निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 29/07/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 29/07/2010 तक्रार निकाल दिनांकः- 23/05/2011 कालावधी 09 महिने 24 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. तान्हाजी पिता संतराम मकरंद अर्जदार वय 68 वर्षे.धंदा. सेवानिवृत्त. अड.व्हि.के.बलखंडे. रा.गौतम नगर.परभणी.ता.जि.परभणी.
विरुध्द 1 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं.लि. गैरअर्जदार. व्दारा एक्झीक्युटिव्ह इंजिनियर. अड.एस.एस.देशपांडे. अर्बन डिव्हीजन.जिंतूर रोड.रभणी. 2 डेप्युटी एक्झीक्युटिव्ह इंजिनियर. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं.लि. अर्बन डिव्हीजन.जिंतूर रोड.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती अनिता ओस्तवाल.सदस्या. ) गैरअर्जदार विज वितरण कंपनीने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराने ग्राहक क्रमांक 30010075318 अन्वये वर्ष 1978मध्ये विज जोडणी गैरअर्जदाराकडून घेतली आहे.अर्जदाराने जून 2007 पर्यंत नियमितपणे विद्युत देयकाचा भरणा केला तदनंतर अवाजवी रक्कमेचे विद्युत देयक गैरअर्जदाराने दिल्यामुळे अर्जदाराने सन्माननिय ग्राहक मंचासमोर तक्रार दाखल केली होती.व मंचाने गैरअर्जदारास मीटर रिडींग प्रमाणे विद्युत देयक अर्जदारास देण्यास आदेशीत केले होते,परंतु गैरअर्जदाराने जानेवारी 2010 ते अद्याप पावेतो अर्जदारास नियमित विद्युत बील दिलेली नाहीत.फेब्रुवारी 2010 साठीचे 13 युनिट व रक्कम रु.1830/- मार्च 2010 साठी युनीट 13 व रक्कम रु.80/- मे 2010 युनीट 13 व रक्कम 150/- चे विद्युत देयक दिलेली आहेत.जुन 2010 महिन्यासाठी मागील रिडींग 135 25 व चालू रिडींग 18131 चे दर्शविण्यात येऊन 4606 युनीट व रककम रु.27,190/- चे विद्युत देयक दिले.त्यामुळे दिनांक 21/07/2010 रोजीच्या लेखी अर्जाव्दारे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे तक्रार नोंदविली व मीटर रिडींग प्रमाणे विद्युत देयक देण्याची विनंती गैरअर्जदारास केली,परंतु गैरअर्जदाराने त्यास कसलाही प्रतिसाद दिला नसल्यामुळे अर्जदाराने ही तक्रार मंचासमोर दाखल करुन दिनांक 06/07/2010 रोजीचे व दिनांक 31/05/2010 ते दिनांक 30/06/2010 या कालावधीठी देण्यात आलेले रक्कम रु.27190/-चे विद्युत देयक रद्द करण्यात यावे.त्या ऐवजी मीटर रिडींग प्रमाणे विद्युत देयक अर्जदारास द्यावी तसेच नुकसान भरपाई रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 2000/- द्यावी अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. तक्रार अर्जासोबत अर्जदाराने शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.6/1 ते 6/12 मंचासमोर दाखल केली. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन नि.15 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहूतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, डिसेंबर 2009 ते मे 2010 या 6 महिन्यासाठी डोअरलॉक असल्यामुळे गैरअर्जदारास मीटर रिडींग प्रमाणे विद्युत देयक देता आलेली नाहीत.नोव्हेंबर 2009 या महिन्यासाठीची मीटर रिडींग 13525 व जून 2010 मध्ये मीटर रिडींग 18131 अशी मिळाल्यामुळे दोन्ही रिडींग मधील फरक 18131 – 13521 = 4606 असा असल्यामुळे अर्जदारास 7 महिन्यासाठी युनीट 4606 चे व रक्कम रु. 27190/- चे विद्युत देयक दिलेली आहेत.अर्जदारास योग्य व मीटर रिडींग प्रमाणे विज बील देण्यात आलेली असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने शपथपत्र नि.18 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.21/1 ते नि.21/4 व नि.23/1 ते नि.23/3 वर मंचासमोर दाखल केली आहेत. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 अर्जदाराने वर्ष 1978 मध्ये गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 30010075318 अन्वये विज जोडणी घेतली आहे. गैरअर्जदाराने जानेवारी 2010 ते अद्याप पावेतो अर्जदारास नियमित व मीटर रिडींग प्रमाणे विद्युत देयक दिलेली नाही.फेब्रुवारी 2010 साठीचे 13 युनिट व रक्कम रु.1830/- मार्च 2010 साठी युनीट 13 व रक्कम रु.80/- मे 2010 13 युनीट व रक्कम रु.150/- चे विद्युत देयक दिली. त्यानंतर जून 2010 महिन्यासाठी 4606 युनीट व रक्कम रु.27190/- चे देयक दिले. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, डिसेंबर 2009 ते मे 2010 या कालावधीसाठी डोअरलॉक असल्यामुळे गैरअर्जदारास रिडींग प्रमाणे बील देता आले नाही,परंतु नोव्हेंबर 2009 या महिन्यात अर्जदाराची मिटर रिडींग 13525 व जून 2009 मध्ये मिटर रिडींग 18131 अशी मिळाल्यामुळे दोन्ही रिडींग मधील फरक ( 18131 – 13525 ) 4606 युनिट एवढा असल्यामुळे अर्जदारास 7 महिन्यासाठी 4606 युनिटचे बिल दिलेले आहे.निकालासाठी मुद्दा असा की, गैरअर्जदाराने अर्जदारास मिटर रिडींग प्रमाणे बील दिलेले आहे काय ? यासाठी गैरअर्जदाराने मंचासमोर नि.21/1 व नि.23/3 वर सी. पी. एल. ची छायाप्रती लावलेल्या आहे. त्याची पडताळणी केली असता मिटर रिडींगच्या नोंदी योग्य रित्या करण्यात आल्या नसल्याचे स्पष्ट होते जशी की, मे 2009 मध्ये चालू रिडींग 13450 व मागील रिडींग 13390 अशी दर्शविण्यात आली आहे व त्यापुढे रिडींग मध्ये कोणताही बदल न होता ऑक्टोबर 2009 पर्यंत चालू रिडींग व मागील रिडींग एकच म्हणजे 13450 दर्शविण्यात येवुन सरासरी युनिटचे विद्युत देयक अर्जदारास दिलेले आहे.तर ऑक्टोबर 2009 मध्ये चालू रिडींग 13490 व मागील रिडींग 13450 दर्शवुन 40 युनिटचे विद्युत देयक अर्जदारास देण्यात आलेली आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, मिटर रिडींग व्यवस्थीत घेण्यात आलेल्या नाहीत अथवा त्याच्या नोंदी योग्यरित्या करण्यात आल्या नसाव्या पुढे गैरअर्जदाराने असा बचाव घेतला आहे की, नोंव्हेंबर 2009 मध्ये मिटर रिडींग 13525 व जून 2010 मध्ये 1813 अशी मिळाल्यामुळे अर्जदारास डिसेंबर 2009 ते 2010 या महिन्यासाठी युनिट 4606 चे बील देण्यात आले म्हणजे ते रिडींग प्रमाणेच देण्यात आलेले आहे, परंतु गैरअर्जदाराने घेतलेल्या बचावात तथ्य दिसत नाही. कारण जर हाच आधार मानावयाचा झाल्यास मे 2009 मध्ये मागील रिडींग 13390 व चालू रिडींग 13450 अशी दर्शविण्यात आली आहे व त्यानंतर ऑक्टोबर 2009 मध्ये चालू रिडींग 13490 व मागील रिडींग 13450 अशी नमुद करण्यात आली आहे.याचा अर्थ असा की, ते जून 2009 ते ऑक्टोबर 2009 च्या कालावधीसाठी फक्त 40 युनिटचा विज वापर अर्जदाराने केले असे गृहीत धरावे लागेल म्हणून सर्व विवेचनावरुन असा निष्कर्ष निघतो की, एक तर अर्जदाराचा मिटर सदोष असावा अथवा मिटर रिडींगच्या नोंदी व्यवस्थित घेण्यात आलेल्या नाही,परंतु मिटर सदोष असल्याबाबत दोन्हीं पक्षांचे म्हणणे नाही त्यामुळे फक्त मिटर रिडींगच्या नोंदी व्यवस्थीत घेण्यात आलेल्या नाहीत. हाच निष्कर्ष निघतो. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले. मुद्दा क्रमांक 2 वर विवेचन केल्याप्रमाणे अर्जदाराच्या मिटर रिडींगच्या नोंदी व्यवस्थीत करण्यात आलेल्या नसल्याचे शाबीत झाल्यामुळे डिसेंबर 2009 ते आजपर्यंत देण्यात आलेली सर्व विद्युत देयके रद्द करण्यात येत आहे.त्या ऐवजी गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासून पूढिल तीन महिन्यापर्यंत मिटर रिडींगच्या सलग नोंदी घ्याव्यात. त्यात अर्जदाराने सुध्दा गैरअर्जदाराशी सहकार्य करुन व स्वतः ही मिटर रिडींगच्या नोंदी ठेवाव्यात व तीन महिन्याचे विद्युत देयकाचे प्रतीमहा सरासरी अर्जदाराचा विज वापर लक्षात घेवून प्रतीमहा या प्रमाणे विज आकारणी करावी. असा आदेश देणे न्यायसंगत होईल म्हणून सर्व बाबींचा सारासार विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार विज वितरण कंपनीने निकाल कळाल्यापासून पूढिल 3 महिन्यासाठी अर्जदाराच्या मिटरच्या नोंदी व्यवस्थीत घेउन त्याप्रमाणे प्रतीमहा अर्जदाराचा विज वापर काढून अर्जदारास डिसेंबर 2009 ते निकाल लागेपर्यंतच्या कालावधीसाठीचे विज बील स्लॅब बेनेफिटसह द्यावी. या रक्कमेवर कोणतेही दंड व्याज आकारु नये या दरम्यान जर अर्जदाराने विद्युत देयकापोटी काही रक्कम भरली असल्यास ती यातून समायोजित करण्यात यावी. व उर्वरित रक्कम 3 समान हप्त्यामध्ये वसूल करावी. 3) आदेश क्रमांक 2 ची पूर्तता निकाल कळाल्यापासून 120 दिवसात करावी. 4) गैरअर्जदार विज वितरण कंपनीने मानसिकत्रासापोटी व सेवात्रुटी पोटी एकुण रु.2,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000 निकाल कळाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावेत. 5) संबंधीतांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |