(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 12/07/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 08.10.2009 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार तिने दैनंदिन खर्चातून बचत करुन जमा केलेले व पतीच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कम रु.68,000/- दि.30.06.2008 रोजी गैरअर्जदारांकडे दाम दुप्पट या योजनेत गुंतविली व त्यावर 10% व्याज देण्यांचे गैरअर्जदारांनी कबुल केले होते. दि.27.06.2008 ते 12.02.2009 या कालावधीचे 10% या दराने गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस दिले. गैरअर्जदारांच्या व्यवहाराची खात्री पटल्यामुळे तक्रारकर्तीने दि.05.06.2008 रोजी रु.16,000/- पुन्हा गुंतविले, तसेच ठेवींवरील व्याजाची रक्कम या रकमेत भर टाकून पुन्हा गुंतविल्यास भविष्यात चक्रवाढ दराने व्याज मिळेल असे सांगितले. त्यामुळे तक्रारकर्तीने आणखी काही ठेवी गैरअर्जदारांकडे दाम दुप्पट योजनेत खाली दर्शविल्याप्रमाणे एकूण रु.1,35,000/- गुंतविल्या. अ.क्र. | ठेवीची तारीख | ठेव रक्कम | रसिद क्र. | व्याजाची अंतिम तारीख | 1. | 30.06.2008 | 68,000/- | 4612 | 12.02.2009 | 2. | 05.08.2008 | 16,000/- | 7844 | 12.02.2009 | 3. | 31.10.2008 | 12,000/- | 19833 | 12.02.2009 | 4. | 25.11.2008 | 8,000/- | 22249 | 12.02.2009 | 5. | 31.12.2008 | 7,000/- | 27353 | 12.02.2009 | 6. | 29.01.2009 | 10,000/- | 32124 | 12.02.2009 | 7. | 12.02.2009 | 14,000/- | 34881 | 12.02.2009 |
वरील रकमेवर दि.12.02.2009 पर्यंत गैरअर्जदारांनी व्याज दिले परंतु त्यानंतर त्यावरील व्याज देणे बंद केले. त्यामुळे तक्रारकर्तीने वारंवार गैरअर्जदारांना विनंती केली परंतु अद्यापही त्यांनी सदर रकमेवरील व्याज दिले नाही व तिची ठेवींची रक्कम परत केली नाही, ही त्यांचे सेवेतील त्रुटी असल्यामुळे सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता ते मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले असुन, त्यांनी आपल्या कथनात त्यांचा तक्रारकर्तीसोबत कोणताही करार झालेला नव्हता तसेच सदरची तक्रार देखिल योग्य नसल्याचे नमुद केलेले आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचे आरोप अमान्य केलेले आहे, त्याच्या मते तक्रारकर्तीने स्वतःहून त्यांचेकडे रक्कम गुंतविलेली आहे व कंपनीचा कारभार सुरळीत चालु होता तोपर्यंत गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीस लाभार्थाची रक्कम दिलेली आहे. परंतु आयकर विभागाने व इतर संबंधीत सरकारी विभागांनी केलेल्या कारवाईनुसार कंपनीची मालमत्ता जप्त झाली व कंपनीचे कार्य बंद पडलेले आहे व गुंतवणूक धारकांच्या तक्रारी वरुन संचालकांविरुध्द फौजदारी खटले दाखल झाले व ते प्रलंबीत आहेत त्यामुळे, गैरअर्जदार तक्रारकर्तीस लाभार्थ रक्कम देण्यांस असमर्थ आहे. तक्रारकर्तीने तक्रारीमध्ये अडीच वर्षात दाम दुप्पट रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते असे गृहीत धरले तरी सदर गुंतवणेकीस अडीच वर्षांचा कालावधी झालेला नाही. त्यामुळे सदरची तक्रार ही मुदतपूर्व आहे, तसेच वरील खटल्यांचा निकाल लागेपर्यंत व संपत्तीची विल्हेवाट लागेपर्यंत गैरअर्जदार तक्रारकर्तीस परतावा देऊ शकत नाही. तक्रारकर्तीस कोणत्याही व्याजाचे आमिष दाखवुन दिशाभुल केलेली नाही त्यामुळे त्यांनी सेवेत कोणत्याही प्रकारे त्रुटी दिली नसल्याचे नमुद केले आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा कारभार गैरअर्जदारांचे हातात नाही, त्यामुळे सदरची तक्रार खर्चासह खारिज करण्यांत यावी, अशी मंचास विनंती केलेली आहे. 4. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात गैरअर्जदारांकडे जमा केलेल्या रकमेच्या पावत्यांच्या छायांकीत प्रती जोडलेल्या आहेत. 5. सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्तीवादाकरीता दि.05.07.2011 रोजी आल्यानंतर मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. वरीष्ठ न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निवाडयांचा विचार करता तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांची ‘ग्राहक’ ठरते, तसेच सदरची तक्रार चालविण्यांचा या मंचास अधिकार आहे. 7. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्तीने वेळोवेळी मिळून रु.1,35,000/- एवढी रक्कम गैरअर्जदारांकडे दि.30.06.2008 ते 12.02.2009 या कालावधीमध्ये गैरअर्जदार यांच्या ‘अडीच वर्षात दाम दुप्पट’, या योजनेत गुंतविलेली होती व सदर रकमेवर 10% व्याज देण्यांचे गैरअर्जदारांनी कबुल केले होते. गैरअर्जदारांनी अप्रत्यक्षरित्या सदरची बाब आपल्या जबाबात मान्य केलेली दिसुन येते, तसेच मुदत ठेवींच्या पावत्यांवरील दिलेल्या व्याजाच्या नोंदी पाहता सदर बाब स्पष्ट होते. सदर नोंदीवरुन असेही निदर्शनास येते की, दि.12.02.2009 पर्यंतचे व्याज गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस दिलेले आहे मात्र त्यानंतरचे व्याज वारंवार मागणी करुनही गैरअर्जदारांनी कबुल केल्याप्रमाणे दिलेले नाही अथवा मुदत ठेवीची रक्कम परत केली नाही. ही निश्चितच गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यास दिलेल्या सेवेतील कमतरता आहे. 8. आयकर विभागाने तसेच इतर सरकारी विभागांनी केलेल्या कारवाईमुळे गैरअर्जदार यांची संपत्ती जप्त झालेली आहे त्यामुळे तक्रारकर्तीस तिची लाभार्थी रक्कम परत देता येणार नाही असे गैरअर्जदारांचे म्हणणे संयुक्तिक नाही तसेच त्या आधारावर तक्रारकर्तीची रक्कम परत न करणे न्यायोचित होणार नाही. गैरअर्जदारांनी कबुल केल्याप्रमाणे तक्रारकर्तीच्या ठेवींवरील व्याज न दिल्यामुळे तिने मुदत ठेवींच्या रकमेची मागणी मुदतपूर्व करण्यात काही गैर आहे असे म्हणता येणार नाही. 9. वरील वस्तुस्थिती व परिस्थ्ज्ञिचा विचार करता गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीकडून सदर रक्कम स्विकारुन व्याजाची देय रक्कम परत न करणे ही गैरअर्जदार क्र.1 यांचे सेवेतील त्रुटी आहे. तसेच तक्रारकर्ती गैरअर्जदार क्र.2 यांची ‘ग्राहक’ नसल्यामुळे त्यांना तक्रारकर्तीचे नुकसानीस जबाबदार धरता येणार नाही. मात्र गैरअर्जदार क्र.2 यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाल्यामुळे गैरअर्जदारांचे संपत्तीमधुन रक्कम देण्याची जबाबदारी ही गैरअर्जदार क्र.2 यांची आहे. या सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्तीस अडीच वर्षात दाम दुप्पट योजनेत गुंतविलेले रु.1,35,000/- परत करावे तसेच त्यावर 10% मासिक व्याज दि.12.02.2009 ते रक्कम अदा होईपर्यंत अदा करावे. 3. वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. 4. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्तीस मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु.1,000/- अदा करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |