तक्रारदारातर्फे – वकील – एस. एस. लंबाटे
सामनेवालेतर्फे – वकिल – एस. आर. राजपूत.
।। निकालपत्र ।।
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार व सामनेवाले यांच्यात तडजोड झालेली असून तक्रारदारांना रक्कम रु. 1,30,500/- तील रक्कमा वेळेवेळी तक्रारदारांना मिळालेल्या आहेत व उर्वरीत रक्कम रु. 37,782/- चा महाराष्ट्र बँक, औरंगाबाद शाखेचा तारीख 20/12/2010 चा डी.डी. क्रं. 035475 सामनेवालेकडून तक्रारदारांना प्राप्त झाला त्यामुळे तक्रारदाराची काहीही तक्रार राहिलेली नाही. म्हणून सदरची तक्रार निकाली करण्याबाबतची पुरसीस तक्रारदाराने दाखल केलेली आहे.
तक्रारदार हजर, सामनेवालेचे वकील एस. आर. राजपूत हजर. तक्रारदार व सामनेवाले यांच्यात आपापसात तडजोड झालेली असल्याने तक्रारदारांना सामनेवाले विरुध्द कसलीही तक्रार राहिलेली नसल्याने सदरची तक्रार निकाली करणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार तडजोडीप्रमाणे निकाली करण्यात येत आहे.
2. सामनेवालेच्या खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड