(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.41,000/-मिळावेत, शारिरीक, मानसिक, आर्थीक त्रासाबद्दल रु.1,00,000/- मिळावेत, तक्रारीचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी पान क्र.26 लगत लेखी म्हणणे व पान क्र.27 प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.3 यांनी पान क्र.46 लगत पुरसीस दाखल करुन सामनेवाला क्र.1 व 2 यांचा जबाब मान्य केलेला आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
तक्रार क्र.142/2011
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे
काय?- नाही.
3) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार यांनी पान क्र.48 लगत लेखी युक्तिवाद सादर केलेला आहे. सामनेवाला यांनी पान क्र.47 लगत लेखी युक्तिवाद सादर केलेला आहे
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांचे नावे व सामनेवाला क्र.3 यांचे नावे सामनेवाला क्र.1 शाखेत सेव्हींग खाते क्र.18194 उघडलेले आहे व हे खाते दोघापैकी एकाने असे आहे.” असे म्हटलेले आहे. अर्जदार यांनी पान क्र.6 लगत सेव्हींग खाते क्र.18194 चे मुळ अस्सल पासबुक दाखल केलेले आहे. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व पान क्र.6 लगतचे पासबुक यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचे खात्यावरुन दि.18/08/2009 रोजी रु.41,000/- काढण्यात आल्याचे दर्शवलेले आहे परंतु अशी कोणतीही रक्कम अर्जदार यांनी काढलेली नाही किंवा तथाकथीत अग्नीदेवी मंदीराचे नावे धनादेशाद्वारे दिलेली नाही असे कथन अर्जदार यांनी केलेले आहे व त्याबाबतच अर्जदार यांनी या कामी दाद मागितलेली आहे.
अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्ज कलम 3 मध्येच “खाते क्र.18194 हे खाते सन 1995 पासून आहे. या खात्यावर सामनेवाला क्र.3 यांचेदेखील खातेदार म्हणून नाव दाखल असल्याने त्यांना या तक्रारीत पक्षकार म्हणून सामिल केलेले आहे.” असा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच सामनेवाला क्र.3 हे सेव्हींग खाते क्र.18194 मध्ये संयुक्त खातेदार होते ही बाब अर्जदार यांना माहिती होती. परंतु अर्जदार यांनी पान क्र.48 लगत जो लेखी युक्तिवाद दिलेला आहे, त्या लेखी युक्तिवादामधील पान क्र.2 परिच्छेद क्र.5 मध्ये अर्जदार यांनी “अर्जदाराने सामनेवाला क्र.2 या बँकेत जे खाते ठेवलेले आहे ते एकटयाचे नावे उघडलेले असून खाते उघडण्याचे नमुन्यात तशी नोंद आहे.” असा उल्लेख केलेला आहे. तक्रार अर्ज कलम 3 व लेखी युक्तिवाद कलम 5 मधील अर्जदार यांचे कथन हे एकमेकाविरुध्द आहे.
तक्रार क्र.142/2011
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार व सामनेवाला क्र.3 यांनी दि.29/06/2005 रोजी खाते उघडण्याचा फार्म भरुन दिलेला आहे, त्याप्रमाणे खाते क्र.18194 उघडलेले आहे. दोघापैकी एकाने खात्याचा वापर करण्याचा आहे. खाते उघडण्याच्या फार्मवर दोघांच्या सहया घेण्यात आलेल्या आहेत. दोघांचे स्पेसिमन सिग्नेचर घेण्यात आलेल्या आहेत. सामनेवाला क्र.3 यांनी दि.04/06/2009 रोजी नवीन पासबुक मागितले, त्यांना डुप्लिकेट पासबुक दिलेले आहे. तसेच दि.20/06/2009 रोजीचे चेकबुक गहाळ झाल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांना दि.18/08/2009 रोजी त्यांचे मागणीवरुन एक लुज चेक देण्यात आलेला आहे. डुप्लिकेट पासबुकवर सर्व नोंदी केलेल्या आहेत. सामनेवाला क्र.3 यांनी दि.20/07/2009 रोजी सेव्हींग खात्यावरुन चेक क्र.890458 रक्कम रु.41,000/- काढलेली आहे. त्यानंतर दि.18/08/2009 रोजी सामनेवाला क्र.3 यांनी चेक क्र.625341 द्वारे रु.41,000/- अग्नीमाता देवी ट्रस्ट सिन्नर या नावे चेक दिलेला आहे व चेकवर स्वतःची स्वाक्षरी केली आहे, या चेकची रक्कम अग्नीमाता देवी मंदिर ट्रस्ट सिन्नर यांचे नावे वर्ग झाली आहे, ही संपुर्ण कारवाई सामनेवाला यांनी बँकेच्या नियमानुसार केलेली आहे.” असे म्हटलेले आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.30 ते 41 लगत अर्जदार यांचे सेव्हींग खात्याबाबत सर्व कागदपत्रे व खाते उतारा, लेजर एक्स्ट्रॅक्ट हजर केलेले आहेत. यामधील पान क्र.30 लगतचे खाते उघडण्याचे परवानगीचे अर्जावर दोघांच्या सहया आहेत व दोघापैकी पैसे काढण्याचा अधिकार एकास असा उल्लेख आहे पान क्र.31 चे कागदपत्रावर दोघांच्या सहया आहेत असे स्पष्ट दिसून येत आहे. पान क्र.39 नुसार सामनेवाला क्र.3 यांनी चेक क्र.625341 अन्वये अग्नीमाता देवी मंदिर ट्रस्ट सिन्नर यांचे नावे रु.41,000/- चेक दि.18/08/2009 रोजी दिलेला आहे व हा चेक वटलेला आहे ही बाब पान क्र.40 चे लेजर वरील दि.18/08/2009 रोजीच्या नोंदीने स्पष्ट झालेली आहे. तसेच सामनेवाला क्र.3 यांनी पान क्र.45 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले असून चेक क्र.625341 ने अग्नीमाता मंदिर ट्रस्टला रु.41,000/- देणगी दिली आहे हे मान्य केले आहे.
वरील सर्व कागदपत्रांचा व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून दि.18/08/2009 रोजीचे रु.41,000/- ची जी रक्कम परत मागत आहेत त्या रकमेबाबत सामनेवाला क्र.3 यांनी दिलेल्या चेक प्रमाणेच सामनेवाला क्र.1 व 2 यांनी बँकेचे नियमानुसार योग्य तीच कारवाई केलेली आहे व सामनेवाला क्र.3 यांनीच चेक वटवलेला आहे ही बाब स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता
तक्रार क्र.142/2011
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी दि.18/08/2009 रोजीचे रु.41,000/- चे व्यवहाराबाबत बँकेचे नियमानुसार योग्य तीच कार्यवाही केलेली आहे व त्या योगे सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे व लेखी युक्तिवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे व लेखी युक्तिवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.