Maharashtra

Chandrapur

CC/18/168

Shri Natthuji Baliram Bobhate - Complainant(s)

Versus

Maha Gujrat Sides Pvt Ltd through Manager - Opp.Party(s)

Adv. Chilbule

23 Dec 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/168
( Date of Filing : 17 Oct 2018 )
 
1. Shri Natthuji Baliram Bobhate
At Kavipeth Post Chincholi Tah Rajura
chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Maha Gujrat Sides Pvt Ltd through Manager
694 chandak Lay outNear geetanjali Press Ghat Road Nagpur
Nagpur
maharashtra
2. Janarghan Krushi Kendra through Pro Shri Sachin Janarghan Ualmale At Wirur
At Wirur Main road Wirur Station Tah Rajura
chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 23 Dec 2021
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

             (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्‍पना जांगडे (कुटे), मा. सदस्‍या)                  

                    (पारीत दिनांक २३/१२/२०२१)

 

                       

  1.      तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ व १४   अन्‍वये  दाखल केली आहे.

 

  1.      तक्रारकर्ता हा शेतकरी असून त्‍यांचा मौजा कविट पेठ, पोस्‍ट चिंचोली (बु.)  तहसील राजूरा, जिल्‍हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक १०३  नुसार शेतजमीन आहे. तक्रारकर्ता हे वयोवृध्‍द असल्‍याने  ते त्‍यांचा मुलगा नामे श्री सुनिल नत्‍थुजी बोभाटे यांच्‍या मदतीने वडिलोपार्जीत शेतामध्‍ये उत्‍पन्‍न घेत आहे. तक्रारकर्ता यांनी त्‍यांचे मुलाचे मार्फत दिनांक १६/०४/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे निर्मित हर्षित वांग्याचे बियाणे रक्कम रु. ३६०/- व सोनल राशी कंपनीची मिरची बियाणे रक्‍कम रुपये ३,४८०/- ला विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे कडून विकत घेतले. तक्रारकर्ता यांनी ४५.००  हेक्‍टर आर शेत जमिनीमध्‍ये  उपरोक्‍त मिरचीचे  बियाणे आणि अंदाजे ०.३० हेक्‍टर आर शेत जमिनीमध्‍ये वांग्‍याचे बियाणे लावले. तक्रारकर्त्‍याने सदर वांग्‍याचे बियाणाचे लागवड केल्‍यानंतर रोपट्यांच्‍या पाहणी व वांग्‍याच्‍या आकारावरुन त्‍यांच्‍या असे निदर्शनास आले की, विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्त्‍यास हर्षित वांग्‍याचे बियाणे न देता डोरली वांगे असलेले हिरव्या रंगाचे निकृष्‍ट बियाणे दिले. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी दिलेल्‍या बियाणाच्‍या पाकिटावर बियाणे हर्षित वांगे असे लिहले आहे. तक्रारकर्त्‍याने सदर बियाणे लावले व ते डोरली वांगे निघाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे नुकसान झाले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक ३/८/२०१८ रोजी सदर बियाणे निकृष्‍ट असल्‍यामुळे तालुका कृषी अधिकारी, राजुरा यांचेकडे  तसेच तहसीलदार, राजुरा यांचेकडे सुध्‍दा अर्ज केला व त्‍या अनुषंगाने दिनांक ५/१०/२०१८ रोजी उपविभागीय कृषी अधिकारी, राजुरा यांनी दिलेल्‍या  अहवालामध्‍ये तक्रारकर्त्‍याचे उपरोक्‍त शेतात ०.३० हेक्‍टर आर क्षेञावर लागवड झालेल्‍या महागुजरात प्रा.लि. च्‍या हर्षित वाणाचे बियाणे सदोष असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास आवश्‍यक त्‍या वाणाच्‍या गुणधर्माचे फळे मिळत नाही असा निर्णय दिलेला आहे. विरुध्‍द पक्ष यांनी दिलेल्‍या वांग्‍याचे बियाणे बोगस/निकृष्‍ट व बनावटी निघाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे अंदाजे ५ लाख रुपयाचे नुकसान झाले ही विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास दिलेली न्‍युनतापूर्ण सेवा आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास शारीरिक, मानसिक व आर्थिक ञास सहन करावा लागला आहे.
  2.      तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्षांकडे नुकसान भरपाई मिळण्‍याकरिता दिनांक ७/८/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना वकीलामार्फत नोटीस पाठविेले. नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा विरुध्‍द पक्ष यांनी नोटीस ची दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ विरुध्‍द तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याप्रती अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करुन न्‍युनतम सेवा दिल्‍याचे घोषित करावे तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी दिलेल्‍या न्‍युनतम सेवामुळे तक्रारकर्त्‍याचे अंदाजे ५ लाख रुपयाचे नुकसान झाल्‍याचे जाहीर करुन तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये १,००,०००/-, तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- व नुकसान भरपाईपोटी रुपये ५,००,०००/- विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी संयुक्‍तपणे देण्‍याचे आदेशित व्‍हावे, अशी मागणी केलेली आहे.
  3.      तक्रारकर्त्‍याची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना आयोगातर्फे नोटीस काढण्‍यात आले. नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे आयोगासमक्ष हजर होवून त्‍यांनी आपले लेखी उत्‍तर दाखल केले.  त्‍यामध्‍ये ते बियाणे उत्‍पादक कंपनी आहे, ही बाब मान्‍य करुन तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील उर्वरीत कथन अमान्‍य करुन त्‍यांनी पुढे आपल्‍या विशेष कथनात नमूद केले की,  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे अधिकृत बियाणे उत्‍पादक कंपनी असून त्यांचा बियाणे उत्‍पादन व विक्रीचा व्‍यवसाय आहे. त्‍यामध्‍ये वांगे या वानाचा उल्‍लेख असून त्‍याचा परवाना विक्रीचे दिवशी वैध होता. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्षाव्‍दारे सांगितलेल्‍या वांगे लागवड तंञज्ञानाचे तंतोतंत पालन केले नाही. तसेच तापमान नियोजनासाठी त्‍यांचेकडे पाण्‍याची कोणती योजना व पाण्‍याची उपलब्‍धता देण्‍यात आली हे दिले नाही. विरुध्‍द पक्ष यांनी सदर बियाणाचे पॅकींग मध्‍ये उगवन शक्‍तीबाबत व अनुवंशिक शुध्‍दतेबाबत बियाणे पास झाल्‍यानंतरच सदर लॉटच्‍या वांग्‍याची बियाणे प्रक्रीया  सिलबंद पॅक करुन विपणन विभागाकडे पाठविली. गुणवत्‍ता नियोजन प्रयोगशाळेचे अधिकारी यांनी सदर लॉट चे वान बियाणे उगवन शक्तीची शास्‍ञीय चाचण्‍या पूर्ण करुन वांगे बियाणे लॉट पास झाल्‍याबाबतचा अहवाल दिला. तक्रारकर्ता यांनी त्‍यांचे शेतामध्‍ये उपरोक्‍त बियाणे पेरल्‍यानंतर त्‍यांना आलेली फळे हिरव्‍या रंगाची डोरली वांगे निघाले असे त्‍यांनी कथन केले. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल हा तक्रारकर्त्‍याचे शेतातील परिस्थितीचा प्रथ‍म दर्शनिय अहवाल असु शकतो व त्‍यावरुन परिस्‍थीतीचा अंदाज येऊ शकतो परंतु बियाणाची  गुणवत्‍ता ही उघड्या डोळ्यांनी  ठ‍रविता येत नाही. तक्रारकर्त्‍याने कोणत्‍याही प्रयोगशाळेचा अहवाल दिला नाही. दिनांक  ५/१०/२०१८  चा दाखल केलेला अहवाल हा विरुध्‍द पक्ष यांना अमान्‍य आहे व सदर अहवाल करतांना पंचानामा पूर्ण केला नाही. दाखल केलेला अहवाल हा महाराष्‍ट्र शासनाच्‍या परिपञकामध्‍ये दिलेल्‍या निर्देशनाचे उल्‍लंघन करुन तसेच विरुध्‍द पक्ष यांचे उपरोक्ष तयार केलेला आहे. सदर अहवाल करतांना पंचानामा सुध्‍दा पूर्ण केला नाही. तक्रारकर्त्‍याने ३ गुंठ्यामध्‍ये लागणारे बियाणे ३० गुठ्यांमध्‍ये  पेरले आणि तक्रारकर्त्‍यास किती उत्‍पादन मिळेल याचा उल्‍लेख नाही. बियाणांची  गुणवत्‍ता  ही उघड्या डोळयांनी ठरविता येत नसतांना अनुवंशिक दोष हे निश्‍चीत करण्‍यासाठी प्रयोगशाळेचा निष्‍कर्ष अहवाल लागते आणि तक्रारकर्त्‍याने सदर बियाणे दोष असल्‍याचा प्रयोगशाळेचा कोणताही अहवाल दाखल केला नाही. तक्रारकर्त्‍याने कमी क्षेञामध्‍ये बियाणे पेरुन २ हेक्‍टर क्षेञामध्‍ये उत्‍पन्‍न  होणा-या रकमेची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार ही उपरोक्‍त कारणास्‍तव खारीज होण्‍यास पाञ आहे.
  4.      विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी आपले लेखी उत्‍तर दाखल करुन त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याचे कथन अमान्‍य करुन आपले विशेष कथनामध्‍ये नमूद केले की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही बियाणे विकणारी कंपनी असून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे शेती उत्‍पन्‍नाकरिता बि-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके इत्‍यादी चे विक्रेता आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडून हर्षित वांग्‍याचे बियाणे विक्री करिता घेतले विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी पाठविलेल्‍या बियाण्याचे पॅकेट पॅकींग करुन पाठविले असून त्‍यावर उत्‍पादनव मुदत तारीख नमूद आहे. तसेच सदर पॅकेट विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी दिनांक १६/०४/२०१८ रोजी तक्रारकर्त्‍याचा मुलगा नामे श्री सुनिल नत्‍थुजी बोभाटे यांना वैध कालावधीमध्ये विकत दिला. तक्रारकर्त्‍याची तक्रार खोटी व बनावट असून त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना विनाकारण ञास देण्‍याचे हेतुने दाखल केली आहे. तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळण्‍यास पाञ नाही. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  5.      तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तावेज, शपथपञ आणि लेखी युक्तिवाद विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे लेखी उत्‍तर आणि लेखी उत्‍तरालाच त्‍यांचे रिजॉईंडर, पुरावा आणि लेखी युक्तिवाद समजण्‍यात यावे अशा अनुक्रमे दिनांक ४/१२/२०१९ आणि दिनांक १७/११/२०१९ रोजी पुरसिस दाखल, विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे लेखी उत्‍तर, दस्‍तावेज, शपथपञ आणि लेखी युक्तिवाद, तसेच उभयपक्षांचे परस्‍पर विरोधी कथनावरुन खालिल मुद्दे आयोगाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले व त्‍याबाबतची कारणमिमांसा आणि निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे.

 

   अ.क्र.                 मुद्दे                              निष्‍कर्ष

    १.  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचा             होय

ग्राहक आहे कायॽ

       २.   विरुध्‍द पक्ष क्र. १ यांनी तक्रारकर्त्‍याप्रति अनुचित व्‍यापारी   होय

           प्रथेचा अवलंब करुन  न्‍युनतम सेवा दिली आहे कायॽ

       ३.  विरुध्‍द पक्ष क्र. २ यांनी तक्रारकर्त्‍याप्रति अनुचित व्‍यापारी    नाही

 

 

 

           प्रथेचा अवलंब करुन  न्‍युनतम सेवा दिली आहे कायॽ

    ४.  आदेश कायॽ                              अंतिम आदेशाप्रमाणे

 

  •  

मुद्दा क्रमांक १ बाबतः-

 

  1.      तक्रारकर्ता हा शेतकरी असून त्‍यांची मौजा कविट पेठ, पोस्‍ट चिंचोली (बु.)  तहसील राजूरा, जिल्‍हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक १०३  नुसार शेतजमीन आहे. तक्रारकर्ता हे वयोवृध्‍द असल्‍याने आणि शेती करणे शक्‍य नसल्‍यामुळे त्‍याचा मुलगा हा शेती करतो. तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाने दिनांक १६/४/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे दुकानातून विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे निर्मित   हर्षित वांगेचे बियाणे ज्‍याचा लॉट क्रमांक ४३१/९१४ व सोनल राशी कंपनीचे मिरचीचे बियाणे लॉट क्रमांक १३२६२९ अनुक्रमे दर  बॅग १२०/- आणि ५८०/- याप्रमाणे हर्षित वांग्‍याचे वान रक्‍कम रुपये १२०/- प्रमाणे  ३ नग रक्‍कम रुपये ३६०/- व मिरची बियाणे दर ५८०/- प्रमाणे ६ नग रक्‍कम रुपये ३,४८०/- असे एकूण रक्‍कम रुपये ३,८४०/- ला खरेदी केले. याबाबत तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी दिलेली पावती प्रकरणात निशानी क्रमांक ५ सोबत दस्‍तक्रमांक १ वर  दाखल केली आहे. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचे ग्राहक आहेत हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

 

 

मुद्दा क्रमांक बाबतः-

 

  1. प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे दुकानातून विरुध्‍द पक्ष क्रमांक १ निर्मित हर्षित वांग्‍याचे बियाणे खरेदी करुन पेरणी केली असता त्‍याला जांभळ्या रंगाची वांगे न येता हिरव्‍या रंगाची वांगे आले याबाबत उभयपक्षात वाद आहे. तक्रारकर्त्‍याचे मुलाने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे दुकानातून विरुध्‍द पक्ष क्रमांक १ निर्मित हर्षित वानाचे लॉट क्रमांक ४३१/९१४ चे वांग्‍यांचे बियाणे खरेदी करुन वांग्‍याचे पीक घेण्‍याकरिता उपरोक्‍त शेतीमधील ०.३० हेक्‍टर आर शेतजमिनीवर हर्षित वांग्‍याचे बियाणे पेरले असता वांग्‍यांचे पीक आल्‍यावर तक्रारकर्त्‍याचे असे निदर्शनास आले की, जांभळ्या रंगाचे वांग्‍यांचे फळे न येता हिरव्‍या रंगाचे फळे आले त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक ३/८/२०१८ रोजी तालुका कृषी अधिकारी, राजुरा तसेच तहसिलदार, राजुरा यांचेकडे विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यास दिलेले बीज हे खराब असून हर्षित वाणाचे नसून दुसरेच दिले व ते खराब निघाल्‍याने विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यास बनावटी बिजाई देवून फसवणूक केल्‍याबाबत त्‍यांचेवर योग्‍य कार्यवाही करुन नुकसान भरपाई मिळण्‍याकरिता अर्ज केला. सदर अर्ज निशानी क्रमांक ५ वरील दस्‍त क्रमांक ४ वर प्रकरणात दाखल आहे. तक्रारकर्त्‍याने केलेल्‍या दिनांक ३/८/२०१८ तक्रार अर्जाच्‍या अनुषंगाने तालुका स्‍तरीय तक्रार निवारण समितीने दिनांक ५/१०/२०१८ च्‍या प्रक्षेञ दौरा दरम्‍यान “ भाजीपाला पीक पैदासकार श्री. डॉ. एस.एस मून, कृषी महाविद्यालय,नागपूर यांनी उपरोक्‍त शेताच्‍या अंदाजे ०.३० हेक्‍टर लागवड करण्‍यात आलेल्‍या महागुजरात कंपनी सिड्स विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे हर्षित वांगे बियाणे वानाच्‍या लागवडीचे निरीक्षण केले व बियाण्याची लागवड बियाणे मुदतीपेक्षा दोन दिवस विलंबाने केली असलि तरी त्यामुळे वैशिष्टे न बदलता फक्त उगवणीवर परिणाम होऊ शकतो असे शास्‍ञज्ञ डॉ. एस.एस. मून यांनी सांगितले व पुढे सदरील वाणाच्‍या जणुकीय वैशिष्‍टयानुसार फळावर येणारा रंग न येता हिरव्‍या रंगाची फळे लागलेली आहे, हे कालबाह्य लागवडीमुळे निश्चितच नसल्‍याचे सांगितले.” तसेच प्रक्षेञ भेटीचा निर्णय यामध्‍ये “श्री. नत्‍थुजी बोभाटे यांच्‍या शेत सर्वे क्रमांक १०३ मधील ०.३० हेक्‍टर क्षेञावर लागवड केलेल्‍या महागुजरात सिड्स प्रायवेट लि‍मी. च्‍या हर्षित वाणाचे बियाणे सदोष असल्‍यामुळे शेतकरी नत्‍थुजी यांना आवश्‍यक त्‍या सदरील वान गुणधर्माचे फळे मिळत नाही. करिता निर्णय देण्‍यात येत आहे.” असे नमूद आहे. सदर अहवालावर तालुका कृषी अधिकारी राजुरा, कृषी अधिकारी पंचायत समिती, राजुरा आणि उपविभागीय कृषी अधिकारी, राजुरा यांच्‍या सह्या आहेत. दिनांक ५/१०/२०१८ चा तालुका स्‍तरीय निवारण समितीने दिलेला अहवाल प्रकरणात दस्‍त क्रमांक ९ वर दाखल आहे. तक्रारकर्त्‍याने सदर हर्षित वाणाचे पिकाचे योग्‍य काळजी घेतली नसल्‍याने पिकावर वरीलप्रमाणे विपरीत परिणाम होवून नुकसान झाले असे दर्शविणारा कोणताही दस्‍तावेज व पुरावा तसेच विरुध्‍द पक्ष क्र.१यांनी सदर बियाणाच्‍या गुणवत्‍ता व दर्जाबाबत आणि बियाणे निर्दोष असल्‍याबाबत कोणताही दुसरा तज्ञांचा अहवाल प्रकरणात दाखल केला नाही व तक्रारकर्त्‍याने सदर लॉटचे बियाणेच शेतात वापरले व तक्रारकर्त्‍याने दिनांक ५/१०/२०१८ चा उपरोक्‍त अहवाल प्रकरणात दाखल केला व त्‍या अहवालानुसार उपरोक्‍त शेतामध्‍ये विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे निर्मित हर्षित वाणाचे वांग्‍याचे बीजापासून जांभळ्या रंगाची वांगे न येता हिरव्‍या रंगाची वांगे आले त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला आवश्‍यक त्‍या गुणधर्माचे फळे न मिळाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे आर्थिक नुकसान झाले.
  2. , अधिकृत कृषी अधिका-याने शेताची तपासणी करुन बियाणे सदोष असल्‍याबाबत अहवाल दिला असल्‍यांस अशा प्रकरणांत शेतक-याने सदर लॉटच्‍या बियाण्‍यापैकी काही बियाणे, नामांकीत कंपनीचे बियाणे सदोष निघू शकते या अपेक्षेत तपासणीसाठी वेगळे काढून ठेवणे अपेक्षीत नाही आणी अशा स्‍थि‍‍तीत बियाणे निर्दोश होते हे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी बियाणे निर्मात्‍या कंपनीवर राहील असा निर्वाळा दिलेला आहे.

मा. राष्‍ट्रीय आयोग,नवी दिल्‍लीचे मा. प्रिसाईडिंग मेंबर डॉ.एस.एम.कांतीकर यांनी, अशोक धुमाळे वि. मे. अंकुर सिड्स याप्रकरणात मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या वरील निवाडयाचा आधार घेवून दिनांक २/७/२०२० च्‍या दिलेल्‍या आदेशान्‍वये,

‘The onus to prove that the seeds manufactured are of good quality lies on the manufacturer as the farmers are not expected to store some of the seeds for future testing. Moreover, as per seeds act, 1966 manufacture is required to keep a small sample of each batch of seeds for a minimum period of time depending upon the nature of the seeds. Therefore, there was no reason for the petitioner to not have sent the seeds to a laboratory for testing as per section 13(1) (c) of the CP Act.’

मा. राष्‍ट्रीय आयोग,नवी दिल्‍ली मा. प्रिसाईडिंग मेंबर डॉ.एस.एम.कांतीकर यांनी,  मे.एवन बिज कंपनी वि. अनुपसींग यामध्‍ये दिलेल्‍या दिनांक १८/८/२०२० च्‍या आदेशान्‍वये

  • The report submitted by the team of Agriculture Experts was not discarded …………………….the report given by the Agriculture Experts is based on spot inspection and taking into account the entire material and documents produced by the Complainant …….

तसेच मा. राष्‍ट्रीय आयोग,नवी दिल्‍ली यांनी, Indian farmers fertilizers v/s  Vijaykumar and another या प्ररकरणात,    

‘failure to follow the procedure prescribed under the circulars issued by the Govt. of Mah. will not it be fatal to the complainant …. ,“No reason to discard the report prepared by the officers of the Agricultural Department’”

असा निर्वाळा दिलेला आहे. उपरोक्‍त निवाडयातील न्‍यायतत्‍व प्रस्‍तुत प्रकरणात लागु होते. वरील बाबी विचारात घेता आयोगाच्‍या मते तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक १ यांचे हर्षित वाणाचेच बीज वापरले परंतु ते सदोष असल्‍यामुळे सदर बियाणापासून आलेले वांगे हे जांभळ्या रंगाचे नसून हिरव्‍या रंगाचे आल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे नुकसान झाले यावरुन विरुध्‍दपक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्ताप्रती अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करुन न्‍युनतापूर्ण सेवा दिल्‍याचे सिध्‍द होते त्‍यामुळे तक्रारकर्ता हे झालेल्‍या नुकसानाची भरपाई विरुध्‍द पक्ष क्र.१यांचे कडून मिळण्‍यास पाञ आहे परंतु तक्रारकर्त्‍याचे निश्चित किती नुकसान झाले याबाबत कोणताही दस्‍तावेज दाखल केला नाही, परंतु हिरव्‍या रंगाचे फळ आल्‍याने तक्रारकर्त्‍याचे आर्थिक नुकसान झाले असल्‍यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडून यथोचित नुकसान भरपाई मिळण्‍यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक ३ बाबतः-

10.      प्रस्‍तुत प्रकरणातील वि‍वादीत हर्षीत वांग्‍याचे बियाणे हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी निर्मित केलेले असून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी केवळ सदर बियाण्‍याची त्‍याचे वैधता कालावधीमध्‍ये विक्री केलेली आहे. सबब हर्षित वांग्‍याच्‍या बियाण्‍याच्‍या दर्जा/गुणवत्‍तेबाबत विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना जबाबदार ठरविता येते नाही, या निष्‍कर्षाप्रत आयोग आल्‍याने मुद्दा क्रमांक ३ चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक ४ बाबतः-

11.     मुद्दा क्रमांक १  ते ३ च्‍या विवेचनावरुन आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित   

करीत आहे.  

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्रमांक १६८/२०१८ अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याला आर्थिक नुकसानपोटी आणि  झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई तसेच तक्रारीचा खर्च यापोटी एकञितपणे रक्‍कम रुपये ५०,०००/-.द्यावे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ विरुध्‍द कोणताही आदेश नाही.
  3. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ‘अ’ व ‘ब’ प्रत परत करावी.
  4. उभय पक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.

 

    

     (किर्ती वैद्य (गाडगीळ))     (कल्‍पना जांगडे (कुटे))       (अतुल डी. आळशी)

            सदस्‍या                सदस्‍या                  अध्‍यक्ष

 

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.