Maharashtra

Gadchiroli

CC/10/30

Shri. Ramchandra Sitaram Pradhan,Age- 75yr. Occu.- Nil, Through Shri. Rajeshwar Pandurang Pradhan, Age- 48yr., Occu.- Farmer - Complainant(s)

Versus

Mah. State Electricity Distribution Co.LTD. through Sahayyak Abhiyanta, M.S.E.D.Co.LTD. Armori - Opp.Party(s)

Adv. Jagdish Meshram

25 Feb 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/30
 
1. Shri. Ramchandra Sitaram Pradhan,Age- 75yr. Occu.- Nil, Through Shri. Rajeshwar Pandurang Pradhan, Age- 48yr., Occu.- Farmer
At. Waghala Buldi, Tah. Armori
Gadchiroli
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Mah. State Electricity Distribution Co.LTD. through Sahayyak Abhiyanta, M.S.E.D.Co.LTD. Armori
M.S.E.D.Co.LTD. Above Bank Of India, Armori, Po.Tah. Armori
Gadchiroli
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Shri. A. N. Kamble PRESIDENT
 HONORABLE Shri. R. L. Bombidwar Member
 HONORABLE Smt. M. J. Bhilkar Member
 
PRESENT:
 
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री रत्‍नाकर ल.बोमीडवार, सदस्‍य)

    (पारीत दिनांक : 25 फेब्रुवारी 2011)

                                      

1.           अर्जदाराने सदरची तक्रार, गैरअर्जदाराकडून डिसेंबर 2009 मध्‍ये अवाजवी वीज बिल आकारणी करण्‍यात येऊन, सदर अवाजवी बिलात कोणतीही दुरुस्‍ती करण्‍यास टाळाटाळ करीत असल्‍याबाबत केली आहे. अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

                           ... 2 ...              (ग्रा.त.क्र.30/2010)

 

2.          तक्रारकर्ता हा वयोवृध्‍द म्‍हातारे असल्‍यामुळे ते कोणताही व्‍यवसाय करीत नाही.  गैरअर्जदार ही शासनाच्‍या अधिपत्‍याखाली काम करणारी कंपनी असून, कंपनीचा प्रमुख उद्देश ग्राहकांना वीज वितरीत करणे व ग्राहकांना योग्‍य प्रकारे सेवा देणे हे आहे.  तक्रारकर्ता यांचा जुना ग्राहक क्र.आरएल-2345 हा आहे.  या वीज मिटरच्‍या रिडींगनुसार प्रत्‍येक वीज बिलाचा तक्रारकर्ते हे नियमितपणे भरणा करीत होते.  असे असतांना अचानकपणे गैरअर्जदार कंपनीने आरमोरी कार्यालयामार्फत स्‍वतःहून माहे ऑगष्‍ट-सप्‍टेंबर 08 मध्‍ये वीजेचे जुने मिटर बदलून नविन कॉम्‍प्‍युटराईज्ड मिटर क्र.9010013969 लावण्‍यात आले व नविन ग्राहक क्र.490510111181 हा देण्‍यात आला.  नवीन मिटर लावल्‍यापासून माहे ऑक्‍टोंबर 08 ते एप्रिल 09 पर्यंतच्‍या बिलाचा भरणा केला. 

 

3.          यानंतर, माहे जुन 09, ऑगस्‍ट 09, ऑक्‍टोंबर 09 या महिण्‍यांचे विद्युत बिल प्राप्‍त झाला नाही व माहे डिसेंबर 09 मध्‍ये गैरअर्जदाराकडून अचानकपणे एकूण 5515 युनीट वापरल्‍याचे दाखवून रुपये 36,810/- चे वीज बिल पाठविण्‍यात आले.  तक्रारकर्त्‍याने दि.18.1.10 रोजी गैरअर्जदार कंपनीच्‍या आरमोरी येथील कार्यालयास तक्रार अर्ज देऊन सदर वीज बिल चुकीचे व अवाजवी आहे, ते दुरुस्‍त करुन देण्‍याची, तसेच नव्‍याने लावण्‍यात आलेला मिटर हा नादुरुस्‍त असल्‍यामुळे तो बदलून देण्‍याची विनंती करण्‍यात आली.  परंतु, गैरअर्जदार कंपनीने सदर वीज बिलात कुठलीही दुरुस्‍ती करुन दिली नाही.  त्‍यामुळे, तक्रारकर्त्‍याने आरमोरी स्थित कार्यालयास संपर्क साधून वीज बिल दुरुस्‍तीबाबत विनंती केली असता, गैरअर्जदार कंपनीचे अधिका-यांनी ‘वीज बिल दुरुस्‍त होऊन येईपर्यंत तुम्‍ही सध्‍याचे रुपये 2000/- भरुन घ्‍या.’  असे म्‍हणून माहे डिसेंबर 09 च्‍या बिलावर सही शिक्‍यानिशी लिहून दिले.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि.17.3.10 रोजी रुपये 2000/- रकमेचा भरणा केला.  तक्रार अर्जानुसार, गैरअर्जदार कंपनीच्‍या अधिका-यांनी नवीन मिटर लावण्‍यासाठी तक्रारकर्त्‍यास रुपये 100/- चा डिमांड भरावयास लावून मार्च 10 रोजी  नवीन वीज मिटर लावले.

4.          त्‍यानंतर, गैरअर्जदार कंपनीकडून माहे फेब्रुवारी 10 मध्‍ये वीज बिल फक्‍त 406 युनीटचे वापराबद्दलचे पाठविले असतांना, ह्या बिलाच्‍या रकमेमध्‍ये थकीत रक्‍कम म्‍हणून डिसेंबरच्‍या वीज बिलाची रक्‍कम जोडण्‍यात आल्‍यामुळे बिलाची एकूण रक्‍कम रुपये 39640/- झाली.  या बिलात चुकीच्‍या पध्‍दतीने माहे डिसेंबर 09 च्‍या बिलाची आकरणी केल्‍यामुळे बिलाचा भरणा केला नाही. यानंतर, दोन महिन्‍यांनी एप्रिल 10 मध्‍ये 712 युनीट वीज वापराचे बिल रुपये 4255/- व माहे डिसेंबर 09 

... 3 ...                 (ग्रा.त.क्र.30/2010)

 

च्‍या बिलाची रक्‍कम व्‍याजासह जोडून एकूण रुपये 41919/- चे बिल पाठविण्‍यात आले.  म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दि.22.5.10 रोजी अर्ज देऊन डिसेंबर 09 च्‍या बिलाची रक्‍कम दुरुस्‍त करुन सुधारीत बिल देण्‍याची विनंती केली.  गैरअर्जदाराचे अधिका-यांनी ‘तुम्‍ही एप्रिल 10 च्‍या बिलापैकी रुपये 5000/- भरुन घ्‍या, जुन्‍या बिलाचे नंतर पाहू.’ तक्रारकर्त्‍याने विद्युत पुरवठा खंडीत होईल या भितीपोटी दि.10.6.10 रोजी रुपये 5000/- चा भरणा केला.  गैरअर्जदाराने, 6 महिन्‍याचा कालावधी होऊनही डिसेंबर 09 चे वीज बिल दुरुस्‍त करुन देण्‍यात आले नाही.  तक्रारकर्त्‍याने दि.29.6.10 रोजी गैरअर्जदाराचे आरमोरी स्थित कार्यालयास डिसेंबर 09 चे बिल दुरुस्‍त करुन देण्‍याची विनंती केली. परंतु, गैरअर्जदाराने, तक्राकर्त्‍याचा अर्ज फेटाळून लावला.  यामुळे, तक्रारकर्त्‍यास शारीरीक व मानसीक ञास झाला. यामुळे, नाईलाजाने तक्रारकर्त्यास ही तक्रार दाखल करावी लागत आहे. गैरअर्जदाराने, तक्रारकत्‍याला पाठविण्‍यात आलेल माहे डिसेंबर 09 चे 5515 वीज युनीट वापराबद्दलचे विद्युत बिल दुरुस्‍त करुन आतापर्यंतच्‍या बिलाच्‍या सरासरीत वाजवी बिल देण्‍याचा आदेश गैरअर्जदारास देण्‍यात यावे.  तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरीक व मानसीक ञासामुळे औषधोपचारासाठी आलेला खर्च रुपये 15000/- देण्‍याचा आदेश देण्‍यात यावा.  तक्रारीकरीता आलेला खर्च रुपये 10000/- गैरअर्जदाराकडून देण्‍याचा आदेश देण्‍यात यावा, अशी मागणी केली आहे.

 

5.          अर्जदाराने, नि.4 नुसार 11 दस्‍ताऐवज दाखल केले.  अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदाराविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आला.  गैरअर्जदार हजर होऊन नि.क्र.7 नुसार लेखी बयान व नि.8 नुसार 8 दस्‍ताऐवज दाखल केले.

 

6.          गैरअर्जदाराने, लेखी बयानात नमूद केले की, तक्रार निवेदन प्रमाणे ग्राहकाचे या कार्यालयाकडून समाधान झाले नसल्‍यास ग्राहकाने म.रा.वी.वी.कं.लि. च्‍या ग्राहक तक्रार निवारक केंद्र, अधिक्षक अभियंता, स.व सु. प्रविभाग, गडचिरोली येथे असून ग्राहकाने तिथे तक्रार केली असती तर, त्‍या तक्रारीचे विवरण करुन, त्‍या आधारे बिल दुरुस्‍त करुन देण्‍यात आले असते.  परंतु, ग्राहकाने तसे न करता मंचाकडे तक्रार केली आहे. अर्जदार ऑगष्‍ट 09 पासून कोणतेही बील भरलेले नसून दि.17.3.10 ला रुपये 2000/- भरलेले आहे.  वरील काळात चुकलेले बील सोडून नंतरचे बील ग्राहकांस कंपनी देण्‍यास तयार होती.  परंतू ग्राहक वीज देयक भरण्‍यास टाळाटाळ करीत होते.

 

 

 

... 4 ...                 (ग्रा.त.क्र.30/2010)

 

7.          माहे ऑगष्‍ट ते सप्‍टेंबर या काळात जुने मिटर बदलविण्‍याची मोहीम राबविण्‍यात आली होती, त्‍या अनुषंगाने आरमोरी येथील बहुतांश ग्राहकाचे मिटर बदली करण्‍यात आलेले आहे. यात कोणताही कंपनीचा हेतु नव्‍हता.  जुन 09, ऑगष्‍ट 09, ऑक्‍टोंबर 09 ग्राहकास विद्युत बिल प्राप्‍त झाले नाही, असे तक्रारीत नमूद केले. परंतू, ग्राहकाने कोणतीही तक्रार या कार्यालयास केली नाही.  तसेच, उपविभागीय कार्यालयातील फोटो रिडींगचे काम खाजगी एजन्‍सीला देण्‍यात आलेले असून सदर एजन्‍सी माहे 09 ला फोटो रिडींग 1684 घेण्‍यात आलेले असून चुकीने संगणकाला 685 लोड करण्‍यात आले.  नंतर ऑगष्‍टला 4602 फोटो मिटर वाचन होते. परंतु, ग्राहकाला आर.एन.अे.बिल झालेले आहे.  परंतु, ग्राहकाचे मिटरवर वाचन फारच आहे.  याबाबत ग्राहकाने कुठल्‍याही प्रकारची तक्रार या कार्यालयास केली नाही.  त्‍यामुळे, डिसेंबर 09 ला बरोबर रिडींग फोटो असल्‍यामुळे ग्राहकांस ती रिडींग 6200 पर्यंत एकूण रिडींगचे बिल तयार करण्‍यात आलेले आहे व ग्राहकांची बिलाबद्दल तक्रार असल्‍या कारणाने मिटर बदली करुन टेस्‍टींग युनीट गडचिरोली येथे पाठविण्‍यात आले.  त्‍याअनुषंगाने, जुन मिटर लावलेल्‍या तारखेपासून 16 महिन्‍या विभागणी करुन बिल दुरुस्‍ती करुन ती केस मंजूरीकरीता विभागीय कार्यालयास गडचिरोली येथे पाठविण्‍यात आले आहे. सदर मिटर वाचनाची पंचीग चुकीची झालेली आहे व ग्राहकाने त्‍याबाबत कोणतीही तक्रार न केल्‍यामुळे ती रिडींग लक्षात आलेली नाही. माहे डिसेंबर 09 चे 5515 युनीटचे बिल झाल्‍यामुळे त्‍या रिडींग पर्यंत्‍नचे बिलाची थकबाकी त्‍यापुढील बिला लागून आलेली आहे.  ग्राहकास चुकीचे बिल सोडून त्‍या समोरील पुढील आलेले रिडींगचे बिल कंपनी देण्‍यास तयार होते, परंतू ग्राहक ते वीज बिल भरण्‍यास तयार नव्‍हते.  कार्यालयाकडून ग्राहकांस कोणताही मानसीक व शारीरीक ञास देण्‍यात आलेला नाही.  नविन मिटर बदलल्‍यापासून नविन मिटरच्‍या प्रत्‍येक महिण्‍याचा वापर सरासरी 350 युनीट प्रयमाणे होत असून त्‍याचे अनुषंगाने ग्राहकाचे जुन मिटर बरोबर नव्‍हते, हे म्‍हणणे चुकी आहे व तसा त्‍याबाबत, अहवाल टेस्‍टींग युनीट गडचिरोली यांना त्‍या कार्यालयास सादर केले आहे. ग्राहकाचे चुकीचे बिल कमी करुन नवीन सुधारीत बिल ग्राहकास भरणा करण्‍याचे आदेश देण्‍यात यावे, वरील उरलेली रक्‍कम पुढील बिलात वजा करुन देण्‍यात येईल.  या कार्यालयाकडून ग्राहकास कोणताही मानसीक, शारीरीक ञास देण्‍यात आला नाही. ग्राहकास वरील प्रमाणे सुधारीत बिल देण्‍यात येत असल्‍यामुळे कोणत्‍याही प्रकारचा खर्च आकारण्‍यात येऊ नये, अशी प्रार्थना केली.

 

8.          अर्जदाराने नि.9 नुसार तात्‍पुरता मनाईचा आदेश करण्‍याबाबत अर्ज सादर केला व सोबत 5 दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराने नि.12 नुसार रिजाईन्‍डर

... 5 ...                 (ग्रा.त.क्र.30/2010)

 

शपथपञ दाखल केले.  गैरअर्जदाराने नि.13 नुसार रिजाईन्‍डर शपथपञ दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज, तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन खालील कारणे व निष्‍कर्ष निघतात.

 

                  //  कारणे व निष्‍कर्ष  //

 

9.          अर्जदार, गैरअर्जदाराचा जुना ग्राहक असून, त्‍याचा ग्राहक क्र.आर.एल.2345 होता.  ऑगष्‍ट - सप्‍टेंबर 2008 मध्‍ये नविन कम्‍प्‍युटराईजड मिटर क्र.90100013969 लावण्‍यात आले व नविन ग्राहक क्र.490510111181 हा देण्‍यात आला.  नविन मिटर लावल्‍यापासून ऑक्‍टोंबर 2008 चे 215 युनीटचे 305/- रुपये, डिसेंबर 2008 चे 309 युनीटचे 1164/- रुपये, फेब्रुवारी 2009 चे 150 युनीटचे 490/- रुपये, एप्रील 2009 चे 150 युनीटचे 470/- रुपये, वीज बिल प्राप्‍त झाले.  परंतु, जुन 2009, ऑगष्‍ट 2009, ऑक्‍टोंबर 2009 चे बिल अर्जदारास प्राप्‍त झाले नाही.  माञ, डिसेंबर 2009 चे 5515 युनीटचे रुपये 36,810/- चे वीज बिल पाठविण्‍यात आले.

 

10.         वीज बिल नियमीत न पाठविणे ही गैरअर्जदाराच्‍या सेवेतील ञुटी आहे.  तसेच, आधिच्‍या वीज बिलाच्‍या सरासरीपेक्षा खुप जास्‍त आहे.  अर्जदाराने, केलेल्‍या तक्रारी नंतर गैरअर्जदाराचे म्‍हणण्‍यानुसार दि.17 मार्च 2010 रोजी रुपये 2000/- रकमेचा भरणा केला व नविन मिटर लावण्‍यासाठी रुपये 100/- चा डिमांड भरुन मार्च 2010 मध्‍ये नविन मिटर लावून दिले.

 

11.          त्‍यानंतर, माहे फेब्रूवारी 2010 मध्‍ये थकीत रकमेसह रुपये 39,640/- चे बिल अर्जदाराला प्राप्‍त झाले.  तसेच, एप्रिल 2010 मध्‍ये नविन मिटरच्‍या रिडींग प्रमाणे थकीत रकमेसह रुपये 41,910/- चे बिल पाठविण्‍यात आले.  परंतु, आधीचे बिल दुरुस्‍त करुन देण्‍यात आले नाही.  अर्जदाराचे तक्रारीनंतर गैरअर्जदाराच्‍या मतानुसार दि.10.6.2010 रोजी रुपये 5000/- चा भरणा केला व सुधारीत बिलाची वाट पाहिली.

 

12.         दि.29.6.2010 रोजी डिसेंबर 09 चे बिल दुरुस्‍ती करुन देण्‍यासाठी अर्ज केला. परंतु, त्‍याची गैरअर्जदाराने योग्‍यप्रकारे दखल घेतली नाही.

13.         गैरअर्जदाराचे लेखी बयानानुसार सदर कार्यालयाकडून समाधान न झाल्‍यास ग्राहकाने म.रा.वी.वी.कं.‍ च्‍या ग्राहक तक्रार निवारण केंद्र अधिक्षक

... 6 ...                 (ग्रा.त.क्र.30/2010)

 

अभियंता, स.व सु., प्रविभाग, गडचिरोली येथे केली असती तर तक्रारीचे विवरण करुन त्‍या आधारे बिल दुरुस्‍त करुन देण्‍यात आले असते.  परंतु, तसे म्‍हणणे संयुक्‍तीक नाही.

 

14.         ग्राहकाने ऑगष्‍ट 09 पासून कोणतेही बिल भरलेले नसून दि.17.3.2010 रोजी रुपये 2000/- बिल भरले.  चुकीचे बिल सोडून त्‍यानंतरचे बिल देण्‍यास कंपनी तयार होती असे गैरअर्जदाराचे म्‍हणणे आहे.  परंतु, त्‍यांनी तशी कृती केलेली दिसत नाही. ऑगष्‍ट ते सप्‍टेंबर या काळात जुने मिटर बदलविण्‍याची मोहिम राबविण्‍यात आली, त्‍यानुसार अर्जदाराचे मिटर बदली करण्‍यात आले.  ह्या म्‍हणण्‍यात तथ्‍य दिसते. 

 

15.         गैरअर्जदाराचे मतानुसार या उपविभागीय कार्यालयातील फोटो रिडींगचे काम खाजगी एजंन्‍सीला देण्‍यात आले, त्‍या एजन्‍सीने माहे 2009 ला फोटो रिडींग 1684 आलेले असून, चुकीने 685 लोड करण्‍यात आले.  नंतर ऑगष्‍टला 4602 फोटो मिटर वाचन होते.  परंतु, ग्राहकाला आर.एन.ए. चे बिल देण्‍यात आले.  ग्राहकाची बिलाबद्दल तक्रार असल्‍या कारणाने मिटर बदल करुन टेस्‍टींग युनीट गडचिरोली येथे पाठविण्‍यात आले.  त्‍याच्‍या अहवालानुसार जुने मिटर लावलेल्‍या तारखेपासून 16 महिन्‍या विभागणी करुन बिल दुरुस्‍ती करुन ती केस मंजुरीकरीता विभागीय कार्यालय, गडचिरोली येथे पाठविण्‍यात आली.

 

16.         अर्जदार यांना एप्रील 09 नंतर विद्युत बिल न देता एकदम डिसेंबर 09 मध्‍ये अवाजवी बिल देणे, ही गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील ञुटी दिसून येते.  अर्जदार यांनी दि.18.1.2010 दि.25.5.10 तसेच, दि.29.6.10 रोजी अर्ज देवून आणि वारंवार ऑफीसमध्‍ये जावून विद्युत बिलात दुरुस्‍ती करुन देण्‍यासाठी विचारणा केलेली दिसते,   ते अर्ज रेकॉर्डवर आहेत.  परंतु, गैरअर्जदार यांनी कोणतीही दखल घेतली नाही.  यावरुन, गै.अ. यांच्‍या सेवेत न्‍युनता आहे, असे या न्‍यायमंचाचे मत आहे.

 

17.         गै.अ.यांनी आपल्‍या लेखी बयानात सांगीतले की, मिटर वाचनाची पंचींग चुकीची झालेली असल्‍यामुळे विद्युत बिल हे अवाजवी आहे, ही चुक गैरअर्जदार मान्‍य करतात.  याबाबत, अर्जदार यांनी कोणतीही कारवाई केली नाही, परंतू अर्जदार यांनी दिलेले (नि.क्र.4 अ-8, अ-9 व अ-10) अर्ज रेकॉर्डवर दाखल आहेत.  यावरुन, गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांना हेतूपुरस्‍पर ञास दिलेला दिसून येतो, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.

 

... 7 ...                 (ग्रा.त.क्र.30/2010)

 

18.         अर्जदाराने दाखल केलेले डिसेंबर 09 चे बिल अ-5 चे अवलोकन केले असता, वीज आकार अतोनात दाखवून एकूण 5515 युनीटचे दिले आहे.  जेंव्‍हा की, त्‍यापूर्वीचे बिल आर.एन.ए असे दाखवून दिले आहे.  यावरुन, डिसेंबर 09 चे बिल बेकायदेशीर असून, योग्‍य वाचनानुसार नाही.  त्‍यामुळे, ते रद्द होण्‍यास पाञ आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.  गैरअर्जदार, अर्जदारास डिसेंबर 09 च्‍या बिलाचे ऐवजी योग्‍य वाचनानुसार बिल दुरुस्‍त करुन देण्‍यास जबाबदार आहे.  गैरअर्जदार यांनी चुकीचे बिल दिल्‍यामुळे थकीत राहिले.  त्‍यामुळे, त्‍यावर व्‍याज, दंड घेण्‍यास गैरअर्जदार पाञ नाही.    

 

            वरील कारणे व निष्‍कर्षानुसार तक्रार मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                       

                  //  अंतिम आंदेश  //

(1)  अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.

(2)   गैरअर्जदार यांनी डिसेंबर 2009 चे विद्युत बिल रद्द करुन, मिटर रिडींगनुसार बिल दुरुस्‍त करुन कोणतेही व्‍याज किंवा दंड न आकारता सुधारीत बिल 30 दिवसांचे आंत अर्जदारास द्यावे.  

(3)   दिलेले विद्युत बिल चार टप्‍यात (टप्‍या-टप्‍याने) भरण्‍याची मुभा देण्‍यात यावी.

(4)   गैरअर्जदाराने, अर्जदारास झालेल्‍या मानसीक व शारिरीक ञासापोटी रुपये 1000/- व तक्रारीच्‍या खर्च म्‍हणून रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे. 

(5)   उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.  

 

गडचिरोली.

दिनांक :- 25/2/2011.

 
 
[HONORABLE Shri. A. N. Kamble]
PRESIDENT
 
[HONORABLE Shri. R. L. Bombidwar]
Member
 
[HONORABLE Smt. M. J. Bhilkar]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.