( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा, श्रीमती रोहिणी दि. कुंडले)
-- आदेश --
( पारित दि. 20 ऑक्टोबर, 2012)
1. तक्रारकर्त्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी दिनांक 12/04/1992 व दिनांक 09/02/2012 रोजी विरूध्द पक्षाला अर्ज दिले. अजूनपर्यंतही तो खंडित केला नाही म्हणून मंचात तक्रार दाखल आहे.
2. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः-
3. बिरदीबाई कुंजीलाल अगरवाल यांच्या नावे विद्युत मीटर क्रमांक BL-CL-95-CL – कन्झुमर नंबर 43001000950 आहे. बिरदीबाई प्रस्तुत तक्रारकर्त्याच्या आईची आई म्हणजे तक्रारकर्त्याची आजी लागते. तक्रारकर्ता व त्याचे कुटूंब बिरदीबाईसोबत राहात होते व उपरोक्त मीटरचा वापर करीत होते. तक्रारकर्ता बिल भरत होता.
4. दिनांक 12/04/1992 रोजी बिरदीबाई व तक्रारकर्त्याने लेखी पत्र देऊन उपरोक्त मीटरचा वीज पुरवठा खंडित करण्याची व ठेव परत देण्याची विनंती केली. विरूध्द पक्षाला ते दिनाक 23/04/1992 रोजी प्राप्त झाले. विरूध्द पक्ष यांनी वीज पुरवठा खंडित केला नाही. त्यामुळे या मीटरचे येणारे बिल जबरदस्तीने व विनाकारण तक्रारकर्त्याला भरावे लागले. मीटर नंबर 43001000950 मधून विरूध्द पक्ष 1, 2, 3 यांनी विरूध्द पक्ष 4 च्या संगनमताने अनेक घरांना/दुकानांना अनधिकृतपणे विद्युत पुरवठा दिला आहे व ते अनधिकृतपणे आकार घेत आहेत, पण बिले मात्र तक्रारकर्ता भरतो.
5. माहितीच्या अधिकारात तक्रारकर्त्याने बिरदीबाईचे मीटर नंबर 43001000950 आणि स्वतःच्या नावे असलेले मीटर नंबर 430010166343 चे लेजर मागितले. त्यावरून अनधिकृत विद्युत पुरवठ्याची बाब स्पष्ट झाली असे तक्रारकर्ता म्हणतो.
6. बिरदीबाई व तक्रारकत्याने विरूध्द पक्षांना अनेकवेळा मीटर नंबर 43001000950 चा विद्युत पुरवठा त्वरित खंडित करण्याची व ठेव परत करण्याची मागणी प्रत्यक्ष भेटून केली. पण विरूध्द पक्ष यांनी विद्युत पुरवठा खंडित केला नाही व रक्कमही परत केली नाही.
7. तक्रारकर्त्याच्या स्वतःच्या नावे असलेल्या घरगुती मीटर क्रमांक 430010166343 चा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मागणी सुध्दा विरूध्द पक्ष यांनी पूर्ण केली नाही. तक्रारकर्त्याला असे समजले की, हे मीटर विरूध्द पक्ष यांनी अन्य ठिकाणी स्थानांतरित केले व महावीर सिल्क हाऊस या दुकानाला त्यातून विद्युत पुरवठा होतो.
8. विरूध्द पक्ष तक्रारकर्त्याला धमकी देतात की, ते तक्रारकर्त्यावर वीज चोरीचा आरोप लावून केस करतील व लाखो रूपये वसूल करतील. बाजारातील काही प्रामाणिक लोकांनी येऊन तक्रारकर्त्याला सांगितले की, ‘त्याच्या मीटरचा (430010166343) वापर व दुरूपयोग अन्य लोक करीत आहेत. वीज पुरवठा त्वरित खंडित करून घ्या’. म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक 09/02/2012 रोजी पुन्हा विरूध्द पक्ष यांच्याकडे अर्ज करून विद्युत पुरवठा खंडित करण्याची लेखी विनंती केली.
9. यावर विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला दिनांक 11/02/2012 रोजी कळविले की, राधेश्याम अग्रवाल हे या premises मध्ये राहात असून मीटरचा वापर करीत आहेत व बिले भरत आहेत. दिवाणी कोर्टात इस्टेटीचा वाद प्रलंबित आहे म्हणून राधेश्यामने विद्युत पुरवठा तोडण्यास मनाई केली.
10. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, राधेश्याम अग्रवालचा व विरूध्द पक्ष यांचा ‘’ग्राहक’’ म्हणून संबंध नाही. पुढे तक्रारकर्ता म्हणतो की, या मीटरवरून अनधिकृत जोडण्या दिल्या आहेत व विरूध्द पक्ष लाखो रूपये मिळवित आहेत. म्हणून ते लेखी निवेदन दिल्यानंतरही विद्युत पुरवठा खंडित करीत नाहीत.
11. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, विरूध्द पक्ष 1, 2, 3 व 4 (राधेश्याम अग्रवाल) यांचे संगनमत (Collusion) आहे. उपरोक्त दोन मीटर्सच्या (D.L. 430010166343 आणि C.L. 43001000950) अनधिकृत वापरामुळे तक्रारकर्त्याला प्रचंड आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास दिनांक 12/04/1992 पासून सहन करावा लागत आहे. त्याबद्दल रू. 1,00,000/- मिळावे व विनाकारण बिले भरावी लागत आहेत म्हणून खालीलप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी.
1. `4,00,000/- - loss of payment of bill from 12/04/92 till today and still continued one.
2. ` 63,000/- - Paid to Electricity Dept. as a theft amount.
3. ` 10,000/- - Cost of petition.
4. ` 25,000/- - Towards as mental and physical harassment to complainant by respondent
---------------------------------------------------------------------------------------------- `4,98,000/- (Four Lakhs Ninety Eight Thousand only)
----------------------------------------------------------------------------------------------
12. लेखी निवेदन देऊनही वीज पुरवठा खंडित न करणे ही विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी ठरते.
13. विरूध्द पक्ष 1, 2, 3 आणि विरूध्द पक्ष 4 हे वैयक्तिक व सामुहिकरित्या तक्रारकर्त्याला नुकसानभरपाई देण्यास बाध्य ठरतात.
14. तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष यांचा ‘’ग्राहक’’ आहे. तक्रारीस कारण सतत घडत आहे. तक्रार मंचाच्या अधिकारक्षेत्रात बसते.
15. प्रार्थनेच्या क्लॉजमध्ये तक्रारकर्त्याने `5,00,000/- ची मागणी दिनांक 12/04/1992 पासून 18% व्याजासहित विरूध्द पक्ष 1 ते 4 यांच्याकडून केली आहे.
16. मीटर क्रमांक C.L. 43001000950 आणि D.L. 430010166343 चा विद्युत पुरवठा त्वरित खंडित करण्याचा आदेश व्हावा अशी प्रार्थना तक्रारकर्ता करतो.
17. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत 5 आणि दिनांक 16/08/2012 रोजी 17 दस्त जोडले आहेत.
18. विरूध्द पक्ष 1, 2, 3 – एम. एस. ई. डी. सी. एल. चे उत्तर रेकॉर्डवर आहे.
19. तक्रारीस कारण, मंचाचे अधिकार क्षेत्र इत्यादी विरुध्द पक्ष नाकारतात.
20. मीटर क्रमांक C.L. 43001000950 हे बिरदीबाईच्या नावे आहे. तक्रारकर्ता हा बिरदीबाईचा प्रतिनिधी/कायदेशीर वारस/नाम-निर्देशित व्यक्ति आहे, ही बाब सक्सेशन सर्टिफिकेट अभावी अमान्य करतात. तक्रारकर्ता विरुध्द पक्ष 1, 2, 3 चा Recorded Consumer नाही, म्हणून त्याला मंचात तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही, म्हणून तक्रार खारीज करावी.
21. बिरदीबाईने दिनांक 12/4/2012 रोजी मीटर क्रमांक C.L. 43001000950 चा विज पुरवठा खंडित करण्यासाठी पत्र दिल्याची बाब विरुध्द पक्ष अमान्य करतात.
22. विरुध्द पक्ष 1, 2, 3 यांनी बिरदीबाईला जबरदस्तीने बिले भरायला लावतात ही बाब खोटी आहे. म्हणून अमान्य.
23. विरुध्द पक्ष 1, 2,3 यांनी मीटर क्रमांक मीटर क्रमांक D.L. 430010166343 तक्रारकर्त्याच्या नावे आणि मीटर क्रमांक C.L. 43001000950 बिरदीबाईच्या नावे असलेल्या दोन मीटर्स वरुन अनधिकृतपणे अन्य लोकांना व दुकानांना वीज पुरवठा दिला व त्यायोगे लाखो रुपये घेतात. या तक्रारकर्त्याच्या आरोपात अजिबात तथ्य नाही. आरोप खोटा आहे. असे विरुध्द पक्ष म्हणतात.
24. प्रस्तूत तक्रारकर्ता विरेद्र अग्रवालच्या नावे मीटर क्रमांक C.L. 430010166343 आहे. परंतु या मीटरचे Disconnection करावे. म्हणून तक्रारकर्त्याने कधीही विरुध् पक्षाकडे लेखी अर्ज सादर केला नाही. तसा तो रेकॉर्डवरही नाही.
25. विरुध्द पक्ष 1, 2, 3 यांनी तक्रारकर्त्याचे मीटर एका ठिकाणाहून दुसरीकडे स्वतःहून हलविले नाही. त्यातुन महाविर सिल्क हाऊस या दुकानाला वीज पुरवठा स्वतःहून केला नाही. मीटरच्या स्थानबदलाबदृल विरुध्द पक्षाकडे तक्रारकर्त्याने कधीही लेखी तक्रार दिली नाही.
26. विरुध्द पक्ष 1, 2, 3 यांनी तक्रारकर्त्याला खोटया वीज चोरीच्या प्रकरणात गोवण्याची धमकी देतात हा तक्रारकर्त्याचा आरोप तथ्यहीन आहे, म्हणून जोरकसपणे नाकारतात.
27. दिनांक 09/02/2012 रोजी बिरदीबाईचे मीटर क्रमांक C.L. 43001000950 चा वीज पुरवठा खंडित करण्याबदृल पत्र प्राप्त झाल्यावर विरुध्द पक्ष 1, 2, 3 चे अधिकारी जागेवर वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेले असता तेथे समजले की तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष 4 मध्ये त्या जागेचा वाद असून दिवानी दावा प्रलंबित आहे. (जेथे मीटर आहे त्या जागेचा) राधेश्यामने त्यांना सांगितले की वादग्रस्त जागा त्याच्या ताब्यात व उपभोगात आहे. मीटरचा वापर ते करतात. बिले भरतात, त्यामुळे विरुध्द पक्ष 1, 2, 3 च्या अधिका-यांनी वीज पुरवठा खंडित केला नाही. कारण वाद कोर्टात सुरु आहे. याच अनुषंगाने विरुध्द पक्षाने दिनांक 11/02/2012 रोजी तक्रारकर्त्याला पत्र दिले व वस्तूस्थिती अवगत केली.
28. विरुध्द पक्ष 1, 2, 3 च्या सेवेत कोणतीही त्रृटी केली नाही. म्हणून तक्रारकर्त्याची नुकसान भरपाईची मागणी `4,98,000/- काल्पनिक, खोटी, बेकायदेशिर आणि तथ्यहीन आहे. म्हणून अमान्य करतात.
29. तक्रारकर्त्याला तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण दिनांक 20/04/1992 व दिनांक 11/02/2012 रोजी घडले नाही. असे विरुध्द पक्ष म्हणतात.
30. प्रस्तूत तक्रारीत तक्रारकर्त्याने दोन वेगवेगळया व्यक्तिच्या नावे असलेल्या दोन भिन्न मीटर्सचा वाद उपस्थित केला आहे. कायदयानुसार अशा प्रकारे दोन गोष्टी एकत्र करता येत नाहीत. यावरुनही तक्रार खारीज होण्यास पात्र ठरते.
31. तक्रारकर्त्याची `5,00,000/- दिनांक 12/04/1992 पासून 18% व्याजासहीत मिळण्याची प्रार्थना विरुध्द पक्षांना अमान्य आहे.
32. तक्रारकर्त्याला तक्रार दाखल करण्यासाठी Locus नाही. कारण मीटर क्रमांक C.L. 43001000950 बिरदीबाईच्या नावे आहे. म्हणून तो याच्या Disconnection बदृल सांगू शकत नाही.
33. तक्रारकर्त्याने त्याच्या स्वतःच्या नावे असलेल्या मीटर क्रमांक D.L. 430010166343 च्या Disconnection बदृल विरूध्द पक्ष 1,2, 3 ला कधीही लेखी कळविले नाही. तक्रार खोटी म्हणून खर्चासहीत खारीज करण्याची विनंती विरुध्द पक्ष 1, 2, 3 करतात.
34. विरुध्द पक्ष क्रमांक 4 चे उत्तर थोडक्यातः-
35. बिरदीबाईच्या नावे मीटर क्रमांक C.L. 43001000950 आहे व ती विरुध्द 1, 2, 3 ची ‘’ग्राहक’’ आहे ही बाब मान्य.
36. बिरदीबाई 1992 साली मरण पावली तरीही अजूनही Recorded Consumer म्हणून तिचेच नाव आहे व त्याच नावाने उपरोक्त मीटरची बिले येतात.
37. तक्रारकर्ता आजी बिरदीबाईसोबत रहात होता हे तक्रारकर्त्याचे म्हणणे खोटे आहे. प्रत्यक्षात महेंद्रकुमार अग्रवाल बिरदीबाईसोबत रहात होता. तो तक्रारकर्त्याचा भाऊ आहे. चंद्रकलाबाई ही एकच मुलगी बिरदीबाईला होती. मुलगा नव्हता. (चंद्रकलाचा मुलगा म्हणजेच प्रस्तूत तक्रारकर्ता विरेद्रकुमार अग्रवाल हा आहे.)
38. बिरदीबाईने दिनांक 12/04/1992 रोजी Disconnection बद्दल विरुध्द पक्षाला पत्र लिहिले ही बाब विरुध्द पक्ष 4 अमान्य करतात.
39. तक्रारकर्ता बिरदीबाईचा प्रतिनिधी, कायदेशिर वारस किंवा नामनिर्देशित नाही.
40. आपल्या उत्तरात विरुध्द पक्ष 4 पुढे म्हणतात की तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष 4 यांच्यामध्ये 1200 Sq. Ft. जागेचा/मकानाचा विक्री संबधाने `12,51,000/- मधे करारनामा दिनांक 24/02/2003 रोजी झाला. त्यात उपरोक्त मीटर क्रमांक C.L. 43001000950 चाही समावेश होता. जागेचा ताबाही मीटरसहीत त्याच तारखेला (24/02/2003) विरुध्द पक्ष 4 ला तक्रारकर्त्याने स्वखुशीने दिला. (त्याच ब्लॉकमध्ये महेद्रकुमार तक्रारकर्त्याचा भाऊ कुटूंबासहीत रहात आहे). पुढे तक्रारकर्त्याने विक्री करुन दिली नाही, म्हणून विरुध्द पक्ष 4 ने स्पेशल सिव्हिल सुट 24/2004 (Specific Performance) दिवाणी कोर्टात दाखल केला. त्याचा निकाल विरुध्द पक्ष 4 च्या बाजूने लागला.
41. तक्रारकर्त्याच्या ताब्यात वादग्रस्त जागा व मीटर नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याला प्रस्तूत तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही.
42. बिरदीबाईच्या नावे असलेले मीटर क्रमांक C.L. 43001000950 ज्या खोलीत आहे तेथे अमित कॅसेट सेन्टर हे दुकान पूर्वीपासूनच आहे. या दुकानासहीत विरुध्द पक्ष 4 ने तक्रारकर्त्याशी विक्रीचा करारनामा केला आहे.
43. आपसी नातेसंबंधातील दुश्मनी व जागा आणि मकान यांचा वाद यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र. 4 ला व इतरांना त्रास देण्याच्या उद्देशाने disconnection चा खटाटोप चालविला आहे.
44. विरूध्द पक्ष क्र. 4 तर्फे सध्या वादग्रस्त जागेत महेन्द्रकुमार राहतो, मीटर वापरतो, बिले पटवितो.
45. तक्रार खोटी व दिशाभूल करणारी आहे. तक्रारकर्त्याने पूर्ण सत्य मंचासमोर आणले नाही. म्हणून तक्रार खर्चासहित खारीज करण्याची विनंती विरूध्द पक्ष क्र. 4 करतात.
46. विरूध्द पक्ष क्र. 4 ने एकूण 6 दस्त दाखल केले आहेत. त्यात तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष क्र. 4 मधील करारनामा, दिवाणी कोर्टाचे निकालपत्र इत्यादींचा समावेश आहे.
47. मंचाने दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला व रेकॉर्डवरील सर्व दस्त तपासले. त्यावरून मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
- निरीक्षणे व निष्कर्ष -
48. हे मंच ही तक्रार मुदतबाह्य म्हणून खारीज करते. असे असले तरीही मेरिटवर विवेचन मंचाला जरूरीचे वाटते. कारण तक्रारकर्त्याची तक्रार ब-याच अंशी संदिग्ध, काल्पनिक व वस्तूस्थितीचा विपर्यास करणारी आहे.
49. बिरदीबाईच्या मृत्युपत्रान्वये तक्रारकर्ता तिच्या इस्टेटीचा मालक झाला असे निष्पन्न होते. (दिवाणी कोर्टाचे निकाल रेकॉर्डवर आहेत). तक्रारकर्त्याने इस्टेटीचे कागदपत्र स्वतःच्या नावे करून घेतले, पण बिरदीबाईच्या नावाचे मीटर क्रमांक C.L. 43001000950 स्वतःच्या नावे करण्यासाठी दिनांक 03/12/1992 पासून (मृत्युची तारीख) आजपर्यंतही एक सुध्दा अर्ज विरूध्द पक्षाकडे दाखल केला नाही.
50. तक्रारकर्त्याने बिरदीबाईच्या नावे असलेल्या मीटर क्रमांक C.L. 43001000950 च्या disconnection बाबत विरूध्द पक्ष यांना दिनांक 22/04/1992 रोजी दिलेल्या पत्राची/अर्जाची प्रत रेकॉर्डवर दाखल केली आहे. त्यावर बिरदीबाईची व तक्रारकर्त्याची सही दिसते. त्यातच दिनांक 13/11/1992 व 16/11/1992 च्या अर्जाचा उल्लेख येतो. पण हे दोन अर्ज रेकॉर्डवर नाहीत. प्रत्यक्षात हे अर्ज केले किंवा नाही हे स्पष्ट होत नाही. दिनांक 22/04/1992 चा अर्ज मंचाला दिशाभूल करणारा वाटतो.
51. अर्जाप्रमाणे विरूध्द पक्ष यांनी disconnection केले नाही असे तक्रारकर्ता म्हणतो. दिनांक 22/04/1992 पासून तीन वर्षाच्या आंत (त्यावेळी 3 वर्षाची मुदत होती) तक्रारकर्त्याने ग्राहक मंचासमोर तक्रार दाखल करावयास पाहिजे होती. तसे त्याने केले नाही म्हणून तक्रार मुदतबाह्य (hopelessly time barred) ठरते असा मंचाचा निष्कर्ष आहे.
52. मीटर क्रमांक C.L. 43001000950 बिरदीबाईच्या नावे आहे. तिचा मृत्यु दिनांक 03/12/1992 रोजी झाला. परंतु त्यानंतर दिनांक 09/02/2012 रोजीच्या विरूध्द पक्षाला लिहिलेल्या पत्रात अर्जदार म्हणून बिरदीबाईचे नाव आहे. मृत व्यक्तीचे नाव ‘’अर्जदार’’ म्हणून येऊ शकत नाही. बिरदीबाई दिनांक 09/02/2012 रोजी ‘’अर्जदार’’ राहू शकत नाही. दिनांक 09/02/2012 चा अर्ज तक्रारकर्त्याने तक्रार मुदतीत आहे हे दाखविण्यासाठी स्वतःचे नाव ‘मार्फत’ घालून मंचाची व विरूध्द
पक्षांची दिशाभूल करण्यासाठी (व्यर्थ खटाटोप) केला असा मंचाचा निष्कर्ष आहे. या संदर्भात आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे खालील केस लॉ लागू होतात.
(i) State Bank of India v/s B. S. Agriculture Industries (I), II (2009) CPJ 29 (SC)=III (2009) SLT 793=(2009) 5 SCC 121.
(ii) Haryana Urban Development Authority v/s B. K. Sood, IV (2005) CPJ 1 (SC)=VIII (2005)SLT 146=2006 (1) CPR 121 (SC) and
(iii) V. N. Shrikhande (Dr.) v/s Anita Sena Fernandese, IV (2010) CPJ 27 (SC)=VII (2010) SLT 648=2011 CTJ 1 (SC) (CP).
यापैकी व्ही. एन. श्रीखंडे या केसमधील समर्पक उतारा खालीलप्रमाणेः-
“34. The respondent has not explained as to why she kept quiet for about 9 years despite pain and agony. The long silence on her part militates against the bona fides of the respondents claim for compensation and the Discovery Rule cannot be invoked for recording a finding that the cause of action accrued to her in November 2002. The National Commission, in our considered view, was clearly wrong when it held that the cause of action lastly arose to the respondent on 25.10.2002 when the second surgery was performed at Lilavati Hospital and the complaint filed by her on 19.10.2004 was within limitation.”
53. दिनांक 09/02/2012 च्या अर्जाच्या अनुषंगाने विरूध्द पक्ष disconnection साठी गेले होते. त्यांना मज्जाव करण्यात आला. तसे पत्र त्यांनी तक्रारकर्त्याला दिनांक 11/02/2012 रोजी पाठविले. ते खालीलप्रमाणेः-
दि. 11/02/2012
जा.क्र. 48
प्रति,
श्री. बीरेंद्रकुमार भगवतीप्रसाद अग्रवाल
गोंदीया
विषय - ग्राहक क्र. 430010000950 का वीज कनेक्शन बंद करणेबाबत
संदर्भ - आपका पत्र दी. 9/02/2012
वरील संदर्भीय पत्राअनुसार आपणे श्रीमती बीरदीबाई कुंजीलाल अग्रवाल के नाव का ग्राहक क्रमांक 430010000950 का वीज कनेक्शन बंद करणे बाबत अर्ज
दीया था पर वहा जाने पर पता चला की उस वीज कनेक्शन का वापर करनेवाले श्री. राधेश्यामजी अग्रवाल सदर कनेक्शन बंद करने के लिए वीरोध कीया और इनका कहना है की सदर वीज कनेक्शन का वापर कई सालो से कर रहे है. उसका वीज बील भी रेगुलर पटा रहे है और जहा वीज कनेक्शन है उस जगह का कोर्ट केस चल रहा है इसलीए भारतीय वीज कायदा 2003 की तहत जब तक कोर्ट का फैसला नही आता तब तक हम वीज वीतरण कंपनी की तरफसे ग्राहक क्र. 43001000950 का वीद्युत कनेक्शन खंडीत नही कर सकते. वो आपका आपसी मामला है तो उसे पुरा नीपटारा होने के बाद ही उसके उपर कारवाई कर सकते है.
ही विनंती
sd/-
Junior Engineer
Main Market D/O
M.S.Elect. Dist. Co. Ltd.,
GONDIA (U)
54. विरूध्द पक्ष 1, 2 व 3 च्या या पत्रात मंचाला तथ्य वाटते. त्यांच्या सेवेत त्रुटी नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे.
55. दिनांक 24/02/2003 रोजी तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष क्र. 4 यांच्यात उपरोक्त मीटर असलेली जागा विक्रीबाबत करारनामा झाला. हा करारनामा तक्रारकर्ता नाकारत नाही. तो रद्द केल्याबद्दलचा दस्तही रेकॉर्डवर नाही.
56. तक्रारकर्ता आणि विरूध्द पक्ष क्र. 4 या दोघांनीही एकमेकांविरूध्द Special Civil Suit दाखल केले. त्यात तक्रारकर्ता हरला व विरूध्द पक्ष क्र. 4 जिंकले असे सर्व निकालाचे वाचन करता निष्पन्न होते. (Special C. S.No. 14/2002 / Special C. S. No. 24/2004– पुढे यावरून अपिलेही झाली).
57. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष क्र. 4 यांच्यातील बिरदीबाईच्या जागेसंबंधीच्या वादामुळे अनेक कोर्ट केसेस झाल्या व अजूनही हा वाद सुरूच आहे. त्यामुळे वादग्रस्त जागेतील केवळ मीटरचा वाद (C.L. 43001000950) ग्राहक मंचाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. तक्रारकर्त्याची तक्रार ग्राहक वाद (Consumer Dispute) नाही असा मंचाचा
निष्कर्ष आहे.
58. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, बिरदीबाईच्या जागेचा/मकानाचा आजही ताबा त्याच्याकडे आहे व मीटर क्रमांक C.L. 43001000950 (बिरदीबाईच्या नावे असलेले) तो वापरतो. विरूध्द पक्ष क्र. 4 सुध्दा असेच विधान करतात. ग्राहक मंचाला या वादामध्ये शिरण्याचे कारण नाही, कारण या सर्व बाबी ग्राहक मंचाच्या अधिकारक्षेत्राबाहेरील आहेत. तरीही दिनांक 07/04/2012 रोजी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना लिहिलेल्या पत्रात, ‘यह मीटर गैरकानुनी तरीके से राधेश्याम अग्रवाल (तेडा) के कब्जे मे है।‘’ या वाक्यावरून जागेचा व मीटरचा ताबा विरूध्द पक्ष क्र. 4 कडे आहे असे स्पष्ट होते. (दिवाणी कोर्टाचे निकालातही असेच नमूद आहे).
59. सबब उपरोक्त विवेचनावरून मंचाचा निष्कर्ष आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मुदतबाह्य म्हणून खारीज करण्यास पात्र ठरते.
60. तक्रारकर्त्याने तक्रारीच्या परिच्छेद 12 मध्ये `1,00,000/- ची, परिच्छेद क्रमांक 13 मध्ये एकूण `4,98,000/- ची व शेवटी प्रार्थनेमध्ये `5,00,000/- ची नुकसानभरपाईची मागणी विरूध्द पक्ष 1, 2, 3 व 4 कडून केली. मंचाला ह्यात अजिबात तथ्य वाटत नाही. ती काल्पनिक व अवास्तव आहे. तक्रारकर्त्याने एकही बिल रेकॉर्डवर दाखल केले नाही.
61. तक्रारकर्त्याने त्याच्या स्वतःच्या नावे असलेल्या मीटर क्रमांक 430010166343 D.L. चे ही disconnection करावे असे याच तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात मंचाचा निष्कर्ष आहे की, दोन्ही मीटर्स वेगळे आहेत. दोन्हीचे ग्राहक भिन्न आहेत. दोन्हीची वर्गवारी वेगळी आहे. पत्ते वेगवेगळे आहेत. त्यामुळे मीटर क्रमांक 430010166343 D.L. चा वाद हातातील तक्रारीच्या माध्यमातून सोडविता
येणार नाही. दोन भिन्न बाबी एकत्र करता येणार नाहीत.
सबब आदेश
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची बिरदीबाईच्या नावे असलेल्या मीटर क्रमांक C.L.43001000950 च्या disconnection बाबतची तक्रार मुदतबाह्य म्हणून खारीज करण्यात येते. (नुकसानभरपाई 1992 पासून मागितली आहे).
2. तक्रारकर्त्याला बिरदीबाईच्या मृत्युनंतर Locus standi नाही म्हणूनही सदर तक्रार खारीज करण्यात येते. (Janak Kumari v/s Dr. Balwinder Kaur Nagpal – II 2003 CPJ 28 (NC)) “Actio personalis Moritur cum persona” = Legal representatives of the deceased complainant – Professor Baleshwar Singh would not be entitled to carry forward the complaint after his death.
3. खर्चाबद्दल आदेश नाही.
(श्रीमती गीता रा. बडवाईक) (श्रीमती अलका उ. पटेल) (श्रीमती रोहिणी दि. कुंडले)
सदस्या सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गोंदिया