जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 239/2008. प्रकरण दाखल तारीख - 04/07/2008 प्रकरण निकाल तारीख - 18/12/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य बालाजी भास्कर पोलावार रा. नायगांव ता. नायगांव जि. नांदेड. अर्जदार विरुध्द. 1. मा.कनिष्ठ अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. उपवीभाग कार्यालय नायगांव जि. नांदेड गैरअर्जदार 2. मा. कार्यकारी अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. कार्यालय देगलूर, जि.नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.आय.एम.शेख गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदार यांचे नायगांव येथील घरी बसविलेले विज मिटर ग्राहक नंबर 555050134361 हे त्यांचे वडील कै.भास्कर विश्वनाथ पोलावार यांचे नांवावर असून ते हयात नसल्याकारणाने वारसा हक्काने अर्जदार हे त्यांचे उपभोग घेत आहेत. ब-याच वेळा मिटर नंबर आर-626 बंद असल्याकारणाने मिटर बदलण्याच्या संबंधी लेखी व तोंडी तक्रार गैरअर्जदार यांना दिली. त्याप्रमाणे गैरअर्जदार यांनी दि.21.6.2007 रोजी मिटर कॉस्ट भरण्यासाठी कोटेशन दिले. त्याप्रमाणे रु.700/- भरले. यानंतर मे,2008 मध्ये गैरअर्जदार यांचे तपासणी पथकाने मोहीमे अंतर्गत विज मिटर बंद असल्यामूळे दि.22.5.2008 रोजी असेंसमेट बिल रु.63,140/- चे दिले. एवढी मोठी रक्कम बघून अर्जदार घाबरले, त्यांची काहीच चूक नाही असे गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केल्यावर त्यांनी ते कमी करुन रु.26,540/- भरण्यास सांगितले. दि.26.5.2008 रोजी पर्यत बिल न भरल्या कारणाने विज पूरवठा खंडीत करण्यात आला. जबरदस्तीने भरावे लागलेले बिल रु.26,540/- परत मिळावेत, मानसिक ञासापोटी रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले. अर्जदाराने दबावतंञाचा वापर करुन खोटी तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदाराच्या सक्षम अधिका-याने भेट दिली असता तीथे विजेचा अनाधिकृत वापर होताना म्हणजे विज चोरी होताना आढळली. त्या वापराचे बिल अर्जदारास देण्यात आले व बिलाची पूर्ण रक्कम अर्जदाराने भरली आहे. दि.21.5.2008 रोजी अर्जदार विज चोरी करताना आढळला. मिटरवर विजेची नोंद होऊ नये म्हणून सर्व्हीस वायरला छेद देऊन डायरेक्ट सप्लॉय स्वतःच्या वापरासाठी घेतलेला होता. त्यामूळे विजेचे मिटर बंद होते, मिटरचे सिलही तोडलेले होते. अर्जदाराचे मिटर बंद असल्याकारणाने असेसंमेंट बिल देण्यात आले. मंजूर भारापेक्षा जास्त म्हणजे 1.17 केडब्ल्यू इतका विज भार अधिक होता. अर्जदाराच्या उपलब्ध असलेल्या विजेच्या जोडणीची पूर्नपाहणी करण्यात आल्यानंतर विजेचे बिल कमी होण्या योग्यतेचे होते त्यामूळे ते बिल नियमानुसार कमी करुन देण्यात आले. अर्जदाराने स्वतःची चूक मान्य करुन विज बिल भरले आहे त्यामूळे गैरअर्जदार यांचे सेवेत कोणतीही ञूटी नाही. त्यामूळे त्यांची तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदारानी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार हे ग्राहक क्रमांक 555050134361 द्वारे विज जोडणी वापरीत असून ती त्यांचे वडिलांचे नांवावर आहे. ते मिटर त्यांनी अद्यापही त्यांचे नांवावर ट्रान्सफर करुन घेतलेले नाहीत तर ते बेनिफीसीयरी या सदरात मोडतात. अर्जदाराने स्वतः आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, विज मिटर बंद होते त्यामूळे त्यांनी ते दि.21.7.2007 रोजी गैरअर्जदार यांनी दिलेले कोटेशन भरुन मिटर घेतले म्हणजे मिटर चालू स्थितीत होते असे असताना दि.2.05.2008 रोजी गैरअर्जदार यांचे तपासणी पथकाने प्रत्यक्ष स्थळी भेट दिली असता त्यांचे मिटर बंद आढळले व मिटरचे सिल तोडण्यात आलेले होते. त्यामूळे त्यांना असेंसमेट बिल रु..63,140/- देण्यात आले परंतु अर्जदार यांनी तक्रार केल्यावर पूर्नतपासणी करुन ते कमी करुन रु.26,540/- चे बिल अर्जदाराना देण्यात आलेले आहे. त्यानंतर अर्जदाराने ते बिल दि.28.5.2008 रोजी पावती नंबर 0282775 या द्वारे भरले आहे. यांचे कारण यानंतर दिलेले बिल अर्जदारांना मान्य होते. जबरदस्तीने हे बिल त्यांचेकडून भरुन घेतले या बददलचा कोणताही पूरावा त्यांने समोर आणलेला नाही. अंडर प्रोटेस्ट ही रक्कम भरली असा कोणताही पूरावा उपलब्ध नाही. उलट गैरअर्जदार यांनी रु.4,000/- चे दिलेले कंपाऊंडीग बिल पावती नंबर 0282776 प्रमाणे दि.28.5.2008 रोजीला अर्जदाराने भरले आहे. कंपाऊडींगचा अर्थ कॉप्रमाईज किंवा सूलानामा असा होतो त्यामूळे आता परत अर्जदारांना बिलाची रक्कम वापस मागता येणार नाही. गैरअर्जदाराने घटनास्थळ तपासणी रिपोर्ट दाखल केलेला आहे. यात मिटरची स्थिती बॉडी सिल हाताळलेले आहे. मिटर बदलण्याचा अर्ज व रु.700/- भरल्याचा उल्लेख यात केलेला आहे. हे मिटर नवीन होते. आऊटगोंईग सर्व्हीस वायरला इनकंमींग डायरेक्ट जोडलेले होते असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे मिटर बंद होते हा सर्व पूरावा पाहिला असता गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी दिसून येत नाही. अर्जदाराने तक्रार केल्यावर लगेच त्यांची दखल ही घेतली गेली. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारानी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |