तक्रारदारातर्फे – वकील – ए.व्ही.कुलकर्णी,
सामनेवाले 1 तर्फे – वकील – एच.एस.पाटील,
सामनेवाले 2 तर्फे – वकील – डी.बी.कुलकर्णी,
।। निकालपत्र ।।
( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांचे बँक ऑफ इंडिया शाखा गेवराई येथे बचत खाते क्र.011323542118 असुन त्यावर एटीएम क्र.6220180384300002753 असा दिलेला आहे. तक्रारदारांनी ता.8.1.2010 रोजी एटीएम द्वारे रक्कम काढण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. दोन्ही वेळेस पैसे मिळाली नाहीत सदर स्लिपा हया अंधुक छपाईमुळे समजल्या नाहीत, म्हणुन दोन्ही व्यवहार रद्द केले. नंतर दूस-या एटीएम द्वारे प्रयत्न केला त्यावेळी मात्र रक्कम रु.10,000/- मिळाले व सदर रक्कम मिळाल्यानंतर स्लिप पाहता तक्रारदाराचे पासबुकात ता.1.1.2010 रोजी त्यांचे खातेवर रक्कम रु.67,797/- शिल्लक होते. ता.8.1.2010 रोजी रु.10,000/- एटीएम द्वारे काढल्यानंतर रक्कम रु.57,797/- शिल्लक असावयास पाहिजे होती. परंतु रु.1,200/- कमी दर्शविण्यात आली असुन, सदर स्लिपवर शिल्लक रक्कम रु.56,597/- अशी दाखविण्यात आली. त्यामुळे तक्रारदारांनी विवरणपत्र काढले असता तक्रारदारांचे खात्यातून रु.700 अधिक रु.500/’ विथड्रॉल झाल्याचे दाखवले. त्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचेकडे ता.22.1.2010 रोजी अर्ज केला. सामनेवाले नं.1 यांनी त्यांनतर ता.25.1.2010 रोजी सामनेवाले नं.2 यांना तक्रारदारांच्या एटीएम संदर्भात पत्र दिले. सदरचे पत्र तक्रारदारांनी सामनेवाले नं.2 यांचेकडे ता.3.2.2010 रोजी नेवून दिले, परंतु त्यांनी तक्रारदार त्यांचे ग्राहक नसल्याचे सांगीतले. तसेच ज्यांचे ग्राहक आहेत त्यांचेकडे जाण्यांस सांगीतले. त्याप्रमाणेता.12.4.2010 रोजी सामनेवाले नं.1 यांचेकडे अर्ज केला. ता.28.4.2010 रोजी तिसरा अर्जकेला तसेच लोकमत हेल्पलाईन कार्यालयाकडे अर्ज केला परंतु प्रतिसाद मिळाली नाही. या बाबत तक्रारदारांने बँकेत बँकेच्या मुख्य शाखेत वेळोवेळी चौकशी केली, पत्रव्यवहार केला, परंतु बँकेने तक्रारदारांना अद्यापपर्यन्त रक्कम रु.700 अधिक 500 असे एकुण रु.1,200/- मिळालेले नाहीत. अशी तक्रारदारांची मुख्य तक्रार आहे.
तरी तक्रारदारांची विनंती की, एटीएम मधुन रक्कम रु.700/- अधिक रु.500/- असे एकुण रु.1,200/- आणि गेवराई ते बी प्रवास व कागदपत्राचा खर्च रु.2,000/- व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- नुकसान भरपाई पोटी सामनेवाले यांचेकडून वसुल होवून मिळावेत.
सदर प्रकरणात सामनेवाले यांना न्यायमंचाची नोटीस मिळाली असुन सामनेवाले 1 व 2 हे न्यायमंचात हजर झाले असुन सामनेवाले नं.1 यांनी त्यांचा खुलासा न्यायमंचात ता.9.8.2010 रोजी दाखल केला आहे.
सामनेवाले नं.1 यांचा लेखी खुलासा थोडक्यात असा की,
सामनेवाले नं.1 यांना तक्रारदारांनी एटीएमच्या रक्कमे संदर्भात त्यांचेकडे दिलेल्या अर्जाबाबतची बाब मान्य आहे. एटीएम वर जो व्यवहार चालतो त्यावर कम्प्लेंट मॅनेजमेंट सिस्टीम यांची देखरेख असून सदर कार्यालयाने ता.8.1.2010 रोजी रु.700/- अधिक रु.500/- काढल्याचे दाखवून ट्रँजेक्शन सक्सेसफूल म्हणून रिपोर्ट दिला आहे. त्यांचा नं.0045000450 डिपॉझीट ट्रँजेक्शन इंनक्वायरी सामनेवाले नं.1 यांना कळवले आहे. त्यानंतर सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांना ता.8.5.2010 रोजीचे पत्रान्वये या संदर्भात कळविले आहे. तसेच तक्रारदारांचा ता.12.4.2010 व 28.4.2010 रोजीचे तक्रारी अर्जाचे निराकरण झाले बाबत कळविले आहे. सदर पत्रामध्ये तक्रारदारांचे तक्रारीचे खातर जमा एटीएम सेटलमेंट ऑफिस, मुंबई याचेकडे करुन तसेच या संदर्भात सामनेवाले नं.1 यांनी रिक्वेस्ट डिटेल 14071866 अन्वये मुंबई कार्यालयाशी संपर्क साधून, मुंबई कार्यालयाने योग्य तो डाटा देवून ट्रँजेक्शन सक्सेसफूल झाल्याचे सामनेवाले 1 यांना कळविले. ही सर्व माहिती सामनेवाले नं.1 यांना तक्रारदारांना सदर पत्रानुसार कळविले आहे.
सामनेवाले नं.2 ही बँक मेन होल्डर ऑफ एटीएम असल्यामुळे एटीएम संदर्भातला संपूर्ण व्यवहार त्यांचेमार्फत चालतो. परंतु तक्रारदार हे सामनेवाले नं.1 यांचे ग्राहक असल्यामुळे सामनेवाले नं.1 यांनी मुंबई कार्यालयाशी संपर्क साधून तक्रारदारांचे ता.8.1.2010 रोजीचे ट्रँजेक्शन विषयी माहिती मिळविली. अशा प्रकारे तक्रारदारांना संपूर्ण सेवा दिलेली असुनही तक्रारदारांनी हेतुपुरसर सदरची तक्रार दाखल केली आहे.
तरी तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी. तसेच तक्रारदारांकडून कॉम्पेंसेटरी कॉस्ट घेण्यात यावी.
सामनेवाले नं.2 यांनी त्यांचा खुलासा न्यायमंचात ता.29.10.2010 रोजी दाखल केला आहे. सामनेवाले नं.2 यांचा लेखी सुलासा थोडक्यात असा की,
तक्रारदार हे सामनेवाले नं.2 यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदारांनी सामनेवाले नं.2 यांचेकडे कोणतीही तोंडी अथवा लेखी तक्रार केलेली नाही. सामनेवाले नं.1 यांचेकडे ता.12.4.2010 व 28.4.2010 रोजी रक्कम न मिळाले बाबत लेखी पत्र दिले आहे. त्याच प्रमाणे सामनेवाले नं.1 यांनी या संदर्भात चौकशी करुन ता.8.5.2010 रोजीचे पत्रानुसार तक्रारदारांना कळविले आहे. खातेदार ज्या बँकेचा ग्राहक असेल त्याच बँकेने सदरील तक्रारीची दखल घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांचे तक्रारीचे निराकरण केले आहे. तरी तक्रारदारांनी सामनेवाले नं.2 विरुध्द विनाकारण सदरची तक्रार केलेली असल्यामुळे तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी. तसेच तक्रारदारांकडून कॉम्पेंसेटरी कॉस्ट रक्कम रु.5,000/- देण्यात यावी.
तक्रारदारांची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्र, पुराव्याचे शपथपत्र, सामनेवाले नं.1 व 2 यांचा लेखी खुलासा, दाखल कागदपत्र, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. सामनेवाले नं.2 यांचे विद्वान वकिल डी.बी.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांचे सामनेवाले नं.1 बँकेत बचत खाते असुन एटीएम क्रमांक.6220180384300002753 असा आहे. तक्रारदारांनी ता.8.1.2010 रोजी सामनेवाले नं.2 याचे कार्यालयाचे एटीएम मधून रक्कम रु.10,000/- काढण्यासाठी गेले असता, एटीएम कार्ड टाकून रु.10,000/- रक्कमेची कमांड दिली. परंतु पैसे आले नाहीत. फक्त स्लिप आली. सदरची स्लिपवर अंधुक छपाईमुळे काय लिहिले आहे हे समजले नाही, त्यामुळे पहिला व्यवाहर रद्द करुन दुस-यांदा एटीएम कार्ड टाकुन रु.10,000/- ची कमांड दिली. परंतु एटीएम मधुन फक्त स्लिप आली, पैसे आले नाहीत. सदरील स्लिपवर अंधुक छपाईमुळे काय लिहिले आहे ते समजले नाही. त्यामुळे तक्रारदारांनी सदरचा व्यवहार रद्द करुन दुस-यांदा एटीएम मधून रु.10,000/- ची कमांड दिलीअसता तक्रारदारांना रक्कम रु.10,000/- मिळाले. ज्या एटीएम मधुन रु.10,000/- मिळाले ती स्लिप पाहता तक्रारदारांचे पासबुकवर ता.1.1.2010 रोजी रक्कम रु.67,797/- शिल्लक होते. तक्रारदारांनी एटीएम मधून ता.8.1.2010 रोजी रक्कम रु.10,000/- काढले असल्यामुळे शिल्लक रक्कम रु.57,797/- असने आवश्यक होते. परंतु तक्रारदारांना रक्कम रु.1200/- कमी दिसले, शिल्लक रक्कम रु.56,597/- दाखविण्यात आली असल्यामुळे तक्रारदारांनी विवरणपत्र काढले असता तक्रारदारांचे खात्यामध्ये रु.700 अधिक रु.500/- असे रु.1,200/- कमी झाल्याचे (Withdrawal) दाखविले. या संदर्भात सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडे तक्रार करुनही अद्यापपर्यन्त तक्रारदारांना सदरील रक्कम मिळाली नाही, अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सामनेवाले नं.1 यांचे खुलाशानुसार तक्रारदारांनी त्यांचेकडे ता.12.4.2010 व 28.4.2010 रोजी दिलेल्या तक्रारी अर्ज मान्य असुन सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांचे तक्रारी अर्जाचे निराकरण केले असे ता.8.5.2010 रोजीचे पत्रान्वये कळविले आहे. सामनेवाले नं.1 यांनी रिक्वेस्ट डिटेल 0014071866 नुसार मुंबई कार्यालयाशी संपर्क साधला असुन ‘‘ योग्य तो डाटा देवून ट्रँजेक्शन सक्सेसफूल ’’ झाल्याचे त्यांनी कळविले बाबतची माहिती सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांना दिली आहे.
सामनेवाले नं.2 यांचे खुलाशानुसार, तक्रारदार सामनेवाले नं.2 यांचा ग्राहक होत नाही. तक्रारदारांनी सामनेवाले नं.2 यांचेकडे कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार दिलेली नाही. एटीएम नियमाप्रमाणे ज्या बँकेत तक्रारदांराचे खाते असेल त्यांचेकडेच लेखी तक्रार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदाराचे तक्रारीची दखल घेवून मुंबई कार्यालयाशी संपर्क साधुन ट्रँजेक्शन विषयी माहिती घेतली आहे, व त्याच दिवशी हे ट्रँजेक्शन सक्सेसफूल झाले बाबतची माहिती सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांना दिलेली असूनही तक्रारदारांनी खोटी तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांना सामनेवाले नं.1 यांनी ता.22.1.2010 रोजी एटीएमच्या रक्कमे संदर्भात तक्रार केल्याचे दिसून येते. सामनेवाले नं.1 यांनी सदर अर्जानुसार सामनेवाले नं.2 यांना या संदर्भात कार्यवाही करण्या बाबत ता. 25.1.2010 च्या पत्रान्वये कळविले आहे. तक्रारदार सामनेवाले नं.1 यांचे ग्राहक असल्यामूळे त्यांनी यासंदर्भात कार्यवाही करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदार सामनेवाले नं.2 यांचे ग्राहक नसल्यामूळे त्यांनी तक्रारदारांना सामनेवाले नं.1 यांचेकडे तक्रार करण्याची सूचना दिल्याप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचेकडे ता. 12.4.2010 व 28.4.2010 रोजी या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाप्रमाणे 30 दिवसाच्या आत सदर तक्रारीचे निराकरण केलेले आहे. तक्रारदारांचे ट्रँजेक्शन सक्सेसफूल होवून त्यांना सदरच्या रक्कमा मिळालेल्या असल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होत असल्यामुळे तसेच सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांच्या तक्रारी संदर्भात दखल घेवून कार्यवाही केल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कसूरी केल्याची बाब स्पष्ट होत नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदार, सामनेवाले नं.2 यांचे ग्राहक नाहीत, परंतु सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदारांना योग्य ते मार्गदर्शन दिलेले आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले नं.2 यांची सेवेत कसूरीची बाब स्पष्ट होत नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांना ता.8.5.2010 रोजी दिलेल्या पत्रानुसार तक्रारदाराचे ता.8.1.2010 रोजी रक्कम रु.700/- अधिक रु.500/- असे एकुण रक्कम रु.1,200/- चे ट्रँजेक्शन सक्सेसफूल झाले असल्या बाबत कळविले आहे. तक्रारदारांना सदरच्या रक्कमा मिळालेल्या आहेत. आशा परिस्थितीत तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे रक्कम रु. 700/- अधिक रु.500/- असे एकुण रक्कम रु.1,200/ देणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांना त्यांच्या तक्रारी संदर्भातील माहिती विलंबाने मिळालेली असल्यामूळे तक्रारदारांना मानसिकत्रास झाला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. पंरतु तक्रारदारांनी ता.8.1.2010 रोजीच्या ट्रँजेक्शन बाबत सामनेवाले नं.1 यांचेकडे विलंबानेच ता. 22.1.2010 रोजी तक्रार दाख्ंल केल्याचे दिसून येते. तसेच तक्रारदारांना सदरच्या रक्कमा ता.8.1.2010 रोजी मिळालेल्या असल्याची बाब स्पष्ट झाल्यामुळे तक्रारदारांना तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे प्रवास खर्चाची, कागदपत्रांचा खर्चाची तसेच मानसिक त्रासाची रक्कम देणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. सामनेवाले खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
( सौ.एम.एस.विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि. बीड