Maharashtra

Gadchiroli

EA/11/5

Manohar Lalaji Sande - Complainant(s)

Versus

Madhukar Kishan Nandanwar - Opp.Party(s)

Adv. Shende

28 Nov 2011

ORDER

 
Execution Application No. EA/11/5
 
1. Manohar Lalaji Sande
Gokulnagar, Ward No. 23, Gadchiroli
Gadchiroli
Maharastra
...........Appellant(s)
Versus
1. Madhukar Kishan Nandanwar
Gakul nagar, Ward No. 16, GAdchiroli
Gadchiroli
Maharastra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Shri. A. N. Kamble PRESIDENT
 HONORABLE Shri. R. L. Bombidwar Member
 
PRESENT:
 
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष (प्रभारी))

       (पारीत दिनांक : 28 नोव्‍हेंबर 2011)

 

1.        अर्जदाराने, सदर दरखास्‍त ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 अन्‍वये मंचाने दिलेल्‍या आदेशाची अंमलबजावणी होऊन, गैरअर्जदाराकडून रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍याबाबत दाखल केली आहे.  अर्जदाराने, गैरअर्जदाराचे विरुध्‍द ग्राहक तक्रार क्र. 34/2010 दाखल केली.  सदर तक्रारी मध्‍ये अंतिम आदेश 29 जानेवारी 2011 ला पारीत करुन तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात आली.  गैरअर्जदाराने, पारीत केलेल्‍या आदेशाचे पालन केले नाही, त्‍यामुळे गैरअर्जदाराची जंगम मालमत्‍ता जप्‍तकरुन आदेशानुसार एकुण रुपये 66,000/- व्‍याजासह मिळवून द्यावे, अशी मागणी केली आहे. 

 

2.            अर्जदाराची दरखास्‍त नोंदणी करुन, गैरअर्जदारास नोटीस काढण्‍यात आले.  गैरअर्जदारास नोटीस तामील झाल्‍याचा अहवाल नि.19 वर प्राप्‍त.  गैरअर्जदार हजर होऊन

 

... 2 ...                (चौ.अ.क्र.5/2011)

 

आदेशाची पुर्तता करण्‍यास वेळ मिळण्‍याबाबत अर्ज नि.10 नुसार सादर.

3.          अर्जदाराने दरखास्‍त सोबत गैरअर्जदार यांचे मोटार सायकल (टु व्हिलर), दिवाण पलंग 2 नग, सोफा सेट 1 नग, गोदरेज आलमारी 2 नग, लाकूड आलमारी 2 नग, कुलर डेझर्ट 2 नग, व घरबांधकाम करावयासाठी सेट्रींग सामान जप्‍त करुन, आदेशानुसार रक्‍कम वसूल करण्‍यात यावी.  जंगम जप्‍तीची यादी निशाणी 8 वर दाखल आहे.

 

4.          अर्जदाराने, ग्राहक तक्रार क्र. 34/2010 आदेश दि. 29/1/2011 च्‍या आदेशानुसार रक्‍कम मिळवून देण्‍यात यावी, अशी मागणी केली आहे.  ती मागणी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 25 (3) नुसार मंजुर करण्‍यास पाञ आहे. अर्जदारास, आदेशानुसार रक्‍कम मिळण्‍याकरीता ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 25 नुसार कारवाई होणे आवश्‍यक आहे.  गैरअर्जदार मधुकर किसन नंदनवार याचेवर वसूलीची कारवाई करुन, गैरअर्जदार यांची चल अचल मालमत्‍ता जप्‍त करुन, आदेशाचे पालन होणे न्‍यायोचीत होईल.  याकरीता, गैरअर्जदार यांची मालमत्‍ता जिल्‍हाधिकारी गडचिरोली यांनी जप्‍तीची कारवाई करुन, अर्जदारास आदेशीत रक्‍कम मिळवून द्यावे.  त्‍याकरीता, वसूली प्रमाणपञ जिल्‍हाधिकारी गडचिरोली यांना पाठविणे न्‍यायोचीत होईल, असे या न्‍यायमंचाचे मत आहे. 

 

5.          प्रस्‍तुत प्रकरणात दिनांक 29/1/2011 च्‍या आदेशाचे पालन होण्‍याकरीता, गैरअर्जदार यांचे मोटार सायकल टु व्हिलर, दिवाण पलंग 2 नग, सोफा सेट 1 नग, गोदरेज आलमारी 2 नग, लाकूड आलमारी 2 नग, कुलर डेझर्ट 2 नग, व घरबांधकाम करावयासाठी सेट्रींग सामान, इत्‍यादी साहित्‍य महाराष्‍ट्र लॅन्‍ड रेव्‍हन्‍यु कोडच्‍या तरतुदी नुसार राजस्‍व वसूली कारवाई प्रमाणे (as a revenue  recovery) जप्‍ती करुन, आदेशीत रक्‍कम जिल्‍हाधिकारी गडचिरोली यांनी अर्जदारास मिळवून देणे क्रमप्राप्‍त आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍यामुळे, अर्जदाराची दरखास्‍त ग्राहक संरक्षण कायद्याचे 25(3) नुसार मंजूर करुन, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

//  अंतिम आदेश  //

 

(1)   अर्जदाराची दरखास्‍त मंजूर.

 

(2)   जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी गैरअर्जदार यांचेकडून ग्राहक तक्रार क्र.34/2010 आदेशाप्रमाणे रक्‍कम व्‍याजासह वसूल करुन अर्जदारास द्यावे.

 

(3)   जिल्‍हाधिकारी, गडचिरोली यांनी वसूल केलेली रक्‍कम अर्जदारास द्यावे व त्‍याचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

 

 

... 3 ...                (चौ.अ.क्र.5/2011)

 

(4)   प्रबंधक यांनी या आदेशाची प्रत, ग्राहक तक्रार क्र. 34/2010 आदेश दिनांक 29/1/2011 ची प्रत आणि दरखास्‍त अर्जाची प्रत जिल्‍हाधिकारी गडचिरोली यांना वसूली कारवाईकरीता पाठविण्‍यात यावे.

 

(5)   अर्जदार व गैरअर्जदार यांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 

     

गडचिरोली.

दिनांक :- 28/11/2011.

 
 
[HONORABLE Shri. A. N. Kamble]
PRESIDENT
 
[HONORABLE Shri. R. L. Bombidwar]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.