जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –137/2010 तक्रार दाखल तारीख –01/09/2010
चांदमल जयनारायण जांगिड
वय 55 वर्षे धंदा व्यापार .तक्रारदार
रा.गढी रोड, माजलगांव ता.माजलगांव जि.बीड
विरुध्द
1. मा.शाखाधिकारी,
दि न्यु इंडिया इन्शुरंन्स कंपनी लि.
कार्यालय साठे चौक, बीड .सामनेवाला
2. (एस.डी.देशमुख,
एजंट, दि न्यू इंडिया इन्शुरंन्स कंपनी लि.
कार्यालय साठे चौक, बीड,
ह.मु.जायकवाडी कॉलनी गेवराई ता.गेवराई जि.बीड.
3. रॉबर्ट रॉडरीजीअस, सर्व्हेअर अण्ड लॉस अँसेसर,
दि न्यु इंडिया इन्शुरंन्स कंपनी लि. सामनेवाला क्र.2 व 3
कार्यालय साठे चौक, बीड ) ता.28.02.2011 चे
आदेशानुसार नांव कमी.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.व्ही.एम.कासट
सामनेवाले क्र.1 तर्फे :- अँड.बी.बी.नामलगांवकर
सामनेवाले क्र.2 व 3 तर्फे ः- कोणीही हजर नाही.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची माजलगांव गढी रोडवर बालाजी सॉ मिल सर्व्हे नबर 384 मध्ये होती. दि.11.2.2009 रोजी पहाटे 3 वाजण्याचे सुमारास सदर सॉ मिलला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. त्या लगत माऊली फर्निचर असल्याने दोन्ही फर्म एकाच वेळी जळून खाक झाले. त्यांची फिर्याद तक्रारदाराने पोलिस स्टेशन माजलगांवला दिलेली आहे.
तहसीलदार माजलगांव मार्फत मंडळ अधिकारी यांनी तसेच वन विभागाचे अधिकारी यांनी दि.13.02.2009 रोजी पंचनामा केला.तक्रारदारांनी सदर सॉ मिलचा विमा पूर्वीच सामनेवाला क्र.2 मार्फत उतरविला होता. त्यानुसार सर्व कागदपत्राची पूर्तता तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 मार्फत सामनेवाला क्र.1कडे केली. त्यानंतर सामनेवाला क्र.2 यांनी दि.19.06.2009 ला त्यापूर्वी दि.28.02.2009 व दि.14.05.2009 रोजीला पत्र देऊन त्यानुसार वेळोवेळी त्या पत्रासोबत उत्तरे व कागदपत्राची पूर्तता तक्रारदाराने केली.
सॉ मिल जळाल्याने तक्रारदाराचे नूकसान झाले. दि.16.3.2009 रोजी विद्यूत निरिक्षक विभाग बीड यांनी आग उपरोक्त कारणाने लागल्याचे मान्य करुन लेखी पत्र तक्रारदारांना दिले.
गेल्या दोन महिन्यापासून तक्रारदार सामनेवाला क्र.3 ला भेटला असता त्यांनी 8 ते 10 दिवस थांबा असे सांगितले. त्यानंतर दि.26.05.2010 रोजीला सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना पत्र देऊन कागदपत्राची मागणी केली. सामनेवाला यांचे सदरचे वर्तन हे खोडसाळ व विलंब करणे करिता नोटीस देत आहे.
त्यानंतर 10-12 दिवसापूर्वी तक्रारदार सामनेवाला क्र.3 ला भेटला असता असंबध्द व उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. तेव्हा सामनेवाला क्र.3 यांनी पण अचूक उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदाराचे जवळपास रु.19,43,000/- चे नूकसान झालेले आहे. त्यामुळे तक्रारदाराची मानसिकता खचली आहे. तक्रारदाराचे उपरोक्त सामनेवाला क्र.1 कडे चालू असलेल्या प्रकरणामधील नूकसान भरपाईची रक्कम व विमा पॉलिसीची रक्कम लवकरात लवकर मिळावी तसेच खर्च, मानसिक त्रास मिळून रु.5,000/- देण्या बाबत आदेश व्हावेत.
विनंती की, तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कडून तक्रारीत दर्शवल्याप्रमाणे विमा रक्कम, तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दि.06.03.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत.
सॉ मिलला कथाकथीत लागलेल्या आगीत नूकसान झालेले आहे. सामनेवाला यांनी ताबडतोब सर्व्हेअर श्री.रॉबर्ट रॉड्रीग्जस यांची नियूक्ती केली. त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. प्रत्यक्ष स्टॉक व मागितलेला स्टॉक यांची पाहणी केली व त्यानंतर तक्रारदाराकडे कागदपत्राची मागणी केली. तक्रारदारांनी सर्व्हेअर यांनी मागणी केलेली कागदपत्रे दिली नाहीत. यासाठी सर्व्हेअर यांनी तक्रारदारांना दि.11.02.2009, 28.02.2009, 24.03.2009, 14.05.2009, 19.06.2009, 10.08.2009, या दिनांकाना पत्र पाठविले. सामनेवाला यांनी तक्रारदारांना वरील पत्रातील कागदपत्रे न मिळाल्याने त्यांचा दावा नो क्लेम करण्यात येत असल्या बाबतचे पत्र दिले. शेवटी तक्रारदाराने दि.07.02.2010 रोजी दावा अर्ज घटनेच्या दिनांकानंतर एक वर्षाने दाखल केला.
दि.30.04.2010 रोजीच्या पत्राअन्वये सामनेवाला यांनी तक्रारदारांना
दूस-या विमा बाबतची माहीती का लपवून ठेवली आणि कागदपत्रे वेळेवर का दाखल केली नाही तसेच 2-4 अकाऊटचे वेगवेगळे अकाऊटस नूकसानी बाबत बॅलेन्स शिट माऊली ट्रेडींग कंपनी, सेल टॅक्स, इनकम टॅक्स रिटर्न का दाखल केले नाहीत याबाबत विचारणा केली. दि.18.05.2010 रोजी तक्रारदारांना सदरचे पत्र मिळाले. सदर पत्रात तक्रारदारांनी नमूद केलेली कारणे योग्य व बरोबर नाहीत. दूस-या कंपनीचा विमा असल्याची माहीती तक्रारदारांनी उघड केली नाही.यावरुन स्पष्ट होते की, दोन्ही विमा कंपनीकडून तक्रारदारांना रक्कम हडप करावयाची आहे. त्यामुळे एक वर्षाचे कालावधीपर्यत तक्रारदार हे सामनेवालेकडे आले नाहीत. दि.26.05.2010 रोजी या सामनेवाला यांनी पत्र पाठविले. तक्रारदारांनी दि.07.06.2010 रोजी त्यांचे उत्तर दिले. त्यात नमूद केलेले काम विश्वासार्ह नाही. नंतर सर्व्हेअर यांचे कागदपत्रावरुन चौकशी सुरु केली असता सर्व्हेअर यांना माहीती मिळाली की विमेदाराने सॉ मिल या नांवाचा दूसरा विमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून घेतलेला आहे. सदर कंपनीने रु.3,74,100/- चा विमा डिसचार्ज व्हाऊचरने रक्कम दिलेली आहे.
दावा अर्जाचे संदर्भात चौकशी केली असता ट्रेंडीग अकाऊट दि.1.4.2008 ते 11.02.2009 या कालावधीचे श्री.ए.एम.विरागकर यांनी तयार केले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या दावा अर्जासोबतच्या कागदपत्रामध्ये वरील कालावधीचे अकाऊट श्री.जी.बी.कासट यांनी तयार केलेले आहे. यांचाच अर्थ श्री. कासट यांचेकडून तक्रारदारांनी खोटे अकाऊट रक्कम हडप करण्याचे दृष्टीने तयार करुन घेतले. तक्रारदाराचे वर्तन शंकास्पद वाटले. सर्व्हेअर यांचे भेटीनंतर तक्रारदारांनी 15 दिवसांचे आंत प्रस्ताव अर्ज दाखल करावयास पाहिजे होता परंतु त्यांनी तो एक वर्षानंतर ओरिएटंल इन्शुरन्स कंपनीकडून नूकसान भरपाई मिळाल्यानंतर दाखल केला. क्लेम अर्जातील कलम 7 उदा.विमा कंपनीकडून आगीचे संदर्भात जोखीम घेण्यात आल्याचा तपशिल. या कलमात तक्रारदारांनी नाही असे उत्तर दिलेले आहे. यांचाच अर्थ तक्रारदारांनी खोटी विधाने करुन दावा अर्ज दाखल केलेला आहे.
नंतर दि.07.02.2010 रोजी सर्व्हेअर यांनी तपासणी केली आणि त्यांचा अहवाल दि.31.03.2010 रोजी दाखल केला. सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांची वरील कृती बाबत विचारले असता तक्रारदारांनी दि.07.06.2010 रोजी दिलेले उत्तर विश्वासहार्य नाही. तक्रारदारांनी नूकसान भरपाईची रक्कम रु.19,43,000/- ची मागणी केलेली आहे.यांचाच अर्थ तक्रारदाराचा व्यवसाय एक करोडचा आहे. त्या संदर्भात तक्रारदारांनी आयकर भरल्याचे विवरण पत्र तक्रारदाराने दाखल केलेले नाहीत.
सर्व्हेअर यांचे अहवालातील निरिक्षणावरुन दोन वेगवेगळे ट्रेडर्सचे अकाऊट आहेत. तसेच त्या बाबत 11 महिने 15 दिवस तक्रारदारांनी दावा अर्ज दाखल करण्यासाठी विलंब केला. तक्रारदारांनी अगोदरच ओरिएंटल कंपनी कडून सदर घटनेची विमा रक्कम घेतली आहे. या सर्व कारणांनी सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा नाकारलेला आहे. यात सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला नाही.तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 व 3 यांचे नांव तक्रारदारांनी दि.28.02.2011 रोजीच्या जिल्हा मंचाचे आदेशावरुन कमी केलेले आहे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 चा खुलासा, शपथपत्र, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.कासट यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.1 व त्यांचे विद्वान वकील गैरहजर, त्यांचा यूक्तीवाद नाही.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराचे माजलगांव गढी रोडवर बालाजी सॉ मिल होती. सदर सॉ मिलला दि.11.02.2009 रोजी शॉर्टसर्कीटने आग लागली आहे व सदर आगीत बालाजी सॉ मिल लगत माऊली फर्निचरचे दूकान असल्याने दोन्ही फर्म एकाच वेळी आगीत जळून खाक झाले.
या बाबत तक्रारदारांनी विद्यूत निरिक्षक कार्यालय बीड यांचे दि.16.03.2009 चे पत्र दाखल केलेले आहे. त्यानुसार आग ही शॉर्टसर्कीटने लागल्याची बाब स्पष्ट होते.
या संदर्भात तक्रारदारांनी पोलिस स्टेशन माजलगांव येथे फिर्याद दिलेली आहे. त्या बाबतचा घटनास्थळ पंचनामा दाखल आहे. तसेच तहसीलदार माजलगांव यांचे मंडळ अधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी यांनी दि.13.07.2009 रोजी पंचनामा केला.
सामनेवाला क्र.1 कडून तक्रारदारांनी सॉ मिलचा विमा घेतलेला आहे. खुलाशावरुन विम्याची बाब सामनेवाला यांना मान्य आहे.
घटनेची माहीती तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांना दिल्याबाबत लगेचच सामनेवाला क्र.1 यांनी सर्व्हेअर श्री.रॉबर्ट रॉड्रीग्जस यांची नेमणूक केली. त्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे व आगीत नूकसान झालेला स्टॉक व मशीनरी यांची पाहणी केलेली आहे व त्यानंतर त्यांनी तक्रारदाराकडे कागदपत्राची मागणी केली. खुलाशात नमूद केल्याप्रमाणे दि.11.02.2009, 28.02.2009, 24.03.2009, 14.05.2009, 19.06.2009, 10.08.2009 या दिनांकाना कागदपत्राची मागणी केलेले वरील दिनांकाचे पत्र दिलेले आहे. तक्रारदारांनी कागदपत्राची पूर्तता केलेली नाही. तसेच सर्व्हे अहवालात सर्व्हेअरने नमूद केल्याप्रमाणे चौकशी केली असता तक्रारदारांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडे सदर सॉ मिलचा विमा घेतलेला आहे. ही बाब तक्रारदारांनी त्यांहचे अर्जात नमूद केलेली नाही.
तक्रारदारांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडून रक्कम रु.3,74,000/- नूकसान भरपाई मिळालेली आहे. या बाबत सर्व्हेअर श्री. रॉबर्ट रॉड्रीग्जस यांचे अहवालातील कलम 8 मधील पान नंबर 12 वर सर्व्हेअर ऑफ असेसंमेंट या शिर्षकाखाली सर्व्हेअर यांनी सामनेवाला व ओरिएंटल इन्शुरन कंपनी यांचे दोन्ही विमा पत्राच्या जोखीमिचा आढावा घेतलेला आहे व त्यानुसार सामनेवाला न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची जबाबदारी रक्कम रु.5,69,820/- दर्शवलेली आहे व ओरिएंटल इन्शुरन्स कपंनीची जबाबदारी रु.2,29,421/- अशी दाखवलेली आहे. एकूण नूकसानीची आकारणी सर्व्हेअर यांनी रक्कम रु.7,99,241/- केलेली आहे. यातून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची मिळालेली रक्क्म रु.,3,78,288/- वजा जाता न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची जबाबदारी रु.4,23,253/-ची आहे. तसेच उर्वरित शिल्लक रक्कम रु.1,45,867/- ची जबाबदारी सामनेवाला न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची असल्याने ती रक्कम त्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला परत करावी असे नमूद केलेले आहे.
तसेच सदर सर्व्हे रिपोर्टमधील निरिक्षण कलम 9 यात क (सी) मध्ये एकूण 4 कारणे सर्व्हेअर यांनी नमूद केलेली आहेत. यातील पहिले कारण दूस-या विमा कंपनीच्या विमा पत्राबाबत माहीती सर्वसाधारण अट नंबर 9 प्रमाणे उघड केली नाही. दूसरे कारण सर्वसाधारण अट नंबर 6 (ए) प्रमाणे कागदपत्रे 15 दिवसांचे आंत दाखल केलेले नाहीत. कारण नंबर 3 सर्वसाधारण सामनेवाला क्र.6 (1) (ब) नुसार इतर विमा उपलब्ध झाले नाहीत. कारण नंबर 4 सर्वसाधारण अट नंबर 8 प्रमाणे तक्रारदारांनी दावा अर्ज खोटे घोषणापत्र लिहून दिले आणि त्यासोबत खोटी कागदपत्रे दाखल केली. केवळ दोन्ही विमा कंपनीकडून लाभ उचलता यावा या उददेशाने वरीलप्रमाणे कृती तक्रारदाराने केली. तसेच कलम 9 मध्ये उदा.आकारणी अहवालात दावा रक्कम वाढवून दाखवलेली आहे.
सदर निरिक्षण विचारात घेऊन तसेच विमा कंपनीने तक्रारीमध्ये कागदपत्राची मागणी केल्याचे पत्र दिलेले असताना तक्रारदारांनी त्यांचे कागदपत्र दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे असले तरी त्या बाबत कूठलेही कागदपत्र मिळाल्या बाबतची विमा कंपनीची पोहच दाखल केलेली नाही. विमा कंपनीने तक्रारदारांना पत्र दिल्यानंतर त्यांनी उत्तरे दिल्याचे म्हटले आहे परंतु सदर पत्राची कारणे विमा कंपनीला पटलेली नाहीत. या संदर्भात मागणी प्रमाणे कागदपत्रे दाखल करण्याची जबाबदारी तक्रारदाराचीच आहे. तसेच तक्रारदारांनी विमा कंपनीकडे एक वर्षानंतर अहवाल दाखल केला व तो देखील पूर्ण कागदपत्रासह दाखल न केल्याने मागणी करुनही कागदपत्रे न पूरविल्याने उपलब्ध कागदपत्रावरुन सर्व्हेअरने वर नमूद केलेली आकारणी केलेली आहे परंतु तक्रारदारांनी विमा पत्र, दूसरे विमापत्र घेतल्याची बाब उघड न केल्याने व तसेच त्या विमा कंपनीची एकाच घटनेबाबत रक्कम मागितल्याने विमा कंपनीने दावा नाकारलेला आहे.
या संदर्भात तक्रारदारांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडून फक्त सॉ मिलचा, मशीनरीचा विमा घेतलेला आहे. स्टॉकचा विमा घेतलेला नव्हता व मशीनरीचे नूकसानी बाब ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने दावा नामंजूर केलेला आहे. त्यात स्टॉकची नूकसान भरपाई मिळालेली नाही व मिळू शकत नाही. या संदर्भात तक्रारदाराचा दावा हा रु.19, 43,000/-चा नूकसान भरपाई मागणीचा आहे. त्या संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे वर नमूद केलेल्या सर्व्हेअरच्या पत्रानुसार तक्रारदाराने दाखल केली असली तरी नूकसान भरपाईची रक्कम तक्रारदारांना निश्चितच मिळाली असती परंतु तक्रारदारांनी विलंबाने दावा अर्ज दाखल केलेला आहे व त्यात कागदपत्राची पूर्ण पूर्तता केलेली नाही अशा परिस्थितीत विमा कंपनीने दावा बंद केलेला आहे. यात सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब कूठेही स्पष्ट होत नाही. त्यामुळे तक्रारदारांना नूकसानीची रक्कम देणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अर्ज रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड