(मा.सदस्या सौ.व्ही.व्ही दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून त्यांनी अर्जदार यांचेकडून कर्जाव्यतिरीक्त जादा घेतलेली रक्कम रु.2,06,353/- परत मिळावी व त्यावर 18 टक्के दराने व्याज मिळावे, अर्जदारकडे कुठलीही थकबाकी नाही असे जाहीर होवून मिळावे, अर्जदार यांची गाडी जप्त करण्यापासून सामनेवाला यांना प्रतिबंध करण्यात यावा, शारिरीक, मानसिक व नोटीस खर्चापोटी रु.1,00,000/- मिळावेत व अर्जाचे खचापोटी रु.10,000/- मिळावेत यासाठी अर्जदार यांनी हा तक्रार अर्ज या मंचासमोर दि.20/07/2011 रोजी दाखल केलेला आहे.
अर्जदार यांचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे दाखल करुन घेण्यास पात्र आहे काय? याबाबत अर्जदार यांचे म्हणणे ऐकून घेण्यात यावे असे आदेश दि.21/07/2011 रोजी करण्यात आलेले आहेत.
तक्रार क्र.170/2011
याकामी अर्जदार यांचेवतीने अँड.आय.वाय.पटेल यांनी युक्तीवाद केलेला आहे.
अर्जदार यांनी नि.1 लगत तक्रार अर्ज, नि.2 लगत प्रतिज्ञापत्र, नि.4 चे यादीसोबत नि.4/1 ते नि.4/4 लगत कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती हजर केलेल्या आहेत.
अर्जदार यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामधील कथन व नि.4/1 ते नि.4/4 लगतची सर्व कागदपत्रे यांचे अवलोकन करता, अर्जदार यांचे कथनानुसार सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांनी ट्रक खरेदीसाठी जे कर्ज घेतले होते त्या कर्जाचे हप्त्यापोटी संपुर्ण रक्कम अर्जदार यांनी जमा केलेली आहे व आता अर्जदार यांचे हिशेबानुसार त्यांनी सामनेवाला यांचेकडे कर्जाव्यतिरीक्त जी तथाकथीत जादा रक्कम रु.2,06,353/- इतकी भरलेली आहे. ती रक्कम परत वसूल होवून मिळावी अशी मागणी केलेली आहे हे स्पष्ट होत आहे.
तक्रार अर्ज कलम 11 क व ड यामधील मागणीचा विचार करता अर्जदार हे सामनेवाला यांचेविरुध्द डिक्लेरेशन स्वरुपाची मागणी मागत आहेत हेही स्पष्ट होत आहे. दिवाणी दाव्यामध्ये जी दाद मागावयाची असते त्याप्रमाणे दाद अर्जदार हे अर्जदार हे अर्जदार हे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार या मंचासमोर मागणी करीत आहेत.
वास्तविक अर्जदार यांनी कर्जाऊ रक्कम घेतलेली आहे. नि.4/4 लगत अर्जदार यांनी सामनेवाला यांचे जे हप्त्याबाबतचे स्टेटमेंट हजर केलेले आहे त्यानुसारच अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे योग्य त्यावेळी योग्य त्या रकमा भरणे गरजेचे होते. जादा रक्कम भरण्याची कोणतीही गरज अर्जदार यांना नव्हती व नाही.
अर्जदार यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामधील कथन व तक्रार अर्ज विनंती कलम 11 मधील सर्व मागण्या याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेविरुध्द रकमेच्या हिशेबाबाबत दाद मागत आहेत व रक्कम वसूल करुन मागत आहेत असे दिसून येत आहे.
अर्जदार यांना सामनेवाला यांनी जी सेवा दिलेली आहे त्यामध्ये त्रुटी आहेत व त्याबाबत अर्जदार हे दाद मागत आहेत असा कोणताही उल्लेख अर्जदार यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामध्ये कोठेही दिसून येत नाही.
वरील प्रमाणे सर्व कारणांचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे दाखल करुन घेण्यास पात्र नाही असे या मंचाचे मत आहे.
तक्रार क्र.170/2011
जरुरतर अर्जदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द योग्य त्या दिवाणी कोर्टामध्ये दाद मागावी असेही या मंचाचे मत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.
1 (2011) सि.पी.जे. महाराष्ट्र राज्य आयोग. पान 55.(पॅरा.4) दयाराम भिका
अहिरे नाशिक. विरुध्द कोटक महिंद्र बँक लि.शाखा नाशिक.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद, वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.