जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 282/2008. प्रकरण दाखल तारीख - 20/08/2008 प्रकरण निकाल तारीख - 17/10/2008 समक्ष – मा.श्री.बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य न्यू इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. मार्फत प्रशासकीय अधिकारी सौ. शारदा अशोकराव मांडवेकर, लाहोटी कॉम्ल्पेक्स अर्जदार. रा. प्रभात टॉकीजजवळ, नांदेड जि. नांदेड. विरुध्द. 1. माधव शंकरराव कलहाळे वय, 35 वर्षे, धदा, नौकरी रा.गोपाळवाडी सिडको, नांदेड 2. शाखाधिकारी, आय.डी.बी.आय. बँक, (युनायटेड वेस्टर्न बँक) आर.टी. नाईक बिल्डींग, गैरअर्जदार कूरुळ ता. कंधार जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. एस.व्ही. राहेरकर. गैरअर्जदार तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.सतीश सामते, अध्यक्ष (प्र.) ) अर्जदार न्यू इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे विरुध्द तक्रार अर्ज दाखल केलेला आहे व ग्राहक प्रकरण क्र.27/2008 यामध्ये झालेला निकाल हा एकतर्फी निकाल रदद करुन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन परत निकाल दयावा अशा प्रकारचे रिव्हीजन पिटीशन दाखल केलेले आहे. मंचाने अशा प्रकारचे रिव्हीजन पिटीशन दाखल करता येते काय या मूददयावर यूक्तीवादासाठी हे प्रकरण ठेवण्यात आले असताना अर्जदार यांनी वकिलामार्फत यावर यूक्तीवाद केला. परंतु दि.7.7.2008 रोजी प्रकरण नंबर 27/2008 यांचा निकाल देण्यात आलेला असून हे प्रकरण तक्रार व उपलब्ध कागदपञानुसार मेरिटवर निकालात काढलेले आहे. त्यामूळे मूळ प्रकरणात गैरअर्जदार असलेले व दाखल प्रकरणात अर्जदार असलेले यांना नोटीस तामील होऊन ते हजर झाले नाही. त्यामूळे एकतर्फी आदेश करुन निकाल देण्यात आला व अर्जदारांनी त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिलेली असताना त्यांचा उपयोग केला नाही. आता त्यांनी जे रिव्हीजन पिटीशन दाखल केलेले आहे. Review As per CPA 1986 amendment Act, 2002 Sec.22.A only National Commission has power to review- expart orders. Consumer Fora/ State Commission not empowered to to review its own final orders- Harish Chadda Vs. New India Insurance Company CJP vol. (II) National CDRC-195 वरील केसेसचा आधार घेऊन हे स्पष्ट केले आहे की, रिव्हीजन पिटीशन दाखल करुन घेण्याचा अधिकार हा फक्त नॅशनल कमीशन लाच आहे, ग्राहक मंच/राज्य आयोगाला नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा रिव्हीजन पिटीशनचा अर्ज नामंजूर करण्यात येतो. 2. पक्षकारानी खर्च आपआपला सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |