::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 14.09.2015 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
सदर फिर्याद ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे योजने अंतर्गत विरुध्दपक्षाकडे खालील प्रमाणे रकमेचा धनादेशाद्वारे भरणा केला व विरुध्दपक्षाची सेवा स्वत:च्या उपभोगाकरिता विकत घेतली.
अ.क्र. | धनादेशाचे विवरण | दिनांक | रक्कम रुपये |
1 | 3135698 | 09/03/2013 | 17,000 |
2 | 315700 | 09/04/2013 | 8,500 |
3 | 302277 | 08/05/2013 | 8,500 |
4 | 302279 | 11/06/2013 | 8,500 |
5 | 302280 | 09/07/2013 | 8,500 |
6 | 323352 | 10/09/2013 | 17,000 |
7 | 323353 | 07/10/2013 | 8,500 |
8 | 323696 | 08/11/2013 | 8,500 |
9 | 998812 | 07/12/2013 | 8,500 |
10 | 998813 | 08/01/2014 | 8,500 |
| | एकूण | 1,02,000 |
वरील रक्कम जमा करुनही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला आज पावेतो कोणत्याही योजनेनुसार विदेश दौरा मुदतीत करवीली नाही. तसेच विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे पुर्ण पैसे आज पर्यंत परत दिले नाही. विरुध्दपक्षाला तक्रारकर्त्याने वारंवार पैसे मागितले असता, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला रु. 25,000/- दिले व तिन धनादेश एकूण रक्कम रु. 77,000/- चे दिले. परंतु तिनही धनादेश अनादरीत झालेले आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याने वकीलामार्फत दि. 26/08/2014 व 09/09/2014 रोजी उपरोक्त धनादेशाच्या रकमेची मागणी केली. त्या अनुषंगाने विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला रु.77,000/- पैकी फक्त रु. 25,000/- परत केले. उरलेली रक्कम रु. 52,000/- अजुनही विरुध्दपक्षाकडून घेणे बाकी आहे. या कृत्यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान झाले. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर व्हावी व तक्रारकर्ते यांना रु. 52,000/- व्याजासह, तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाई पोटी रु. 50,000/- व तक्रार खर्च रु. 10,000/- विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्त्यास मिळवून देण्यात यावे.
तक्रारकर्त्याने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून पुरावा म्हणून तक्रारीसोबत एकुण 8 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्षाचा लेखी जवाब
2. विरुध्दपक्षाला या प्रकरणाची नोटीस बजाविल्यानंतर देखील विरुध्दपक्ष्ा प्रकरणामध्ये गैरहजर राहील्यामुळे, सदर प्रकरण विरुध्दपक्षाविरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेखाद्वारे पुरावा दाखल केला व तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात विरुध्दपक्षाने नोटीस घेण्यास नकार दिल्याने, सदर नोटीस परत आली. त्यामुळे विरुध्दपक्ष या प्रकरणात मंचसमोर हजर न झाल्याने, सदर प्रकरण विरुध्दपक्षाविरुध्द एकतर्फी चालविण्यात आले. त्यामुळे केवळ तक्रारकर्त्याची तक्रार व तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांच्याच आधारे सदर प्रकरण निकाली काढण्यात आले.
तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचा लकी ड्रॉ काढून कमी पैशात विदेश दौरा घडवणा-या योजनेत सहभागी होऊन दि. 09/03/2013 ते 08/01/2014 या कालावधीत एकूण रु. 1,02,000/- विरुध्दपक्षाकडे जमा केले. परंतु विरुध्दपक्षाने सदर योजने अंतर्गत कुठलाही विदेश दौरा घडविला नसल्याने, तक्रारकर्त्याने, त्याने जमा केलेले पैसे परत मागीतले, तेंव्हा विरुध्दपक्षाने रु. 25,000/- दिले व रु. 77,000/- चे तिन धनादेश दिले. परंतु तिनही धनादेश अनादरीत झाल्याने तक्रारकर्त्याने त्यांच्या वकीलामार्फत दि. 26/08/2014 व दि. 9/9/2014 रोजी विरुध्दपक्षाला नोटीस पाठवून अनादरीत झालेल्या धनादेशाच्या रकमेची मागणी केली. सदर नोटीस प्राप्त झाल्यावर विरुध्दपक्षाने रु. 77,000/- पैकी फक्त रु. 25,000/- परत केले. त्यामुळे तक्रारकर्ता उर्वरित रक्कम रु. 52,000/- व्याजासह व शारीरिक, आर्थिक, मानसिक नुकसान भरपाई व प्रकरण खर्च मिळण्यास पात्र असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.
तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तांपैकी, मॅग्ना ओपस हॉस्पीटॅलीटी प्रा.लि., ने तक्रारकर्त्याला पाठविलेल्या दि. 7/4/2014 रोजीच्या पत्रावरुन, सदर कंपनीने तक्रारकर्त्याला, त्याने भरणा केलेली रक्कम, धनादेश क्र. 194839, 194840 व 194841 हे प्रत्येकी रु. 25,000/- चे धनादेश व धनादेश क्र. 194848 हा रु. 27,000/- च्या धनादेशाद्वारे Full and Final Settlement म्हणून परत केली. परंतु धनादेश क्र. 194841 रु. 25,000/- चा व धनादेश क्र.194847 हा रु. 27,000/- चा, तक्रारकर्त्याने वटविण्यास लावला असता, पुरेशा निधी अभावी, वटल्या गेला नसल्याचे, दाखल दस्तांवरुन दिसून येते. त्यामुळे सदर न वटलेल्या धनादेशांची रक्कम रु. 52,000/- सव्याज मिळण्यास तक्रारकर्ता पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. प्रकरण दाखल करण्यापुर्वीही तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दोन नोटीसेस पाठवल्या होत्या, परंतु विरुध्दपक्षाने उर्वरित रक्कम तक्रारकर्त्याला दिलेली नाही, तसेच मंचात प्रकरण दाखल झाल्यावरही मंचाची नोटीस घेण्यास नकार देऊन, विरुध्दपक्ष मंचासमोर हजर झाले नसल्याने तक्रारकर्ता शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईसह प्रकरणाचा खर्च विरुध्दपक्षाकडून मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. सबब अंतीम आदेश खालील प्रमाणे..
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) विरुध्दपक्ष ह्यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे घोषीत करण्यात येते.
3) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याची उर्वरित रक्कम रु. 52,000/- ( रुपये बावन्न हजार ), प्रकरण दाखल केलेल्या तारखेपासून म्हणजेच दि. 23/12/2014 पासून ते देय तारेखेपर्यत द.सा.द.शे 8 टक्के व्याजासह द्यावेत
4) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रु. 3000/- ( रुपये तिन हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- द्यावेत.
5) उपरोक्त आदेशाचे पालन, निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे,
6) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.