निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 29/10/2012
तक्रार नोदणी दिनांकः-29/10/2012
तक्रार निकाल दिनांकः- 19/09/2013
कालावधी 10 महिने. 21 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
रमेश पिता दत्तात्रय जाधव अर्जदार
वय 41 वर्षे. धंदा.शेती. अॅड.एस.आर.मगर.
रा.करंजी,ता.मानवत,जि.परभणी.
विरुध्द
1 महाबीज सीड्स. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य बि-बियाणे महामंडळ मर्या महाबिज भवन, अॅड.डि.यु.दराडे.
कृषि नगर,अकोला, प्रादेशिक कार्यालय,परभणी.
2 जिल्हा कृषी विकास अधिकारी. स्वतः
जिल्हा परिषद,परभणी.
3 तालुका कृषि अधिकारी. स्वतः
पंचायत समिती,मानवत,जि.परभणी.
4 कोक्कर कृषि केंद्र, मेन रोड,मानवत,जि.परभणी. अॅड.सोमनाथ व्यवहारे.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
गैरअर्जदार क्रमांक 4 ने गैरअर्जदार क्रमांक 1 च्या उत्पादित निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बी अर्जदारास विक्री करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा मौजे करंजी ता.मानवत जिल्हा परभणी येथील रहिवासी असून त्यास मौजे करंजी येथे गट क्रमांक 31 मध्ये शेत जमीन आहे व सदरच्या शेतामध्ये सोयाबीनचे बी पेरणी करण्यासाठी दिनांक 15/06/2011 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 4 कडून जे.एस.-335 बॅच क्रमांक 3483 अंतिम मुदत एप्रिल 2012 अशा वर्णनाचे बी खरेदी केले सदरचे बी खरेदी केल्यानंतर अर्जदाराने सदरील शेतामध्ये (53 गुंठे) सोयाबीन पेरणीसाठी जमिनीची संपूर्ण मशागत केली व सदरचे गैरअर्जदार क्रमांक 4 कडून खरेदी केलेले बी अर्जदाराने त्याच्या जमिनी मध्ये पेरले पेरणी केल्यानंतर काही दिवसांनी अर्जदाराच्या निदर्शनास आले की, पेरणी केलेले सोयाबीनचे बियांण्यांची उगवण झालेली नाही सदरचे बी हे बनावट व हलक्या प्रतीचे व निकृष्ट दर्जाचे बी गैरअर्जदार क्रमांक 4 ने अर्जदारास विक्री करुन फसणुक केलेली आहे. म्हणून 20/07/2011 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे सदरील पिका बद्दल रितसर अर्ज करुन नुकसानी झाले बाबत तक्रार दिली सदरचे बी हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी निर्मिती केलेले होते, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरच्या बोगस बियाण्यामुळे त्याचे 25,000/- रुपये नुकसान द्यावे बाबत गैरअर्जदार क्रमांक 3 कडे अर्जदाराने लेखी अर्ज केला. सदरचा अर्ज मिळाल्यानंतर त्यांनी त्याबाबत चौकशी केली व गट क्रमांक 31 मधील 53 गट गुंठे क्षेत्रामध्ये पेरणी केलेले पिकास भेट देवुन पाहणी केली सदर पाहणी करते वेळेस गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या सोबत मंडळ अधिकारी कृषि पर्यवेक्षक कृषि सहाय्यक मानोली हे हजर होते व या सर्वानी गट क्रमांक 31 मधील संपूर्ण सोयाबीन पिकाची पाहणी केली व रितसर पंचनामा केला. पंचनाम्यामध्ये एकूण लागवड केलेल्या बियाण्यां पैकी फक्त 4 टक्के बियाणे उगवले असे नमुद केले. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी तपासणी अहवाल व पंचनामा पूढील कार्यवाहीसाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठविला. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या कार्यालयात ब-याच वेळा भेट देवुन प्रकरणा बाबत सतत पाठपुरावा केला, परंतु प्रत्येक वेळेस गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदारास काहीही सांगीतले नाही. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 हे बि-बीयाणे मुख्य उत्पादक असून त्यावर त्यांचे नियंत्रण आहे.
अर्जदाराने सदरचे बियाणे पेरणी केल्यानंतर मशागतीसाठी खुप खर्च केला 2 गोण्या खत, 10:26:26 चा वापर केला. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्यांचे संपूर्ण कुटूंब सदरच्या शेतावर अवलंबुन आहे. व त्याच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह शेतावर भागवतो गैरअर्जदाराकडून खरेदी केलेले निकृष्ट बियाण्यांमुळे अर्जदाराचे वर्षभराचे नुकसान झालेले आहे व त्यास गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 जबाबदार आहेत व अर्जदाराचे एकुण 1,00,000/- रु.नुकसान झाले आहे, म्हणून अर्जदाराने सदरची तक्रार गैरअर्जदारां विरुध्द मंचासमोर दाखल केलेली आहे. व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज खर्चासह मंजूर करावा व गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांना सेवेत त्रुटी दिल्या बद्दल त्यांना जबाबदार धरावे, व परिच्छेद क्रमांक 14 नुसार गैरअर्जदाराने अर्जदारास 1,00,000/- रु. 18 टक्के व्याजाने द्यावयाचा आदेश व्हावा. व तक्रार खर्चा पोटी 10,000/- रु. द्यावयाचा आदेश करावा. म्हणून विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 4 वर 9 कागदपत्रांच्या यादीसह 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये सोयाबीन बियाणे बॅगच्या फोटो, सोयाबीन पिकाची उगवण दाखवणारे फोटो, सोयाबीन खरेदी केल्याचे बिल, दिनांक 15/06/2011 रोजीचे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना पाठविलेले पत्र, पंचनामा गट क्रमांक 31, प्रक्षेत्र पाहणी अहवाल, कृषि अधिकारी पंचायत समिती मानवत यांना पाठविलेले पत्र, कृषि अधिकारी यांना पाठविलेले पत्र, 7/12 उतारा इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत हजर, व नि.क्रमांक 12 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे व त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गट क्रमांक 31 मध्ये 53 आर.जमिनीत सोयाबीनची पेरणी केली, तसेच त्यास अर्जदाराने पाणी दिले, त्यामुळे बियाणाची परेणी करणे व त्यास पाणी देणे ही बाब अर्जदाराने खोटी सांगीतली आहे. तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने दिनांक 20/07/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे अर्ज करुन नुकसान भरपाई मागीतली हे देखील अर्जदाराने खोटे म्हंटले आहे व गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, सदरचे बियाणे निर्कृष्ट दर्जाचे नव्हते. व म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास कोणत्याही प्रकारे सवेत त्रुटी दिलेली नाही. व खोटी तक्रार दाखल केल्या बद्दल अर्जदारास 10,000/- रु दंड आकारुन सदरची तक्रार फेटाळण्यात यावी. अशी विनंती केली आहे.
नि.क्रमांक 13 वर गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. नि.क्रमांक 6/4 वर गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपले लेखी जबाब सादर केला व
त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, बियाणे तक्रार निवारण समिती सुरवातीला जिल्हा स्तरीय कमेटी होती. सदरील जिल्हा स्तरीय समिती महाराष्ट्र शासन निर्णया नुसार सदर समिती परभणी गठीत करुन खालील प्रमाणे गठीत केली आहे. 1) तालुका कृषि अधिकारी अध्यक्ष. 2) कृषि विद्यापिठ 3) महाबिज प्रतिनिधी 4) तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील कृषि अधिकार, कृषि पंचायत समिती यांच्या व्दारे पंचनामा केला जातो. व अहवाल शेतक-यांना द्यावा लागतो. व तोच अहवाल अंतिम असतो इ.स. 2011 मध्ये सोयाबीन बद्दल अनेक तक्रारी परभणी जिल्हयात आल्यामुळे तक्रारीचा पंचनामा करुन अहवाल देणे बाबत तालुका कृषि अधिकारी व कृषि अधिकारी पंचायत समिती यांना सुचित केले होते, त्याप्रमाणे परभणी जिल्हयात कारवाई झालेली आहे व आमच्या विरुध्द अर्जदाराने सदरची तक्रार खोटी दाखल केलेली आहे. व काहीही चुक केलेली नाही.
गैरअर्जदार क्रमांक 3 ने नि.क्रमांक 6 वर आपला लेखी जबाब सादर केला आहे . त्यांनी अर्जदाराचे शेतात पंचनामा व प्रक्षेत्र पाहणी अहवाल जिल्हा कृषि अधिकारी परभणी कडे दिनांक 25/07/2011 रोजी पूढील कार्यवाहीस्तव पाठविला, त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारे चुक केलेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
गैरअर्जदार क्रमांक 4 ने नि.क्रमांक 7 वर आपले लेखी जबाब सादर केला आहे व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व अर्जदाराने खरेदी केलेले बियाणे हे गैरअर्जदार क्रमांक 4 ने विजय फर्टीलायझर एजन्सी परभणी यांच्याकडून दिनांक 20/04/2011 रोजी बिल नंबर 3022 व्दारे खरेदी केले
होते. व सदरचे बियाणे हे उत्पादन गैरअर्जदार कंपनीकडून जसे प्राप्त झाले तसेच गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी बिलव्दारे सिल कंडिशन मध्ये विक्री केलेले आहे. गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी सदर मालाचे विजय फर्टीलायझर यांचे बिल पुरावा म्हणून दाखल केलेले आहे व तसेच गैरअर्जदार क्रमांक 4 चे असे म्हणणे आहे की, विजय फर्टीलायझर एजन्सी हे आवश्यक पार्टी असून अर्जदारास त्यांना पार्टी करण्याचा आदेश व्हावा. अशी विनंती केली आहे. व अर्जदाराची संपूर्ण तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हणणे आहे. या पूढे गैरअर्जदार क्रमांक 4 यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी सदरील बियाणे महाबिज सोयाबीनचे संशोधीत बी हे विजय अॅग्रो एजन्सी परभणी यांचे मार्फत खरेदी केले व तेच अर्जदारास विक्री केले आहे.व कोठल्याही प्रकारची ढवळाढवळ न करता अर्जदारास विक्री केले आहे. व तसेच गैरअर्जदार क्रमांक 4 हे उत्पादक कंपनीचे एजंट असून जी नुकसान भरपाई म्हणून मा. मंच आदेश करील तो गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून वसूल करण्यात यावी. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी नि.क्रमांक 8 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 4 कडून गैरअर्जदार क्रमांक 1
यांनी निर्मित केलेले सोयाबीन बियाने कमी उगवण शक्तीचे व
निकृष्ट दर्जाचे होते हे अर्जदाराने सिध्द केले आहे काय ? नाही.
2 अर्जदाराने मागणी केलेली नुकसान भरपाई अर्जदार
मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदार हा गैरअर्जदार क्रमांक 4 चा ग्राहक आहे ही बाब नि.क्रमांक 4/3 वरील दिनांक 15/06/2011 च्या खरेदी पावतीवरुन सिध्द होते.अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 4 कडून गैरअर्जदार क्रमांक 2 ने निर्मित केलेले सोयाबीनचे बी खरेदी करुन त्याच्या मालकीच्या शेतात मौजे करंजी ता.मानवत जि.परभणी येथे जुन 2011 मध्ये सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली होती ही अॅडमिटेड फॅक्ट आहे, परंतु सदरचे बियाणे हे निकृष्ट दर्जाचे होते, याबाबत अर्जदाराने दाखल केलेला पुरावा नि.क्रमांक 4/5 वरील पंचनामा, व 4/6 वरील प्रक्षेत्र पाहणी अहवाल हा विश्वासार्ह नाही. कारण त्यावर दोन्ही कागदपत्रावर संबंधित अकधिका-याचा व कार्यालयाचा शिक्का नाही, व म्हणून अर्जदाराने दाखल केलेला पुरावा ग्राह्य धरता येणार नाही. व तसेच अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 4 कडून खरेदी केलेले सोयाबीनचे बियांचीच पेरणी केली, याबाबत देखील अर्जदाराने कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही. व तसेच गैरअर्जदाराचे सदरच्या बियाण्यामुळे त्याचे 1,00,000/- रु. चे नुकसान झाले हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. अर्जदार आपली तक्रार सिध्द करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरला आहे. व गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिली याबाबत ठोस पुरावा दिसत नाही.म्हणून मुद्दा क्रमांक 1 ते 2 चे उत्तर नकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.