Maharashtra

Kolhapur

CC/10/117

Pandurang Rawaji Redekar. - Complainant(s)

Versus

Mahagaon Gramin Bigar Sheti Sah.Pat Sanstha and others. - Opp.Party(s)

Santosh Patil.

30 Jul 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/116
1. Mohan Gundupant Kumbhar.Jaybhawani Colony.Ringroad Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Mahagaon Gramin Bigar Sheti Sah.Pat Sanstha and others.Mahagaon Tal-Gadhinglaj Kolhapur2. Shri Hanmantrao Annaso Patil, ChairmanAs above3. Shri Mahmad Ibrahim Bagwan, Vice Chairmanas above4. Shri Tatoba Bhimrao Magdum, DirectorAs above5. Shri Babu Rama Koleas above6. Shri Indrajit Shankarrao Patilas above7. Sou.Malubai Shripatrao Desai, Directoras above8. Smt.Anita Dashrath Kokitkar, Directoras above9. Shrikant Yamaji Mangale, Directoras above10. Shri Vijay Gangaram Shingate, Manageras above ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Sontosh Patil., Advocate for Complainant

Dated : 30 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

संयुक्‍त निकालपत्र :- (दि.30.07.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुत ग्राहक तक्रार केस नं.116/10 व 117/10 या दोन्‍ही तक्रारींच्‍या विषयांमध्‍ये साम्‍य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्‍याने हे मंच दोन्‍ही प्रकरणांमध्‍ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे. 
 
(2)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.5 यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(3)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे दामदुप्‍पट व मुदत बंद ठेवीच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्‍कम
1.
116/10
000275
50000/-
10.10.2003
17.08.2008
100000/-
2.
--”--
000274
50000/-
10.10.2003
17.08.2008
100000/-
3
--”--
485
20000/-
02.10.2004
02.08.2008
20000 + 11500 int = 31500
4.
117/10
000948
121250/-
31.03.2007
17.08.2007
121250 +24240 = 145490

 
(4)        सदर ठेवी या तक्रारदारांनी त्‍यांच्‍या कुटुंबाच्‍या आर्थिक अडचणीच्‍यावेळी व व कौटुंबिक गरजेकरीता अडीअडचणीला तत्‍पर रक्‍कम उपलब्‍ध व्‍हावी या एकमेव उद्देशाने ठेवलेल्‍या होत्‍या. सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(5)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, सामनेवाला यांनी पाठविलेले पत्र, सामनेवाला यांना नोटीस पाठविलेच्‍या पोष्‍टाच्‍या पावत्‍या व पोचपावत्‍या इत्‍यादींच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(6)        सामनेवाला क्र.5 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, प्रस्‍तुत सामनेवाला यांनी त्‍यांचे घरगुती व वैयक्तिक अडचणीमुळे सामनेवाला संस्‍थेचे संचालक पदावर काम करणे अशक्‍यप्राय झालेने सामनेवाला क्र.1 संस्‍थेच्‍या अध्‍यक्षांना दि.06.07.2003 रोजी स्‍वत:चे स्‍वाक्षरीने संचालक पदाचा राजीनामा देवून त्‍याप्रमाणे संस्‍थेच्‍या संबंधिताकडून सदर राजीनाम्‍याची पोहोच पावती संस्‍थेच्‍या सही-शिक्‍क्‍यानिशी घेवून सदर पदावरुन मुक्‍त झालेनंतर जवळपास 4 वर्षाच्‍या कालावधीनंतर सदरच्‍या ठेवी ठेवल्‍या असलेने सदर ठेवी परताव्‍याची व्‍यक्‍तीश: व संयुक्तिकरित्‍या सामनेवाला क्र.5 यांची कोणतीही जबाबदारी कधीही नव्‍हती व नाही. तक्रारदारांच्‍या ठेवींच्‍या कालावधीमध्‍ये प्रस्‍तुत सामनेवाला हे संचालक पदावर कार्यरत नव्‍हते. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करुन प्रस्‍तुत सामनेवाला यांना नुकसान भरपाईपोटी रुपये 25,000/- देणेचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.
 
(7)        सामनेवाला क्र.1 ते 4 व 6 ते 10 यांना या मंचाने संधी देवूनही त्‍यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या व्‍याजासह रक्‍कमा परत करण्‍याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्‍न केलेले नाहीत हे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्‍हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्‍य असल्‍याचे दाखवून दिले आहे. 
 
(8)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला क्र.5 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात त्‍यांनी त्‍यांच्‍या संचालक पदाचा राजीनामा दिलेचे व तो मंजूर झालेने त्‍यांना प्रस्‍तुत प्रकरणी जबाबदार धरता येणार नाही असे कथन केले आहे. तथापि, त्‍यांचा राजीनामा मंजूर झालेबाबतच्‍या त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. त्‍यामुळे त्‍यांना तक्रारदारांच्‍या ठेवी अदा करणेची जबाबदारी टाळता येणार नाही. तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील इतर कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 9 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.10 हे संस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने त्‍यांची केवळ संयुक्तिक‍ जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता तक्रार क्र.116/10 मधील तक्रारदारांनी दामदुप्‍पट ठेवी ठेवल्‍याचे दिसून येते. सदर दामदुप्‍पट ठेवींच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते. त्‍यामुळे सदर तक्रारदार हे दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(10)       तक्रार क्र.116 व 117/10 मधील तक्रारदार यांनी मुदत बंद ठेव पावत्‍यांच्‍या स्‍वरुपातही रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत व सदर ठेवींची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(11) तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 9 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.10 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदत बंद रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
देय ठेव रक्‍कम
1.
116/10
485
20000/-
2.
117/10
000948
121250/-

 
 
 
 
 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 9 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.10 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील दामदुप्‍पट रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर दि.18.08.2008 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
देय मुदतपूर्ण रक्‍कम
1.
116/10
000275
100000/-
2.
--”--
000274
100000/-

 
 
 
 
 
(4)   सामनेवाला क्र.1 ते 9 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.10 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT