ग्राहक तक्रार क्रमांकः-64/2009 तक्रार दाखल दिनांकः-31/01/2009 निकाल तारीखः-31/05/2010 कालावधीः-01वर्ष04महिने00दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्रीमती.प्रियांका निलेश सावंत रा-603,सिध्दी टॉवर,भक्ती मंदीर मार्ग, ठाणावाला गॅरेज समोर,हरीनिवास नाका, ठाणे(प) ...तक्रारकर्ती विरुध्द महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि., लोकमान्य नगर सबडिव्हीजन, वागळे इस्टेट,ठाणे (प) ...वि.प. उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.पी.ए.गोखले. विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्री.एस.डी.तिगडे गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या 3.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-31/05/2010) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेद्वारे आदेशः- 1)तक्रारकर्ता यांनी सदर तक्रार विरुध्दपक्ष यांचे विरुध्द दिनांक 31/01/2009 रोजी नि.1 प्रमाणे दाखल केली आहे.त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- तक्रारकर्ती हिने श्री सत्यम सिंघ गोपाळ सिंग बेहर यांचेकडून ''जिलीड'' वर आयुर्वेदिक ट्रिटमेंट सेंटर सुरु करण्याकरिंता मिळकत घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी घरगुती वापराकरींता इलेक्ट्रिक मिटर क्र.275397 ग्राहक नं.0000110733620 होते. तक्रारकर्ता यांनी घरगुती वापरांचे मिटर हे व्यापारी दरांने होवून मिळणेसाठी विहीत अर्ज करुन पुर्तता केल्याने विरुध्दपक्षकार यांनी तक्रारकर्ती हिस व्यापारी पध्दतीचे मिटर नं.8003249824 व ग्राहक क्र.000011656901 हा देण्यात आला. मिटर नं.275397 हे सन 2007 पासून 2/- दोषीत होते ते दयेक नि.ए वर दाखल असून नोव्हेंबर2008 मध्येही दोषीत होते. बी व सी वर दाखल आहे. दिनांक30/12/2008 रोजी विरुध्दपक्षकारतर्फे डेप्यु.एक्झीक्युटीव इंजिनिअर श्री.प्रदीप अबाजी सोरटे व सिनी.इंजिनिअर श्री.निळकंठ मधुकर वायदंडे यांनी तक्रारदार यांचे मिळकतीत अचानक प्रवेश करुन मिटर तपासणी सुरु केली तेव्हा जुन्या मिटरचे (घरगुती वापराचे) तपासणी अहवाल व पंचनामा केला. जॉईंट इन्स्पेक्शन रिपोर्ट मिटर नं.275397 ऐवजी 27539 चा केला नि.डी,ई,एफ वर दाखल आहे.8003249824 या मिटरची पुर्ण माहिती असून सुध्दा अँक्यु चेक मशिनने केले त्या अहवालांची प्रत तक्रारदार यांना देण्यात आली नाही. पंचनामा हा प्रत्यक्ष जागेवर केला नसल्याने पंच राजेंद्र कोंडीराम जाधव व गणेश सखाराम अंगणे हे जागेवर उपस्थित रहाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यावर तक्रारदार यांची सही घेण्यात आलेली नाही हे वादीत मिटर काढून त्या ठिकाणी नविन मिटर दिनांक31/12/2008 रोजी लावणेत आले. त्या वरुन मिटर नं.27539 यामध्ये कोणत्याही प्रकारे फेरबदल झालेले नाहीत हे सिध्द होते. दिनांक 03/01/2009 रोजी विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना धमक्या दिल्या व दिनांक 04/01/2009 रोजी इलेक्ट्रीक अँक्ट कलम135 (i-e) अन्वये 24महिन्याचे रुपये 1,28,432.11पैशाचे देयक ''जी'' प्रमाणे दिले ते हाताने लिहिले तयार केले ते तक्ता देणे आले आहे. व त्यावेळी 275397 मिटरचे 8003249824 चा स्पॉट इलेक्ट्रीक रिपोर्ट वगैरे केला नाही. तरीही तक्रारदार यांनी त्यांचे आयुर्वेदीक ट्रिटमेंटचे कामकाज बंद पडू नये. म्हणून दिनांक 06/01/2009 रोजी सर्व खर्च 'एच' प्रमाणे भरणा केली. दिनांक09/01/2009 रोजी तक्रारदार यांनी तशी विरुध्दपक्षकार यांना अँडव्होकेट मार्फत कायदेशीर नोटीस दिली ''आय'' प्रमाणे ती विरुध्द पक्षकार यांना तथापी विरुध्दपक्षकार यांनी नोटीस दखल न घेतल्याने सदर तक्रार अर्ज मंचात दाखल करणे भाग पडले आहे व पुढील विनंती मागणी केलेली आहे. 1)सदर तक्रार अर्ज दाखल करुन घेवून विरुध्दपक्षकार यांना नोटीस काढणेत यावी. 2)विरुध्दपक्षकार यांनी रुपये 01,28,430/- चे दिलेले वादीत देयक विरुध्दपक्षकार यांनी सेवेत त्रुटी केलेली असल्याने वसूल करु नये. 3)वरील प्रमाणे भरणा करुन घेतलेली रक्कम दिनांक06/01/2009रोजी पासून 18टक्के व्याज दरांने परत करावी. 4)मानसिक,शारिरीकत्रास व नुकसानीपोटी केलेले 5,00,0000/- रुपये नुकसान भरपाई मिळावी.5)अर्जाचा खर्च व इतर अनुषंगीक दाद मिळावी अशी मागणी केलेली आहे. 2)विरुध्दपक्षकार यांनी मंचात हजर राहून नि.9 प्रमाणे लेखी 3/- जबाब,प्रतिज्ञापत्र,लेखी युक्तीवाद दाखल दिनांक08/04/2009रोजी केला आहे. सह पुरावा करिता नि.8वर पुरशिस व नि.10वर कागदपत्रांचे यादीसह कागदपत्रे व नि.15प्रमाणे लेखी युक्तीवादाकरीता पुरशिस दाखल केली आहे. त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणे. विरुध्दपक्षकार यांनी लेखी जबाब नमुद केलेले आहे की तक्रारदार यांची तक्रार खोटी,चुकीची आहे ब-याच बाबी लपविण्यात आलेल्या आहेत. म्हणून खर्चासह नामंजुर करणेत यावा. तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही. तक्रारदार हे विरुध्दपक्षकार यांचे ग्राहक नाहीत. सक्षम अधिकारान्वये असेसमेंट देयक दिलेले आहे. एफ.आय.आर विज चोरी बाबत कलम126 व 135 अन्वये दाखल केलेले आहे. तक्रारदार हे आयुर्वेदिक ट्रिटमेंट देत असल्याने व्यवसाईक विज वापर आहे. म्हणून तक्रार अर्ज मंचात चालण्यास पात्र नाही. कोणत्याही विधानास बाधा न येता नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी विजेचा वापर आहे. त्यांचे देयक भरणा केलेले आहे. अन्य आक्षेप मान्य नाहीत.विरुध्दपक्षकार यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही. अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. म्हणून खर्चासह अर्ज नामंजुर व्हावा असे नमुद केले आहे. 3)तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज, विरुध्दपक्षकार यांचा लेखी जबाब, उभयतांची कागदपत्रे,प्रतिज्ञालेख,रिजॉईंडर, लेखी युक्तीवाद यांची सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केलेअसता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारण मिमांसा देऊन आदेश पारीत करणेत आले. 3.1)तक्रारदार यांनी ''लिव्ह अँड लायसेन्स'' दाखल केलेले नाही. त्यामुळे नमुद मिळकत ही तक्रारदार यांचे ताब्यात होती हे सिध्द होत नाही. तथापी नमुद मिळकतीमध्ये विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांचे नांवे कमर्शियल 1फेज विद्युत मिटर क्र.8003249824 व ग्राहक नं.00001165690 हे वीज वापराकरींता दिलेले होते व आहे हे दाखल देयकांवरुन सिध्द होते यावरुन विरुध्दपक्षकार यांनी विद्युत मिटर व्यवसाईकारणाकरीता दिलेले होते ते नेमके केव्हा दिले याबाबत उभयतांनी कोणताही खुलासा केलेला नाही. तथापी दिनांक06/12/2008 चे देयक पडताळणी केले असता मागील रिडींग 1361 दिनांक07/10/2008 व चालू रिडींग ''फॉल्टी'' दिनांक07/11/2008 असे नमुद आहे. म्हणजेच या मिटरमध्ये नेमके कोणते दोष होते ते विरुध्दपक्षकार यांनी त्यांचे रेकॉर्डवर ही बाब आल्यानंतर व माहिती झालेनंतरही त्यांची दखल घेतलेली नाही. म्हणून तक्रारदार यांना जी देयके देण्यात आली ती देयके भरणा केलेली आहेत व मुळात या देयकांविरुध्द कोणतेच वाद विरुध्दपक्षकार 4/- यांनी निर्माण केलेले नाही. तथापी यांचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. कारण विरुध्दपक्षकार यांना ही बाब सुध्दा मान्य आहे की, त्यांच मिळकतीमध्ये हे मिटर देण्यापुर्वी 'घरगुती' वापराचे विद्युत मिटर सदनामसिंग गोपालसिंग बेहर यांचे नांवे होते व ते मिटरही एप्रिल 2007 पासून ''फॉल्टी'' होते हे दाखल देयकांवरुन सिध्द होते ते देयक सदर व्यक्तीने पुर्णपणे भरलेले होते किंवा नाही हे विरुध्दपक्षकार यंनी सिध्द केलेले नाही. तथापी मंचापुढे जी दोन देयके अनुक्रमे दिनांक03/05/2007 व 26/12/2008 ची दाखल आहेत त्यामध्ये थकीत बाबी 15970.00 रुपये असल्याचे स्पष्ट होते असे असले तरी विरुध्दपक्षकार यांचे विद्युत कायदयाप्रमाणे जर एका मिळकतीमध्ये एकविद्युत मिटर वापरांत असेल तर त्यांच ठिकाणी दुसरे मिटर दिले जात नाही हा नियम व कायदा आहे. म्हणून त्या नियमांची व कायदयाची दखल घेतली असता तक्रारदार यांचा मुख्य मुद्दा मान्य व गृहीत धरणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तीक आहे. तक्रारदार यांनी व्यवसाईकारणाकरीता दुसरे नविन मिटर मागणी केली ती विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना मान्य करुन दिली आहे. पण त्या मिळकतीमध्ये पहिले मिटर बंद न करता चालू ठेवलेच कसे हा शंकास्पद प्रश्न मंचापुढे उभा रहातो व हाच मुद्दा निर्णयीत करणे अत्यंत आवश्यक आहे. सदर मिटर हे फॉल्टी होते हे विरुध्दपक्षकार यांना मान्य आहे. या मिटर ऐवजी दुसरे मिटर दिले हे ही मान्य आहे. मग पुन्हा त्याच मिटरला तक्रारदार हे व्यवसाईक कारणांकरीता वापर कसे काय करतील. तसेच विरुध्दपक्षकार यांनी दाखल केलेला स्पॉट इन्सपेक्शन रिपोर्ट पंचनामा यांची पडताळणी केली असता विरुध्दपक्षकार यांनी दिनांक 30/12/2008 रोजी वादीत मिटरचे रिडींग 03948 आहे असे नमुद केले आहे व हेच रिडींग दिनांक 26/12/2008 चे देयकांत आहे तर त्यांच मिटरचे दिनांक03/05/2007 चे देयकांचे रिडींग पडताळल्याच दिनांक 10/03/2007 रोजी मागील रिडींग 4926 व चालू रिडींग ''फॉल्टी'' असे नमुद आहे. यावरुन तफावती स्पष्टपणे मंचासमोर स्पष्ट होतात. तेच मिटर संयुक्त तपासणी अहवालामध्ये नमुद केले आहे की ''सिल काढून उघडण्यात आले. मिटरच्या आतील काळया रंगाची न्युट्रल वायर टर्मिनल जळाल्यामुळे कट झालेली आढळून आली. सदर मिटरमध्ये कोणत्याही प्रकारचा इतर फेरफारबदल आढळून आला नाही. तर मग हे मिटर सुरु होते कां.?मिटर विरुध्दपक्षकार यांनी त्यांचे ताब्यात पुढील चौकशीकरीता घेतले त्याचे काय झाले हे स्पष्ट केले कां.?व अँक्युचेकने मिटर तपासणी केली ती तपासणी 100टक्के योग्य व बरोबर होती व आहे हे गृहीत विद्युत कायदयाचे नियम व अटी व अँक्ट प्रमाणे 5/- धरता येईल कां.? म्हणून 99.41टक्के मिटर हळू चालत होते, त्या मिटरचा तक्रारदार हे वापर करीत होते. हे मुद्दे कायदेशीररित्या विचार,पडताळणी व अवलोकन केल्यास सिध्द,मान्य व गृहीत धरणेच न्यायोचित,विधीयुक्त व संयुक्तीक नाही. म्हणून विरुध्दपक्षकार यांनी जरी एफ.आय.आर. दाखल करुन विज चोरीची तक्रार तक्रारदार यांचे विरुध्द दाखल केलेली असली तरी विरुध्दपक्षकार यांनी एफ.आय.आर. हा अपुर्ण माहितीचा अर्धाच दाखल केला आहे व विज चोरीची फिर्याद ते फौजदारी न्यायायालयात सिध्द करण्यास कोणतीच अडकाठी नाही. कारण मंचाने मंचापुढे तक्रारदार यांनी वादीत देयकांविरुध्द तक्रार मांडली आहे व न्याय मागणी केली असल्याने जी वस्तु स्थिती मंचापुढे आहे त्यांची पडताळणी केली असल्याने जी वस्तु स्थिती मंचापुढे आहे त्यांची पडताळणी व अवलोकन करुन पुढील आदेश पारीत केलेला आहे. यदाकदाचित फौजदारी गुन्हा सिध्द झालेस वादीत देयक शेडयुल्ड प्रमाणेच वसुल करणेचा कायदेशीर हक्क व अधिकार विरुध्दपक्षकार यांना रहाणार आहे व त्या फिर्यादीचे या आदेशामुळे कोणतीही बाधा नाही. म्हणून मंचास सदर तक्रार अर्ज चालविण्यास व निर्णयीत करण्याचा पुर्ण हक्क व अधिकार आहे. वादीत देयक हे कोणते माप कसे घेवून देयक दिले आहे यांचीच फक्त पडताळणी केली आहे. अँक्युचेकने तपासणी करुन अंदाजे तक्ता तयार करुन 24 महिन्याचे 15900 युनिट जादा विज वापर व टेरिफ चेन्ज या कारणांने अंदाजे दिलेले देयक हे खोटया,चुकीच्या व बिनबुडाचे तत्त्वावर आधारीत असल्यामुळे रक्कम रुपये 1,28,432/- रुपये 11 पैसे वसुल करण्यास कोणताही हक्क व अधिकार विरुध्दपक्षकार यांना नव्हता व नाही. तथापी असे स्पष्ट असूनही ग्राहकांची लयलूट करण्याचा प्रयत्न कायदयाचे शस्त्र हाती घेवून केले आहे व नाहक आर्थिक,शारिरीक व मानसिक त्रास तक्रारदार यांना दिलेला आहे. सेवेत त्रुटी,निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केला आहे म्हणून आदेश. -आदेश - 1)तक्रारदार यांचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे. 2)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांचेकडून 03/01/2009 रोजीचे वादीत देयकाचे आधारे तक्रारदार यांचेकडून दबावाने रुपये1,28,423.11 पैसेचे देयक भरुन घेतले आहे ते खोटे चुकीचे व दिशाभूल करुन ग्राहकास नाहक त्रास दिला आहे. अशी रक्कम वसुल करण्यास कोणताच हक्क व अधिकार नाही. म्हणून अशी रक्कम त्वरीत परत करावी. यदाकदाचित अशी रक्कम त्वरीत रोख स्वरुपात परत करणे शक्य 6/- नसल्यास तक्रारदार यांचे प्रत्येक वेळचे चालू देयकांतून रक्कम वजा/वळती करुन रक्कम फेड करावी व तसा अखेर तपशिल तक्रारदार यांना दयावा. 3)उभय पक्षकारांनी आपापला खर्च स्वतः सोसावा. 4)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 5)तक्रारदार यांनी मा.सदस्यांकरीता तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात.अन्यथा मंच जबाबदार राहणार नाही. म्हणून केले आदेश. दिनांकः-31/05/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|