निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 20.07.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 20.07.2010 तक्रार निकाल दिनांकः- 15.02.2011 कालावधी 6 महिने 25दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या. सदस्या. सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सौ.अदिती अतूल पालीमकर अर्जदार वय 40 वर्षे धंदा घरकाम रा.रामकृष्णनगर, ( अड.एस.एन.वेलणकर) परभणी. . विरुध्द 1 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड गैरअर्जदार मार्फत कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय,परभणी. 2 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड मार्फत युनिट इनचार्ज युनिट क्रमांक 5, बसमत रोड, परभणी. ( गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे अड.सचीन देशपांडे ) ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा सौ. सुजाता जोशी सदस्या ) अर्जदाराकडचे घरगुती वापराच्या 3 मिटर्सचे एकत्रीकरण गैरअर्जदाराने करु नये म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार अशी आहे की, अर्जदार ही परभणी येथील रामकृष्णनगरमधील रहिवासी असून तिच्याकडे घरगुती वापरासाठी 3 मिटरस असून त्यातील एक स्वतःच्या घरासाठी व उर्वरीत दोन भाडेकरुंसाठी आहेत. गेल्या 15 वर्षापासून ही 3 मिटरस आहेत. दिनांक 20.07.2010 रोजी अर्जदाराकडे गैरअर्जदाराचे युनिट इनचार्ज आले व त्यानी अर्जदारांच्या तिन्ही मिटर्सचे एका योजनेव्दारे एकत्रिकरण करण्यात येवून एक मिटर घराच्या आवारात बसवण्यात येइल असे सांगितले. अर्जदाराने त्याच्या घरातील 2 ब्लॉक्स किरायाने दिलेले आहेत व किरायेदारांना 2 स्वतंत्र मिटर्स दिली आहेत. अर्जदाराने परीपत्रक क्रमांक 110 ची पाहणी केली असता सोसायटीज मध्ये Common purpose ( एकत्रीत कारणासाठी ) जसे पार्कीगस्पेस, जिने, वॉटर पंप या सगळयांसाठी स्वतंत्र मिटर्स न देता एकच मिटर दयावे असा स्पष्ट उल्लेख आहे. जर गैरअर्जदाराने मिटर्सचे एकत्रीकरण केले तर विद्युत देयकाबद्यल बि-हाडकरुमध्ये भांडण होइल. अर्जदाराने गैरअर्जदाराला आजपर्यंतची विद्युंत देयक नियमीतपणे भरली आहेत. अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन ग्राहक क्रमांक 530010064901, 530010257572 व 530010503603 ची मिटर्स एकत्र करण्यात येवू नयेत म्हणून विनंती केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत शपथपत्र परीपत्रक क्रमांक 110 व विद्युत देयक तक्रारीत दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे दाखल करण्यासाठी गैरअर्जदारास नोटीस पाठविल्यावर गैरअर्जदाराने आपली बाजू अशी मांडली आहे की, अर्जदार ही त्यांची ग्राहकच नसल्यामुळे व अर्जदाराला गैरअर्जदाराने कोणतीही त्रूटीची सेवा दिलेली नसल्यामुळे ही तक्रार फेटाळण्याची विनंती केली आहे. विद्युत पुरवठयाच्या नियम व अटीनुसार एकाच आवारात एकाच कारणासाठी 2 विद्युत जोडण्या देता येणार नाहीत तर एकच विद्युत जोडणी देण्यात येइल परीपत्रक क्रमांक 110 नुसार मिटर्सचे एकत्रीकरण हे विद्युत देयकामधला तोटा टाळण्यासाठीच आहे. गैरअर्जदाराला चीफ ईजिनिअरच्या आदेशानुसारच अर्जदाराच्या मिटर्सचे एकत्रीकरण करावयाचे होते. अर्जदार तिच्या बि-हाडकरुंसाठी खाजगी मिटर बसवू शकते त्यामुळे मालक व बि-हाडकरुंमधील भांडणाचा प्रश्नच उदभवत नाही. गैरअर्जदाराचची तक्रार खर्चासहीत फेटाळण्यात यावी अशी लेखी निवेदनच्या शेवटी विनंती केली आहे. . गैरअर्जदाराने आपल्या लेखी म्हणण्या सोबत शपथपञ , परीपत्रक 123 विद्युत पुरवठयासाठी अटी हे कागदपत्र दाखल केले आहे. अर्जदार व गैरअर्जदारांच्या वकिलांचा युक्तिवाद व तक्रारीत दाखल कागदपत्र यावरुन तक्रारीत खालील मुददे उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक आहे काय ? होय 2 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रूटीची सेवा दिली आहे काय ? होय 3 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 – सदरील तक्रारीतील ग्राहक क्रमांक 530010257572, 530010064901, 530010503603 ची मिटर्स ही अर्जदाराचे नावे नसल्यामुळे अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक होत नाही असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. अर्जदाराने तिच्या तक्रारीत तिन्ही मिटर्स घरगुती वापरासाठी घेतलेली असून त्यातील एक मिटर ती स्वतः वापरते व 2 मिटर्स तिच्या बि-हाडकरुंसाठी आहेत असे म्हटलेले आहे. ‘’ ग्राहक संरक्षण कायदा 1986 ‘’ मधील ‘’ ग्राहक ‘’ याचा अर्थ ड ( दोन ) ज्याचे प्रदान करण्यात आले आहे किंवा प्रदान करण्याचे वचन देण्यात आले आहे किंवा अशंतः देण्याचे वचन देण्यात आले आहे अशा प्रतिफलाचे किंवा स्थगित प्रदानाच्या कोणत्याही पदतीनुसार कोणतीही सेवा ( भाडयाने घेते किंवा तिचा लाभ घेते ) अशी कोणतीही व्यक्ति असा असून जेव्हा अशी सेवा प्रथमनिर्दिष्ट व्यक्तिच्या समतीने उपलब्ध झाली असे अशा बाबतीत त्यात देण्यात आलेल्या किंवा देण्याचे वचन दिलेल्या किंवा अशंतः दिलेल्या किंवा अशंतः देण्याचे वचन दिलेल्या प्रतिफळासाठी किंवा स्थगित प्रदानाचा कोणत्याही पध्दतीसाठी अशी सेवा ( भाडयाने घेते किंवा तिचा लाभ घेते ) अशा व्यक्तिखेरीज अशा सेवेच्या कोणत्याही लाभधा-याचा समावेश असेल ‘’ वरील व्याख्येनुसार अर्जदार वरील मिटर्सची लाभधारक असल्यामुळे ती सदरील तक्रार ग्राहक म्हणून दाखल करु शकते म्हणजेच अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक आहे. गैरअर्जदारानी अर्जदाराच्या नावावर मिटर्स नसल्यामुळे ती ग्राहक होत नाही व त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाखाली ती तक्रार दाखल करु शकत नाही असे म्हटलेले आहे त्यामुळे अर्जदार ही लाभार्थी असली तरी केवळ विद्युत देयकावर नाव बदल केले नाही म्हणून न्यायापासून वंचीत राहील म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराकडून योग्य ती कागदपत्रे जी मिटर्सचे नाव बदल करण्यासाठी लागतात ती घेवून अर्जदाराच्या मिटर्सचे कायदेशीरित्या नामांतर करुन दयावे अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेले नि. 6/1 वरील दिनांक 16.02.2010 चे परीपत्रक क्रमांक 110 पाहिले असता त्यात Subject clubbing of common meters of residential housing societies and commercial complexes या विषयाखाली हाऊसिंग सोसायटीज व कमर्शिअल कॉम्पलेक्स मध्ये सामाइक विद्युत पुरवठा लिफट, वॉटर पंप, जिने इत्यादी साठी स्वतंत्र विद्युत जोडणी असते त्याऐवजी या परीपत्रकाव्दारे सर्व सामाईक वापरांसाठी एकच विद्युत मिटर असावा असे जाहीर करण्यात आले. त्या परीपत्रकामध्ये 1 Common connection is to be given to Residential Housing Societies and Commercial complexes for common lighting lift, water pump and stair case etc ” परीपत्रक क्रमांक 110 साठी अजून मार्गदर्शक तत्वे देण्यासाठी गैरअर्जदारानी दिनांक 14.10.2010 रोजी परीपत्रक क्रमांक 123 जाहीर केले जे गैरअर्जदाराने नि. 20/2 वर दाखल केले आहे त्यामध्ये परीपत्रक क्रमांक 110 तील सर्व अटी ग्राहकांना लागू आहेत व त्या परीपत्रकाला पुरक म्हणून परीपत्रक क्रमांक 123 मधील अटी आहेत त्यात 2 In future all new common purpose connections of the Residential Housing Societies and commercial complexes are to be released on single common metering point only. Any separate meters issued will be viewed seriously असे आहे म्हणजे परीपत्रक क्रमांक 110 व 123 मध्ये Residential Housing Societies and Commercial compleses मधील common purpose connection साठी ही परीपत्रके लागू आहेत. गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि. 20/1 वरील “ Condition of supply “ यातील New service connections साठीच्या अटी दाखल केले ल्या आहेत या अटी नवीन विद्युत जोडणी देण्यासाठीच्या आहेत व नवीन विद्युत जोडणी देताना एकाआवारात एका कारणासाठी एकच विद्युत जोडणी देण्यात यावी व जर एकाच नावावर एकाच आवारात अशी दोन कनेकशनस असतील तर त्यातील एक कनेकशन कायमचे तोडावे व त्यांच्यातील करार रद्य करावा पण प्रारभीक काळ संपल्यानंतर डिसकनेकशन करावे आणि ‘’ टर्मिनेशन आफ अग्रिमेंट ‘’ ची नोटीस दयावी. व नवीन कनेकशन एखादया कारणासाठी देताना त्या आवारात जुने कनेकशन त्याच कारणासाठी त्याच मालकाच्या नावावर नाही ना याचा शोध घेवूनच नवीन कनेकशन दयावे अशा अटी आहेत पण या अटी नवीन विद्युत जोडणी देतानाच्या आहेत. परीपत्रक क्रमांक 110 व 123 मधूनही Housing Socieities व Commercial complexes मधील सामाईक वापरासाठी एक मीटर असावे असे स्पष्ट दिसून येते गेरअर्जदारांच्या युनिट इजिनीरने परीपत्रकाचा पूर्णपणे अर्थ समजून घेवून ग्राहकांवर त्यांचा वापर करावा नसत ग्राहकांवर अन्याय होवू शकतो त्यामुळे गैरअर्जदाराने परीपत्रकाच्या आधारे अर्जदाराच्या तिन्ही मिटर्सचे एकत्रीकरण करण्याचे सांगून अर्जदारास त्रूटीची सेवा दिली आहे असे आम्हास वाटते म्हणून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदाराच्या घरातील ग्राहक क्रमांक 530010066901, 530010257572 व 530010503603 चे मिटर्सचे एकत्रीकरण करु नये 3 संबंधीताना आदेशाच्या प्रती मोफत पाठवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |