Maharashtra

Jalna

CC/110/2010

Shivaappa Kondiappa Barse - Complainant(s)

Versus

M.S.E.DC.L. Jalna - Opp.Party(s)

M.R.Waghunde

31 Dec 2010

ORDER


REPORTSSurvey No.488 Opp. Krida Bhavan bypass road Jalna
CONSUMER CASE NO. 110 of 2010
1. Shivaappa Kondiappa BarsePost- Gawadiwadi Tq- badnapurJalnaMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. M.S.E.DC.L. JalnaMustgad JalnaJalnaMaharashtra2. Exe. Engg.Mustagad JalnaJalnaMaharashtra3. Jr. Engg.JalnaJalnaMaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :M.R.Waghunde, Advocate for
For the Respondent :G.R.Kad, Advocate G.R.Kad, Advocate G.R.Kad, Advocate

Dated : 31 Dec 2010
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(घोषित दि. 31.12.2010 व्‍दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्‍यक्ष)
 
      वीज वितरण कंपनीने चुकीची देयके देऊन त्रुटीची सेवा दिल्‍याच्‍या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.
      तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्‍याने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून त्‍याच्‍या राहत्‍या घरी ग्राहक क्रमांक 510090398375 द्वारे वीज जोडणी घेतलेली आहे. दिनांक 13.06.2010 रोजी वादळी पावसामुळे विद्युत कंपनीने उभे केलेले सर्व खांब पडल्‍यामुळे त्‍याच्‍या गावाकडे येणारा वीज पुरवठा विस्‍कळीत झाला. दिनांक 28.07.2010 रोजी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने त्‍याच्‍या घरी कंत्राटदारा मार्फत मीटर बसविले. परंतू त्‍याचा वीज पुरवठा सुरु केला नाही. त्‍याबाबत वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली असता त्‍यांनी पावसाळा संपल्‍यानंतर खांब उभारण्‍याचे काम होईल असे सांगितले. परंतू वीज पुरवठा सुरु नसतांना देखील वीज वितरण कंपनीने त्‍यास वीज वापराची देयके दिली. देयकामध्‍ये वीज वितरण कंपनीने खोटी रिडींग नोंदविली. त्‍याने वीज वितरण कंपनीकडून प्राप्‍त झालेल्‍या देयकामधील रिडींग चुकीची असल्‍याचे लाईनमनच्‍या निदर्शनास आणून दिले. तरी देखील वीज वितरण कंपनीने पुन्‍हा चुकीची देयके दिली. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरु न करता चुकीची व खोटी देयके देऊन त्रुटीची सेवा दिली. म्‍हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्‍यास देण्‍यात आलेली बेकायदेशीर व खोटी देयके रद्द करावीत आणि त्‍याचा वीज पुरवठा सुरु करण्‍याबाबत वीज वितरण कंपनीला आदेश देण्‍यात यावा तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई द्यावी.
      गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, तक्रारदाराला वीज पुरवठा सुरु केल्‍यानंतर त्‍याने वापर केलेल्‍या युनिटचेच देयक देण्‍यात आलेले आहे. तक्रारदाराला देण्‍यात आलेल्‍या देयकावर तांत्रीक कारणांमुळे फोटो आला नाही किंवा रिडींग आली नाही तरी त्‍याचे कोणतेही नुकसान होत नाही. तांत्रीक कारणांमुळे रिडींग उपलब्‍ध झाली नाही तर नियमाप्रमाणे सरासरी देयक दिले जाते आणि रिडींग उपलब्‍ध झाल्‍यानंतर समायोजन केले जाते. तक्रारदाराला त्‍याने जेवढी वीज वापरली तेवढयाच वापराबद्दल देयक देण्‍यात आलेले आहे. परंतू देयकाची रक्‍कम न भरता वीज पुरवठा सुरु रहावा म्‍हणून तक्रारदाराने ही काल्‍पनीक तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराला देण्‍यात आलेली देयके योग्‍य असून, त्‍याला त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्‍हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे.
दोन्‍ही पक्षाच्‍या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
    
      मुद्दे                                     उत्‍तर
 
1.गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला
 चुकीची देयके देऊन त्रुटीची सेवा दिली आहे काय ?                   होय
                                                   
 
2.आदेश काय ?                                         अंतिम आदेशा प्रमाणे
 
कारणे
 
मुद्दा क्रमांक 1 तक्रारदाराच्‍या वतीने अड.एम.आर.वाघुंडे आणि वीज वितरण कंपनीच्‍या वतीने अड.जी.आर.कड यांनी युक्‍तीवाद केला.
      वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला दिनांक 10.08.2010 रोजी दिनांक 30.06.2010 ते 31.07.2010 या कालावधीसाठी 35 युनिट वीज वापराचे देयक (नि.7) दिलेले असुन, सदर देयकामधे मागील रिडींग 51 आणि चालू रिडींग 86 दर्शविलेली आहे. या देयकामधे तक्रारदाराचा मागील वीज वापर देखील दर्शविलेला असुन एप्रिल 2010 मधील वीज वापर 62 युनिट, तसेच मे आणि जुन 2010 मधील वीज वापर प्रत्‍येकी 50 युनिट दर्शविलेला आहे. तसेच तक्रारदाराला दिनांक 08.09.2010 रोजी दिनांक 31.07.2010 ते 31.08.2010 या कालावधीसाठी दिलेले देयक पाहता त्‍यामध्‍ये मागील रिडींग 86 आणि चालू रिडींग 118 अशी दर्शवून या कालावधीतील तक्रारदाराचा वीज वापर 32 युनिट दर्शविलेला आहे. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचे मीटर प्रत्‍यक्षात न पाहता रिडींग नोंदविल्‍याचे कोर्ट कमीशनर श्री.बी.एम.वाघमारे यांचा अहवाल नि.21 वरुन दिसुन येते. तक्रारदाराच्‍या मीटरमधील रिडींग व मीटरची परिस्थिती जाणून घेण्‍यासाठी तक्रारदाराच्‍या विनंतीवरुन कोर्ट कमीशनरची नेमणूक करण्‍यात आली होती. त्‍यानुसार कोर्ट कमीशनर श्री.बी.एम.वाघमारे यांनी दोन्‍ही पक्षांच्‍या उपस्थितीत दिनांक 11.12.2010 रोजी तक्रारदाराच्‍या मीटरची पाहणी केली त्‍यावेळी कोर्ट कमीशनर श्री.वाघमारे यांना असे दिसुन आले की, तक्रारदाराचे मीटर सुरु होते. परंतू मीटरमधील आकडे किंवा रिडींग दिसत नव्‍हती. कोर्ट कमीशनर यांनी नोंदविलेले सदर निरीक्षण वीज वितरण कंपनीने देखील मान्‍य केले आहे. दिनांक 11.12.2010 रोजी तक्रारदाराच्‍या मीटर मधील रिडींग दिसत नसतांनाही वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला रिडींग नोंदवून देयके दिल्‍याचे दिसते. वीज वितरण कंपनीने दिनांक 10.11.2010 रोजी दिलेल्‍या देयकामधे देखील त्‍याची चालू रिडींग 185 असल्‍याचे दर्शविण्‍यात आलेले आहे. कोर्ट कमीशनर श्री. बी.एम.वाघमारे यांनी गैरअर्जदारांचे वकील श्री. जी.आर.कड गैरअर्जदार क्रमांक 3 कनिष्‍ठ अभियंता वीज वितरण कंपनी आणि वीज वितरण कंपनीचे लाईन हेल्‍पर यांच्‍या उपस्थितीत तक्रारदाराच्‍या मीटरची पाहणी केली त्‍यावेळी मीटर रिडींग दिसत नसल्‍याचे सर्वांनी मान्‍य केले. अशा प्रकारे मीटर रिडींग दिसत नसतांनाही वीज वितरण कंपनीने मीटर रिडींग नोंदवून तक्रारदाराला जी देयके दिलेली आहेत ती विश्‍वासपात्र ठरत नाहीत. तक्रारदाराच्‍या मीटरमधील रिडींग प्रत्‍यक्षात जाऊन नोंद करणा-या व्‍यक्‍तीचे शपथपत्र किंवा त्‍याची साक्ष मंचासमोर नोंदविली नाही. त्‍यामुळे वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला दिलेल्‍या देकामधील रिडींग संशयास्‍पद आहे आणि म्‍हणून वीज वितरण कंपनीने दिलेली देयके भरण्‍याचे बंधन तक्रारदारावर राहणार नाही. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा वीज पुरवठा सुरु नसुनही त्‍यास वीज वापराची देयके दिल्‍याच्‍या तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यास या मंचासमोर तक्रारदाराच्‍याच गावातील इतर पाच व्‍यक्‍तींनी दाखल केलेल्‍या तक्रारींवरुन पुष्‍टी मिळते. वीज वितरण कंपनीने तक्रार क्रमांक 108/10, 109/10, 111/10, 112/10 आणि 113/10 मधील तक्रारदारांना दिलेल्‍या देयकामधे सर्वांचाच मे व जुन 2010 मधील वीज वापर प्रत्‍येकी 50 युनिट दर्शविलेला आहे. यावरुन वीज वितरण कंपनीने प्रत्‍यक्ष मीटर रिडींग न नोंदविता खोटया व चुकीच्‍या नोंदी घेवून तक्रारदारासह उपरोल्‍लेखीत पाच प्रकरणातील तक्रारदारांना अंदाजानेच मीटर रिडींग नोंदवून देयके दिल्‍याचे स्‍पष्‍ट दिसुन येते. आमच्‍या मतानुसार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा वीज पुरवठा एप्रिल 2010 मध्‍ये सुरु केलेला नसुन तो ऑक्‍टोबर 2010 मध्‍ये सुरु केला आणि त्‍याच्‍या मीटरमधील रिडींग प्रत्‍यक्षात न नोंदविता त्‍यास अंदाजानेच चुकीची देयके दिलेली आहेत. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीला तक्रारदाराकडून कोणतीही रक्‍कम वसुल करण्‍याचा अधिकार नाही. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला खोटी देयके देऊन त्‍यास केवळ त्रुटीची सेवा दिलेली नसून वीज वितरण कंपनीने अनुचित व्‍यापार देखील केलेला आहे. म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात आले.
म्‍हणून खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
 
आदेश
 
  1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.
2        गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनीने तक्रारदारास (ग्राहक क्रमांक 510090398375) एप्रिल 2010 पासुन दिनांक 30.11.2010 पर्यंत दिलेली सर्व देयके रद्द करण्‍यात येतात.  
3        गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनीने तक्रारदाराच्‍या घ्‍ारी  (ग्राहक क्रमांक 510090398375) निकाल कळाल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत नविन मीटर बसवावे आणि सदर नविन मीटरचा खर्च वीज वितरण कंपनीने सोसावा. वीज वितरण कंपनीने नविन मीटर बसविल्‍यानंतरच तक्रारदाराला देयके द्यावीत.
4        गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनीने तक्रारदारास (ग्राहक क्रमांक 510090398375) मानसिक त्रासापोटी रुपये 500/- (रुपये पाचशे फक्‍त) आणि तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्‍त) निकाल कळाल्‍यापासून एक महिन्‍याचे आत द्यावेत.
5        दोन्‍ही पक्षांना आदेश कळविण्‍यात यावा.         

HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, MemberHONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT ,