जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/48. प्रकरण दाखल दिनांक – 13/02/2009. प्रकरण निकाल दिनांक – 10/06/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. 1. सौ.निलावतीबाई भ्र. रामराव पाचलिंग वय, 60 वर्षे, धंदा, घरकाम व शेती रा. कासार गल्ली, मुदखेड ता.मुदखेड जि.नांदेड. अर्जदार 2. वैजनाथराव तोलाजीराव भालेराव वय, 45 वर्षे, धंदा शेती, रा.कासार गल्ली, मुदखेड. विरुध्द 1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. मार्फत अधिक्षक अभिंयता, विदयूत भवन हिंगोली रोड, नांदेड. गैरअर्जदार 2. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. मार्फत कार्यकारी अभिंयता, विदयुत भवन, हिंगोली रोड, नांदेड. 3. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. मार्फत कनिष्ठ अभिंयता, शासकीय विश्रामगृह समोर, उमरी रोड, मुदखेड ता. मुदखेड जि. नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.राहूल डावरे गैरअर्जदारा तर्फे - अड.विवेक नांदेडकर निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार क्र.1 हे मूळचे मूदखेड येथील रहीवासी असून अर्जदार क्र.2 हे अर्जदार क्र.1 चे घरजावई आहेत.अर्जदार यांची एकञित कूटूंबाची शेती गट नंबर 106 एकूण क्षेञफळ 5 हेक्टर 4 आर असून त्यापैकी 3 हेक्टर 2 आर जमीन अर्जदार क्र.1 यांचे नांवे आहे व उर्वरित अर्जदार क्र.2 यांच्या नांवे आहे. अर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदाराकडून ग्राहक क्र.550050016731 याद्वारे विद्यूत कनेक्शन घेतलेले आहे. अर्जदार यांचे शेतातून गेरअर्जदार यांची विदयू मूख्य प्रवाहीका गेली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना वारंवार शेतातून गेलेल्या विदयूत मूख्य प्रवाहीकाचे तार ऐकमेकांना स्पर्श करुन स्पार्कीग होत असल्याचे सांगितले होते तरी गैरअर्जदार त्याकडे दूर्लक्ष करीत होते. दि.17.1.2007 रोजी दूपारी 12.00 वाजता तार एकमेकांना चिकटून स्पार्कीग होऊन तार तूटले व अर्जदार यांच्या शेतातील ऊस जो की तोडणी योग्य होता व ऊसाच्या पाचटी सर्व वाळलेल्या असल्या कारणामॅळे स्पार्कीग मूळे अर्जदार यांचा 1 हेक्टर 20 आर ऊसापैकी 1 हेक्टर ऊस पूर्णपणे जळून नूकसान झाले. गेरअर्जदार क्र.3 यांना त्या बाबत तोंडी व लेखी कळविले. पोलिस स्टेशन मूदखेड यांना व तहसील कार्यालय, मूदखेड यांनाही कळविले. दि.17.1.2007 रोजी पोलिस ठाणे मुदखेड यांनी जळीत क्र.1/07 अशी नोंद केली व घटनास्थळी येऊन पंचनामा केला व रु.1,50,000/- चे नूकसान झाले असा पंचनामा केला. तहसिल कार्यालय मूदखेड यांनी मंडळ अधिकारी व तलाठी सज्जा यांना घटनास्थळी पाठविले असता त्यांनी सूध्दा पंचासमक्ष पंचनामा केला व रु.1,40,000/- चे नूकसान झाले असा अहवाल दिला. गेरअर्जदार यांना नूकसान भरपाईची मागणी केली असता त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. गेरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना दि.9.2.2007 रोजी वकिलामार्फत रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठविली व ती त्यांना मिळाली त्या बाबतच्या पोचपावत्या तक्रारीत दाखल केल्या आहेत. अर्जदार यांचे शेतातून कमीत कमी 50 टन एकरी ऊसाचे उत्पादन होत होते व त्यांचे ऊस जळाल्यामूळे त्यांचे भयंकर वजन घटल्यामूळे 125 टन होण्याऐवजी त्यांचे वजन 80 टन झाले व अर्जदारास 45 टनाचे नूकसान झाले. प्रतिटन रु.850/- भाव याप्रमणे रु.38,250/- चे नूकसान झाले, तसेच ऊस जळीत प्रकरण म्हणून कारखान्याने रु.10,912/- एवढे कपात केले. असे एकूण रु.49,162/- निव्वळ नूकसान झाले. तसेच मानसिक ञासापोटी रु.25,000/- व सेवेत ञूटी बददल रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- चे नूकसान मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 तर्फे वकिल हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदार क्र.1 हे त्यांची ग्राहक नसल्याकारणाने ही तक्रार चालू शकत नाही. अर्जदार क्र.1 यांचे नांवे गैरअर्जदार यांनी कोणतेही विज कनेक्शन दिलेले नाही व तसे प्रमाणपञ ही प्रकरणात जोडलेले आहे. अर्जदार क्र.1 चे अर्जदार क्र.2 हे घरजावई असल्या बाबत त्यांना कोणतीही माहीती नाही. एकञित कूटूंब असल्या बाबत त्यांना माहीती नाही. त्यांचे नांवावर जमिन आहे ही बाब सूध्दा गैरअर्जदार यांनी नाकारलेली आहे. अर्जदार क्र.2 हे सदर जमिन वहिती करतात असे म्हटले आहे पण त्या बाबत कोणताही पूरावा दिलेला नाही. अर्जदार यांचे शेतातून विदयूत मूख्य प्रवाहीका गेली हे म्हणणे चूकीचे आहे. अर्जदार क्र.1 हे गैरअर्जदाराचे ग्राहक नसल्याकारणाने हे प्रकरण दाखल करता येऊ शकत नाही. तार ऐकमेकांना स्पर्श होऊन स्पार्कीग होत आहे या बाबत गैरअर्जदार यांना काहीही अर्जदार यांनी सांगितलेले नाही. स्पार्कीग होऊन दि.17.1.23007 रोजी ऊस जळाला हे म्हणणे चूकीचे आहे. ऊस जळाल्या बाबत पोलिस स्टेशन व तहसिल कार्यालय मुदखेड यांना कळविल्या बाबत गैरअर्जदार यांना काहीही माहीती नाही. ऊस जळून रु.1,40,000/- चे नूकसान झाले हे त्यांना मान्य नाही. दोन्ही पंचनामे चूकीचे आहेत. एकरी रु.850/- चे उत्पन्न होते व रु.38,250/- चे नूकसान झाले हे म्हणणे सर्वस्वी चूक आहे. गैरअर्जदारांने असा आक्षेप घेतला आहे की, ग्राहक सरंक्षण कायदयाने दोन वर्षाची मूदत असताना हा अर्ज दि.12.2.2009 रोजी दाखल केलेला आहे जो दोन वर्षाच्या कालावधीनंतर दाखल केलेला आहे त्यामूळे तक्रार खारीज करावी असे म्हटले आहे. त्यामूळे गैरअर्जदारांची विनंती आहे की, अर्जदाराने केलेली तक्रार ही खोटी व बनावट असून ती खारिज होण्या योग्यतेची आहे त्यामूळे त्यांना रु.10,000/- कॉस्ट लावावी ही विनंती. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार यांची तक्रार मूदतीत आहे काय ? नाही. 2. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांचे अर्जातील कथनानुसार अर्जदार यांचे शेतीमध्ये घडलेली ऊस जळीताची घटना ही त्यांनी दाखल केलेल्या कागदपञानुसार दि.17.1.2007 रोजी घडल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दि.9.2.2007 रोजी आर.पी.ए.डी.ने नोटीस पाठविली आहे. प्रत्यक्ष अर्जदार यांना गैरअर्जदार यांचे विरुध्द या मंचामध्ये दि.13.2.2009 रोजी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. ग्राहक संरक्षण कायदा कलम 24 प्रमाणे घटना घडल्यापासून दोन वर्षाचे आंत सदर घटने विरुध्द ग्राहक मंचामध्ये दाद मागता येते. अर्जदार यांची घटना दि.17.1.2007 रोजीची व त्यानंतरची नोटीस दि.9.2.2007 रोजीची पाहिले वरुन व अर्जदार यांचे प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याची दि.13.2.2009 रोजी यांचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी सदरचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 24 नुसार मूदतीत दाखल केलेली नाही. अर्जदार यांनी अर्ज दाखल करताना सदर अर्जास उशीर माफीचा अर्ज दिलेला नाही. ग्राहक संरक्षण कायदा कलम 24 नुसार घटना घडल्यापासून त्यांचे मूदतीचा कालावधी हा दोन वर्षासाठी आहे. सदरची नोटीस मिळाल्यापासून ग्राहक संरक्षण कायदा नुसार मूदतीचा कालावधी अर्जदार यांना मोजता येणार नाही. त्यामूळे अर्जदार यांच्या नोटीस मिळाल्या बाबतचे कथनास कोणतेच कायदेशीर अर्थ उरत नाही. त्यामूळे अर्जदार यांचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 24 नुसार मूदतीच्या कारणावरुन नामंजूर होण्यास पाञ आहे असे या मंचाचे मत आहे. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांचे अर्जातील कथनाप्रमाणे अर्जदार क्र.1 ही मुदखेड येथील मूळची रहीवासी असून अर्जदार क्र.2 हे घरजावई आहेत. गैरअर्जदार यांची विदयूत मूख्य प्रवाहीका अर्जदार यांचे शेतातून गेलेली आहे. सदर प्रवाहीकेचे तार एकमेकाना स्पर्श करुन स्पार्कीग झाल्यामूळे अर्जदार यांचे शेतातील ऊस 1 हेक्टर 20 आर या क्षेञातील ऊस जळून अर्जदार यांचे नूकसान झाल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार यांची विदयूत मूख्य प्रवाहीका ग्राहकाना विज कनेक्शन देण्यासाठी मैलो कोंसो दूर कार्यरत असतात. सदरची प्रवाहीका अर्जदार यांचे शेतामधून गेली आहे. म्हणून अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक संरक्षण कायदयानुसार ग्राहक होऊ शकत नाहीत असे या मंचाचे मत आहे. त्यामूळे अर्जदार यांची त्या अनुषंगाने केलेली ऊस जळीताची नूकसान भरपाईची मागणी करता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार क्र.1 हे मूदखेड गावांचे मूळ रहीवासी असून अर्जदार क्र.2 हे अर्जदार क्र.1 घरजावई होत. प्रत्यक्षात ऊस अर्जदार क्र.1 चे नांवे कारखान्यास पाठविल्याचे दाखल कागदपञावरुन स्पष्ट होत आहे. प्रत्यक्षात अर्जदार यांनी लाईट बिल दाखल केलेले आहे. सदरचे लाईट बिलावर अर्जदार क्र.2 यांचे नांव नमूद केलेले आहे. अर्जदार यांचे या सर्व गोष्टी विसंगत अशा आहेत. ग्राहक सरंक्षण कायदयाचा गैरफायदा घेण्याचे उददेशाने अर्जदार यांनी ओढूनताणून प्रत्यक्ष अर्जाची बांधणी केलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना अशा प्रकारचा अर्ज दाखल करुन नाहक खर्चात टाकलेले आहे. गैरअर्जदार यांनी या मंचाची नोटीस मिळाल्यानंतर गेरअर्जदार हे वकिलामार्फत या मंचात हजर झालेले आहेत. त्यांचे मार्फत त्यांनी लेखी जवाब व शपथपञही दाखल केलेले आहे. त्या अनुषंगाने गैरअर्जदार यांना नाहक खर्चही सोसावा लागलेला आहे यांचा विचार होता गैरअर्जदार हे अर्जदार यांचेकडून कॉम्पेसेटरी कॉस्ट रक्कम रु.1,000/- वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ व गैरअर्जदार यांनी दाखल केलेला जवाब शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ तसेच दोन्ही पक्षांनी वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांना अर्ज नामंजूर करण्यात येतो. 2. अर्जदार क्र.1 व 2 यांनी गैरअर्जदार यांना कॉम्पेसेटरी कॉस्ट म्हणून रु.1,000/- दयावेत. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |