमध्‍ये            योग्‍य त्‍या सोई सुविधा तक्रारदारानां विहित मुदतीत उपलब्‍ध करुन दिल्‍या नाहीत, त्‍यामुळे तक्रारदारांना विरुध्‍दपक्षास नोटीस द्दावी लागली आणि शेवटी प्रस्‍तुत तक्रारी न्‍यायमंचा समक्ष दाखल कराव्‍या लागल्‍यात. वरील वस्‍तुस्थितीवरुन विरुध्‍दपक्षाने तक्रारदारानां  दोषपूर्ण सेवा दिली आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याची बाब पूर्णतः सिध्‍द होते.

मुद्दा क्रं 2 बाबत-

19.    उपरोक्‍त नमुद परिस्थितीत, विरुध्‍दपक्षाने निकालपत्रातील परिशिष्‍ट-ब मध्‍ये नमुद केल्‍या नुसार उभय पक्षांमध्‍ये दि.14.07.2012 रोजी पार पडलेल्‍या सभेचे ईतिवृत्‍ता नुसार आणि बांधकाम योजनेतील परिशिष्‍ट-क-मध्‍ये नमुद केल्‍या नुसार विरुध्‍दपक्षाने छापलेल्‍या स्‍पेसिफीकेशन्‍स नुसार संपूर्ण कामे तक्रारदारानां पूर्ण करुन द्दावीत अथवा खाजगी बांधकाम अभियंता मे. के.एम.के.असोसिएटस, तुकडोजी स्‍क्‍वेअर, मानेवाडा रोड, नागपूर यांचे परिशिष्‍ठ-ड अनुसार अंदाजपत्रका प्रमाणे उर्वरीत कामे पूर्ण करण्‍यासाठी येणारा संभाव्‍य खर्च तक्रारदारांना अदा करणे योग्‍य होईल असे मंचाचे मत आहे. विरुध्‍दपक्षाने दि.14.07.2012 रोजीचे सभेचे ईतिवृत्‍तामध्‍ये बांधकाम योजने प्रमाणे उर्वरीत बांधकाम तक्रारदारांना पूर्ण करुन देऊन                      दि.30 सप्‍टेंबर, 2012 पर्यंत रो-हाऊसचा ताबा देण्‍याचे आश्‍वासन दिले होते परंतु आश्‍वासना प्रमाणे पुर्तता केली नाही. तक्रारदार हे अद्दापही विरुध्‍दपक्षाने रो-हाऊसचे बांधकाम पूर्ण करुन ताबा न दिल्‍यामुळे क्‍वॉर्टरमध्‍ये भाडयाने राहत असल्‍याचे नमुद केलेले आहे, त्‍यामुळे तक्रारदारांचे आर्थिक नुकसान होत आहे.

या संदर्भात विरुध्‍दपक्षाने अन्‍य ग्राहक योजनेतील रो-हाऊसमध्‍ये वास्‍तव्‍यास आहेत असे नमुद केलेले आहे परंतु त्‍या संबधीचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारदार आर्थिक नुकसानी संबधाने प्रत्‍येकी रुपये-10,000/- मिळण्‍यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.   विरुध्‍दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारानां झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्‍येकी रुपये-10,000/- आणि तक्रारखर्च म्‍हणून प्रत्‍येकी रुपये-5000/- प्रमाणे नुकसान भरपाई देणे योग्‍य होईल असे मंचाचे मत आहे.

 

20.   वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.

                     ::आदेश::

 

         उपरोक्‍त नमुद तक्रारदारांच्‍या तक्रारी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द अंशतः

        मंजूर करण्‍यात येतात.

 

 

 

1)      विरुध्‍दपक्ष यांना निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी

         उभय पक्षांमध्‍ये झालेली सभा दि.14.07.2012 मधील सभेचे

         ईतिवृत्‍ता नुसार  आणि  विरुध्‍दपक्षाचे बांधकाम योजनेतील

        स्‍पेसिफीकेशन्‍स नुसार तसेच उभय पक्षांमधील विक्रीपत्रा नुसार

         संपूर्ण कामे तक्रारदारानां पूर्ण करुन द्दावीत व तक्रारदारांना विक्रीपत्रा

         प्रमाणे प्रत्‍यक्ष्‍य ताबा देऊन तसे प्रमाणपत्र द्दावे. विरुध्‍दपक्षास त्‍यांचे

         छापील स्‍पेसिफीकेशन नुसार/सभेचे ईतिवृत्‍ता नुसार/विक्रीपत्रानुसार

         उर्वरीत बांधकाम त.क.नां करुन देणे शक्‍य नसल्‍यास खाजगी

         बांधकाम अभियंता मे. के.एम.के.असोसिएटस, नागपूर यांचे

        परिशिष्‍ठ-ड अनुसार अंदाजपत्रका प्रमाणे उर्वरीत कामे पूर्ण

         करण्‍यासाठी येणारा संभाव्‍य खर्च त्‍या-त्‍या तक्रारदारांना अदा करावा.
2)       विरुध्‍दपक्षाने, तक्रारदारानां झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल

         प्रत्‍येकी रु.-10,000/-(अक्षरी प्रत्‍येकी रु. दहा हजार फक्‍त) तसेच

         आर्थिक नुकसानी बद्दल प्रत्‍येकी रुपये-10,000/-/-(अक्षरीप्रत्‍येकी रु.-

         दहा हजार फक्‍त) आणि तक्रारखर्च म्‍हणून प्रत्‍येकी रु.-5000/-

         (अक्षरी प्रत्‍येकी रु.पाच हजार फक्‍त) द्दावेत.

4)       सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्षाने सदर निकालपत्राची प्रत

         प्राप्‍त झाल्‍या पासून 60 दिवसांचे आत करावे. विरुध्‍दपक्षाने विहित

         मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्‍यासपरिशिष्‍ठ-ड मधील

         नमुद रकमा त्‍या त्‍या तक्रारदारानां तक्रार दाखल दि.-07.01.2013

         पासून द.सा.द.शे.9% दराने दंडनीय व्‍याजासह देण्‍यास विरुध्‍दपक्ष

         जबाबदार राहतील.

5)       विरुध्‍दपक्षास त्‍यांचेतील विक्रीपत्र/स्‍पेसिफीकेशन/सभेचे ईतिवृत्‍ता

         नुसार तक्रारदारांना उर्वरीत बांधकाम पूर्ण करुन द्दावयाचे असल्‍यास

         त्‍यांनी ते विहित मुदतीत पूर्ण करुन बांधकाम पूर्ण केल्‍या बाबत

         उभय पक्षांचे सहीचे प्रमाणपत्र तक्रारीनिहाय न्‍यायमंचा समक्ष सादर

         करावे.                

6)       निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

         देण्‍यात यावी.

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.