जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे तक्रार क्र. - 640/2009 दाखल दिनांक - 23/09/2009 निकालपञ दिनांक - 19/07/2010 कालावधी - 00 वर्ष 09 महिने 26 दिवस 1.श्री.प्रमोद पांडुरंग पाटील 304, धर्मसिता पार्क, ए बिल्डींग, गंगेश्वर टॉवर समोर, राजू नगर, मु. पो. डोंबिवली (पश्चिम), ता. कल्याण. .. तक्रारकर्ता विरूध्द 1.मुख्य अधिकारी/अभियंता महाराष्ट्र ग्रृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, रामगणेश गडकरी चौक, आयकर कार्यालयाशेजारी, जुना आग्रा रोड, नाशिक 422 002. 2.कार्यकारी अधिकारी/अभियंता महाराष्ट्र ग्रृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, विभागिय कार्यालय, जूने जिल्हाधिकारी कार्यालय कंपाऊंड, कमलाबाई कन्या शाळेमागे, साक्री रोड, धुळे - 424001. 3.उपकार्यकारी अधिकारी/अभियंता नाशिक ग्रृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, उपविभागीय कार्यालय, म्हाडा कॉलनी , रेल्वे गेट जवळ, विकास दूध फेडरेशन समोर, जळगाव - 425001. .. विरुध्द पक्षकार
समक्ष - श्री.एम.जी.रहाटगावकर - मा. अध्यक्ष श्री.पी.एन.शिरसाट - मा. सदस्य तक्रारकर्ता स्वतः हजर विरुध्द पक्षकार गैरहजर आदेश (दिः 19/07/2010 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रारकर्त्याचे थोडक्यात म्हणणे खालील प्रमाणेः- 2003 साली वृत्तपत्रात आलेल्या विरुध्द पक्षकारच्या जाहिरातीच्या संदर्भात त्याने भुसावळ जि.-जळगाव येथल जोडबंगला योजनेत विरुध्द पक्षकार कडुन निवास्थान मिळण्यासाठी दि.27/01/2003 रोजी रु.46,000/-चा डिमांन्ड ड्राफ्ट व दस्तऐवज भुसावळ येथील विरुध्द पक्षकारच्या कार्यालयात सादर केले. मात्र 2 वर्षानंतर दि.03/03/2005 रोजी विरुध्द पक्षकाराने योजना कार्यान्वीत होऊ शकत .. 2 .. (त.क्र.640/2009) नसल्याचे कळविले. अनेकदा पत्र पाठवुनही व्यवस्थीत खुलासा विरुध्द पक्षकार यांनी केला नाही. 25/04/2006 रोजी विक्री किंमत सुरवातीच्या किमती ऐवजी वाढवुन रु.7,74,610/- एवढी दाखविली. त्यानंतर रु.9,35,000/- एवढी सुधारित अंदाजित किंमती विरुध्द पक्षकाराने कळविला व तक्रारकर्ताचे सम्मतीपत्रक मागविले. दरम्यानच्या काळातील विरुध्द पक्षकार ने पाठविलेले कथीत पत्र त्याला प्राप्त झाले नाही अथवा कोणताही खुलासा मिळाला नाही. त्यामुळे वाढीव किंमती ऐवजी सुरवातीला नमुद केलेले रु.4,60,000/- एवढीच रक्कम विरुध्द पक्षकारने त्यांचे कडुन स्विकारावी व सदनिका त्यांना द्यावी असा आदेश मंचाने पारित करावे, तसेच नुकसान भरपाई व खर्च मंजुर करण्यात यावा या उद्देशाने सदर प्रकरण दाखल करण्यात आले. तक्रारकर्ताचे समर्थनार्थ प्रतिज्ञापत्र व दस्तऐवज दाखल करण्यात आले. 2. मंचाने विरुध्द पक्षकाराला नोटिस जारी केली. विरुध्द पक्षकार नं.1 ते 3 यांचे लेखी जबाबात म्हणणे असे की, या मंचाच्या न्यायिक कार्य कक्षेत/भौगोलिक कार्यक्षेत्रात सदर प्रकरण येत नाही. तक्रारीतील इतर मुद्दया संदर्भात विरुध्द पक्षकार ने आपल्या जबाबात तपशिलवार उल्लेख केलेला आहे. जबाबासोबत कागदपत्रे दाखल करण्यात आलेले आहेत. 3. तक्रारकर्ता यांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला- मंचाने उभयपक्षांचा युक्तीवादाचा विचार केला ह्या आधारे खालील प्रमुख मुद्दयाचे विचार करण्यात आलाः- 1. सदर तक्रारीचे निराकरण करणे या मंचाच्या भौगोलिक कार्यकक्षेत येते काय? उत्तर – नाही. स्पष्टीकरण मुद्दा क्र. 1 सदर्भात- उपलब्ध कागपत्रांचे उवलोकन केले असता असे स्पष्ट होते की विरुध्द पक्षकार नं.1चा पत्ता नाशिक येथील आहे, विरुध्द पक्षकार क्र. 2 चा पत्ता धुळे येथील आहे. तर विरुध्द पक्षकार नं. 3 चा पत्ता जळगावचा आहे. थोडक्यात विरुध्द पक्षकार न. 1, 2 व 3 यांचे कार्यालय या ठाणे मंचाच्या भौगोलिक कार्यकक्षेत येत नाही. दुसरी महत्वाची बाब अशी की, ज्या जोडबंगल्यासाठी तक्रारकर्ताने विरुध्द पक्षकारकडे अर्ज केला होता ते घर भुसावळ जि- जळगाव येथे बांधण्यात येणार होते. त्यामुळे वादग्रस्त निवास्थान देखील या मंचाच्या भौगोलिक परिसिमेच्या बाहेर आहे. सबब या मंचाच्या भौगोलिक कार्यकक्षेत वाद विषय येत नाही. सबब अंतीम आदेश पारीत करण्यात येतो- अंतीम आदेश 1.सदर तक्रारीचे निराकरण करणे या मंचाच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात येत नसल्याने खारीज करण्यात येते. 2.न्यायीक खर्चाचे वहन उभयपक्षाने स्वतः करावे.
दिनांक – 19/07/2010 ठिकाण - ठाणे (श्री.पी.एन.शिरसाट) (श्री.एम.जी.रहाटगावकर) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|