Maharashtra

Nagpur

CC/10/171

Shri Sudip Maheshchandra Agrawal - Complainant(s)

Versus

Magma Fincorp Ltd. - Opp.Party(s)

Adv. Katariya

26 Nov 2010

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/171
1. Shri Sudip Maheshchandra AgrawalBangla No. 74, Shivamkunj Barade nagar, Gorewada Road, Nagpur ...........Appellant(s)

Versus.
1. Magma Fincorp Ltd.Magma House, 34, Park Street, Kolkatta ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 26 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलींद केदार, सदस्‍य
 
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 26/11/2010)
 
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्‍वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्‍याची तक्रार अशी आहे की, त्‍याने गैरअर्जदार क्र. 3 कडून कार विकत घेण्‍याकरीता गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे कर्ज प्रस्‍ताव दाखल केला. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने कर्ज प्रस्‍ताव मंजूर करुन तक्रारकर्त्‍यास रु.1,76,000/- ही रक्‍कम मंजूर करुन ती गैरअर्जदार क्र. 3 यांना दिली. गैरअर्जदार क्र. 3 यांनी सदर रक्‍कम स्विकारुनही तक्रारकर्त्‍याला वाहन दिले नाही व कर्जाचे हफ्ते गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने वसुल करणे सुरु केले. यावर गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला तक्रारकर्त्‍याने विचारणा केली की, वाहन न देता कर्ज वसुली कशी काय सुरु केली. यावर गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने प्री क्‍लोझर अमाऊंट म्‍हणून रु.17,726/- द्यावे लागतील आणि न दिल्‍यास कर्ज वसुली सुरु राहील व रक्‍कम दिली नाहीतर तक्रारकर्त्‍याने दिलेल्‍या धनादेशाद्वारे कर्जाची वसुली करण्‍यात येईल. तक्रारकर्त्‍याने प्री क्‍लोझर अमाऊंट म्‍हणून रु.17,726/- दिले व कर्ज खाते बंद केले. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने दि.18.11.2009 ला ‘ना देय प्रमाणपत्र’ तक्रारकर्त्‍यास दिले. परंतू कोरे धनादेश मात्र परत करण्‍यात आले नाही. याबाबत गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला तक्रारकर्त्‍याने कायदेशीर नोटीसही बजावला. परंतू तक्रारकर्त्‍याला कोरे धनादेश परत करण्‍यात आले नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार दाखल केलेली आहे व मागणी केलेली आहे की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्‍या कृत्‍यामुळे त्‍याला एकूण रु.83,600/- ची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केलेली आहे.
 
2.    सदर प्रकरणाचा नोटीस गैरअर्जदारावर बजावण्‍यात आला असता गैरअर्जदार क्र. 3 यांना नोटीस प्राप्‍त होऊनही ते मंचासमोर हजर न झाल्‍याने दि.26.10.2010 रोजी मंचाने त्‍यांच्‍याविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित केला. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्‍तपणे लेखी उत्‍तर दाखल केले.
3.    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल करतांना प्राथमिक आक्षेप उपस्थित करुन सदर तक्रार ही खोटी असून तथ्‍यहीन असल्‍याचे म्‍हटले आहे व करारनाम्‍यामध्‍ये लवादाचा उल्‍लेख असतांना मंचाला सदर तक्रार चालविण्‍याचा अधिकार नसल्‍याचे नमूद केले आहे.
      आपल्‍या परिच्‍छेदनिहाय उत्‍तरात त्‍याने तक्रारकर्त्‍याने रु.1,76,000/- वाहन कर्ज मंजूर केल्‍याची बाब मान्‍य करुन तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीवरुन गैरअर्जदार क्र. 3 ला वाहन कर्जाची रक्‍कम दिल्‍याचे नमूद केले आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या मागणीवरुन त्‍याचे कर्ज खाते बंद करुन त्‍याला ‘ना देय प्रमाणपत्र’ 18.11.2009 रोजी देण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याला धनादेश परत करण्‍यास ते तयार आहेत. तक्रारकर्त्‍याने प्री क्‍लोझर अमाऊंटची रक्‍कम रु.17,726/- दिलेली नाही, सदर रक्‍कम इझी फायनांशियल कंपनीचे मालक श्री रमन सवाईथुल, जे की तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांच्‍यामधील एजंट आहे त्‍यांनी दिलेली आहे. तक्रारीतील इतर बाबी नाकारल्‍या असून सदर तक्रार खारीज करण्‍याची विनंती केलेली आहे.
4.    सदर तक्रार मंचासमोर दि.19.11.2010 रोजी युक्‍तीवादाकरीता आली असता युक्‍तीवादाचेवेळेस उभय पक्षांच्‍या वकिलांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला. मंचाने सदर तक्रारीमध्‍ये दाखल दस्‍तऐवज, शपथपत्रे, उभय पक्षांनी दाखल केलेली कथने यांचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
5.    तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडून वाहन कर्ज घेतले होते ही बाब उभय पक्षांच कथनावरुन स्‍पष्‍ट होते असल्‍याने तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र. 1 व 2 चा सेवाधारक व ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे.
 
6.    गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने लेखी उत्‍तरामध्‍ये करारनाम्‍यामध्‍ये लवादाचा उल्‍लेख असतांना सदर मंचाला तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही असे नमूद केलेले आहे. परंतू मा. राष्‍ट्रीय आयोगाने वेळोवेळी दिलेल्‍या निवाडयानुसार अशा प्रकरणामध्‍ये मंचाला निर्णय देण्‍याचा अधिकार आहे. त्‍यामुळे सदर तक्रार चालविण्‍याचा पूर्णतः अधिकार मंचाला आहे.
 
7.    गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने रु.1,76,000/- चे वाहन कर्ज दिले होते ही बाब उभय पक्षांच्‍या कथनावरुन स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीवरुन सदर रक्‍कम गैरअर्जदार क्र. 3 ला दिली होती. परंतू सदर बाब सिध्‍द करणारा कोणताही पुरावा वा दस्‍तऐवज त्‍यांनी दाखल केलेला नाही. ज्‍यावरुन तक्रारकर्त्‍याच्‍या सुचनेवरुन गैरअर्जदार क्र. 3 ला गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने वाहन कर्जाची रक्‍कम वळती केल्‍याची बाब मान्‍य करता येईल. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्ते यांच्‍या सुचनेवरुन गैरअर्जदार क्र. 3 यांना वाहन कर्जाची रक्‍कम दिली ही बाब सिध्‍द होत नाही.
 
8.    गैरअर्जदारांच्‍या कथनावरुन, तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांवरुन, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याकडून वाहन कर्जाच्‍या संदर्भात रु.5100/- दि.14.09.2009 ला व रु.4100/- दि.01.10.2009 ला कर्जाची किस्‍त घेतली होती ही बाब स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍यास वाहन दिले नसतांना तक्रारकर्त्‍याकडून कर्जाच्‍या संदर्भात मासिक रक्‍कम स्विकारणे अनुचित व्‍यापार प्रथा आहे असे मंचाचे मत आहे.
      गैरअर्जदाराने लेखी उत्‍तरामध्‍ये तक्रारकर्त्‍याने वाहन उपलब्‍ध आहे की नाही हे पाहणे गरजेचे होते म्‍हटले आहे, गैरअर्जदाराचे सदर कथन मान्‍य करण्‍यायोग्‍य नाही. कारण गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वाहन कर्ज हे गैरअर्जदार क्र. 3 ला देत असतांना वाहनाच्‍या उपलब्‍धतेविषयी ज्‍या व्‍यक्‍तीस कर्ज उपलब्‍ध करुन दिले त्‍या व्‍यक्‍तीस वाहन देण्‍याकरीता उपलब्‍ध आहे किंवा नाही हे पाहणे आवश्‍यक होते असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास वाहन मिळाले नसतांना त्‍याच्‍याकडून वाहन कर्जाची जी वसुली गैरअर्जदारांनी केलेली आहे ती परत मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे.
 
9.    गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याकडून रु.17,400/- वाहन कर्ज खाते बंद करण्‍याकरीता प्री क्‍लोझर अमाऊंट म्‍हणून घेतलेले आहे असे तक्रारकर्त्‍याचे कथन आहे. त्‍याला उत्‍तर देतांना गैरअर्जदाराने सदर रक्‍कम ही इझी फायनांशियल कंपनीचे मालक श्री रमन सवाईथुल यांनी भरले होते व ते गैरअर्जदार व तक्रारकर्त्‍यामधील एजंट होते. परंतू याबाबत गैरअर्जदारांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. याउलट, तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज क्र. 15 वरुन हे स्‍पष्‍ट होते की, सदर रक्‍कम ही तक्रारकर्त्‍याने भरलेली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने ज्‍या कारणाकरीता कर्ज घेतले होते त्‍याची पूर्तता न होताच कर्ज खाते त्‍याने बंद केले आहे. त्‍यामुळे प्री क्‍लोझर अमाऊंट तक्रारकर्त्‍याकडून स्विकारणे अनुचित व्‍यापार पध्‍दती आहे. त्‍यामुळे सदर रक्‍कम मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
10.   गैरअर्जदाराने आपल्‍या लेखी उत्‍तरामध्‍ये तक्रारकर्त्‍याचे आठ कोरे धनादेश देण्‍यास तयारी दर्शविली आहे. परंतू सदर धनादेश देण्‍याबाबत कोणतीही कारवाई केल्‍याचे दस्‍तऐवजावरुन निदर्शनास येत नाही. ही गैरअर्जदारांच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. म्‍हणून तक्रारकर्ता सदर आठ कोरे धनादेश मिळण्‍यास पात्र आहे.
 
11.    तक्रारकर्त्‍याने मानसिक त्रासाबाबत रु.50,000/- ची व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.5,000/- ची मागणी केलेली आहे. मंचाचे मते सदर मागणी ही अवाजवी असून न्‍यायिकदृष्‍टया तक्रारकर्ता मानसिक त्रासाबाबत भरपाई म्‍हणून रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्‍यास पात्र ठरतो.
 
12.   गैरअर्जदार क्र. 3 विरुध्‍द तक्रारकर्त्‍याची कोणतीच मागणी नसल्‍याचे मंच त्‍यांच्‍याविरुध्‍दची तक्रार खारीज करीत आहे. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन व दाखल दस्‍तऐवजावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-‍आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 3 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.
3)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी सदर प्रकरणी सेवेत त्रुटी दिल्‍याचे व अनुचित व्‍यापार      पध्‍दतीचा अवलंब केल्‍याचे घोषीत करण्‍यात    येते.
4)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला      रु.5100/-, रु.4100/- व रु.17,400/- असे एकूण रु.26,600/- आदेशाची प्रत     मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत द्यावे अन्‍यथा, सदर रक्‍कमेवर तक्रार दाखल     दि.19.03.2010 पासून      तर रक्‍कम प्रत्‍यक्ष मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9% दराने व्‍याज देय राहील.
5)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्‍याला मानसिक त्रासाबाबत भरपाई म्‍हणून    रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
6)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्‍याला आठ कोरे धनादेश परत करावे.
7)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30      दिवसाचे आत संयुक्‍तपणे किंवा वैयक्‍तीकपणे करावे.    
 
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT