जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
तक्रार दाखल दिनांक : 17/03/2010.
आदेश पारीत दिनांक : 31/08/2010.
ग्राहक तक्रार क्रमांक : 129/2010.
सूर्यकांत गोवर्धन शेळके, वय 45 वर्षे, व्यवसाय : शेती
व व्यापार, रा. सुर्डी, ता. बार्शी, जि. सोलापूर. तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांक : 130/2010.
सौ. उर्मिला सूर्यकांत शेळके, वय 41 वर्षे, व्यवसाय : घरकाम
व व्यापार, रा. सुर्डी, ता. बार्शी, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. कै. श्रीकांत पाटील माढा तालुका ग्रामीण बिगरशेती सहकारी
पतसंस्था मर्या., धानोरे, ता. माढा, जि. सोलापूर, शाखा : मालवंडी.
(याचे समन्स विरुध्द पक्ष क्र.2 यांचेवर बजावावे.)
2. श्री. पांडुरंग साहेबराव पाटील, वय सज्ञान, व्यवसाय : शेती
व पतसंस्था, रा. धानोरे, ता. माढा,
हल्ली मु. मानेगाव, ता. माढा, जि. सोलापूर.
3. श्री. भारत नागनाथ देशमुख, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. धानोरे, ता. माढा, जि. सोलापूर.
4. श्री. सुखदेव शंकर मगर, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. धानोरे, ता. माढा, जि. सोलापूर.
5. श्री. गोविंदराव भागवत देशमुख, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. धानोरे, ता. माढा, जि. सोलापूर.
6. श्री. पोपट साहेबराव पाटील, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. धानोरे, ता. माढा, जि. सोलापूर.
7. श्री. चांगदेव बोधा दावते, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. धानोरे, ता. माढा, जि. सोलापूर.
8. सौ. कमल पांडुरंग पाटील, वय सज्ञान, व्यवसाय : घरकाम,
रा. धानोरे, ता. माढा, जि. सोलापूर. ह.म. मानेगाव, ता. माढा. विरुध्द पक्ष
9. जैनुद्दीन जमादार, वय सज्ञान, व्यवसाय : पतसंस्था,
रा. मालवंडी, ता. बार्शी, जि. सोलापूर.
10. सचिन दिगंबर क्षीरसागर, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
व पतसंस्था, रा. मालवंडी, ता. बार्शी, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष
कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य
सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : रविंद्र आर. शेळके
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एन.के. तांबिले
आदेश
सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :-
1. उपरोक्त दोन्ही तक्रारीतील विषय, विरुध्द पक्ष व त्यांचे म्हणणे एकसारखे असल्यामुळे त्यांचा एकत्रित निर्णय देण्यात येत आहे.
2. तक्रारदार यांची अशी तक्रार आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या मालवंडी शाखेमध्ये त्यांनी अनुक्रमे मुदत ठेव व आवर्तक ठेवीमध्ये खालीलप्रमाणे रक्कम गुंतवणूक केलेली आहे.
ग्राहक तक्रार क्रमांक | ठेवीदाराचे नांव | खाते क्रमांक | पावती क्रमांक | ठेवीची रक्कम (रुपयात) | ठेव तारीख | मुदत संपल्याची तारीख |
129/ 2010 | सूर्यकांत गोवर्धन शेळके | 153 | 1844 | 50,000 | 18/8/08
| 19/2/09 |
-''- | 153 | 1828 | 50,000 | 16/7/08 | 17/9/09 |
130/2010 | उर्मिला सूर्यकांत शेळके | 34 | अवर्तक ठेव | 12,000 | 26/3/07 | 27/3/12 |
2. तक्रारदार यांनी गुंतवणूक केलेल्या मुदत ठेवीवर द.सा.द.शे. 14 टक्के व्याज दर देय आहे. तक्रारदार यांना मुदत संपल्यानंतर ठेव रक्कम परत करण्यास विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ केली आहे. तसेच वारंवार पाठपुरावा करुनही ठेव रक्कम परत मिळालेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केलेली आहे.
3. विरुध्द पक्ष क्र.2 हे मंचासमोर हजर झाले. तसेच इतर विरुध्द यांनी म्हणणे दाखल न केल्यामुळे व मंचासमोर हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. तसेच 'सामनेवाला तर्फे लेखी म्हणणे' असे संदिग्ध नमूद करुन रेकॉर्डवर लेखी म्हणणे दाखल करण्यात आले असले तरी त्यावर कोणत्याही विरुध्द पक्ष यांची स्वाक्षरी नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी एकतर्फा आदेश रद्द करवून घेऊन म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे सदरचे लेखी म्हणणे न्यायाचे दृष्टीने विचारात घेता येऊ शकत नाही.
4. तक्रारदार यांची व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. तक्रारदार ठेव रक्कम परत मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. आदेश काय ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
5. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारदार यांनी मुदत/आवर्तक ठेवीद्वारे विरुध्द पक्ष पतसंस्थेमध्ये रक्कम गुंतवणूक केल्याचे रेकॉर्डवर दाखल ठेव पावत्या व आवर्तक ठेव पासबूकावरुन निदर्शनास येते.
6. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार ठेव पावतीची मुदत संपल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी त्यांना ठेव रक्कम व्याजासह दिलेली नाही. तसेच आवर्तक ठेव पासबुकाप्रमाणे रक्कम मागणी करुनही त्यांना परत देण्यात आलेली नाही.
7. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावती व आवर्तक ठेव खात्यामध्ये गुंतविल्याचे रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांवरुन निदर्शनास येते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव व आवर्तक ठेव खात्यामध्ये रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतल्याचे स्पष्ट आहे. तक्रारदार यांच्या मागणीनुसार मुदतीनंतर किंवा मुदतपूर्व ठेव रक्कम परत करणे विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना मुदत ठेव व आवर्तक ठेव रक्कम परत न करुन सेवेत त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारदार ठेव रक्कम व्याजासह मिळविण्यास पात्र ठरतात, या मतास आम्ही आलो आहोत.
8. विरुध्द पक्ष क्र.9 हे पतसंस्थेचे मॅनेजर व विरुध्द पक्ष क्र.10 हे कॅशिअर आहेत. तक्रारदार यांची ठेव रक्कम परत करण्याबाबत त्यांची जबाबदारी निश्चित झाल्याशिवाय त्यांना ठेव रक्कम परत करण्याबाबत जबाबदार धरता येत नाही. सबब, विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेसह विरुध्द पक्ष क्र.2 चेअरमन व विरुध्द पक्ष क्र.3 ते 8 संचालक तक्रारदार यांची ठेव रक्कम परत करण्यास जबाबदार आहेत.
9. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. ग्राहक तक्रार क्र.129/2010 मध्ये विरुध्द पक्ष क्र.1 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना ठेव पावती क्र.1844 अन्वये गुंतवणूक केलेली रक्कम रु.50,000/- दि.18/8/2008 पासून द.सा.द.शे. 14 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.
2. ग्राहक तक्रार क्र.129/2010 मध्ये विरुध्द पक्ष क्र.1 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना ठेव पावती क्र.1828 अन्वये गुंतवणूक केलेली रक्कम रु.50,000/- दि.16/7/2008 पासून द.सा.द.शे. 14 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.
3. ग्राहक तक्रार क्र.130/2010 मध्ये विरुध्द पक्ष क्र.1 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना आवर्तक ठेव खाते क्र.34 मध्ये जमा असलेली रक्कम रु.12,000/- दि.8/4/2009 पासून द.सा.द.शे. 14 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.
4. विरुध्द पक्ष क्र.1 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रत्येकी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
(सौ. संगिता एस. धायगुडे÷)
अध्यक्ष
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/31810)
|
[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER |