जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 19/2016 तक्रार नोंदणी दि. :-3/5/2016
तक्रार निकाली दि. :- 23/01/2017
निकाल कालावधी :- 8 म.20 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- विजय वामन पोलजवार,
वय 43 वर्षे, व्यवसाय-शेती/नौकरी,
राह.हनुमान नगर, चामोर्शी,
तह.चामोर्शी, जिल्हा गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) मॅग्मा एच.डी.आय.जनरल इन्शुरन्स कं.लि.,
मार्फत संबंधित अधिकारी,
राह.मॅग्मा हाऊस, 2 रा माळा,
अंजू चेंबर, 24 पार्कस स्ट्रीट, कलकत्ता-700016.
(पश्चिम बंगाल)
(2) मॅग्मा एच.डी.आय.जनरल इन्शुरन्स कं.लि.,
मार्फत संबंधित अधिकारी,
शाखा नागपूर, राह.81, हिल रोड, रामनगर,
नागपूर,तह.जि.नागपूर.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.एन.टी.दलपेलवार
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील :- अधि.श्री व्ही.एम.लिंगे
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
- आ दे श -
( मंचाचे निर्णयान्वये, सादिक मो.झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 23 जानेवारी 2017)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टर क्र.एम.एच.33-एफ-2882 एस्कॉर्ट पीटी 434 डी.एस. + एल.एम., इंजिन क्र.ई-3226730, चेसिस क्र.बी3204385, उत्पादन वर्ष 2013 असलेला फायनान्सवर रुपये 5,70,000/- किमतीचा शेतीच्या कामाकरीता विकत घेतला. सदर ट्रॅक्टर गैरअर्जदार क्र.1 कडे पॉलीसी क्र.पी0015400002/4/07/112792 अन्वये दिनांक 31.5.2014 ते 30.5.2015 या कालावधीकरीता दिनांक 24.4.2014 ला विमाकृत केला. तक्रारकर्त्याने सदर पॉलीसीच्या प्रिमियमपोटी गैरअर्जदार क्र.1 कडे दिनांक 24.4.2014 ला रुपये 16,017/- जमा केले. गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराकडून अ) वाहनाचे नुकसान 2) बेसिक थर्ड पार्टी क) मालक/ड्रायव्हर, क्लिनर, कामगार यांचा विमा स्विकृत केलेला होता. अर्जदाराचा ड्रायव्हर यादव रामदास ठाकूर ट्रॅक्टर घेवून शेतात नांगरणीकरीता गेले असता सदर ट्रॅक्टरला दिनांक 23.6.2014 ला दुपारी 3-00 ते 3-30 वाजता अपघात झाला. सदर ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टरखाली ड्रायव्हर दबला व सदर वाहनाचे पेट घेतला. त्यामध्ये, ट्रॅक्टरचा ड्रायव्हर यादव ठाकूर याचा जळून मृत्यु झाला. त्याबाबतची सूचना तेथे काम करीत असलेला श्री.दिगांबर मधुकर पोरटे याने अर्जदारास दिली. अर्जदाराने त्यास घटनेबाबचा रिपोर्ट पोलीस स्टेशनला देण्यास सांगितले. श्री.दिगांबर पोरटे याने दिनांक 34.6.2014 ला पो.स्टे.चामोर्शी ला रिपोर्ट दिली. सदर रिपोर्टवरुन पो.स्टे.चामोर्शी यांनी घटनास्थळी येवून पंचनामा तयार करुन अपराध क्र.055/2015 अन्वये दिनांक 26.6.2014 ला गुन्हा दाखल केला. पो.स्टे.चामोर्शी यांनी वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करुन एफ.आय.आर., इनक्वेस्ट पंचनामा, पी.एम.रिपोर्ट तयार केला. अपघाताचे वेळी वाहनचालक श्री.यादर रामदास ठाकूर होते व त्यांना वाहन चालविण्याचा अनुभव होता. वाहन चालक अपघातात जळून मरण पावल्यामुळे त्यांचेकडील वाहन परवाना देखील अपघातात जळून नष्ट झाला. सदर अपघातात वाहनाचे पुर्णपणे नुकसान झाले. अर्जदाराने सदर वाहनाच्या अपघाताबाबतची सूचना गैरअर्जदार क्र.2 ला दिली. सदर वाहन अपघातानंतर घटनास्थळावरच होते. त्यानंतर, गैरअर्जदार क्र.2 ने अपघातग्रस्त ट्रॅक्टरचे मुल्यमापन करण्यासारठी सर्वेअरची नियुक्ती करुन अपघातग्रस्त ट्रॅक्टरचा सर्व्हे रिपोर्ट तयार केला. अर्जदाराने गैरअर्जदाराचे सर्वेअरचे मागणीनुसार अपघातग्रस्त वाहनाचे दस्तऐवज, पोलीस दस्तऐवज दिले. दरम्यान, अर्जदाराने अपघातग्रस्त ट्रॅक्टर दुरुस्तीकरीता नागपूर रोड, पडोली, चंद्रपूर येथे आणले. अपघातग्रस्त ट्रॅक्टर संपुर्णपणे जळालेले असल्याने शेतीच्या कामाकरीता उपयोगात आणणे शक्य नव्हते.अर्जदाराने सदर वाहन घटनास्थळावरुन चंद्रपूरला आणण्यास वाहतुक खर्चापोटी रुपये 10,000/- खर्च केले आहे. सदर अपघातग्रस्त वाहन चंद्रपूर येथे दुरुस्तीकरीता आणले असता तेथील मेकॅनिकने इस्टिमेट क्र.14/जेई/5 अन्वये रुपये 5,58,976/- दिले. सदर इस्टिमेट अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 कडे दिले. अपघातग्रस्त वाहन पुर्णपणे जळालेले असल्यामुळे दुरुस्त करणे शक्य नाही. अर्जदाराचे मागणीनुसार अपघातग्रस्त वाहनाचे संपुर्ण दस्तऐवज व पोलीसाचे दस्तऐवज गैरअर्जदारांस दिले. परंतु, गैरअर्जदाराने अपघातग्रस्त वाहनाची नुकसान भरपाईची रक्कम अर्जदारास दिलेली नाही.अपघातग्रस्त वाहनाची नुकसानभरपाई न दिल्यामुळे अर्जदार अपघातग्रस्त वाहनाची दुरुस्ती करु शकले नाही. त्यामुळे, अर्जदाराचे शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे, अर्जदाराला दुसरे ट्रॅक्टर भाडयाने घेवून शेती करावी लागत आहे. सदर नुकसानास गैरअर्जदार जबाबदार आहे. गैरअर्जदारांनी कोणतेही कारण नसतांना अर्जदाराला अपघातग्रस्त वाहनाची नुकसानभरपाईची रक्कम रुपये 5,58,976/- व त्यावरील व्याज 18 टक्के दराने दिनांक 23.6.2014 पासून अर्जदाराचे पदरी पडतेपर्यंत खर्चासह देण्यास जबाबदार आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे सेवेमध्ये ञृटी केली. त्यामुळे तक्रारकर्त्यांस मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी, गैरअर्जदारांनी अपघातग्रस्त वाहनाची नुकसानभरपाईची रक्कम रुपये 5,58,978 दिनांक 23.6.2014 पासून अर्जदाराचे हाती पडेपावेतो द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने मिळण्याचे, अपघातग्रस्त वाहन दुरुस्त होऊ न शकल्यामुळे अर्जदाराच्या शेतीच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी रुपये 1,00,000/- तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 1,00,000/-, अपघातग्रस्त वाहन चंद्रपूर येथे दुरुस्त करण्याकरीता वाहतुक खर्च रुपये 10,000/-, नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याकरीता गैरअर्जदाराचे ऑफीसला वारंवार जावे लागले त्या खर्चापोटी रुपये 25,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 9 झेरॉक्स व 3 अस्सल दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.16 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.16 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, ट्रॅक्टर क्र.एम.एच.33-एफ-2882 एस्कॉर्ट पीटी 434 डी.एस. + एल.एम., इंजिन क्र.ई-3226730, चेसिस क्र.बी3204385, उत्पादन वर्ष 2013 चा अर्जदार मालक आहे हे माहितीअभावी अमान्य आहे. अर्जदाराने फायनान्सवर रुपये 5,70,000/- किमतीचा शेतीच्या कामाकरीता विकत घेतला. सदर ट्रॅक्टर गैरअर्जदार क्र.1 कडे पॉलीसी क्र.पी0015400002/4/07/112792 अन्वये दिनांक 31.5.2014 ते 30.5.2015 या कालावधीकरीता दिनांक 24.4.2014 ला विमाकृत केला. तक्रारकर्त्याने सदर पॉलीसीच्या प्रिमियमपोटी गैरअर्जदार क्र.1 कडे दिनांक 24.4.2014 ला रुपये 16,017/- जमा केले. गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराकडून अ) वाहनाचे नुकसान 2) बेसिक थर्ड पार्टी क) मालक/ड्रायव्हर, क्लिनर, कामगार यांचा विमा स्विकृत केलेला होता, हे ही माहितीअभावी अमान्य आहे. तथापि, सदर ट्रॅक्टर गैरअर्जदार क्र.1 कडे पॉलीसी क्र.पी0015400002/4 /07/112792 अन्वये दिनांक 31.5.2014 ते 30.5.2015 या कालावधीकरीता दिनांक 24.4.2014 ला विमाकृत केला व विम्याचे प्रिमियमपोटी रुपये 7284/- भरलेले आहेत ही बाब मान्य आहे. अपघातग्रस्त ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून रामदास ठाकूर हे काम करीत होते व ट्रॅक्टरला अपघात होऊन त्यामध्ये ड्रायव्हरचा मृत्यु झाला व त्याबाबतची सूचना श्री.दिगांबर पोरटे याने अर्जदारास दिली व अर्जदाराने त्यास पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यास सांगितले ही बाब माहितीअभावी अमान्य केली आहे. सदर तक्रारीवर पो.स्टे.चामोर्शी यांनी घटनास्थळ पंचनामा केला व तक्रार नोंदवून घेतली ही बाब अमान्य आहे. अर्जदाराने स्वतःच बनावटी कथा तयार करुन खोटा विमा दावा गैरअर्जदारांविरुध्द सादर करुन विम्याची रक्कम उचलण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्जदाराने नियुक्त केलेल्या ड्रायव्हरला वाहन चालविण्याचा कोणताही अनुभव नव्हता व त्याचेकडे वैध वाहन परवाना देखील नव्हता. त्यामुळे, अर्जदाराचा विमा दावा खोटया व बनावटी तथ्यावर आधारीत असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे. गैरअर्जदार यांनी पुढे असे नमुद केले की, अपघातग्रस्त वाहन दुरुस्तीकरीता चंद्रपूर येथे आणले व वाहन पुर्णपणे जळालेले आहे, हे माहितीअभावी अमान्य आहे. तसेच, सर्व्हेअरने सदर वाहनाच्या दुरुस्तीकरीता रुपये 5,58,976/- चे इस्टिमेट दिले हे देखील माहितीअभावी अमान्य आहे. अर्जदाराचे वाहन शेतीच्या उपयोगाकरीता होते व वाहनाअभावी शेतीचे नुकसान झाले, तसेच, त्यामुळे गैरअर्जदार हे नुकसानभरपाई देण्यास जबाबदार आहे, हे देखील माहितीअभावी अमान्य आहे.
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आपल्या विशेष कथनामध्ये असे नमुद केले की, विद्यमान मंचास अर्जदाराचे प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही, त्यामुळे अर्जदाराचे प्रकरण खारीज होण्यास पात्र आहे. अर्जदाराकडून अपघाताची सूचना मिळाल्यानंतर गैरअर्जदार यांनी दिनांक 24.9.2014 ला रजिस्टर्ड पत्र पाठवून ड्रायव्हर श्री.यादव ठाकूर यांचा वाहन परवाना, पोलीस रिपोर्ट/एफ.आय.आर.ची प्रत व क्लेम फॉर्म पुर्णपणे भरलेला व अर्जदाराच्या सहिनिशी असलेला मागणी केली व विनंती केली की, उपरोक्त दस्तऐवज 15 दिवसांचे आंत सादर करण्यात यावे. परंतु, अर्जदाराने ड्रायव्हरचा वाहन परवाना सादर केलेला नाही. त्यानंतर, पुन्हा गैरअर्जदार यांनी दिनांक 13.10.2014 व 30.10.2014 ला रजिस्टर्ड पोस्टाव्दारे मागणी केली, परंतु, अर्जदार यांनी उपरोक्त दस्तऐवज सादर केले नाही. त्यामुळे, गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा दावा खालील कारणानिशी बंद केला.
“ The letter vide dated 12.11.2014 and remark that we regret to inform you that inspite of our Reminder Letter dated 24.9.2014 dated 13.10.2014 and dated 30.10.2014 we have not received the required papers/any satisfactory reply from your side. In view of the above we are unable to process your claim any further and hence threating as closed.”
गैरअर्जदार यांनी पुढे असे नमुद केले की, अर्जदाराकडील ड्रायव्हर हा अपघाताचे वेळी वाहन परवाना धारण करीत नव्हता व त्याच्याकडे ट्रॅक्टर चालविण्याचा अनुभवदेखील नव्हता. अर्जदाराने अपघातग्रस्त वाहन परवाना नसल्यामुळे इसमाकडे सोपवून मोटार वाहन कायदयातील तरतुदीनुसार पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. गैरअर्जदार यांनी पॉलीसीच्या अटी व शर्तीबाबत प्रमाणित प्रत रेकॉर्डवर दाखल केली आहे. त्यामध्ये ड्रायव्हरची व्याख्या खालीलप्रमाणे नमुद केलेली आहे.
Driver
Any person including the insured Provided that a person driving holds an effective driving licence at the time of the accident and is not disqualified from holding or obtaining such a licence. Provided also that the person holding an effective Learner’s licence may also drive the vehicle and that such a person satisfies the requirements of Rule 3 of the Central Motor Vehicles Rules 1989.
अर्जदाराने आवश्यक बाबी विद्यमान मंचापासून लपवून ठेवलेल्या आहेत आणि गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्द प्रकरण दाखल केले आहे. अर्जदार यांनी खोटी व बनावटी तक्रार दाखल केलेली असल्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी.
4. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 2 यांनी दाखल केलेले लेखी बयान, शपथपञ, तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 चा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून विमा पॉलिसीचा लाभ : होय
मिळण्यास पाञ आहे काय ?
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदाराने दाखल केलेली विमा दाव्याची तक्रारीनुसार गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या ट्रॅक्टरचा विमा काढला होता. ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्याचे तसेच त्यांनी दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होत असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे, हे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
6. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या अपघातग्रस्त ट्रॅक्टरचा विमा काढला होता हे सिध्द होते व जेव्हा अर्जदाराचे सदर ट्रॅक्टरचा अपघात दिनांक 23.6.2014 रोजी झाला व अपघातग्रस्त ट्रॅक्टरचा अपघात झाल्याची सूचना गैरअर्जदारास देवून, विमा दावा गैरअर्जदारांच्या नियमानुसार दाखल करुन सर्व दस्तऐवज इ. दिल्यानंतरही गैरअर्जदाराने अर्जदाराचा अपघात विमा दावा निकाली काढलेला नाही. अर्जदार व गैरअर्जदाराने अर्जदाराची तक्रार, लेखी उत्तर, शपथपत्र व लेखी युक्तीवादावरुन जे मुद्दे उपस्थित केले, त्यावरुन खालील मिमांसा या मंचाव्दारे करण्यात येत आहे.
गैरअर्जदाराचे हे म्हणणे गृहित धरता येत नाही की, अर्जदार हा तक्रारीतील उल्लेखलेल्या ट्रॅक्टरचा मालक नाही, कारण अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन हे सिध्द होते की, अर्जदार हा अपघातग्रस्त गाडीचा मालक आहे.
गैरअर्जदार यांनी आपले विशेष कथनामध्ये असे नमुद केले आहे की, अर्जदाराची तक्रार या मंचास चालविण्याचा अधिकार नाही, हे गृहीत धरता येत नाही. कारण, अर्जदाराच्या गाडीचा अपघात गडचिरोली जिल्हयात झालेला असल्यामुळे व गाडीची नोंदणी गडचिरोली जिल्हयात झालेली असल्यामुळे सदर प्रकरण या न्यायमंचाच्या अधिकारक्षेत्रात आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे गाडीच्या ड्रायव्हरचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल केलेला नाही, या कारणांवरुन विमा दावा खारीज केलेला आहे. परंतु, याबाबत गैरअर्जदाराने कुठलेही साक्ष पुरावे दाखल केलेले नाही व त्यासाठी कोणती कार्यवाही गैरअर्जदाराने कोणती कार्यवाही केली, हे सुध्दा नमुद नाही. गैरअर्जदारास जर हे वाटत होते की, अर्जदाराच्या ड्रायव्हरजवळ वाहन परवाना नाही, तर याबाबत गैरअर्जदाराने आर.टी.ओ. कडून तपासणी केली का ? तसा अहवाल सादर केलेला नाही. उलट अर्जदाराने नि.क्र.19 प्रमाणे दस्तऐवज क्र.1 नुसार गैरअर्जदारास पत्र पाठवून ड्रायव्हरजवळ वाहन परवाना होता व मिळाल्यास दाखल करु, असे सुचविले आहे. तसेच, नि.क्र.21 व 22 नुसार साक्ष पुरावे शपथपत्र दाखल केलेले आहे, यावरुन असे सिध्द होते की, अर्जदाराच्या ड्रायव्हरजवळ वाहन परवाना होता. परंतु, झालेल्या अपघातात ड्रायव्हरचा जळून मृत्यु झाला असल्यामुळे कदाचित वाहन परवाना जळाला असेल असे गृहीत धरता येते. एकंदरीत अर्जदाराने नि.क्र.19 नुसार दिलेले पत्र व नि.क्र.21 व 22 नुसार दाखल साक्ष पुरावे वरुन सिध्द होते की, गैरअर्जदार, अर्जदारास जाणूनबुजून न्युनतापुर्ण सेवा देऊन अनुचित व्यापार पध्दती अवलंबिलेली आहे. वरील विवेचनावरुन मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
7. या तक्रारीचे आदेश वरील विवेचनावरुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
(2)IDV
मुल्यानुसार रुपये 4,44,600/- अपघाताची नोंद केल्याचे दिनांक
23.6.2014 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह, आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(3)
त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची
प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(4)
गडचिरोली.
दिनांक – 23.01.2017.