Maharashtra

Ahmednagar

CC/17/102

Ramesh Ramlal Pimpale - Complainant(s)

Versus

Magic Motors, T.V.S. Credit Services Ltd. - Opp.Party(s)

Jundre

21 Nov 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/102
( Date of Filing : 23 Mar 2017 )
 
1. Ramesh Ramlal Pimpale
A/P. Pathare Bu, Tal- Rahata,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Magic Motors, T.V.S. Credit Services Ltd.
Plot. 1026, Vishal Circle, Bazar Road, Near Damaniya Hospital, Shrirampur Tal- Shrirampur
Ahmednagar
Maharashtra
2. Magic Motors, T.V.S. Credit Services Ltd.
Bristol Towers, South Phase, Thiru-Vi-Ka industrial Estate, Near Master , Guindy, Chennai- 600 032
Chennai
Tamil Nadu
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Jundre , Advocate
For the Opp. Party: P.D. Mhaske , Advocate
Dated : 21 Nov 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – २१/११/२०१९

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.  तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार यांनी दिनांक २७-०२-२०१५ रोजी टीव्‍ही.एस. कंपनीची मोटार सायकल विकत घेतली होती.   त्‍यावेळी तक्रारदार यांनी रोख रक्‍कम रूपये १५,२००/- दिलेले होते. त्‍याबाबतची पावती सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिनांक १५-०२-२०१५ रोजी दिलेली होती.  सदरील वाहनाला रजिस्‍ट्रेशन नंबर एमएच.१७-बीजी-१७२० असा मिळाला असुन तक्रारदार यांनी टी.व्‍ही.एस क्रेडीट या कंपनीचे सदरील वाहनावर कर्ज उतरविलेले होते.  सदर वाहनाचा चेसीस नंबर एमपी६२५सीएफ १बी२७३१९ असा असुन इंजिन नंबर सीएफ१बीएफ१२१५०५६ चावी क्रमांक २५२७ असा आहे. दिनांक २५-०५-२०१५ रोजी तक्रारदार व सामनेवाले यांचेदरम्‍यान गाडीचा कर्ज करारनामा झाला. सामनेवाले यांनी गाडीवर दिलेल्‍या कर्जाचे हप्‍त्‍यावर रक्‍कम रूपये २,४१४/- मात्रचे २४ हप्‍ते देण्‍याचे तक्रारदार यांनी मान्‍य केलेले होते. तक्रारदार यांचे बॅंक खातेमधुन पहिला हप्‍ता दिनांक ०७-०४-२०१५ रोजी वेळेवर कपात करण्‍यात आला.  त्‍यानंतर वेळोवेळी तारीख ०७-०५-२०१५, ०८-०६-२०१५, ०७-०७-२०१५, ०७-०८-२०१५, ०९-०९-२०१५, ०७-१०-२०१५ या तारखेस गाडीचा हप्‍ता सामनेवाले यांना मिळालेला आहे. दिनांक ०७-११-२०१५ रोजीचा हप्‍ता सामनेवाले यांच्‍या शोरूममध्‍ये सामनेवाले यांचा असणारा एजंट नामे शफी शेख यांच्‍याकडे तक्रारदार यांनी रोख स्‍वरूपात जमा केलेला आहे. त्‍यानंतर दिनांक ०७-१२-२०१५, ०७-०१-२०१६, ०८-०२-२०१६ यावेळी सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्‍या बॅंकेतील खात्‍यामुधन कर्मचारी मोरगे व दिनांक ०७-०४-२०१६ रोजी श्री.शेख यांच्‍याकडे हप्‍त्‍याची रक्‍कम रोख स्‍वरूपात जमा केलेली आहे. त्‍यानंतर तक्रारदार यांनी त्‍यांचे खाते असलेल्‍या स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया या खात्‍यातुन सामनेवाले यांनी तारीख १८-०५-२०१६ रोजीचा हप्‍ता घेतलेला आहे. त्‍यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिनांक १९-०७-२०१६ रोजी ओव्‍हर डयु रक्‍कम रूपये ५,७२१/- ची नोटीस दिनांक १९-०७-२०१६ रोजी पाठविलेली आहे. सदरची नोटीस तक्रारदार यांना तारीख २७-०७-२०१६ रोजी मिळालेली आहे. त्‍यानंतर तक्रारदार यांनी दिनांक २६-०८-२०१६ रोजी सामनेवाले यांची नेट ओव्‍हर डयु रक्‍कम रूपये ५,१३५/- आणि एक हप्‍त्‍याची रक्‍कम रूपये २,४१४/- अशी एकुण रक्‍कम रूपये ८,१३५/- ही सामनेवाले यांचे ऑफिसचे एजंट शफी शेख यांचेकडे जमा केलेली आहे. त्‍यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना तुमचे गाडीचा इन्‍शुरन्‍स करावयाचा असे सांगुन सदरील गाडी सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्‍या  ताब्‍यातुन घेतली. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना तुम्‍हाला दोन दिवसांनी गाडी परत मिळेल असे आश्‍वासन दिले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे शब्‍दावर विश्‍वास ठेऊन गाडी सामनेवाले यांच्‍या ताब्‍यात दिली. त्‍यानंतर दिनांक २६-०८-२०१६ रोजी सामनेवाले यांचे शोरूमधील श्री. शेख याने तक्रारदार यांना सरेंडर लेटर तक्रारदार यांच्‍या हातात दिले व तक्रारदार यांना सांगितले की, आता तुमची गाडी हप्‍ते थकल्‍यामुळे कंपनीने जमा केली आहे. असे सांगुन गाडी तक्रारदार यांचे ताब्‍यात देण्‍यास नकार दिला. वास्‍तविक पाहता तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे आजपर्यंत रक्‍कम रूपये ४१,९३१/- जमा केलेले आहेत व रक्‍कम भरलेली आहे. सामनेवालेकडे गाडी जमा केल्‍यामुळे तक्रारदाराचे रक्‍कम रूपये १,५०,०००/- चे नुकसान झालेले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराला योग्‍य ती सेवा दिलेली नाही म्‍हणुन तक्रारदार यांनी सामनेवालेविरुध्‍द सदरचा अर्ज दाखल केला आहे.         

     तक्रारदाराने अशी विनंती केली आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदाराची मोटरसायकल नंबर एमएच-१७-बीजी-१७२० ही तक्रारदार यांचे ताब्‍यात देण्‍याचा आदेश व्‍हावा. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची मोटार सायकल बेकायदेशीररित्‍या त्‍यांचे ताब्‍यात ठेवल्‍याने तक्रारदार यांची मासे विक्री व्‍यवसायासाठी झालेले नुकसान रूपये १,५०,०००/- सामनेवाले यांच्‍याकडुन तक्रारदार यांना मिळावे.  तसेच सामनेवालेकडुन तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई म्‍हणुन रक्‍कम रूपये ५०,०००/- मिळावे व सदर अर्जाचा खर्च मिळावा.

३.   तक्रारदाराने नि.५ सोबत दस्‍तऐवज यादीसोबत खालील कागदपत्रांच्‍या  छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. आर.सी. बुकची दि.१८-०३-२०१५, गाडीची टॅक्‍स भरलेली पावती दि.१७-०३-२०१५, गाडीची कर्ज वगैरे नोंदणीची पावती दि.१६-०३-२०१५, सामनेवालेंना पाठविलेली नोटीस दि.०८-०९-२०१६, मॅजीक मोटर्सची पावती दि.२७-०२-२०१५, गाडी जप्‍त केलेचे पत्र दिनांक २६-०८-२०१६, मॅजीक मोटर्सचे डिलीव्‍हरी चलन दि.२७-०२-२०१५, सामनेवाले कंपनीने पाठविलेले पत्र दि.१९-०७-२०१६, गाडीची इन्‍शुरन्‍स पॉलिसी दि.१०-०३-२०१५, सामनेवाले यांना वकिलामार्फत पाठविलेली रजिस्‍टर्ड नोटीस प्रत दि.१९-०१-२०१७, पोस्‍टाची पावती दिनांक १९-०१-२०१७.  

४.   तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाले यांना मंचातर्फे नोटीस काढण्‍यात आली. त्‍यानुसार सामनेवाले क्र.२ हे मे.मंचात हजर झाले.   सामनेवाले यांनी वकिलामार्फत अर्ज केला व प्रकरणात कैफीयत दाखल करणेसाठी मुदत घेतली. सदर प्रकरणात सामनेवाले क्र.१ हे नोटीस मिळूनही मे.मंचात हजर झाले नाही. म्‍हणुन नि.१ वर त्‍यांचेविरूध्‍द सदर प्रकरण एकतर्फा चालिवणेचा आदेश पारीत करण्‍यात आला व सामनेवाले क्र.२ यांनी कैफीयत दाखल केली नाही म्‍हणुन त्‍यांचे विरूध्‍द ‘म्‍हणणे नाही’ चा आदेश पारीत करण्‍यात आला.  तक्रारदाराने सदर प्रकरणात सर तपासणीचे शपथपत्र दाखल केले आहे. दिनांक १९-११-२०१८ रोजी लेखी युक्तिवाद दाखल करण्‍यात आला.

५.    तक्रारदाराची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र, सर तपासणीचे शपथपत्र तसेच तक्रारदाराने दाखल केलेला युक्तिवाद याचे अवलोकन केले असता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील कारणमिमांसेप्रमाणे देत आहोत.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवा देण्‍यास त्रुटी ठेवली आहे काय ?

नाही

(२)

तक्रारदार हे सामनेवाले यांच्‍याकडुन नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ?

नाही

(३)

आदेश काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमिमांसा

६.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदाराने तक्रारीत नमुद टी.व्‍ही.एस. कंपनीची मोटारसायकल विकत घेतली होती. सदरील मोटारसायकलवर तक्रारदाराने टी.व्‍ही.एस क्रेडीट या कंपनीचे सदरील वाहनावर कर्ज उतरविलेले होते व सदर वाहनाला रजिस्‍ट्रेशन नंबर एमएच.१७-बीजी-१७२० असा मिळाला होता. सदरील तक्रारीत युक्तिवादात नमुद केल्‍यानुसार तक्रारदाराची मोटारसायकलवर सामनेवाले कंपनीचे कर्ज होते व त्‍याबाबत तक्रारदाराने सामनेवाले यांना  बॅंक खात्‍यातुन रक्‍कम अदा केलेली आहे. त्‍यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदारास ओव्‍हर डयु रक्‍कम रूपये ७,२२१/- ची नोटीस पाठवीली होती. तक्रारदाराने ओव्‍हर डयु रक्‍कम रूपये ५,१३५/- आणि एक हप्‍त्‍याची रक्‍कम रूपये २,४१४/- असे एकुण रक्‍कम रूपये ८,१३५/- सामनेवाले यांचे कार्यालयाचे एजंट शफी शेख यांच्‍याकडे जमा केली त्‍यावर सामनेवाले यांनी तक्रारदाराच्‍या गाडीचा इन्‍शुरन्‍स  करावयाचा आहे म्‍हणुन त्‍यांचे तक्रारीतील नमुद मोटारसायकल तक्रारदाराच्‍या  ताब्‍यातुन घेऊन गेला आणि नंतर तक्रारदाराच्‍या गाडीचा हप्‍ता थकल्‍यामुळे कंपनीने जमा केली आहे, असे सांगुन मोटार सायकल तक्रारदाराचे ताब्‍यात देण्‍यास स्‍पष्‍ट नकार दिला, असे तक्रारदाराच्‍या लेखी युक्तिवादात नमुद आहे. तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता नि.५/४ वर सामनेवाले कंपनीने तक्रारदार यास एकुण थकबाकी रूपये २६,१६२/-, अधिकार प्राप्‍ती शुल्‍क रूपये ३,०००/- असे एकुण रूपये २९,१६२/- इतकी रक्‍कम ७ दिवसाच्‍या आत सामनेवाले कंपनीकडे जमा करण्‍याची नोटीस दिली होती, असे दिसुन येते.  निशाणी ५/६ वर दिनांक २६-०८-२०१६ रोजी तक्रारदाराने कर्जासंबंधी थकीत रकमेबद्दल तसेच करारनाम्‍यानुसार अटी व शर्तींचे पालन न केल्‍यामुळे स्‍वतःहुन सदरील गाडी ही तक्रारदाराने सामनेवाले यांचे अधिकारी यांच्‍याकडे स्‍वतःहुन जमा केलेचे नमुद आहे व त्‍यावर तक्रारदाराची सही व पत्‍ता नमुद आहे. या विवेचनावरुन तक्रारदारास सामनेवाले यांनी कुठलीही सेवेत त्रुटी दिली नाही, असे मंचाचे मत आहे. म्‍हणुन मुद्दा क्र.१ चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.       

७.  मुद्दा क्र. (२) : वरील मुद्दा क्रमांक १ वरील विवेचनावरून तक्रारदार हे कुठल्‍याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही, असे स्‍पष्‍ट होते.  म्‍हणुन मुद्दा क्र.२ चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

८.  मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

आदेश

१. तक्रारकर्ताची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

 

२. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

३. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 

४. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.